एक कहाणी ( प्रेम) २

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in कलादालन
7 Jan 2011 - 4:47 pm

सोमवार सकाळ : गाडी आधल्या दिवशी मस्त घुवून करून आणलेली , मी पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घालून ( कोणी तरी तेंवा सांगितले होते कि हे कॉम्बी. लई भारी मुलीना आवडते म्हणून.) . गाडी आणि स्वारी दोन्ही खुशीत .... कोलेज जवळ एका स्टाल वरून एक मस्त फ्रेंड शिप बेल्ट घेतला नी तिला क्लास सुटल्यावर गाठला . नशिबाने तेंवा रस्त्याला वर्दळ कमी होती . लई डेरिंग केले आणि म्हटला " माझ्याशी फ्रेंड शिप करशील का? " ती म्हणाली " नाही" . मी हिरमुसलो . परत घरी आलो . मित्रांनी सारखे फोन केले आणि बोलावले म्हणून निघालो . रस्त्यात जोरात पाऊस आला म्हणून गाडी रस्त्यावर लाऊन एका आडोश्याला थांबलो . काय भाग्य माझे... प्रत्यक्ष ती भिजत भिजत जात होती . मी धावत जाऊन तिला हाक देली ती दचकून थांबली . मी तिला म्हटले ," अगं पोरी भिजू नकोस इकडे आडोसा आहे थांब इथे थोडा वेळ ." तो आडोसा बराच मोठा होता त्यामुळे तिथे आम्ही आणि बरेच अजून काका... मामा ... सारखे लोक होतेच . काही वेळ झाला आणि पाऊस थांबायचे नाव घेत नवता. तिची चल बिचल सुरु झाली . मी तिला विचार ले , " काय झाले ? " ती उत्तरली ," लेक्चर ला उशीर होतोय. " कदाचित तिला अवघडल्या सारखे होत असेल म्हणून मी पावसात धावत जाऊन रिक्षा थांबवली ( आई शप्पत तेंवा आई साठी पण नाही हो एवडे कधी केले. पण आत्ता करतो ) . ते त्या रिक्षा ने ती निघून गेली. पाऊस कमी झाल्यावर मी पण कॉलेज कॅन्टीन ला गेलो आणि मित्रांच्यात बसलो. काही वेळानी ती आणि तिचा सर्व कंपू कॅन्टीन मध्ये आला . मी परत नेहमी प्रमाणे टक लाऊन ( नजर ठेऊन म्हणा ना. ) बसलो. तशी तिला माझी नजर तिच्यावर आहे हे कदाचित ठाऊक होते त्या मुळे ती अवघडून गेली होती. आणि मी तिला पाऊसात पाहिलेले रूप आठवत होतो . भिजलेले केस कपाळावरून निथालणारे पाण्याचे थेंब. आणि ती चे मुळचे सौंदर्य .
नंरात नवा कंपू म्हणून माझे सर्व मित्र त्या मुलींच्या घोळक्यात गेले नी ओळख करून घेण्यात गुंतले . मी ही त्यांना जाऊन जॉईन केले. त्यावेळी मात्र तिने माझ्या शी फ्रेंड शिप केली . आणि बेल्ट बांधून घेतला आणि मला पण एक बेल्ट बांधला सुद्धा . आमच्या मैत्रीची सुरवात तर झाली होती.

कथा

प्रतिक्रिया

गाडी आधल्या दिवशी मस्त घुवून करून आणलेली

कोलेज जवळ एका स्टाल वरून एक मस्त फ्रेंड शिप बेल्ट घेतला नी तिला क्लास सुटल्यावर गाठला(?)

तिला हाक देली

मी तिला विचार ले

माझ्या शी फ्रेंड शिप केली

नन्दादीप's picture

7 Jan 2011 - 5:09 pm | नन्दादीप

झाला...भेटला नविन बकरा....वाचव रे बाबा चिपलून्करा स्वत:ला....

चिप्लुन्कर's picture

7 Jan 2011 - 5:31 pm | चिप्लुन्कर

हि एक कहाणी (प्रेम) १ अशि आहे . यात नावात बदल करायचा आहे कसा करणार . मार्ग दर्शन अपेक्षित

५० फक्त's picture

7 Jan 2011 - 5:54 pm | ५० फक्त

''लई भारी मुलीना आवडते म्हणून'' म्हणजे तुमची ती लई भारी होती हे सांगायचं आहे का ?
" नंरात नवा कंपू म्हणून " - नंरात / नरात / नरांत - नक्की काय म्हणायचे आहे.
''" अगं पोरी भिजू नकोस इकडे आडोसा आहे थांब इथे थोडा वेळ .'' एकदम सुर्यकांत / चंद्रकांत टाईपचा डायलॉग वाटला.
'' ते त्या रिक्षा ने ती निघून गेली.'' अशी वाक्य्ररचना कहाण्यांत असते - तो नागकन्या देवकन्या जागत्या जात्या जाहल्या.

चिपळुणकर,

अहो, गमभन / बराहा डाउनलोड करुन इन्स्टॉल करा, गुगलचं ऑनलाईन ट्रान्सस्क्रिपशन बरंचसं हिंदीला जवळचं आहे मराठीपेक्षा. "मराठी असे आमुची मायबोली" म्हणुन असं नका करु हो.

नाहीतर ,

बापु ने कहा चाचा आजमेर गये तो मँने सुना चाचा आज मर गये, अशी स्टोरी होईल.

निवांत घ्या, कथावस्तु चांगली आहे, मी सुद्धा याच विषयावर लिहिलं आहे काही दिवसापुर्वी, तुम्ही लिहिलेलं वाचताना ते पुढं न्यायचं आहे याची आठवण झाली, त्या बद्दल धन्यवाद.

हर्षद.

विजुभाऊ's picture

7 Jan 2011 - 6:10 pm | विजुभाऊ

तिने माझ्या शी फ्रेंड शिप केली . आणि बेल्ट बांधून घेतला आणि मला पण एक बेल्ट बांधला सुद्धा
ओ चिप्लुन्कर साहेब बेल्ट कमरेला बांधतात बॅन्ड हाताला बांधतात. तुमचे प्रेम बरेच मोठ्ठे आणि घट्ट दिसतय एकदम कमरेला रिस्ट बॅन्ड ऐवजी कमरेला बेल्ट बांधताय.
अवांतरः तुमचे लिखाण वाचल्यावर प्रवीन भ्पकर या सदस्याची आठवण झाली डोळे पाणावले

चिप्लुन्कर's picture

7 Jan 2011 - 6:46 pm | चिप्लुन्कर

संपादक मंडळाला विनंती आहे कि या लेखाचे शीर्षक एक कहाणी (प्रेम) १ असे करावे.

वा ! पौगंडावस्थेची आठवण करुन देणारा लेख. एकेकाचं "व्यक्तिचित्र" उभं करण्याची हातोटी आहे लेखका कडे. उत्तम. अजुन येऊ द्या :) एका दिवशी दहा लेख टाकलेत तरी हरकत नाही :) छाण लिहीताय.

- चिपळ्या

गणपा's picture

7 Jan 2011 - 7:07 pm | गणपा

कधी पासुन फोटो शोधतोय, पण अजुन एकही स्क्रिनवर उमटला नाही.

शिल्पा ब's picture

8 Jan 2011 - 1:17 am | शिल्पा ब

हे आणि काय आता?

विजुभाऊ's picture

8 Jan 2011 - 11:47 am | विजुभाऊ

हा घ्या फोटू गणपा काका

dog