भारतातील मंदिरे
(भारतातील मंदिरांचा इतिहास,त्यांच्या उभारणीमधील वेगवेगळ्या शैली, त्यांतील उपशैली, निरनिराळ्या प्रांतातील देवळांत आढळणारे फ़रक, तसेच वैयक्तिक देवळातील वैशिष्टे, नेमके काय पहाण्यास विसरू नये यांची तोंडओळख करून देणारी लेखमाला. इथे आपणास काही पारिभाषिक शब्दांची सूचीही पहाता येईल. तिचा उपयोग आपणाला इतर तांत्रिक लेख वाचतानाही होईल. विषयाचा आवाका फ़ार मोठा असल्याने जास्त माहिती देणे शक्य नाही. दिग्दर्शन एवढाच माफ़क उद्देश.)
इतिहास.
आपण लहानपणी देवळात जातो. मोठेपणी जातोच असे नाही.पण देवळांबद्दलचे एक आकर्षण मनात घर करून रहातेच. ही भावना सर्व भारतीयांच्या मनात शेकडो वर्षे घर करून राहिली आहे.त्यामुळे क्षेत्रांमध्ये सोडाच पण पुण्यासारख्या शहरातही शेकडो देवळे आढळतात. हिंदू धर्मात अनेक देव असल्याने त्यात भर पडते. वर्षानुवर्षे कलाकारांनी अपार कष्ट करून जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यामुळे देवळे भक्तांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आकर्षणे ठरली आहेत. तर अशी ही देवळे बांधावयास सुरवात तरी केंव्हा झाली ? किंवा असे विचारले की सर्वात पुरातन देऊळ पहावयाचे असेल तर ते कोणत्या शतकातील असेल ? माझी खात्री आहे बहुतेकांचा अंदाज चुकीचा असेल. बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
पुराणांनी जेव्हा शंकर, विष्णु असे "सगुण" देव "हिंदू" धर्माला दिले तेंव्हा देवळे बांधावयाची सोय झाली. पहिल्यांदा मूर्ती आली व नंतर तीचे घर.आधीच्या वाङ्मयात उल्लेख असले तरी दगड विटांची टिकावू देवळे उभारावयाची वेळ तिसऱ्या शतकातच आली. शंख-चक्र-गदा-पद्मधारी मूर्तीची पूजाअर्चा करावयाची तर गाभारा पाहिजे, चार लोकांना बसावयाला मंडप पाहिजे, प्रदक्षणा मार्ग पाहिजे. बस, सुरवातीच्या देवळात एवढीच सोय होती. मध्य प्रदेशातील तिगवा "कंकाली मंदिर" सर्वात जून्या देवळातील एक. गाभारा बाहेरून पावणेचार मि.लांब-रूंद, आतल्या बाजूने अडीच मि.चौरस.समोरचा मुखमंडप पावणेचार मि.लांब व पावणेदोन मि. रुंद आहे. चार स्तंभ, त्यावर पूर्ण कलश व सिंहाच्या मूर्ती. सपाट छप्पर.द्वाराभोवती गंगा- यमुनेच्या मूर्ती. पूजेला आवश्यक तेवढ्याच भागांचा समावेश. पण सुरवात जरी अशी साधी-सुधी असली तरी पुढील प्रगती भराभर झाली.याचे कारण परत अगदी साधे. बौद्ध-जैन स्थापत्यकलेमुळे कलाकार कलेत आणि तांत्रिक बाबतीत परिपूर्ण होते. काय करावयाचे सांगा. कसे करावयाचे आम्ही बघू. बुद्ध हवा? बुद्ध घ्या. शंकर हवा? शंकर घ्या; तितकाच सुंदर. काय बांधावयाचे, कसे बांधावयाचे ते ठरवण्यास एक दोन शतके लागली. हा काळ चाचपणीचा (trial and error) होता. निरनिराळ्य़ा शैलींचा उगम या काळातीलच. आज पाहावयास मिळणारे सर्वात जुने देऊळ, तिगवा, मध्यप्रदेश.
सुरवातीलाच मी काही पारिभाषिक शब्दांची सूची देतो आहे. त्याची गरज भासेलच असे नाही. पण माहिती असेल तर नागर-द्रविड शैलींमधील बारकावे समजावून घेणे सोपे जाईल.
अर्धमंडप: मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरचा लहान आकाराचा, तीन बाजूंनी उघडा असलेला मंडप.
अर्धस्तंभ: भिंतीत गुंतवल्यामुळे ज्यांचा अर्धाच भाग दृष्टीस पडतो असा खांब.
आमलक: शिखराच्या माथ्यावर येणारे, रायआवळ्यासारख्या खाचा असलेले दगडी चक्र.
उत्क्षिप्त: भिंतीचे पुढे सरकलेले ( फ़ेकलेले म्हणजे क्षिप्त ) काही भाग यांना रथ असे म्हणतात.यांना विसंवादी, मागे सरकलेले, उठाव .देणारे भाग म्हणजे उत्क्षिप्त.
उद्गम: भिंतीवर सजावटीसाठी वापरण्यात येणारे त्रिकोणी रूपक .
अंतराळ: देवळाचा गाभारा आणि मंडप यांच्या मधोमध येणारे दालन. आरंभी याच्यावर छप्पर नसे. पीठ : जोते
उपपीठ :पीठावर येणारे, कमी उंचीचे जोते किंवा चौथरा.
कपोत: सज्जा किंवा पागोळी .
कोष्ठ: कोनाडा
गजपृष्ठ: चापाकार वास्तूचे छप्पर.
जंधा: देवालयाच्या भिंतीचा मधला भाग.हा सहसा सपाट असून यावर मूर्तिकाम केलेले आढळते.
तरंगहस्त: bracket.
प्रणाल: पन्हाळ.
भद्र: कोणत्याही इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर बांधण्यात येणारा उघडा मंडप.
भूमी: मजला.
मंडप: आयताकार दालन. विशेषत: गाभाऱ्य़ासमोरील.
रथ: गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे. हे एकापुढे एक सरकतात. या रथांच्या संख्येवरून विधानाला त्रिरथ, पंचरथ अशी नावे देतात.
वितान: छत.
विमान: गाभारा व शिखर यांना मिळून दिलेले नाव.
वेदिका: कठडा.
व्याल: सिंह, वाघ, हत्ती अशा निरनिराळ्या प्राण्यांचे अवयव जोडून केलेला प्राणी.शरीर मुख्यत्वे सिंहाचे असते.
शाला: आयताकार विधानाची इमारत.
शिखर: छप्पर. यात कळसाचाही समावेश होतो.
शुकनास: "अंतराळ" य़ा भागावर येणारे गोलाकर छप्पर. याच्या लहान बाजूंपैकी एक शिखराला चिकटलेली असते तर दुसरीत कोनाडा करून देवमूर्ती बसवतात.
हस्त: क्षिप्त भाग. Bracket सारखा बाहेर आलेला भाग
काही इन्ग्रजी शब्दही बघू.
Apsidal : चापकार विधानाची वास्तू.
Arc : कमान
Barrel vaulted roof : गजपृष्टाकार छप्पर.
Brace: कर्ण
Bracket : हस्त
Capital : स्तंबशीर्ष, मथळा
Ceiling : छत, वितान
Column : खांब
Facade : गृहमुख
Frieze : शिल्पपट्ट
Medallion: तबक
Monolithic : एकपाषाणी
Motif : रूपक
Pilaster : अर्धस्तंभ
Plan : पदविन्यास,विधान
Recess : प्रतिक्षेप
Relief : उठाव
बुद्ध-जैन स्थापत्यकलेचा देवळांवरचा परिणाम
बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेचच त्याच्या अवशेषावर (उदा. दात ) इमारत बांधावयास सुरवात झाली. तसेच विहार, चैत्य यांचीही उभारणी सुरू झाली. हा काळ सुमारे इ.स.पूर्व ४०० च्या आधी. बौद्ध धर्माचा ओसर इ.स. ३०० ते ४०० धरला तर जवळजवळ ७०० वर्षे ही बांधकामे चालू होती. या काळात चाचपणी होत असणारच.हिंदू देवळांची लाकडी किंवा कच्च्या विटांची बांधकामे आधीपासून चालू असली पाहिजेतच कारण वाङ्मयात तसे उल्लेख मिळतात. कबूल. पण दगडांची देवळे तिसऱ्या शतका नंतरचीच मिळतात. त्या काळच्या स्थपती समोर विहार, चैत होते आणि देवळे बांधताना तो त्यांचा उपयोग करणारच. आधाराबाबत म्हणाल तर बौद्ध कलेचा देवळांच्या बांधणी वरचा परिणाम यावर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.. सुरवातीला म्हटल्याप्रमाणॆ विषयाचा आवाका मोठा असल्याने सगळ्याच गोष्टींबद्दल लिहणॆ अवघड आहे. क्षमस्व.
आता एक विनंती. लेखातील संदर्भाकरिता लागणारी चित्रे मी देईनच. पण आपणही आपल्याकडचे फोटो डकवलेत तर सगळ्यांच्या आनंदात भरेच पडेल.
शरद
प्रतिक्रिया
4 Jan 2011 - 1:01 pm | अवलिया
वा ! सुरेख लेखमाला सुरवात झाली आहे यात शंका नाही. मंदीरे आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर नेहमीच मोहवणारा असतो. हे मी शहरातल्या दोन बाय चारच्या मंदीरांबद्दल बोलत नाही. शेकडो वर्षांच्या परंपरा, रुढी असलेली, अनेक आख्यायिकांचा आधार असलेली मंदीरे हा भारतीय संस्कृतीचा अमुल्य ठेवा आहे.
शरद यांच्या या लेखमालेतुन आणि त्याला येणार्या प्रतिसादातुन बहुमुल्य अशी माहिती वाचायला मिळेल यात शंका नाही.
स्तुत्य लेखमाला !!
4 Jan 2011 - 1:05 pm | प्रचेतस
खूपच सुरेख लेखमाला. हेमाडपंथी मंदिरे, शिलाहार भोज -झंझ राजाच्या कारकिर्दीत बांधल्या गेलेल्या मंदिरांबद्दल पुढे अधिक वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
4 Jan 2011 - 1:06 pm | ५० फक्त
श्री. शरद,
एक छान विषय सुरु केल्याबद्दल अतिशय धन्यवाद. माझ्या संग्रहात काही फोटो आहेत. ते पिकासावर लावुन आपल्याला लिंक देईन, उपयोगी पडल्यास त्यांचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान मिळेल.
हर्षद.
4 Jan 2011 - 1:10 pm | भाऊ पाटील
छान मेजवानी मिळेल असं दिसतय!
पुढच्या भागांच्या प्रति़क्षेत.
4 Jan 2011 - 1:11 pm | sagarparadkar
छान लेख ....
माझ्या माहितीत कुंटे आडनावाचे अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी आज्जी-आजोबा आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर बराच प्रवास करून अनेक दुर्मिळ मंदीरांचे फोटो व त्यांचा इतिहास गोळा केलेला आहे. त्यांनी 'बालगंधर्व' ला त्यांच्या त्या संग्रहाचे प्रदर्शन देखील भरवले होते. आता त्यांच्याशी बरेच वर्षात संपर्क नाही, पण थोडीफार शोधाशोध केल्यास त्यांचा पत्ता मिळू शकेल ...
आपला लेख वाचून त्यांची आठवण झाली.
(योगायोगाने ते कुंटे आपणच असल्यास आपाणांस हार्दीक शुभेच्छा)
4 Jan 2011 - 3:27 pm | विजुभाऊ
हे बघा भारताबाहेरील प्राचीन मंदीर. आंग्कोर वात चे हे मंदीर.
.
.
आणि हे पहा या एकसंध नसलेल्या दगडातून घडवलेल्या मूर्ती
कंबोदीयातील हे विष्णुचे मंदीर सूर्यावरम या राजाने बांधलेय
4 Jan 2011 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार
हि लेखमाला देखील सुंदर होणार हे निश्चीत.
काका लेखना बरोबरच फोटोपण देता येतील का ? त्यामुळे शैली समजायला सोपे जाईल असे वाटते.
अवांतर :- विजुभौ कॅमेर्याचे शटर बंद करुन काढलेत का हो हे फोटु ?
4 Jan 2011 - 2:06 pm | सूड
हा लेख छानच !!! पुभाप्र !!
4 Jan 2011 - 2:37 pm | विजुभाऊ
अरेच्चा त्या फोटोची लिंक ब्राउजरमध्ये चिकटवली तर दिस्ताहेत की ते फोटो
ओके
हे बघ
4 Jan 2011 - 2:42 pm | यशोधरा
सुरेख लेखमाला असेल असे वाटत आहे. वाचणार. :)
विजूभाऊ, फोटो दिसत नाहीत. केवळ ग्रे रंगाचे चौकोन दिसत आहेत :(
4 Jan 2011 - 2:53 pm | नन्दादीप
हेच म्हणतो,,,,,
4 Jan 2011 - 4:18 pm | धमाल मुलगा
शरदरावांचा लेख म्हणजे आमच्यासारख्यांसाठी पर्वणीच. :)
ह्या लेखात गमभन गिरवून तयार झालो आहोत. आता अंकलिपीची वाट पाहतोय. :)
शरदराव,
मंदिरांच्या स्थापत्यपध्दतीमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, अघोर, नाथ इत्यादींच्या पंथांप्रमाणे फरक असतात का हा प्रश्न खूप दिवस मनात घोळतोय.
हर्षदरावांनी दिलेल्या लिंकमध्ये भुलेश्वरच्या मंदिराचे फोटो आहेत ते मंदीर सर्वसाधारण भक्तीमार्गियांचे मंदिर नव्हते अशी ऐकिव माहिती आहे. ह्या/अशा मंदिरांसंदर्भातही काही माहिती सांगू शकाल काय?
(हे विषय पुढच्या भागांमध्ये येऊ घातले असल्यास इथे प्रकाश न टाकल्यास हरकत नाही. :) )
4 Jan 2011 - 9:04 pm | सर्वसाक्षी
ही माहितीपूर्ण लेखमाला वाचायला आवडेल
4 Jan 2011 - 11:16 pm | धनंजय
शरद यांनी लेखमाला पुन्हा देऊन उजळणी केली आहे, हे चांगले.
मात्र त्यांना अशी विनंती आहे : त्यांनी मागे जिथे लेखमाला दिली होती, त्याचा दुवा देऊन वाचकांची सोय करावी. तेथील प्रतिसादकांनी (आणि श्री. शरद यांच्या प्रतिसादांतही) अधिक माहिती दिली होती, आणि कठिण मुद्द्यांबाबत स्पष्टीकरणेही दिली होती. या सर्वांचा फायदा येथील वाचकांना व्हावा, अशी मदत करावी.
5 Jan 2011 - 7:55 am | शरद
पूर्व संदर्भ
ही लेखमाला पूर्वी उपक्रमवर प्रसिद्ध झाली आहे. (दि. २३-४ ते ५-६ - ०९). त्या वेळीं वाचकवर्गही भरपूर होता व अनेक मान्यवरांनी (सर्वश्री धनंजय, विसूभाऊ, चित्रा इत्यादी) त्यात स्वत:ची सुरेख व माहितीपूर्ण भर घातली होती. अशा केवळ माहिती देण्याकरिता लिहलेल्या मालिकेत वाचकांनी भाग घेतला तर माहितीत भर पडल्याने लेख जास्त वाचनीय होतो. या वेळीं ( त्या वेळच्या प्रतिसादांच्या मदतीने) लेख जास्त सुसंघटीत (cohesive) करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या आवडीचे फोटो अवष्य़ पाठवा व विचारलेल्या प्रश्नांना माहीत असतील तर उत्तरेही द्या.जेवढे जास्त वाचक यात सहभाग घेतील तेवढा सगळ्यांचा आनंद वाढणार आहे. लिंक कशी देतात ते मला कळत नाही, कोणी दिली तर हरकत नाही पण माझे असे वैयक्तिक मत आहे की नववाचकांनी एकदम सगळे लेख एका वेळीं वाचण्याऐवजी ते सावकाश प्रसिद्ध होत जातील तसतसे वाचण्यात जास्त मजा येईल. कॉफी घुटके घुटके घेत पिण्यातच आनंद आहे; ती काय घटाघटा प्यावयाची असते ? (कोणी रसिक कॉफी ऐवजी बीअर म्हणाला तरी चालेल, हा आपला माझा एक अंदाज ! ).
शरद
7 Jan 2011 - 10:30 am | ऋषिकेश
वर श्री. धनंजय म्हणाले असेच म्हणणार होतो. त्यावर हा खुलासा वाचला..
माहिती एकत्र करून नव्याने बांधलेल्या लेखमालेला शुभेच्छा! (आधीची लेखमाला वाचली असल्याने) अपेक्षा खूप आहेत त्या तुम्ही पूर्ण कराअल याची खात्री आहे.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
5 Jan 2011 - 12:48 am | विकास
माहीतीपूर्ण लेखमालीका होणार हे निश्चित!
तिगवा मंदीरांच्या संदर्भात उत्सुकतेने गुगलले तर खालील चित्र मिळाले:
त्यात बाहेरच उजव्या बाजूस पाहीले तर बुद्धासारखे काहीतरी कोरलेले आढळले, मात्र त्याचा संदर्भ काय असू शकेल ते समजले नाही.
5 Jan 2011 - 1:12 am | प्रशु
सुंदर उपक्रम..
पुढल्या लेखाची वाट बघतोय. जमल्यास ह्या विषयावर असलेली पुस्तके आणि छायाचित्रांची यादी द्यावी
धन्यवाद..
5 Jan 2011 - 6:18 am | जयंत कुलकर्णी
5 Jan 2011 - 8:11 am | सहज
संग्राह्य लेख!
5 Jan 2011 - 10:16 am | मृत्युन्जय
खुपच सुंदर. लेख छान. प्रतिक्रियाही उत्तम.
5 Jan 2011 - 10:22 am | पाषाणभेद
उत्तम लेख
6 Jan 2011 - 1:25 pm | JAGOMOHANPYARE
बरेच जण सांगतील इ.स. पूर्वी किमान ४००-५०० वर्षे. या काळातील बौद्ध स्तुप, विहार,चैत्य आपल्या समोर आहेत. पण देऊळ म्हणाल तर आपल्याला इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पुढे यावे लागते. कारण अगदी साधे आहे.बुद्ध-जैन धर्मांच्या आधी धर्म होता तो "वैदीक धर्म".त्यात इंद्र, वरूण इत्यादी देवता होत्या, यज्ञ होता, पण या गोष्टी देवालय बांधावयाला सोयिस्कर नव्हत्या.
वैदिक आणि अवैदिक या दोन्ही उपासना खूप जुन्या आहेत... उगाच हिंदुनी बौद्धांनंतर मंदिरे आणि मूर्त्या उभारल्या असे कशाला म्हणायचे? रामाने समुद्र ओलांडण्यापूर्वी रामेश्वरला शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली होती.. म्हणजे त्या काळात शिवलिंग आणि शिवलिंग्मंदिर असणार. श्रीकृष्णानेही गुजरात्जवळ समुद्र ओलांडून द्वारका बेटावर जाताना सोमनाथाची ( म्हणजे शिवलिंगाचीच ) पूजा केली होती.. ( आता आम्हीही समुद्र ओलाम्डणार असल्याने आम्हीही एक शिवलिंग पूजणार आहोत. :) ) वैदिक देवांच्या मूर्ती नसतात, वैदिक धर्म जुना आहे. पण मूर्ती पूजणारा शैव आणि इतर हिंदु पद्धतीही तितकीच जुनी आहे..
6 Jan 2011 - 7:12 pm | चित्रा
>> हिंदुनी बौद्धांनंतर मंदिरे आणि मूर्त्या उभारल्या असे कशाला म्हणायचे?
तसेच असावे. मूर्तीपूजा ही वैदिक धर्मात नाही. सध्याची हिंदू मूर्तीपूजा ही बौद्धांच्या काळानंतरच आली आहे. अर्थात बौद्धांच्याही आधी मातृदेवतांची पूजा आणि कुळाच्या नैसर्गिक दैवतांची पूजा ही होतच असावी.
7 Jan 2011 - 9:57 am | JAGOMOHANPYARE
मूर्तीपूजा वेदात नव्हती. पण वैदिकांच्याबरोबरच त्या काळात जो अवैदिक स्मूह होता , त्यातील बरेच लोक शिव, स्कंद, गणपती आणि विविध स्त्री रुप देवी यांचे पूजन करत होते. त्यांच्या मूर्ती होत्या आणि देवळेही होती... हिंदु धर्मातील स्कंद हाच देव बौद्धानी वज्रपाणी या रुपात उचलला. त्याच्याच नावावरुन वज्रयान हा संप्रदाय तयार झाला. हाच स्कंद दक्षिणेत मुरुगन नावाने ओळखला जातो आणि महाराश्ट्रात कार्तिकेय या नावाने गणपतीचा भाऊ म्हणून आपण याला ओळखतो. http://en.wikipedia.org/wiki/Skanda_(Buddhism) , सारांश, मूर्तीरुप देवपूजा ही बौद्धांच्या आधीपासून आहे.
लेखातच म्हटलेले आहे की पुराणांनी मूर्तीरुप देवता दिल्या. आणि त्यानंतर असेही म्हणायचे की बौद्ध धर्मानंतर मूर्तीपूजा आली. म्हणजे मग पुराणे बौद्धांच्या नंतर आली की काय? :)
6 Jan 2011 - 11:08 pm | चित्रा
शरद यांच्या देवळांवरील लेखांमुळे जरा कुतुहल चाळवलेले आहे. मला एक प्रश्न होता तो असा की -
देवळांवर प्राणी, फुले पाने असे काही कोरलेले नेहमीच आढळते. पण कुठचीही अवजारे, शस्त्रे अशी देवळावर कोरलेली पाहिली आहेत का? तसेच प्राणी जसे हमखास दिसतात तसे पक्षी कोरलेले दिसतात का?
7 Jan 2011 - 1:08 pm | शरद
श्री. जागोमोहनप्यारे :मी म्हटले आहे कीं सर्वात पुरातन मंदिर पहावयाचे असेल तर तिसर्या शतकापर्यंत यावे लागेल. त्या पूर्वी देवळे होती; तसे उल्लेख आहेत, पण ती देवळे लाकडी/वीटांची असावीत; ती आज पहावयास मिळत नाहीत.इ.स.पूर्व स्तूप, विहार पहावयास मिळतात.
लेखमाला आहे मंदिरांवर. मूर्तिपूजेवर नाही. तो विषय निराळा. आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर मीही माझ्याकडील मजेदार माहिती देईन.( उदा. बौद्धांची तारा ही देवता गणपतीवर नाचत आहे अशी मूर्तीही पहावयास मिळते!)
पुराणे अर्थातच बुद्धानंतर ६००-७०० वर्षांनंतरची आहेत.
श्री. चित्रा : शिल्पांत पक्षी (गरुड, हंस, गंडभेरुंड इत्यादी) आहेत. शस्त्रे योद्ध्यांच्या हातात आहेत. अवजारे नसावित कारण फार शोभादायक नाहीत म्हणून, हा माझा अंदाज. आज नजरेसमोर नाहीत पण आता लक्षात ठेवीन व दिसली तर कळवीन.
शरद
8 Jan 2011 - 1:44 am | चित्रा
>>शिल्पांत पक्षी (गरुड, हंस, गंडभेरुंड इत्यादी) आहेत.
पण पोपट, साळुंक्या, मोर असे फारसे दिसत नाहीत असे वाटते. निदान महाराष्ट्रातील साध्यासुध्या देवळांमध्ये विशेष पाहिलेले नाहीत असे वाटते.
>>अवजारे नसावित कारण फार शोभादायक नाहीत म्हणून, हा माझा अंदाज.
मलाही असेच वाटते, किंवा कदाचित मंदिरांवर काय असावे याचे नियम असतील.
>>आज नजरेसमोर नाहीत पण आता लक्षात ठेवीन व दिसली तर कळवीन.
धन्यवाद.
7 Jan 2011 - 4:37 pm | JAGOMOHANPYARE
आपण त्यावर लेखमाला लिहलीत तर मीही माझ्याकडील मजेदार माहिती देईन.( उदा. बौद्धांची तारा ही देवता गणपतीवर नाचत आहे अशी मूर्तीही पहावयास मिळते!)
पुन्हा तेच ! आता हिंदुंच्या मूर्ती या जर बौद्धांच्यानंतर आल्या, तर या ताराबाईला टाळक्यावर नाचायला गणपती कुठून सापडला ???? :)
आणि मुळातच बौद्ध धर्मात देव असणं हाच मोठा विनोद आहे... बुद्धानी देव नाकारलेला असून बौद्ध धर्म हा एक नास्तिक धर्म आहे.. ( नास्तिक दोन्ही अर्थाने- वेदानाही मानत नाहीत आणि देवानाही मानत नाहीत. ) त्यांच्या अनुयायानी हे असे देव तयार केले.
पुराणे अर्थातच बुद्धानंतर ६००-७०० वर्षांनंतरची आहेत.
तुम्हाला कोपरापासून दंडवत ! सन ७८६ पूर्वी जग आस्तित्वातच नव्हते असेही म्हणणारे लोक आहेत!! त्यांच्यापुढे तुमचे 'हे ' संशोधन काहीच नाही !! :) बुद्धानंतर ६०० वर्षानी हिंदु मूर्ती आल्या असे म्हणताय, मग इ स पूर्वी जी लाकडाची आणि विटांची देवळं होती असे तुम्ही म्हणताय, त्या देवळात कोण बसत होतं??? :)
बौद्ध धर्मात जे लोक गेले ते त्या काळातले पूर्वीचे हिंदुच तर होते.. म्हणजे बुद्धापूर्वी वास्तु आणि स्थापत्यचे ज्ञान लोकाना नव्हते आणि अचानक बौद्ध धर्मात गेल्यावर या लोकाना वास्तु आणि स्थापत्य ज्ञानाचा दृष्टांत झाला की काय? :) .. हिंदु धर्म बाकी धर्माना अर्वाचीन कसा हे सिद्ध करायची आजकाल चढाओढच लागलेली आहे.. ! :)
8 Jan 2011 - 2:24 am | चित्रा
बौद्ध धर्मात जे लोक गेले ते त्या काळातले पूर्वीचे हिंदुच तर होते.. म्हणजे बुद्धापूर्वी वास्तु आणि स्थापत्यचे ज्ञान लोकाना नव्हते आणि अचानक बौद्ध धर्मात गेल्यावर या लोकाना वास्तु आणि स्थापत्य ज्ञानाचा दृष्टांत झाला की काय? हिंदु धर्म बाकी धर्माना अर्वाचीन कसा हे सिद्ध करायची आजकाल चढाओढच लागलेली आहे.. !
असे नसावे. जैन, बौद्ध आणि वैदिक अशा तीन ढोबळ पद्धती धरल्या, तर हे सर्व एकमेकांकडून काही ना काही विचार/आचार घेऊनच तयार झाले असावेत.
बौद्ध धर्मात गेल्यावर स्थापत्याचा दृष्टांत झाला नाही, तर अशोकाच्या आणि त्याच्यानंतरच्या काळात बौद्ध मठांना जे दान दिले गेले, त्यातून मठांकडे पैशाचा ओघ वाढला आणि स्तूप बांधता आले. जैनांचीही देवळे नंतरच झाली. गुप्तकाळात व्यापार-उदीमही वाढला असावा, त्यामुळे हिंदू देवतांची देवळे बांधली गेली असावी.
याउलट तत्कालीन बौद्ध जैन किंवा हिंदू असा कुठचाही शिक्का नसलेली घरे/राजवाडे यांचे अवशेष फारसे दिसत नाहीत, कारण त्यांच्याकडे हे खूपकाळ टिकणारे बांधकाम साहित्य (दगड) नसावेत/तेवढे उत्खननही शक्य नसावे. विटामातीची घरे, किंवा लाकडी/गवताची घरे नष्ट झाली असतील. जे दगडात कोरले होते ते तसेच राहिले. पण बौद्धांआधी नागरी स्थापत्य नव्हते असे समजण्याचे कारण नाही. कुठच्याही काळातील लोकांची राहणी कशी होती याबद्दल आपल्याला भित्तीचित्रांमधून, शिल्पांमधून काही ना काही समजतच असते.
हे बघा
किंवा हे बघा
7 Jan 2011 - 11:58 pm | प्राजु
वा वा! लेखमाला अतिशय सुरेख होणार यात शंका नाही.
वाट पाहतेय .