चालो जमवा: अहमदाबाद मिपाकट्टा.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Dec 2010 - 12:38 am

आय आय एम चा कॅम्पस कस्त भटकून झाला.
संध्याकाळचे साडेआठ वाजले होते.
जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का , आपण किती इंचाने माघार घेत आहोत , खलिस्तान चळवळ आणि बिहारी , युरो डॉलर आणि भारतीय रुपया ,मिपावरील डामरट प्रतिसाद , सिग्नेचर किंग टार्‍या इत्यादी विषयंवर तज्ञामध्ये गहन चर्चा सत्र झाल्यानन्तर
क्लिंग्टन आणि विजुभाऊ ना कडकडून भूक लागली होती.
अहमदाबादच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांची रेलचेल होती. मसालानी चा, खाखरो ., कच्छी दाबेली , पाउं भाजी , फराळी नासतो , खमण उंधीयो च्या गाड्या वातावरणात एक मस्त माहौल तयार करत होत्या.
वर्षाअखेर आल्याने दुकाने सजली होती.
या गडबडीत काय खायचे असा एक नेहमी पडणारा गहन प्रश्न पडला होता.
क्लिंग्टन यांच्या मेसच्या डब्याला सुट्टी दिली होती. आता बाहेर खाण्याशिवाय पर्याय नव्हता.
अंधारात प्रकाश किरण दिसावा तसा अचानक गुजराती थाळी जेवण्याचा बेता करावा असे वाटु लागले . इतके सगळे कोण जेवणार असा एक निराशाजनक विचार मनात आला पण झळझळीत सूर्यप्रकाशाने मळभ झटकून टाकावे तसा तो विचार आम्ही झटकून टाकला आणि पक्वान नामक डायनिंग होल ( हो गुजराती मध्ये हॉल ला होल म्हणतात )
तेथे गेलो आणि आणि बेधडक ऑर्डर दिली.
थोद्याच वेळात जीची आतुरतेने वाट पहात होतो ती आली.
1
डावीकडून...
गाजरनो हलवो .कढी ,चणानी उसळ , टमेटा बटेटानु रस्साळु शाक, पनीर नु रस्साळून शाक ,उंधीयु ,बासुंदी ,सेलेड , फरसाणमा:- धोकळानु सेन्डविच , दाळना पकोडा अने बटेटाना पकोडा. लिली चटणी आमलीनी चटणी दही वडा,पापड , पुडी अने रोटली,
असे जोरदार आगमन झाले.
यजमान हॉटेलवाले आगत्याने आग्रह करून वाढत होते. आम्ही हा आजचा शेवटचाच दिवस असे समजून खात होतो.
पोटात अजून काही मावणार नाही याचा अंदाज आला आणि थाळीची आणि आमची ताटातूट झाली.
यजमान होटेलवाल्याला अन्नदाता सुखी भव असा क्लिंग्टन आशिर्वाद देनार होता तेवढ्यात बील आल्याने आशिर्वाद मागे घेतला आणि बील चुकते केले.जड पोटाने बाहेर आलो
अहमदाबाद मध्ये "अशोक पान" ही पानाच्या दुकानाचे चेन आहे.
कात चुना मस्त फेसून त्यावर चटणीचा वर्ख , सेकेली कतरी सोपारी, थन्डक लिली पत्ती लवींग अने वेलची.
इथे तुम्हाला हवे असणारे पान अक्षरशः खीलवले जाते.
2
विडा घ्या हो नारायणा एवढेच म्हणायचे बाकी ठेवले होते.
रात्रीचे दहा झाले. आणि पक्षी घरट्याकडे परतले.
कट्ट्याला प्रभु मास्तर आणि नितीन थत्ते याणीदेखील हजेरी लावली होती.
पुढचा कट्टा बहुते आणंद मुक्कामी, थत्ते सरकारांकडे

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

वावावा! भरून पावलो हा वृतांत वाचून. :)

गुज्जु थालीचा फोटो आवडला. त्याच्या धुसर पणावरून तो मोबाईल कॅमेराने काढला असल्याचे लक्षात आले.
:)

(बरं तर बरं पान विकणारा होता... विकणारी नव्हती.) ;)

खरंच ... वांगात भरुन पावलो :) गुज्जु थाळी म्हणजे आमचा (अलिकडेच) जीव की प्राण :) विजुभाऊ वृत्तांत सारु लागे छे :) बाकी हा तरूण द्वेष्टा मास्तर गुजरातेत काय करतो आहे ? त्यांन्ना तिकडे ना नॉनव्हेज मिळणार ना रोमरस :)

:)
( दोन पावले पुढे जाऊन मी तर म्हणेल बरंय तो पानवालाच होता , अंडरगार्मेंट्स वाला नाही ;)

अवांतर : कवळ्या युवराजांकडे कट्टा असेल तव्हा फोनवा :)

-टारुभाउ

विजुभाऊ's picture

27 Dec 2010 - 10:41 am | विजुभाऊ

तो फोटो निकॉन एस ३००० ने काढलाय. फ्लिकरवरून इकडे फोटो टाकताना साईज मध्ये कायतरी गम्मत होते.
हा बघ
1

आणि हा बघ .
क्लिंटन म्हणाला की त्याने लग्नातसुद्धा इतक्याप्रेमाने विडा खाल्ला नव्हता
त्या पानवाल्याने " विडा घ्या हो नारायणा" इतकेच म्हणायचे बाकी ठेवले होते
2
आता दिस्ला का येवस्थीत
क्यामेर्‍याला नाव ठीवू नगा जी.
नितीन थत्ते आणि प्रभू मास्तर सूक्ष्मदेहाने हजर होते

चिंतामणी's picture

27 Dec 2010 - 1:46 am | चिंतामणी

मसालानी चा, खाखरो ., कच्छी दाबेली , पाउं भाजी , फराळी नासतो , खमण उंधीयो

तुम्हाला, क्लिंटनला आणि थोडेफार मला समजले असेल तरी समस्त मराठी बांधवांना समजेल असे लिवा की.

कट्ट्याला प्रभु मास्तर आणि नितीन थत्ते याणीदेखील हजेरी लावली होती.

पहील्यांदा याचा अर्थ समजला नाही. पण "पुढचा कट्टा बहुते आणंद मुक्कामी, थत्ते सरकारांकडे" हे ( जरी "बहुते " असा अमराठी शब्द " बहुधाच्या" जागी वापरला असला तरी) समजल्यावर सगळ्या गोष्टी उलगडल्या. (यातील "बहुते " हा शब्द अती महत्वाचा. तुम्हाला खात्री नसल्याच्या भावना पोहोचल्या) :(

;)

अहो ती पदार्थांची नावे आहेत.. त्यात काय समजून सांगणार ..मराठी मध्ये.
उंधियो ला उंधियोच म्हणणार ना. शिवाय पावभाजी , कच्छी दाबेली हे पदार्थ तर मराठी माणसाला ही माहित आहेच की.
फराळी नासतो - नाष्टा , फराळ हे तर स्पष्टच कळत आहे. हे पदार्थ काय आहेत हे हवे असेल तर त्या पदार्थाचे वर्णन करावे लागेल - कृती , चव , रंग वगैरे

उलट पदार्थांची नावे गुजराथी मध्ये लिहून लेख लज्जतदार झाला आहे.
@विजूभाऊ - छान वर्णन केले आहे .

रेवती's picture

27 Dec 2010 - 1:47 am | रेवती

वा! वा!
दिलखुश धागा! सगळे पदार्थ पाहून ड्वले सुखावले.
आत्ताच जेवण झाल्याने मनाचेच काय ते हाल झाले.;)
समस्त मराठी बांधवांना समजेल असे लिवा की.

मला तरी समजले ब्वॉ!
कदाचित मराठी भगिनी असल्याने समजले असेल.;)

चिंतामणी's picture

27 Dec 2010 - 1:53 am | चिंतामणी

एक मिनीटापुर्वी मी प्रतिक्रीया लिहीली. त्यातील वाक्य "तुम्हाला, क्लिंटनला आणि थोडेफार मला समजले असेल तरी समस्त मराठी बांधवांना समजेल असे लिवा की." आणि तु लिहीले आहेस त्यात काहिही फरक नाही.

भा.पो.

तुझे नाव add करतो.

हा पाइंट सारखाच आहे. पण मह्त्वाचा मुद्दा मी मांडलेला आहे. त्याबद्दल तुझी प्रतिक्रीया वाचायला आवडेल.

रेवती's picture

27 Dec 2010 - 2:04 am | रेवती

गम्मत केलिये तुमची जरा.

मस्त हो विजुभौ , बहुतेक हा फक्त जेवणकट्टा होता अस वाटतय ;)

बाकी ती पुडी आणि रोटली जुळ्या बहिणीच दिसतायत. =))

फोडीफार माफक गुजराथी शब्दांनी व्रुत्तांताला, थाळीतल्या चणटी आणि लोणच्यासारखी लज्जत आणली आहे.
हुं तो बद्दु समझी ग्यो. ;)
आम्हाला कधी घेउन जाताय?

तरिही "बहुतेक हा फक्त जेवणकट्टा होता अस वाटतय" असे म्हणण्याचे प्रयोजन नाही समजले. :(

आजानुकर्ण's picture

27 Dec 2010 - 11:36 am | आजानुकर्ण

मस्त हो विजुभौ , बहुतेक हा फक्त जेवणकट्टा होता अस वाटतय

यात आश्चर्य व्यक्त करण्यासारखे काही विशेष नाही. गुजरातेत मद्यविक्री व मद्यपानास सरकारी बंदी असावी असे वाटते.

फोडीफार माफक गुजराथी शब्दांनी व्रुत्तांताला, थाळीतल्या चणटी आणि लोणच्यासारखी लज्जत आणली आहे.
हुं तो बद्दु समझी ग्यो.

सहमत आहे. याआधीच्याच लेखात भाषेच्या शुचितेला महत्त्व देणाऱ्या विजुभाऊंनी तात्काळ योग्य पवित्रा घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

कट्ट्याचे वर्णन आवडले.

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 11:59 am | क्लिंटन

गुजरातेत मद्यविक्री व मद्यपानास सरकारी बंदी असावी असे वाटते

हो त्यामुळे पूर्ण गुजरात राज्यात बार नाहीत. मिलिटरी कोट्यातून सैन्यदलातील लोकांना दारू मिळते. अर्थात पडद्याआड चोरून सर्व काही चालू असते.

पण गुजरात अगदी "वेट स्टेट" असते तरी त्याचा माझ्या सारख्याला काय उपयोग होणार होता? :)

क्लिंटन

अर्थात पडद्याआड चोरून सर्व काही चालू असते.

ह्यावरून तेव्हाचे अजून काही आठवले.

आमच्यातील एकजण अमदावादच्या टी. व्ही. केंद्रात 'स्ट्रिंगर कॅमेरामन' होता. म्ह़णजे तो काँट्रॅक्ट- बेसिसवर, जरूरीप्रमाणे घटनेचे फिल्मींग करी, त्यातील जेव्हढे फूटेज प्रत्यक्ष बातमीत वापरले जाई, त्यानुसार त्याला पैसे मिळत. ह्या परिस्थितीत ह्या आबास तेथील संबंधित पदाधिकार्‍यांना खूष ठेवणे भाग असे. ह्या त्याच्या खातिरदारीचा एक भाग होता, त्यांच्यासाठी अधूनमधून मद्याच्या बाटल्या आणणे. आबा मुंबईचा व कामासाठी व वैयक्तिक कारणांसाठी तो मुंबईस ये-जा करे. मुंबईतून परततांना हमखास त्याच्याकडे 'डाह्याभाईच्या फिल्म्स'चा रोल असे. अमदावादमध्ये स्टेशनवर उतरल्या, उतरल्या प्लॅटफॉर्मवरच अनेकदा एक्साईज आणि दारूबंदीच्या इम्प्लिमेंटेशनशी संबंधित कर्मचारी सामानाची झडती घेण्यास उभे असत. आबाच्या सामानात डाह्याभाईच्या फिल्मचा डब्बा असे. जुन्या जमान्यात -म्हणजे सुमारे ऐशीच्या दशकापर्यंत तरी हिंदी चित्रपटात 'स्पेशल इफेक्ट्स : डाह्याभाई' असे एक क्रेडिट सर्वांनी वाचले असेल. हा ह्याच डाह्याभाईचा रेफरन्स. अर्थात त्याचा प्रत्यक्ष श्री. डाह्याभाईंचा काही संबंध नव्हता. तर आबा ह्या सीलबंद फिल्म्कॅन्समधून दारूच्या बाटल्या घेऊन येई. एकतर त्याच्याकडे त्याचे स्ट्रिंगरचे कार्ड होतेच, त्यामुळे तो फिल्म्स्चे कॅन्स आणतोय हे शक्य होते. त्यातून ह्या कॅन्स सील केलेल्या आहेत कारण त्यात डाह्याभाईंनी केलेला स्पेशल इफेक्टची निगेटिव्ह आहे, म्हणून कॅन उघडणे शक्य नाही!

प्रत्यक्षात त्या कॅन्समधील कंटेन्ट्सनी भलताच डाह्याभाई इफेक्ट निर्माण केला असेल!

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 4:04 pm | क्लिंटन

अरे वा. चांगली आयडिया आहे. हल्ली रेल्वे स्टेशनवर दारू तपासनीस असतात की नाही याची कल्पना नाही. आणि असले तरी मला त्यांनी कधीही अडवलेले नाही. (कारण बहुदा हा माणूस काय दारू पिणार असे त्यांना वाटणे हेच असावे) :)

आता यावर "मी दारू पित नाही" हे सांगायचा केविलवाणा प्रयत्न असे म्हणू नये ही विनंती :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Dec 2010 - 2:31 am | निनाद मुक्काम प...

एकदम सरस

सुनील's picture

27 Dec 2010 - 3:45 am | सुनील

भाज्या "रस्साळू" असल्या तरी एकंदरीत कट्टा "ड्राय" झालासे दिसते!

अजूनही वर्णन चालले असते!

राजेश घासकडवी's picture

27 Dec 2010 - 3:54 am | राजेश घासकडवी

विजुभाऊ,

तुम्ही हे जे काय चालवलंय ते अजिबात बरोबर नाही, सांगून ठेवतोय. काय कोण चार टकली (म्हणजे डोकी या अर्थाने) एकत्र जमून जेवली आणि त्यांनी गप्पा मारल्या ही काय मिपासारख्या संस्थळावर लिहिण्याची बातमी आहे? ऑं ऑं? आणि तेही असले खाद्यपदार्थांचे फोटो आणि वर्णनं लिहून लोकांमध्ये जळजळ निर्माण करण्याच्या हेतूने?

अशाने मिपाचा सोशल क्लब होतोय या तक्रारीला पुष्टीच नाही का मिळणार, काय?

लज्जा-संस्कृतीप्रेमी विजुभाउ, अध्यात्मप्रेमी थत्ते चाचा, कम्युनिश्ट क्लिंटन आणि शिष्टाचार-सभ्यतेचे खंदे पुरस्कर्ते प्रभु मास्तर! अशा लोकांचा कट्टा म्हणजे डेंजरसली* फक्कड कट्टा झालासे दिसते आहे!! वा!!
(*डेंजर सुंदर वगैरे चालीवर)

बाकी फोटोवगैरे दिसले नाहीत का कुणास ठावुक. ;-)

-(सर्वद्वेष्टा)

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 8:39 am | क्लिंटन

लज्जा-संस्कृतीप्रेमी विजुभाउ, अध्यात्मप्रेमी थत्ते चाचा, कम्युनिश्ट क्लिंटन आणि शिष्टाचार-सभ्यतेचे खंदे पुरस्कर्ते प्रभु मास्तर

हा हा हा आवडले.

क्लिंटन

नितिन थत्ते's picture

27 Dec 2010 - 2:30 pm | नितिन थत्ते

>>अध्यात्मप्रेमी थत्ते चाचा

??

अवलिया's picture

27 Dec 2010 - 11:33 am | अवलिया

सहमत आहे

आत्मशून्य's picture

27 Dec 2010 - 4:14 am | आत्मशून्य

आता गूजराती थाळीच....

प्रदीप's picture

27 Dec 2010 - 7:53 am | प्रदीप

तुमचा लेख वाचून तीन दशकपूर्वीच्या अमदावादच्या वास्तव्याच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. तेव्हा 'चेतना' डायनिंग होल गुजराती थाळीसाठी सुप्रसिद्ध होता. तसेच रिलीफ रोडवर एका चाळीत पहिल्या मजल्यावर एके ठिकाणी अगदी स्वस्त आणि म्हणून आम्हाला परवडणारी थाळी मिळत असे- इतर ठिकाणांसारखीच अनलिमीटेड! नंतर आश्रम रोडवरही एक मोठठा डायनिंग होल झाला. पण तो होल व चेतना हे दोन्ही आम्हाला कधीतरीच जाण्यासाठी परवडणारे होते.

(अगदी तसाच पण त्याहून बराच स्वच्छ असलेला, मुंबईत काळबादेवी रोडवर 'न्यू जोशी फ्रेंड्स क्लब' ८० च्या दशकात सापडला, तिथे मग बरेचदा जाणे झाले).

नॉन व्हेज खायचेच झाले तर लाल दरवाज्याच्या बाजूने खानपूरमधे गेल्यावर 'रॉयल कॅफे' नावाचे एक हॉटेल आम्ही शोधून काढले होते. तिथे मटन, चपाती वगैरे मिळे.

रस्त्यावरील खाण्याची तेव्हा दोन ठिकाणे होती-- जुन्या शहरातील माणेक चौक आणि नव्या शहरात, लो कॉलेजचा परिसर (अमदावाद चौपाटी!)

कधीतरी वाडीलाल हॉस्पिटलच्या बाहेरील आश्रम रोडवरील महेता गार्डन रेस्टॉरंटात फड जमे. तिथे फाफडा व चहा हा बेत असे. 'नवनिर्माण आंदोलना'त प्रामुख्याने भाग घेतल्यांपैकी तरूण मुले, मनिषी जानी वगैरे तिथे पडलेले असत. मनिषीचा भाऊ आश्विन आमचा सहकारी, तोही अनेकदा तिथे असे. आमच्या सोसायटीत एक फाफडाचे नवे दुकान झाले, त्यानिमीत्ताने रस्त्याच्या कोपर्‍यावर मोठठा प्रमोशनल बोर्ड लावला होता, त्यात 'फाफडानो दर्यो, अमुक तमुक दुकान...' असे ठळक लिहीले होते!

तेव्हा उडप्यांची मात्र अगदी वाववा होती. उडुपी ह्या नावाखाली जे काही मिळे ते अगदी भलतेच काही असे (इटली-ठोसा, हे नावाप्रमाणेच इडली व डोसा ह्यांच्याशी फटकून होते). उडुपी स्टाईल खायचे तर थेट स्टेशनवरच्या पहिल्या मजल्यावरील रेल्वे कँटिनात जावे लागे.

इराणी तिथे जवळपास नव्हताच. एकमेव इराणी सदृष्य हॉटेल, रिलीफ रोडवर लाल दरवाज्याच्या बाजूने शिरल्यावर, उजव्या हाताला लागे. रविवारी सकाळी भरपूर वर्तमानपत्रे, विशेषतः 'संडे ऑब्झर्वर' घ्यावीत, व ह्या हॉटेलात चहा, व खारी साठी जावे असा आमचा शिरस्ता असायचा. तिथे प्रथम गेल्यावर आम्ही दोघाजणांनी दोन चहा मागवल्यावर थोडा गोंधळ उडाला, आणि नंतर थोड्या वेळाने अजून दोन मागवल्यार तर वेटर चक्रावून गेला होता!

चहाची आम्हा मुंबईकरांची कल्पना आणि तेथील कल्पना ह्यात मात्र तफावत असे. आल्याच्या चहाचे आम्ही कुणीच फॅन्स नव्हतो. तसेच लाल दरवाजा भागात तेव्हा मिळणार्‍या व अत्यंत पॉप्युलर असलेल्या चहा-बोर्न्व्हिटा काँबोचेही. पण रात्रभर उंडारून जेव्हा घरी चालत चालत जायची वेळ येई, तेव्हा मधेच कुठेतरी 'चार-रस्ट्यावर' चालू असलेल्या टपरीतील चहा घेणे होई. तेव्हा त्या चहावाल्यास 'खांड ओछी, आदू नथी-- आदू नो कपडो पण नहीं वापरवानू' असे स्पेसिफिकेशन द्यावे लागे.

माझे वास्तव्य आय. आय. एम. च्या परिसरातील माणेकबाग येथे होते. गुजराती जेवण मला व माझ्या पार्टनरांसा आवडे. पण त्यावेळी तो शहराचा नवीन भाग होता, त्यामुळे तिथे जवळपास एकही चांगले, गुजरातीच काय, कसलेही, चांगले रेस्टॉरंट नव्हते. जवळात जवळ रेस्टॉरंट होते ते पंजाबी पद्धतिचे 'कॉलेजियन' (गुजरात कॉलेजपाशी). गुजराती प्रांतात पंजाबी खाणे खाणे खरे तर अगदी जीवावर येई.

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 8:44 am | क्लिंटन

म्हणजे अहमदाबाद किती बदलले आहे!! एकेकाळी आय.आय.एम शहराच्या बाहेर होते. आज शहर त्याच्याही पलिकडे बरेच वाढले आहे. त्यामुळे आम्हाला खायचे ठिकाण कुठे शोधायचे असा काही प्रश्न येत नाही. पहिल्या वर्षी प्रचंड काम असल्याने असे बाहेर जायला फारसा वेळही नसे पण आता तो ही प्रश्न नाही :)

प्रदीप's picture

27 Dec 2010 - 9:49 am | प्रदीप

हे थोडे स्मरणरंजक आहे असा आरोप होईल तो दोष पत्करून थोडे तेव्हाबद्दलच्या मी अनुभवलेल्या शहराबद्दल लिहीतो आणि आताच्या स्थितीबद्दल विचारतो.

तेव्हा मी जिथे रहात असे ती उमिया विजय सोसायटी शहराच्या सीमेबाहेर होती. शहराची त्या दिशेची सीमा तेव्हा माणिकबागेकडे संपे. रस्त्यांवर तिथपर्यंत दिवे असत, त्यापुढे रस्ता रात्रौ काळोखी असे. आम्ही उडाणटप्पू तीन-चार जण अगदी उशिरा, कधी कधी अगदी एक-दोन वाजेपर्यंत शहरात जेऊन व टी. पी. करून रमतगमत घराकडे परतत असू. आम्ही तिघे-चौघेच असू आणि मोठमोठ्याने बडबड करीत असू. तेव्हा अमदावाद पोलिसांकडे जीप्स नसाव्यात. त्यांचा संचार टेंपोसारख्या गाड्यांतून चाले. इतक्यांदा आम्ही त्या भागात असे रात्रौ, बेरात्रौ भटकलो असू, एकदाही पोलिसांनी आम्हास हटकले नाही, आमच्या आरड्याओरड्यामुळे कुणाचेही लक्ष वेधले गेले नाही.

तसेच नव्या भागातले शहरे तेव्हा कितीतरी सुरक्षित होते. हे असे अपरात्री, निर्जन रस्त्यांवरून फिरतांना आम्हाला कधीही भीति वाटली नाही, कारण तश्या घटना घडल्याचे वाचनात, अनुभवात, ऐकिवात नव्हतेच तेव्हा! आम्ही रहायचो ते एका बंगल्यातील तळमजल्यावरील खोल्यांत.-- मालक पुढील भागात रहात, आम्ही मागील भागात. मागील भागात येण्यासाठी बाजूने रस्ता होता. आजूबाजूस अगदी निर्मनुष्य होते, समोर एक छोटेसे शेत होते (त्यात पावसाळ्याच्या सुरूवातीस एक-दोनदा मोरास नाचतांना पाहिले आहे). अशा त्या घरात एकदोनदा आम्ही चुकून दाराची कडी न लावताच झोपी गेलो. पण कधीच तेथे काहीही विपरीत घडले नाही.

आम्हाला गुजराती खाणे आवडे पण जवळपास तसे काही नव्हतेच. तेव्हा कुणी घरीच येऊन शिजवून देईल का, अशी चौकशी आम्ही सुरू केली. एक ओळखीचे गृहस्थ शहरात रहात, त्यांनी माणेकबाग/नहेरूनगरमधील कुणाचातरी पत्ता दिला व तेथे चौकशी करा असे सांगितले. त्या घरी आम्ही दोघे मित्र एका सकाळी गेलो, तर तेथील बाईंनी प्रथम आत या व पाणी प्या असे सांगितले. मग कामाविषयी बोलणे!

हे सगळे सविस्तर लिहीण्याचे कारण तेव्हा शहर किती बिनधास्त व निर्भर होते, हे दाखवणे आहे. तेथील लोक अत्यंत प्रेमळ, अदबशीर व मदतीस तत्पर असत. हे सर्व तेव्हा फारसे जाणवले नाही. आता इतरस्त्र अनेक दशके काढल्यावर, मागे वळून पाहिल्यावर ते प्रकर्षाने जाणवत आहे.

अर्थात आता ते शहर तसे निर्भर नसेल, तसे त्याने नसावेही! पण तेथील माणसे तशीच प्रेमळ, मदतीस तत्पर असतील का, ही क्युरिऑसिटी मला आहे.

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 12:45 pm | क्लिंटन

बापरे अहमदाबादेत मोर?असे काही इथे असेल याची कल्पनाही केली नव्हती.बाकी आम्ही आमच्या डॉर्ममधील खोलीलाही कडी न घालता कधी झोपत नाही.अनेकदा डॉर्ममध्ये विद्यार्थी सोडून इतरांचाही वावर असतो तेव्हा काळजी घेतलेली बरी.काही चोरीच्या घटनाही झाल्या आहेत.बाकी शहरातील लोक खूपच चांगले आणि मदतीला कायम तत्पर आहेतच.गुजराती भाषा येत नाही म्हणून कधीही अडचण आली नाही.रिक्षावाले, दुकानवाले सगळे हिंदी बोलतात.

बाकी अहमदाबादमधील जुने अनुभव आवडले.

पंगा's picture

27 Dec 2010 - 1:18 pm | पंगा

रिक्षावाले, दुकानवाले सगळे हिंदी बोलतात.

हे निरीक्षण रोचक वाटले.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2010 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते

रिक्षावाले, दुकानवाले सगळे हिंदी बोलतात.

या वाक्याचा भावार्थ "रिक्षावाले, दुकानवाले सगळे हिंदीतही बोलतात." असा असल्याने फारसे रोचक वाटले नाही. पण जर का हे वाक्य "रिक्षावाले, दुकानवाले सगळे हिंदीतच बोलतात." असे असते तर मात्र मला रोचक वाटले असते.

दुकानांवर / पाट्यांवर गुजराती लिपीत लिहिलेले असावे असा कटाक्षही पाळला जातो असे ऐकून आहे.

असो. हा विषय इथे नको. धाग्याचे काश्मिर व्हायचे. :)

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 1:29 pm | क्लिंटन

हो बरोबर याचा अर्थ "हिंदीतही" बोलतात असाच आहे. दुकानांवरच्या पाट्या गुजरातीत असल्या तरी मराठी आणि गुजराती लिपी (काही थोडी अक्षरे वगळली ) तर सर्वसाधारण सारखी असल्यामुळे नावे वाचायला काहीच अडचण येत नाही.

पंगा's picture

27 Dec 2010 - 1:29 pm | पंगा

गुजराती भाषेस हिंदीने अमदावादेत आत्तापर्यंत गिळंकृत वगैरे कसे केले नाही याबद्दल कुतूहल वाटले, म्हणून विचारले. असो.

आजानुकर्ण's picture

27 Dec 2010 - 1:33 pm | आजानुकर्ण

याच धाग्यात गुजराती भाषेने मराठीस गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे याचा मी तीव्र निषेध करु इच्छितो.

पंगा's picture

27 Dec 2010 - 1:35 pm | पंगा

.

बाकी चालू द्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2010 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते

हे आपल्याला कसे कळणार? त्यासाठी गुजराती लोकांशी बोलले पाहिजे. तेच बरोबर सांगतील. गेला बाजार, गुजरातेतील शहरांमधे प्रदीर्घ वास्तव्य केलेल्या आणि गुजराती सांस्कृतिक रंगपटाशी चांगली ओळख असलेल्या मराठीभाषिकांनी इथे लिहायला पाहिजे.

कालच साहित्य संमेलनात, जागतिकीकरणाच्या रेट्यात स्थानिक भाषांना धोका असे काहीसे मत कोणीतरी प्रतिपादन केल्याचे वर्तमानपत्रांतून वाचले.

त्यापेक्षा, 'हिंदी भाषा बाकी सगळ्या भाषांना कशी गिळंकृत करून राहिली आहे' म्हणून (आधीच चिथावल्या गेलेल्या) मराठी माणसांना सांगणार्‍या महाराष्ट्रवासी गुजराती बांधवांनी, हीच हिंदी भाषा गुजरातेत गुजरातीला कशी गिळंकृत करत नाही याचे जर (जमल्यास) काही स्पष्टीकरण देऊ केले, तर होतकरू मराठी बांधवांस ते मार्गदर्शक ठरण्याची शक्यता जास्त वाटत नाही काय?

(शेवटी अमदावादेस जाऊन येऊ शकतात म्हणजे स्थानिक परिस्थितीबद्दल काहीतरी माहिती असेलच की नाही? शिवाय तेथील भाषाही बोलतात - म्हणजे तेथील स्थानिकांशी संपर्कासाठी - म्हणजे माहितीसाठी वगैरे हो - सोयिस्कर - कसें? शेवटी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने गुजराती काय किंवा मराठी काय, पण दूर अमदावादेत राहणार्‍या माणसावर विश्वास ठेवायचा, की आपल्या महाराष्ट्रात राहणार्‍या माणसावर?)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2010 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रदीपदा, आठवणी आवडल्या. शहरं तर झपाट्याने बदलतात. इतक्या वर्षांनी तुम्हाला तर तोच भाग ओळखूपण येणार नाही.

सुधीर काळे's picture

27 Dec 2010 - 8:43 am | सुधीर काळे

गुजरातीत अशी एक म्हण आहे कीं "सुरतमा जमण अने काशीमा मरण"! तरी विजूभाऊंनी एक 'मिपा' कट्टा सुरत शहरात भरवावा!
माझ्या आवडीनुसार गुजराती जेवणात उंदियो ही "राजा" डिश आहे.
परवा ठाण्याला गेलो होतो तेंव्हां रामदास-जींना आणि विनायक-जींना भेटलो होतो. पण फोटोवरून नितिन ('थत्तेकाका'?) अगदीच "कोवळा" निघाला!

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 8:50 am | क्लिंटन

फोटोवरून नितिन ('थत्तेकाका'?) अगदीच "कोवळा" निघाला!

8) 8-) :cool:

काका अहो तो फोटो माझा आहे. अर्थात मलाही क्लिंटनकाका कोणीतरी म्हटले होतेच. :)

क्लिंटन

प्रदीप's picture

27 Dec 2010 - 9:59 am | प्रदीप

रामदास- जी, आणी प्रभू-जी. पण नितीन- जी का नाही?

(हसत घ्यावे, सहज गंमतीत विचारले आहे).

सुरतचे उंधियू, नानकटाई व अस्सल शिव्या... 'हे घेलXX'...

बाकी रामदास व प्रभु मास्तरानी जीना आडनाव कधी पासुन बदलुन घेतले? पाकिस्तानला भेट दिली होती का दोघानी?

ऋषिकेश's picture

27 Dec 2010 - 8:55 am | ऋषिकेश

वा! दोन वर्षांपूर्वी महिनाभर अहमदाबाद-गांधीनगरीत मुक्काम होता त्याची आठवण जागी झाली. गुजरातेत मिळणारे भरपूर (आणि प्रचंड स्वस्त) आईसस्क्रीम अजूनही (थंडीत देखील) मनाला हुरहुर लावतं :)

प्रदीप's picture

27 Dec 2010 - 9:51 am | प्रदीप

गुजरातेत मिळणारे भरपूर (आणि प्रचंड स्वस्त) आईसस्क्रीम अजूनही (थंडीत देखील) मनाला हुरहुर लावतं

हो हे खरेच!! वाडीलाल आईस्क्रीम तेथे पूर्वी खूप पॉप्युलर होते.

क्लिंटन's picture

27 Dec 2010 - 8:57 am | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

मी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अहमदाबादेत असेन. आमच्या संस्थेचा दीक्षांत समारंभ तेव्हाच असेल.समारंभानंतर पार्टी घ्यायला मी असेपर्यंत तरी जरूर अहमदाबादेला भेट द्यावी हे आमंत्रण.

बाकी कट्ट्याचा वृत्तांत फक्कड विजूभाऊ.

क्लिंटन

अरेच्चा! फोटोखालच्या ओळीवरून मला असे वाटले कीं तो नितिनचाच फोटो आहे! सोरी!
(’हॉल’ऐवजी होल तसेच ’सॉरी’ ऐवजी सोरी!)

विंजिनेर's picture

27 Dec 2010 - 9:21 am | विंजिनेर

हॅ हॅ हॅ... अमहदावाद मधला कट्टा वृत्तांत खाण्याच्या लिस्टांनी ९०% भरलेला असावा हे अगदी साहजिक आहे.

बायदवे, एलिस ब्रिजच्या खाली, LIC च्या शेजारी खोपटात एक स्वर्गीय पंजाबी ढाबा आहे. किंमत पॉश रेस्टॉरंटच्या १/५ आणि चव खात्रीशीर, स्पीडी सर्विस. कधी गेलात तर भेट द्या.
तसंच नॅशनल हँडलूम जवळचे फ्रिजलँड - मस्त ग्र्लिड सँडविचेस + वाफाळणारी कॉफी.
असो. अमहदावादेत खादाडीचे अगणित स्पॉटस् आहेत. सगळ्यांची यादी करायला बसलो तर बादली भर लाळ जमा व्हायची की-बोर्डवर :)

विनायक प्रभू's picture

27 Dec 2010 - 10:23 am | विनायक प्रभू

वरील कट्ट्यास मी मानसिक रित्या हजर होतो.
आता क्लिंटन ला शिक्षण क्षेत्रात काम करायची खुमखुमी आली आहे.(कँपस्,पॅकेज ची चाहुल)
ते नेमके कसे करावे? त्यातल्या त्रुटी, आणि निराशा (स्वानुभवाने) ह्या बाबतीत फोन वर चर्चा झाली.

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

बाकी एवढा विस्तृत प्रतिसाद लिहील्याबद्दल वेगळे धन्यवाद :)

क्रिप्टिक न लिहील्याबद्दल महिलामंडळा तर्फे हार्डिक धन्यवाद. ;)

- धन्यावादी

छोटा डॉन's picture

27 Dec 2010 - 10:25 am | छोटा डॉन

छानच कट्टा झाला दिसतोय, अस्सल गुजराथी :)
का हो विजुभाऊ, हातासरशी गरबा / दांडिया नाही का खेळुन घेतलात ? ;)

पुढच्या थत्तेचाचांकडच्या कट्ट्याचाही असाच वृत्तांत येऊद्यात :)

>>जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का ,
:)
म्हणजे काय, विजुभाऊ आणि थत्तेचाचांसारखे कडवे संघप्रेमी असल्यावर ही चर्चा होणारच की ;)

- छोटा डॉन

का हो विजुभाऊ, हातासरशी गरबा / दांडिया नाही का खेळुन घेतलात ?
ज्या हाटीलात गेलो होतो तेथेगरब्याची सोय नव्हती.
इथे एक विशला नावाचे हाटेल आहे. तेथे गरबा वगैरेची सोय आहे म्हणे.
तेथे गेलो कधी तर जरूर टाकेन फोटो. अगदी काठीयावाडी "केडीयू" वगैरे सहीत टाकेन.

जकार्तालासुद्धा ’मिपा’ कट्टा सुरू करावा म्हणतो!
माझे दोन मित्र आधीच सभासद झाले आहेत (अद्याप निद्रिस्त आहेत)! आणखी कांहीं मंडळी सभासद म्हणून आणतो आणि मग नासी गोरेंग आयाम, मी गोरेंग, गाडो-गाडो, साटे आयाम, क्रुपुक वगैरेचा मेन्य़ू ठेऊन एक मस्त कार्यक्रम घडवून आणतो. मस्त मजा येईल!

आत्ताच हाती आलेल्या खळबळजनक वृत्तानुसार जकार्तातली बरीच कुटुंबे स्थालांतर करत आहेत, सैरावैरा पळत आहेत असे कळते :)

- बीबीसी

आणिबाणी जाहीर झाल्याचे अजुन तुला कळाले नाही का?

सीएनएन

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2010 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

श्री. क्लिंटन ह्यांच्यावर आम्ही नाराज असल्याने ह्या धाग्याला प्रतिसाद नाही.

सुहास..'s picture

27 Dec 2010 - 12:19 pm | सुहास..

अगदी असेच म्हणतो !!

असो .. विजुभाऊ थेट अहमदाबाद ? मी फोन केला त्या दिवसापासुन माझा समज आहे की तुम्ही अजुन सातार्‍यातच आहात ते ?

आणि मास्तर नानुभाउंना सोडुन तिकडे कुठे आणि सर्वात मोठठ सरप्राईज पॅकेज म्हणजे मि. नितीन थत्ते तिकडे कुठे

अवांतर : करा लेको चैन !! खा लोको पानं !! ऊठवा ,उठवा थाळ्यांच्या पंगती ! !

पुणेरी
वाश्या

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2010 - 12:55 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो + वृत्तांत मस्त. क्लिंटनचे दर्शन बर्‍याच दिवसांनी झाले.

राजेशशी सहमत व्हावेसे वाटत आहे, पण आम्हीही पूर्वी असेच कट्टे केले आणी वृत्तांत टाकले म्हणून आता आमची गोची होते आहे. लवकरच जनता आमचे पूर्वीचे अपराध विसरून जाईल मग आम्ही राजरोसपणे पक्ष बदलू.

अवलिया's picture

27 Dec 2010 - 1:15 pm | अवलिया

खुलाशाबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2010 - 1:16 pm | बिपिन कार्यकर्ते

मग आता विषयही संपवा. :)

जशी दी. के(अ)रटेकर संपादकांची आज्ञा !

श्री घासकडबींच्या खाली मताशी मी सहमत नाही
अशाने मिपाचा सोशल क्लब होतोय या तक्रारीला पुष्टीच नाही का मिळणार, काय?

सहनौ भुनक्तु.... हे मानणारे आम्ही. जे आवडले त्यात सर्वाना सामावून घेतले
हाय कम्ब्ख्त तुने खायाही नही.
कट्ट्याची वर्नणे ल्ह्यायची फॅशन आमीच हिते आणली
http://misalpav.com/node/1207
http://misalpav.com/node/1213
http://misalpav.com/node/1219
http://misalpav.com/node/1232

>>>कट्ट्याची वर्नणे ल्ह्यायची फॅशन आमीच हिते आणली

शुद्धलेखनावर अजुन बरीच मेहनत आवश्यक आहे.

मस्त कलंदर's picture

27 Dec 2010 - 4:39 pm | मस्त कलंदर

अशाने मिपाचा सोशल क्लब होतोय या तक्रारीला पुष्टीच नाही का मिळणार, काय?

अभ्यास कमी पडतोय. जरा मागचे धागे वाचा...

नितिन थत्ते's picture

27 Dec 2010 - 10:07 pm | नितिन थत्ते

सदरचा कट्टा मी मुंबईला जात असल्याची खात्री करून घेऊन भरवला गेला असावा असा संशय आहे.
;)