!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
25 Mar 2008 - 11:23 am
गाभा: 

सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली.
ये समयी तडीताच्या तोफांचा भडीमार जाहला.....लखलखाट् तर विचारु नये एवढा तौबा झाला.....कित्येकांस तर ** भाल अथवा ललाटात गेल्यासारख्या भासले. भूमीवरची वीज अत्यानन्दाने आकाशीच्या भगीनीला भेटावयास निघोन गेली
मिपा सदस्यांच्या मार्गात हा अडथळा आडवा आला नाही...पलिते त्वरेने पेटवले गेले.ही तो पंचतारांकीत बुभुक्षालयात व्हावी तैसी खातिरदारी झाली. स्वामी संतोष पावले (विख्यात तीव्र धनुर्धर सदा पावले चे हे कोणीही नाहीत).
सरदार विजुभाऊ ना सर्व मनसबदारानी सरदारानी पुन्हा वापसीने वोळख करोन दीली.....
सरदार धमाल यानी दारुगोळा आणि दाणागोट्याचा जातीने चोख बंदोबस्त ठेवला होता.तमाम खाषा स्वार्‍या त्या सरलश्करी बंदोबस्तावर फिदा जाहल्या. उत्तोताम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या. सोबत काही यवन पेये ही होती. यांचा लत्तप्राहार काही और असतो असे सरदार धमाल यानी वैयक्तिक अनुभवावरुन सांगितले. ऐशी अनुभवी मंडळी हे तर मिपा साम्रज्याचे वैभव्...जणु फतेलश्कर दल्........ऐशी खाशी नवरत्ने तर आलमगीर बादशाहाच्या दरबारी ही नव्हती ऐसे इतिहासात नमुद आहे.
येकेक वीर पात्रे बह्रो लागले. त्यात हीम नग टाको लागले फेनद द्रव्य ही टाकों...काही तर केवळ हीम नग च वापरुन पात्रास पाहोन चिंतन करों लागले. ये समयी किर्र शांतता पसरली. खलबते आता द्रुष्टीपथात होती. सरदारांची चिंतन मन पाठ सुरु जाहले..
मग थोड्या कालाने राजविडंबकवीसरदार केषवसुमार खुलते जाहले.....त्यानी कवितेची एक फैर झाडली....गनिमांच्या झोपा आकाशी गरुड उडावा तैशा असमानी उडाल्या.
मग सरदार दंताड वैदु प्रसाद दाढे यांना त्यांचा गाता गळा आठवला....नरड्यात मझा आहे बॉ ऐसे दाद ठायी ठायी घेतल्यावर
दुसरे मनसबदार सरदार विजुभाऊ याणी भिमसेनी थाटात बालगीत "गोरी गोरी पान" पेष केले.....हे तात्यांस कैसे चलते ऐसी काही नतद्रष्ट्रानी प्रुछाकेली.....
मग सरदार चित्तर यानी आपल्या भक्कम बाहुनी एक से एक खर्ड्या यावनी उर्दुत काही वाघ ( ऊर्फ शेर) पेष केले...ते समयी दाणागोटा पुरवठा पहाणारे उल्मुल्क मा सफदर्जंग सरदार भुईणळा यानी काही हरकती केल्या ते समयी त्याणी ईर्षाद ईर्षाद ऐसे उद्गार काढीले.
सार्‍यांस बहुत आस्चर्य जाहले...त्यावरी त्याणी खुलासा जे केला की मूळ यावनी ईर्षाद हा शब्द सूद्ध भारतीय आहे...ईर्षाद मूळ उचार
'नाईलाज" ऐसा आहे...त्याचा मतलब ही तोच आहे....
ये समयी मि पा सदस्यानी ईर्षाद हा शब्द नाईलाज ये अर्थाने भविस्यात वापरणेचा आहे ऐसा ठराव करणेत आला. त्यास येक्मुखाने सर्वानी दुजोरा दीला.....
ईतरही काही म्हत्वाचे ठराव ये समयी सदनात पेष केले गेले
ईतर ठराव्..........काय जाहले ते
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी
म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ...
व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी
धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी
आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात ( हा बखरी तला चौक आहे...प्रस्तुत लेखकाने हा शब्द फकस्त पवाड्यातच ऐकला आहे..वाद नको)
म्हणे शाहीर विजुभाऊ सर्वांस जी र जी र जी र जी जी जी जी
....आद्य बखरनवीस्.....विजुभाऊ कलमदाने....

( मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादःचर्चा ठराव्....बखरीच्या पूढील भूर्जपत्रावर)

प्रतिक्रिया

छान होती ही ओळ..

विवेक वि.

विजुभाऊ's picture

25 Mar 2008 - 1:57 pm | विजुभाऊ

तात्या ईतर ठराव कुठे मांडू?नव्या चौकात का?

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 4:45 pm | विसोबा खेचर

नव्या चौकात, नव्या लेखाने मांडावेत ऐशी आम्ही आपणास विणंतीवजा आज्ञा करितो! :)

--श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Mar 2008 - 2:15 pm | डॉ.प्रसाद दाढे

विजुभाऊ जोरात सुटले आहेत्..सव्वीस अधिक एकशे ऐ॑शी महिन्या॑चा हिशेब कधीच मागे पडलाय...नव्हे॑.. आता उलटी गिनती सुरू झालीय्.. हो की नाही केशवसुमार?
पण विजुभाऊ, खरेच छान लिहिताय्..तुमचे लिखाण वाचोन आम्हा॑स भाईकाका॑च्या 'पुरूषराज अळुरपा॑डेची' आठवण झाली
आपला,
(सरदार दंताड वैदु) प्रसाद दाढे

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 4:46 pm | विसोबा खेचर

उत्तोताम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या
सोबत काही यवन पेये ही होती. यांचा लत्तप्राहार काही और असतो असे सरदार धमाल यानी वैयक्तिक अनुभवावरुन सांगितले.

वा वा! मस्त भाषा!

कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या

हे तर लैच भारी! :)

झक्कास बर्र का विजूभाऊ!

तुम्हासारखी एकापेक्षा एक अनमोल रत्ने मिसळपावला मिळाली आहेत हे मिपाचे भाग्यच म्हटले पाहिजे! :)

मस्त धमाल सुरू आहे, चालू द्या..! :)

--श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

प्राजु's picture

25 Mar 2008 - 11:15 pm | प्राजु

आपला घोडा जोरात दौडत नसावा अशी आम्हांस शंका उत्पन्न होते आहे.. तरी आपल्या घोड्यास यथोचित चारा-पाणी करोनी आपण घोडा मैदान लवकर गाठावे ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु

या सगळ्या वातावरणात बालगीत?

खरं बालगीत होतं का विडंबन? याचं एक अत्यंत अश्लिल विडंबन आम्हास ठावूक आहे ;-) तेच गायिले नाही ना?

धमाल मुलगा's picture

26 Mar 2008 - 9:46 am | धमाल मुलगा

एक्या...
आयला पेरुगेटाची कार्टी उभ्या आयुष्यात सुधारायची नाहीत म्हणतात ते अस॑!

अगदी बरोब्बर ओळखल॑स रे!!!!

एक's picture

26 Mar 2008 - 9:56 pm | एक

मेंदू तिरकाच चालवायची सवय लावली गेली ना शाळेत? ;-) आता कुठला सरळ होणार?

विजुभाऊनी सर्वाना माहीत असलेले "गोरी गोरी पान" हे बालगीत भिमसेन जोशींच्या थाटात पेष केले..

प्रभाकर पेठकर's picture

26 Mar 2008 - 5:58 pm | प्रभाकर पेठकर

.....कित्येकांस तर ** भाल अथवा ललाटात गेल्यासारख्या भासले.

हा:..हा:.हा: ... बखर काळापासून ही 'प्रथा' अस्तित्वात आहे तर....

उत्तमोत्तम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या.

धुवांधार पाऊस आणि कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार म्हणजे विचारुच नका. तोंडाला पाणीच सुटले.

विजुभाऊ's picture

27 Mar 2008 - 1:34 pm | विजुभाऊ

ईर्षाद....एका मित्राला हे सगळे सलग पहायचे आहे

सुधीर कांदळकर's picture

27 Mar 2008 - 9:30 pm | सुधीर कांदळकर

तर ** भाल

नरड्यात मझा आहे बॉ

बालगीत आमच्या काळी पण होते की.

मग नंतर डमडम डिगा म्हटले की नाही.

पण झकास बखर मजा आली.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.