मार्बल केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
26 Apr 2008 - 12:27 pm


साहित्य-
२५० ग्राम मैदा,२५० ग्राम तूप/लोणी/मार्गारिन,२५० ग्राम साखर
२ चहाचे चमचे भरून बेकिंग पावडर,१चिमूट मीठ,५ अंडी,१/४कप दूध
१.५ चमचा वॅनिला अर्क, २ ते २.५ मोठे चमचे कोको पावडर
कृती-
तूप चांगले फेसून घेणे,साखर घालून फेसणे. अंडी घालून फेसणे.नंतर वॅनिला अर्क घालून फेसणे.
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे आणि वरील मिश्रणात हळूहळू मिसळणे.नंतर थोडे दूध घालणे व मिश्रण एकजीव करणे.
आता मिश्रणाचे २ भाग करून वेगवेगळ्या वाडग्यात काढून घ्या,एका भागात कोको पावडर घाला व दुसरा भाग तसाच ठेवा.
केकच्या साच्याला तूप लावून घ्या.दोन चमचे कोकोयुक्त मिश्रण आणि २ चमचे वॅनिलाचे साधे मिश्रण असे दोन्ही मिश्रणे संपेपर्यंत घाला‌. साचा तिरपा करून मिश्रण सगळीकडे सारखे पसरवून घ्या.
अवन प्रीहिट करून घ्या. १८० ते २०० अंश से. ला ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
वि. सू-
१. केक नेहमी थंड झाल्यावर कापावा म्हणजे स्लाइस तुटत नाहीत.
२‌.केक कापल्यावर स्लाईस उघड्यावर ठेवायच्या नाहीत,त्या कोरड्या पडतात.

पाकक्रिया

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2008 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर

पाककृती छान आणि सोप्प्प्पी दिसते आहे.
पण हाय.... डॉक्टरांनी केक खाण्यास मनाईहुकूम बजावला आहे.
करून कोणाला खाऊ घालेन म्हंटले तर ओव्हनही बिघडला आहे. जाऊ दे.....

देवदत्त's picture

26 Apr 2008 - 10:06 pm | देवदत्त

वाह... पाहूनच तोंडाला पाणी सुटले
सांगेन कधीतरी घरी करायला :)

अभिता's picture

27 Apr 2008 - 12:22 am | अभिता

माय्क्रोवेव्ह मध्ये कसा बेक करायचा.

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2008 - 4:59 pm | स्वाती दिनेश

अना,साध्या मायक्रोवेव मध्ये जर केक करायचाच असेल तर साधारण ४ ते ५ मिनिटे लागतात,कमी जास्त वॅटेजप्रमाणे.परंतु त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे)
मी स्वत: केक मायक्रोवेव मध्ये करणं प्रेफर करत नाही.मायक्रोवेव+कन्वेक्शन असेल तर गोष्ट निराळी..
मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरा.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो.आणि केक उत्तम होतो, हे मी स्वतः करून पाहिले आहे.

प्राजु's picture

1 May 2008 - 1:34 pm | प्राजु

स्वाती तुला, केक स्पेशालिस्ट अशी पदवी बहाल करावी... :)
हिट्ट आहे केक तुझा.. एकदम सह्ही.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

29 Apr 2008 - 3:54 am | चित्रा

दिसते आहे पाककृती.
त्सेंटा आजी पण दिसतायत का फोटोत?

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2008 - 4:48 pm | स्वाती दिनेश

त्सेंटा आजीच आहे,आकिम आजोबांच्या वाढदिवसासाठी तो केक मी केला होता,:)

आनंदयात्री's picture

30 Apr 2008 - 5:04 pm | आनंदयात्री

आज्जीचे नाव फारच अवघड आहे हो उच्चारायला, आम्ही तसेंटा असे उच्चारुन मोकळे झालो !

विसोबा खेचर's picture

30 Apr 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर

छान दिसते आहे पाकृ. फोटूही छान आलाय...

आपला,
(कट्टर मिसळपावकर) तात्या.

अवांतर - बाय द वे, आम्ही फक्त ग्रॅन्टरोडच्या मेरवानचा मावाकेक किंवा मेट्रोजवळील कयानीचा मावाकेक एवढे दोनच केक आवडीने खातो...

आपला,
(केकप्रेमी मुंबईकर) तात्या.

स्वाती दिनेश's picture

1 May 2008 - 1:30 pm | स्वाती दिनेश

बाय द वे, आम्ही फक्त ग्रॅन्टरोडच्या मेरवानचा मावाकेक किंवा मेट्रोजवळील कयानीचा मावाकेक एवढे दोनच केक आवडीने खातो...
तात्या,मेरवान आणि कयानीचा जबाब नही!
आपल्याकडे जे केक मिळतात ते मुख्यकरुन ब्रिटिश स्टाइलचे असतात पण जर्मन बेकरी प्रॉडक्ट्स वेगळेच असतात.आमच्या त्सेंटा आजी,काळेबाईं,मार्लिस आजी,गाबीची आई,मेलिसा आणि बिर्गिट अशा सुगरणींच्या केक रेसिपींचं वर्णन मी काय करू? त्यात आणि ड्रेस्डनची खासियत असलेला रम मध्ये बेदाणे सोक करुन घातलेला ख्रिसमसलाच इथे मिळणारा श्वेनियाच्या वडलांच्या हातचा 'स्टोलन'केक.... वॉव...काय सांगू ?

सुनील's picture

28 Apr 2009 - 3:18 pm | सुनील

रम मध्ये बेदाणे सोक करुन घातलेला
क्या बात है!

बाकी मेरवानच्या मावा केकला मुंबईत तरी पर्याय नाही!

मार्बल केक दिसतोय झक्कास तेव्हा चवीलाही खासच असणार!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिता's picture

1 May 2008 - 12:28 am | अभिता

आभारी आहे.माझ्याकडे कन्व्हेक्शन आहे.

शाल्मली's picture

2 Nov 2008 - 11:58 pm | शाल्मली

स्वातीताई,
मार्बल केकचा प्रयत्न केला आहे...
तू सांगीतल्याप्रमाणे केक आतून थोडा ओला राहिला आहे :)

आता मार्क दे :)
-- (स्वातीताईची शिष्या) शाल्मली.

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2008 - 12:38 pm | स्वाती दिनेश

छान झालेला दिसतो आहे केक. डिस्टिंक्शन!
ख व पहा.
स्वाती

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 4:56 pm | चतुरंग

लुफ्तहंसाचं विमान फ्राफुहूनच जातं! नाही, भारतवारीच्या अधल्यामधल्या थांब्यांचा विचार करुन ठेवतोय जरा... :W :?

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2008 - 5:00 pm | स्वाती दिनेश

स्वागत आहे.. :)
फक्त आधी कळवा (तुम्ही यायची तारीख आणि फर्माईश दोन्ही,:) म्हणजे तुम्हाला पाहिजे ते मिळेल.
स्वाती

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 5:02 pm | चतुरंग

काही ठरताच जरुर कळवीन!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर

शाल्मलीभाभीने केलेला केकही छान आहे! :)

यशोधरा's picture

3 Nov 2008 - 11:13 am | यशोधरा

हाही केक मस्तच दिसतोय!!
ए स्वातीताई, मला सगळे केक बनवून कुरियर कर आता!! नुसतेच फोटू बघून जीव तडफडतोय माझा आता केक खायला !!
तू पण गं शाल्मली!
=P~ 8>

स्वाती ताई,
एकदम जिवघेणा फोटो लावला आहेस, असे वाटते केकचा एक पिस खावा. :)

चटोरी वैशू's picture

28 Apr 2009 - 2:19 pm | चटोरी वैशू

केक ओव्हन शिवाय करता येईल काय?..... हो ! तर मग कसा ... क्रुपा करुन सांगावे....