युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
तो:
आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी ||धॄ||
ती:
नको नको आता नको, माझा बा आनल काठी
तो:
नको तू अशी दुर पळू नको
नको तू अशी दुर राहू नको
दोन प्रेमाच्या फुलामधी
तिसरा भुंगा तू आनू नको
ती:
असं नको करू, जवळ नको येवू
माझा भाऊ लागलं आपल्या पाठी
तो:
अर्रर्रर्रर्रर्रर्र, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||१||
तो:
ते बघ तुला दिसतंय काय
ती:
काय?
तो:
अगं, ते बघ तुला दिसतंय काय
एक राघू, त्याची मैना, चोच चोचीत जाय
ते बघ.....तिकडं माझी नजर जाय
ती:
कुठं?
तो:
आगं, ते बघ.....तिकडं माझी नजर जाय
उस पिकलाय, तुला खायचा काय?
ती:
नको नको, आत्ता नको देवू
आपन घरला जावू
लोकं बोलत्यात आपल्या पाठी
तो:
आरं बाब्बो,
ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||२||
तो:
आली थंडी साधू संधी चल पेटवू शेकोटी ||धॄ||
दोघ : लाला लाला... अंहं अंहं...लाला लाला लाला ला
- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/१२/२०१०
प्रतिक्रिया
11 Dec 2010 - 6:32 pm | प्रकाश१११
आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
फारच मस्त .खूप छान
.शुभेच्छा
12 Dec 2010 - 1:04 pm | टारझन
वा पाभे वा !!
आहो ही कविता त्या चिंटु च्या बाबांना पण ऐकवा हो .. परवा कुठे ते चिंटु ला सांगत होते .. सकाळी उठुन पळायला जाण्याइतका छाण व्यायाम नाही कुठला ! ... हे म्हणजे घरचं सोडून पळत्याच्या मागे ;)
बाकी थंडीत पत्ता लवकर सापडत नाही म्हणे :)
13 Dec 2010 - 2:01 pm | नंदू
चिंटूचे बाबा चिंटूला सांगत होते म्हणजे ते सुद्धा जातील असं नाही :-)
12 Dec 2010 - 4:53 pm | पक्या
झकास
13 Dec 2010 - 2:30 pm | मेघवेडा
वा वा वा! एकदम दगडफोड गीत!