नमस्कार मिपाकर !
येत्या शनिवारी (दि. १५ जानेवारी २०११) संध्याकाळी आम्ही 'उभ्या उभ्या विनोद' (अर्थात मराठीत 'स्टँड अप कॉमेडी'!) 'कॅन्सास सिटी - कॅन्सास' इथे सादर करत आहोत.
त्याचप्रमाणे शनिवार (दि. ५ फेब्रुवारी २०११) ह्या दिवशी आम्ही 'आल्बनी - न्यू यॉर्क' इथे हा कार्यक्रम सादर करणार आहोत.
कॅन्सास सिटी आणि आसपासचा भाग तसेच आल्बनी आणि आसपासचा भाग इथे राहणारे कुणी मिपाकर असतील आणि ते कार्यक्रमाला येणार असतील तर भेटायला नक्की आवडेल. कार्यक्रमाची वेळ इ. अधिक माहितीसाठी कृपया त्या भागातील मराठी मंडळांना संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 10:40 pm | टारझन
कार्यक्रमास शुभेच्छा. माझी सिडनीत एक महत्वाची मिटींग आहे , त्यामुळे हे एकदोन महिने मी वेलिंग्टन - सिडनी दौर्यांवर असेन . चित्रे साहेब कार्यक्रमाची रेकॉर्डींग फ्लॉपी वर सेव्ह करुन क्रुरियर करा :)
बेस्ट लक .
- बीजी पांडे (लापतागंज)
13 Jan 2011 - 10:45 pm | सुनील
ऑस्ट्रेलियात पूर आल्याचे समजते. पोहोण्याचे कपडे घेऊन जावेत, हा सल्ला!
आणि हो, तिथे भारतीयांवर हल्ले होतात असे ऐकून आहे!
बाकी उभ्या कट्ट्यास शुभेच्छा!
17 Jan 2011 - 6:48 pm | विजुभाऊ
आणि हो, तिथे भारतीयांवर हल्ले होतात असे ऐकून आहे!
ते रस्त्यावर चालताना होतात. रस्त्यावर पोहोताना होत नाहीत
14 Jan 2011 - 3:59 am | निनाद
टारझन साहेब आल्यावर नक्की भेटा!
-
14 Jan 2011 - 7:03 am | शिल्पा ब
अरे वा!!! तुम्ही पण परदेशात जाताय...आजकाल अशा जाहिरातींचं काँट्रॅक्ट घेतात असे काहीसे ऐकून आहे त्या सुविधेचा लाभ घेता आला असता...
14 Jan 2011 - 10:52 am | बबलु
हा हा हा !! शिल्पा.... सर्वात बेष्ट प्रतिसाद. :) :)
_/\_ तुस्सी ग्रेट हो. :)
14 Jan 2011 - 12:28 pm | निनाद
परदेशात एका पायावर जायला तयार आहे. पण बायको मुली तयार नाहीत त्यांना हितंच आवडते. काय करणार? त्यामुळे बसलोय इथेच... :(
तरीही वेळ आली तर येण्या आधी जाहिरातींचं काँट्रॅक्टचे टेंडर काढूच! तुम्ही आधीच विषय काढलेला आहे त्यामुळे प्रायोरिटी देऊच ;)
14 Jan 2011 - 12:35 pm | टारझन
तो विषय शिल्पा ने काढलेला नाही. एखादा भाडोत्री गुर्जी बिर्जी बघायचा. तो मस्त लेखातुन पब्लिकसिटी करुन देतो. :) मिपालिक्स वाचत नाय काय तुम्ही ? चुकीच्या ठिकाणी चुकीची जाहीरात कराल तर फसाल :)
- ( कन्सल्टंट ) टारेश पर्यायसुचवी
14 Jan 2011 - 12:44 pm | निनाद
ते गुर्जी आणि मोठी मोठी विक्षिप्त मान्स!
आपलं काम छोटं आपान संक्षिप्त मान्स!
आपल्याला परवाडनार का भौ?
14 Jan 2011 - 12:51 pm | टारझन
"दुसर्याचं ते मोठं , आणि स्वतःचं ते छोटं " ह्या वैफल्यग्रस्त विचारसरणी ला माझ्या मानसोपचारतज्ञ डॉक्टर मित्राच्या मते इन्फेरियॉरिटी काँप्लेक्स असे म्हणतात. जालावर वावरताना आपलंच मोठं आणि आहे त्यापेक्षा २ इंच जास्त दाखवायचे असते हा बेसिक नियम लक्षात ठेवावा. हाच सल्ला ह्याच शब्दांत मिपा ज्येष्ठांकडुन ऐकला होता. जनकल्याणार्थ इथे देत आहे ;)
- (जनहितचिंतक) जिहाद
15 Jan 2011 - 3:41 am | निनाद
सल्ल्य्या बत्तल धणुर्वात!
जे नाही ते ऐनवेळेला दाखवायला जमले पाहिजे ना गुर्जी?
जे आहे आणि जसं आहे ते संक्षिप्तच बरं आहे.
आपण तेव्ह्ढ्यातच आनंदी आहोत.
17 Jan 2011 - 6:58 pm | नरेशकुमार
हे काय टारु भौ, फकस्त २ इन्च.
आजकाल ८-१० इन्चाचा जमाना आहे.
14 Jan 2011 - 12:36 pm | शिल्पा ब
तुम्हाला उद्देशुन नाही लिहिलं पण आता विषय काढला आहेच तर , ते जर्मनीवाले म्हणजे जर्मन बायको, सासु सासरे, बाटलीतलं पाणी पित घरातुन दिसणारा डोंगर पहाणारे निनाद वेगळे का तुम्हीच आय डी बददला?
14 Jan 2011 - 12:42 pm | निनाद
फाइव्ह स्टारवाले निनाद साहेब वेगळे हो!
मी आपला चित्रपट ओळखवाला निनाद (बिल्ला नं. येगळा हाये आम्चा!)
18 Jan 2011 - 12:30 am | निनाद मुक्काम प...
हे मात्र खरे
उच्च रहाणी व साधी विचारसरणी असे आमचे जीवनविषयक सूत्र आहे .
बाकी उपक्रम चांगला आहे . तू नळी वर यायची .
वाट पाहत आहे .ह्यात विनोदाचा दर्जा किती चांगला वाईट ह्यांचे मूल्यमापन करण्यापेक्षा परदेशातील आपले बांधव नवीन संस्कृती आत्मसात करताना दैनंदिन आयुष्यातील अनुभव मार्मिक रित्या व्यक्त करतात .तेव्हा तेथील त्यांच्या भाव विश्वाचे दर्शन घडते .
सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील भावना ओठावर येतात .
त्याला दाद मिळते तेव्हा होणारा आनंद हि खरी कमाई
18 Jan 2011 - 12:42 am | कुंदन
ते म्हणजे "मोठ्ठ्या सहीवाले" निनाद.
18 Jan 2011 - 1:59 am | गणपा
बर तरी बर, तुझी सही खुप लहान आहे. ;)
14 Jan 2011 - 12:06 pm | योगी९००
टारझणभाऊ..
फ्लॉपीपेक्षा विडीओ कॅसेट करून घ्या.
अवांतरः
कार्यक्रमास शुभेच्छा..!!
17 Jan 2011 - 7:00 pm | नरेशकुमार
कशाला एवढे कश्ट
त्यापेक्षा पेन ड्राईव्ह मधुन सेव्ह करुन घ्या.
13 Jan 2011 - 11:07 pm | ५० फक्त
कार्यक्रमास शुभेच्छा.
14 Jan 2011 - 12:46 am | Nile
कार्यक्रमास शुभेच्छा. कार्यक्रमाची लिंक असेलकृपया द्या, त्याभागातील काही मित्रांना पाठवु शकेन.
14 Jan 2011 - 1:50 am | रेवती
कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
14 Jan 2011 - 3:51 am | शिल्पा ब
कार्यक्रमास शुभेच्छा. कार्यक्रम झाल्यावर त्याची लिंक जरुर द्या.
14 Jan 2011 - 3:57 am | निनाद
असेच म्हणतो!
14 Jan 2011 - 3:52 am | नंदन
दोन्ही कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा, संदीप!
14 Jan 2011 - 8:53 am | यशोधरा
संदीप, दोन्ही कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा!
14 Jan 2011 - 9:56 am | राजेश घासकडवी
५ फेब्रुवारीला आल्बनीला...
14 Jan 2011 - 10:06 am | नावातकायआहे
उभ्या उभ्या शुभेच्छा!
नंतर लिंक द्या...
14 Jan 2011 - 10:11 am | रोमना
हार्दिक शुभेच्छा
लिंक असल्यास जरुर द्या.
उभ्या उभ्या हसुन घेऊ.
14 Jan 2011 - 10:58 am | नगरीनिरंजन
ब्बॉर!
अजून एकदोन विनोद सांगितले असते उभ्या उभ्या तर आम्हीपण हसलो असतो उभ्याउभ्या.
असो. उसातले लोक हसावेत अशी शुभेच्छा.
14 Jan 2011 - 12:21 pm | फारएन्ड
संदीप, शुभेच्छा! नंतर अनुभव लिही!
14 Jan 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
कार्यक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा :)
शक्य झाल्यास परत आल्यावर तू-नळी वर व्हिडो चढवा.
14 Jan 2011 - 1:25 pm | प्राजक्ता पवार
दोन्ही कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा!
14 Jan 2011 - 2:11 pm | रामदास
कार्यक्रमाची लिंक द्या हो. बरीच नवी मंडळी आहेत त्यांना लाभ घेता येईल.
कार्यक्रमास शुभेच्छा.
14 Jan 2011 - 2:42 pm | इन्द्र्राज पवार
संदीप....तुझ्या आणि तुझ्या ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न व्हावेत यासाठी हार्दिक शुभेच्छा !!
दोन्ही कार्यक्रमांचे इथे मिपावर 'रीपोर्टिंग' [लेख रूपात] अवश्य करावे.
इन्द्रा
14 Jan 2011 - 6:24 pm | मी-सौरभ
जो तो फक्त फु़कट व्हिडो बघायला मागतो... :(
संदीपः पुण्या मुंबईत पण कार्यक्रम आहे का? मी येईन बघायला.
14 Jan 2011 - 8:30 pm | संदीप चित्रे
शुभेच्छांसाठी धन्यवाद!
आधी एकदा सादर केलेल्या कार्यक्रमाची झलक इथे देत आहे !
http://www.youtube.com/watch?v=fdUrf5YdAnE&feature=player_embedded
15 Jan 2011 - 7:01 am | मदनबाण
कार्यक्रमास शुभेच्छा... :)
कार्यक्रम झाल्यावर लिंक डकवा हिथ.
17 Jan 2011 - 7:39 pm | पंगा
बाकी सर्व ठीक आहे हो (म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा, वगैरे वगैरे), फक्त ते 'स्टँड-अप कॉमेडी'ला तेवढे 'उभ्या उभ्या विनोदा'ऐवजी दुसरे काहीतरी म्हणता येईल का, प्लीज?
नाही म्हणजे, मग प्रतिसादांतूनसुद्धा प्रत्येकजण मग उगाचच काही ना काहीतरी 'उभ्या उभ्या अमूकअमूक', 'उभ्या उभ्या तमूकतमूक' वगैरे म्हणू लागतो.
म्हणजे एरवी तशी हरकत नाही, पण मग उगाचच आळंदीच्या वाटेवरच्या विस्मरणात गेलेल्या संत-संतीण जोडप्याची राहूनराहून आठवण येऊ लागते.
बाकी चालू द्या.
18 Jan 2011 - 12:48 am | अडगळ
बाकी सर्व ठीक आहे हो (म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा, वगैरे वगैरे), फक्त ते 'स्टँड-अप कॉमेडी'ला तेवढे 'उभ्या उभ्या विनोदा'ऐवजी दुसरे काहीतरी म्हणता येईल का, प्लीज?>> याच्याशी सहमत.
उभ्या उभ्या विनोद हे नावच फार भयानक आहे.
उद्या 'रॅपिड फायर राऊंड' ला "कचाकच प्रश्न" असं नाव दिलं नाही म्हणजे झालं.
18 Jan 2011 - 9:37 am | आजानुकर्ण
हॅहॅहॅ बसल्या बसल्या केलेला विनोद आवडला. उभ्या उभ्या विनोदाला वाचून मलाही आळंदीच्या शेतातले गहू आठवले.
कार्यक्रमाला शुभेच्छा.
17 Jan 2011 - 8:10 pm | स्वाती दिनेश
कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
स्वाती
18 Jan 2011 - 12:40 am | कुंदन
तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा!!!
१५ लाच परदेशात (दुबैला) आलो त्यामुळे त्यादिवशीचा कार्यक्रम हुकला.
आता शनिवार (दि. ५ फेब्रुवारी २०११) कसे जमवता येईल ते बघतो.