..गंधमुग्ध

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in जे न देखे रवी...
1 Jan 2011 - 8:27 pm

तुझ्यामध्येच रमले होते..
तुझ्या मूळेच फुलले होते...
उमलले तुझ्यामुळे
गंधले तुझ्यामुळे...

कोवळ्या अन मुग्ध या
रेशीम स्पर्शी पाकळ्या
खुलल्या तुझ्यात अन्
उमलल्या तुझ्यामुळे..

गंध भरल्या पाकळ्यांची
ही नजाकत मखमली
टवटवी अन् हा तजेला..
लाभला तुझ्यामुळे ..

बहर सरला... गंध विरला....
झाले मुक्त फुलुनी
उतरली धुंदी नजाकत
वेळ झाली मिटायची

परत बंद....परत मुग्ध....
मिटेन मी तुझ्यामध्ये
गंधमुग्ध, स्पर्शमुक्त
मिटेन मी तुझ्यामध्ये

मिटेन मी तुझ्यामध्ये ......

शांतरसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

पियुशा's picture

2 Jan 2011 - 2:13 pm | पियुशा

व्वा व्वा,मस्तच !

पाषाणभेद's picture

2 Jan 2011 - 3:21 pm | पाषाणभेद

"परत बंद....परत मुग्ध....
मिटेन मी तुझ्यामध्ये
गंधमुग्ध, स्पर्शमुक्त
मिटेन मी तुझ्यामध्ये"
समर्पणाची भावना मस्त आहे. छान काव्य.

नगरीनिरंजन's picture

3 Jan 2011 - 10:49 am | नगरीनिरंजन

अगदी असेच म्हणतो. सुंदर कविता.

प्रकाश१११'s picture

2 Jan 2011 - 9:44 pm | प्रकाश१११

कोवळ्या अन मुग्ध या
रेशीम स्पर्शी पाकळ्या
खुलल्या तुझ्यात अन्
उमलल्या तुझ्यामुळे.

आवडली.छान!मस्त!!

मदनबाण's picture

3 Jan 2011 - 6:54 am | मदनबाण

मस्त... :)

गंध भरल्या पाकळ्यांची
ही नजाकत मखमली
टवटवी अन् हा तजेला..
लाभला तुझ्यामुळे ..

--- मस्त एकदम

प्राजक्ता पवार's picture

3 Jan 2011 - 5:15 pm | प्राजक्ता पवार

सुंदर कविता .

santosh waghmare's picture

31 Dec 2011 - 9:51 pm | santosh waghmare

छान आहे

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2012 - 3:52 pm | आनंदी गोपाळ

बदलायला झालाय बहुतेक.
बराचवेळ विचार करत होतो, की गंधमुक्ता वर कविता काय केली असेल बरे?