अंगाई

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
10 Dec 2010 - 1:11 am

अंगाई
- - - - -
आठवतंय ना?
मी गाडी चालवताना
सावध बसायचास
मुठी आवळून
-
दमलायस रगड
आहेत पापण्या जड
तर येऊ दे डुलकी
घे शांत निजून
- - - - -

शृंगारशांतरसकविता

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

10 Dec 2010 - 6:26 am | बेसनलाडू

(ड्रायवर)बेसनलाडू

स्पंदना's picture

10 Dec 2010 - 8:50 am | स्पंदना

हे हायकु आहे का?

जे काय असेल ते आवडल.

गुंडोपंत's picture

10 Dec 2010 - 9:00 am | गुंडोपंत

हायचारोळी प्रकार आवडला.
पण # शृंगार
# शांतरस

असे का वर्गीकरण आहे?
यात काही द्वयर्थी अपेक्षित आहे का?

म्हणजे

"दमलायस रगड
आहेत पापण्या जड
तर येऊ दे डुलकी
घे शांत निजून"

ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की
मायेने, काळजीने प्रेमाची सूचना?

मिसळभोक्ता's picture

10 Dec 2010 - 2:38 pm | मिसळभोक्ता

ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की
मायेने, काळजीने प्रेमाची सूचना?

दोनकडवी एकामागोमाग एक वाचल्याने, अंमळ इडिपस कॉम्प्लेक्स सारखे काही तरी वाटले.

असो.

कुणीतरी समजवून सांगा बॉ !

एक सवारी भितीने जीव घेणारी तर एक सवारी जीव जाईपर्यंत दमवणारी. (दोन पैकी एकच जीव).

-()सदाशीव.

बेसनलाडू's picture

12 Dec 2010 - 1:17 am | बेसनलाडू

हायकूच्या अंगाने जाणारी चारोळी म्हणून यांना हायरोळ्या म्हणावेसे वाटते. यावरून आमच्या आवडत्या कायरोळ्यांची आठवण होते. बरेच दिवस झाले खाल्ल्या नाहीत; आता केल्या पाहिजेत.
(आचारी)बेसनलाडू

राघव's picture

10 Dec 2010 - 11:07 am | राघव

आवडले! :)

शब्दांनी तयार केलेला "स्त्री" चा आकार आवडला..

अवांतर :
असेच शब्दांनी आकार करायचे मध्ये मध्ये खुप सवय झाली होती .. आठवले ते . .धन्यवाद

धनंजय's picture

12 Dec 2010 - 12:53 am | धनंजय

प्रतिसादांत दिलेले वेगवेगळे अर्थसंदर्भ पटण्यासारखे वाटतात.

सर्वांचे धन्यवाद.