तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार ,
सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार
शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार
वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार -
देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार
शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार -
आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार !
सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार
'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार
'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार
निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार
'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!