इतिहास

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
8 Dec 2010 - 6:59 pm

माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न
भोळी भाबडी, अगदी साधी.
तुझ्या न माझ्या साथीची
आयुष्याच्या वाटचालीची.
तु
उघड्या डोळ्यांनी साकारतोयस,
शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी.

मी अन तु ,
अगदी भिन्न माणस.
मी अधिर , आवेगी,
तु शांत , संयमी.

मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी.
तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी.

अन
तरीही मला जपतोयस,
वास्तवाच्या दाहक उन्हात ,
सावली होतोयस.
एव्हढ्या वेगवान जगात
घटकाभर थांबुन
मला डोळे मिटुन
स्वप्न बघायला
संधी द्यायची
धडपड करतोस .

आयुष्याच्या वाटचालीत
खुप खुप पुढ गेल्यावर
कधी तरी आपण माग वळु,
सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु,

तेंव्हा मी तुला
प्रत्येक वळणावरच्या
स्वप्नांचा
इतिहास
ऐकवीन.

__/\__
अपर्णा

शांतरसकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

8 Dec 2010 - 7:54 pm | गणेशा

एकदम मस्त

सर्व खुप मस्त लिहिले आहेच..

"स्वप्नांचा इतिहास" हे खास करुन जास्त मनात भिडले ...

लिहित रहा .. वाचत आहे

नगरीनिरंजन's picture

8 Dec 2010 - 7:33 pm | नगरीनिरंजन

वा वा! मस्त!

प्रकाश१११'s picture

8 Dec 2010 - 9:15 pm | प्रकाश१११

अन
तरीही मला जपतोयस,
वास्तवाच्या दाहक उन्हात ,
सावली होतोयस.
एव्हढ्या वेगवान जगात
घटकाभर थांबुन
मला डोळे मिटुन
स्वप्न बघायला
संधी द्यायची
धडपड करतोस .

अरे वा !! छान नि मस्त लिहिलेस .आवडले !!

बेसनलाडू's picture

9 Dec 2010 - 8:17 am | बेसनलाडू

कविता आवडली.
(जाणकार)बेसनलाडू

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 9:02 am | गुंडोपंत

छान!
हल्ली आमचे केशवसुमार दिसत नाहीत कुठे?
ते नाही तर नाही पण चतुरंग खोडसाळ वगैरे मंडळीही कुठे अंतर्धान पावली आहेत ते नारोशंकरालाच माहिती.

पियुशा's picture

9 Dec 2010 - 10:21 am | पियुशा

वा व्वा मस्तच !

राघव's picture

9 Dec 2010 - 11:26 am | राघव

रचना आवडली :)

अवलिया's picture

9 Dec 2010 - 11:36 am | अवलिया

वा ! मस्त !!

टारझन's picture

9 Dec 2010 - 11:46 am | टारझन

छान ग मस्त ग

sneharani's picture

9 Dec 2010 - 11:49 am | sneharani

मस्तच!!

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 1:57 pm | शैलेन्द्र

"आयुष्याच्या वाटचालीत
खुप खुप पुढ गेल्यावर
कधी तरी आपण माग वळु,
सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु,

तेंव्हा मी तुला
प्रत्येक वळणावरच्या
स्वप्नांचा
इतिहास
ऐकवीन."

सुंदर, चित्रदर्शी

स्पंदना's picture

9 Dec 2010 - 6:13 pm | स्पंदना

धन्यवाद !

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 6:17 pm | धमाल मुलगा

एकदम कविता वगैरे? आणि तीही एकदम अशी झकास? उदाहरणार्थ वगैरे म्हणायचं झालं तर थोरच आहेस. :)

अय्यो धमु! मी मुळची कवितेतलीच आहे. ललीत एका गुरु महाराजांनी डोक खाउन लिहायला लावल्यान सुरु केल.

आणी हो थोरच म्हणायच आहेना? ते 'कोसला' मधल? की 'थेर'?

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 8:05 pm | धमाल मुलगा

तू मला बरोब्बर कोसला! :D

रन्गराव's picture

9 Dec 2010 - 9:55 pm | रन्गराव

लई भारी :)

सुहास..'s picture

10 Dec 2010 - 6:40 pm | सुहास..

_/\_

आ व ड ले मु क्त क !!

गंगाधर मुटे's picture

11 Jan 2011 - 7:25 pm | गंगाधर मुटे

तेंव्हा मी तुला
प्रत्येक वळणावरच्या
स्वप्नांचा
इतिहास
ऐकवीन.

अहाहा. क्या बात है. :)