सब मिपाकर्स को सलाम ,
माझ्या मागिल लेखावर नाहक चिखल्फेक झाल्यावर हि दुसरा लेख लिहिन्याची हिम्मत करत आहे.
मागिल लेखात श्री . नूर यांना मी कुठल्या का केटेगरीत असेना सर्वोत्तम असे कौतुक् पर म्हटले त्याची दखल ना घेता , आप ल्याला हवा तसा अर्थ काढुन वाद झाला , असो ....
यावर एक शेर आठवला पहिले तो देतो मग श्री. किशन यांची गझल.
इबादतो कि तरह मै ये काम करता हु !
जब भि मिलता हु पहले सलाम करता हु !!
( आरधने सारखे मी हे काम करतो , कुनालाही भेटलो कि पहिले अभिवादन करतो )
मुखालिफत से संवरती है शख्सियत मेरी !
मै दुश्मनो का बडा एहतेराम करता हु !!
( विरोधाने माझ्या व्यक्तिमत्वाला निखार येतो , मी माझ्या शत्रुंचा फारच आदर करतो )
dr.Bashir badar
वो लब के जैसे सागर-ए-सहबा दिखाई दे!
जुम्बिश जो हो तो जाम छलकता दिखाई दे!! (सागर-ए-सहबा = अंगूरी शराब का पयाला , जुम्बिश = कंपन )
उस तिशनालब की नींद न टूटे, खुदा करे!
जिस तिशनालब को ख्वाब में दरिया दिखाई दे!! ( तिशनालब= तहानलेला , दरिया= मोठी नदी )
कहने को तो उस निगाह के मारे हुए हैं सब!
कोई तो उस निगाह का मारा दिखाई दे!!
दरिया में यूँ तो होते हैं कतरे ही कतरे सब!
कतरा वही है जिसमें कि दरिया दिखाई दे!! ( कतरा = थेंब )
खाये न जागने की कसम वो तो कया करे!
जिसको हर ख्वाब अधूरा दिखाई दे!!
कयों आईना कहें उसे? पत्थर न कयों कहें!
जिस आईने मे अक्स न उनका दिखाई दे!! ( अक्स = प्रतिबिंब )
कया हुस्न है, जमाल है, कया रंग रूप है! ( जमाल = सुंदरता )
वो भीड में भी जाए तो तनहा दिखाई दे!! ( तनहा = एकटा )
फिरता हूँ शहरों-शहरों समेटे हर एक याद!
अपना दिखाई दे न पराया दिखाई दे!!
पूछूँ कि मेरे बाद हुआ उनका हाल क्या ?
कोई जो उस जनम का शनासा दिखाई दे!! ( शनासा = ओळखिचा )
कैसी अजीब शर्त है दीदार के लिए!
आँखे जो बंद हों तो वो जलवा दिखाई दे!!
ऐ "नूर" यूँ ही तरक-ए-मुहबबत मे कया मज़ा!
छोडा है जिसको वह भी तो तनहा दिखाई दे.............!! ( तरक-ए-मुहबबत = प्रेम<प्रीय व्यक्ती>सोडणे)
किशन बिहारी नूर.
प्रतिक्रिया
28 Dec 2010 - 8:49 pm | मदनबाण
वालेकुम सलाम अश्फाक मियाँ... तुम्ही तुमचं काम सुरु ठेवा.
तुमचा मागचा धागा मला कुठे दिसत नाहीये... :( त्यातले शेर या धाग्यात दिले आहेत का ?तसे नसेल ते सुद्धा द्या.
त्यातला एक शेर मला फार आवडला होता... (तुम्ही बहुतेक वा वा वा असे त्याच्या पुढे लिहले होते)
बाकी तुमचे हे शेरो-शायरीवाले धागे आपल्याला लयं आवडतात बघा !!! :)
लगे रहो...
28 Dec 2010 - 9:12 pm | अश्फाक
http://www.misalpav.com/node/16024
घ्या कि राव
28 Dec 2010 - 9:10 pm | रामदास
कैसी अजीब शर्त है दीदार के लिए!
आँखे जो बंद हों तो वो जलवा दिखाई दे!!
या ओळी खूप आवडल्या .
अश्फाक साहेब कठीण शब्दाचे अर्थ तर कळले .सोबत रसग्रहण लिहीले तर सागर-ए-सहबा ची रंगत वाढल्यासारखे वाटेल.
अवांतर :मला तर जुंबीश हा शब्द फार आवडला.म्हण्जे ओझरता स्पर्श झाला आणि मी जुंबीश जुंबीश झालो.
येऊ द्या आणखी.
28 Dec 2010 - 9:14 pm | अश्फाक
रसग्रहन .... नक्कि प्रयत्न करेल.
28 Dec 2010 - 11:23 pm | प्राजु
सुरेख आहेत सगळेच शेर!! येऊद्यात अजून.
29 Dec 2010 - 9:06 pm | गणेशा
सर्व जबरदस्त ...
खालील ओळीतील सत्य तर अप्रतिम
ऐ "नूर" यूँ ही तरक-ए-मुहबबत मे कया मज़ा!
छोडा है जिसको वह भी तो तनहा दिखाई दे.............!!
29 Dec 2010 - 11:23 pm | पंगा
"उर्दूचे (साहित्याची भाषा आणि काव्याची भाषा म्हणून) स्वरूप 'एका गटाची भाषा' इतके संकुचित नसून त्यापेक्षा बरेच व्यापक आहे (अत एव त्यात कोणत्याही व्यक्तीने काहीही कर्तबगारी दाखवली असता ती त्या व्यक्तीच्या सामाजिक गटाच्या निरपेक्ष प्रशंसनीय आहे)" या प्रतिपादनात चिखलफेक कोठे आली ते समजले नाही.
मुळात कौतुक करताना एखाद्याला कोठल्यातरी क्याटेगरीत कोंबण्याची गरज काय? आणि 'कोठल्या का क्याटेगरीत असेना'च्या पुस्तीने त्या कौतुकाचा दर्जा खालावतो, त्या कौतुकास एका प्रकारच्या वैषम्ययुक्त कौतुकाची छटा येते, एका प्रकारचे 'लेफ्ट-हँडेड काँप्लिमेंट'चे स्वरूप येते, असे वाटत नाही काय? मग भलेही कौतुक करणाराचा तसा उद्देश असो वा नसो.
(समांतर उदाहरण घ्यायचे झाले तर, 'अमूकतमूक व्यक्तीचा प्रामाणिकपणा/राष्ट्रभक्ती वाखाणण्यासारखी आहे' आणि 'अमूकतमूक व्यक्तीचा प्रामाणिकपणा/राष्ट्रभक्ती वाखाणण्यासारखी आहे, मग भलेही त्या व्यक्तीची जात/धर्म/सामाजिक गट काही का असेना' या दोन वाक्यांच्या छटांत आणि त्यामधील 'कौतुका'च्या दर्जात काही फरक आहे की नाही? मुळात दुसरे वाक्य 'कौतुक' दर्शवते का?)
दुर्दैवाने सलामीलाच अशी वाक्ये आली तर जेवणात पहिल्या घासालाच मिठाचा खडा आल्यासारखी खटकतात, आणि मग उरलेला लेख भलेही कितीही उत्कृष्ट असो, पुढे वाचण्याची इच्छा मरते. मुळात माझ्यासारख्या उर्दूच्या शेरोशायरीचा गंध नसलेल्या (परंतु दुर्दैवाने उर्दूच्या भाषा म्हणून व्यापकतेबद्दल थोडीफार ऐकीव का होईना, पण कल्पना असलेल्या आणि उर्दूबद्दल ज्ञान नसले, तरी आदर असलेल्या) माणसाने कुतूहलाने लेख उघडावा, आणि पहिल्याच वाक्यात असले काहीतरी सामोरे यावे; त्या पार्श्वभूमीवर उरलेला लेख चांगला आहे की वाईट, हे तपासण्याकरिताही पुढे वाचावेसे वाटत नाही. (अर्थात उरलेला लेख जर उत्कृष्ट असेल, तर त्यास मी मुकून नुकसान माझेच होते, अन्य कोणाचे नाही, हे मान्य करूनही, पहिल्या वाक्यात व्यक्त होणार्या भावनेच्या पार्श्वभूमीवर पुढे विषाची परीक्षा घ्यावीशी वाटत नाही. शिवाय, मला उर्दू शेरोशायरीचे ज्ञान करून घ्यायची एवढी दुर्दम्य इच्छा असेलच, तर या एका लेखावरच मी अवलंबून राहणार नाही, त्यामुळे हा एक लेख गमावल्याने होणारे माझे नुकसान तसे फारसे मोठे नसेल, हाही भाग आहेच.)
तरीही लेखकाचा उद्देश कदचित तसा नसूही शकेल, असे वाटले, म्हणून अतिशय सौम्य शब्दांत आणि अतिशय नम्रपणे लेखकाच्या भूमिकेबद्दल एक अत्यंत साधा प्रश्न विचारला. तितकेच साधे उत्तर - मला पटण्यासारखे अथवा मला न पटण्यासारखे - लेखकाकडून मिळाले असते, तर आवडले असते. (अर्थात, उत्तराचा आग्रहही नव्हता.) ते झाले तर नाहीच, उलट 'कालचा गोंधळ बरा होता'. (असो, चालायचेच. आणि चालू द्या.)
बाकी, या एकंदर उपक्रमाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. (मग भलेही त्यातले मला काहीही कळत नसले तरी.) फक्त अशा उपक्रमांतून नकळत चुकीच्या कल्पना पसरू नयेत, एवढीच एक वाचक आणि एक सदस्य म्हणून माफक अपेक्षा आहे.
बाकी चालू द्या.
(अवांतरः बाकी त्या 'रेख़्ता' प्रकाराबद्दल तूर्तास मला यत्किंचितही कल्पना नाही. आता कुतूहल चाळवले आहे, तर बघेनही पुढेमागे कदाचित, पण तूर्तास ती प्रायॉरिटी नाही. तसेही माझ्या 'रेख़्ता' माहीत असण्यानसण्यातून काहीही सिद्ध होते, किंवा मला जे खटकते - आणि ज्याबद्दल मी कारणमीमांसा देऊ शकतो - त्याबद्दल बोलण्याचा माझा अधिकार माझ्या 'रेख़्ता'बद्दल माहिती नसण्यातून नष्ट होतो, असे मला वाटत नाही.)
29 Dec 2010 - 11:59 pm | वाहीदा
जनाब अश्फाक
एक कहावत तो तुम्हें याद होगी
अधजल गगरी छलकत जाय !!
कितनी ठोस बात कही है कि घडा आधा भरा हुआ हो तो आवाज करता है, पानी छलक कर गिर जाता है और पूरा भरा हो तो न छलकता हैं और बिल्कुल भी न आवाज करता है,| पूरे भरे घडे में गहनता आ जाती है। छिछलापन नहीं रहता।
मतलब साफ है, छिछलापन आवाज करता है, गहराई में शांति होती है.
Empty Vessels makes more noise याची प्रचिती तुम्हाला आली असेलच :-)
बाकी सर्व शेर आवडले
अन सर्वात जास्त आवडले ते
मुखालिफत से संवरती है शख्सियत मेरी !
मै दुश्मनो का बडा एहतेराम करता हुं !! :-)
30 Dec 2010 - 10:50 am | ज्ञानराम
छान लिहलंय
दरिया में यूँ तो होते हैं कतरे ही कतरे सब!
कतरा वही है जिसमें कि दरिया दिखाई दे!!
क्या बात हे.....!!!!!!!!
31 Dec 2010 - 3:18 am | धनंजय
वा! शेर आवडले.
"तनहा" शब्दामध्ये मला कारुण्याची झालर दिसते. (हे वैयक्तिक असेल.) त्यामुळे शेराचा अर्थ माझ्यासाठी अधिक बहुपदरी होतो आहे.
एक विनंती : जमल्यास टंकताना काळजी घ्यावी. "क्या" ऐवजी "कया" लिहिलेले वाचताना बहर ठेचकाळतो.
31 Dec 2010 - 8:30 am | यशोधरा
सुरेख शेर आहेत. धन्यवाद.
सोबत काही रसग्रहण येईल तर मजा येईल.