गच्च मिठी शहारलेली

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
14 Dec 2010 - 9:21 pm

हळुवार कातरवेळी
गच्च मिठी शहारलेली
चंदेरी किणार ल्यालेली
आकाशी ओढणी रंगबिरंगी

तव गालावर रेशमी
किरणांची केशरी लाली
जांभुळनयनात हरवली
गच्च मिठी शहारलेली

सोहळा रजनीगंधाचा
स्पर्श रेशमी आनंदी ..
लाजुनी दडला सूर्य
ओठांची निशब्द बोली..

---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०)

* अवांतर :
१. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

14 Dec 2010 - 9:26 pm | प्राजु

हळूवार कविता! छान आहे.

९.४७ वाजता थंडीच्या दिवसांत अशी कविता...
जांभुळनयन ही उपमा खुपच समर्पक वाटते..

रचना वाचुन खरंच.............."ओठांची निशब्द बोली"

गणेशा - प्रथम तुला मी वंदितो...
पुलेशु..

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

14 Dec 2010 - 10:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

व्वा!...
मस्त..छान जमलिये!

प्रकाश१११'s picture

15 Dec 2010 - 7:48 am | प्रकाश१११

हळुवार कातरवेळी
गच्च मिठी शहारलेली
चंदेरी किणार ल्यालेली
आकाशी ओढणी रंगबिरंगी

तुझ्या फुलांचा वास पसरतोय सगळीकडे सर्वत्र
मला येतोय त्यांचा सुवास ! आता दरवळेल दूरवर ......

मदनबाण's picture

15 Dec 2010 - 8:08 am | मदनबाण

वा...सुंदर :)

सोहळा रजनीगंधाचा
स्पर्श रेशमी आनंदी ..
लाजुनी दडला सूर्य
ओठांची निशब्द बोली..
झकास्स्स्स... :)

नगरीनिरंजन's picture

15 Dec 2010 - 8:27 am | नगरीनिरंजन

वा! जांभुळनयन!! मस्त शब्द. मनात रुतलेलं एक नयनयुगल आठवून छातीत कळ आली रे.

चुकुन येथे नविन चित्र कविता लिहितान रिप्लाय दिला गेला.
कविता वरती आल्याने क्षमस्व

गणेशा