मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

स्पंदना · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न भोळी भाबडी, अगदी साधी. तुझ्या न माझ्या साथीची आयुष्याच्या वाटचालीची.
तु उघड्या डोळ्यांनी साकारतोयस, शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी. मी अन तु , अगदी भिन्न माणस. मी अधिर , आवेगी, तु शांत , संयमी. मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी. तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी. अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, तेंव्हा मी तुला प्रत्येक वळणावरच्या स्वप्नांचा इतिहास ऐकवीन. __/\__ अपर्णा

वाचने 3767 वाचनखूण प्रतिक्रिया 18

गणेशा Wed, 12/08/2010 - 19:54
एकदम मस्त सर्व खुप मस्त लिहिले आहेच.. "स्वप्नांचा इतिहास" हे खास करुन जास्त मनात भिडले ... लिहित रहा .. वाचत आहे

प्रकाश१११ Wed, 12/08/2010 - 21:15
अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . अरे वा !! छान नि मस्त लिहिलेस .आवडले !!

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 09:02
छान! हल्ली आमचे केशवसुमार दिसत नाहीत कुठे? ते नाही तर नाही पण चतुरंग खोडसाळ वगैरे मंडळीही कुठे अंतर्धान पावली आहेत ते नारोशंकरालाच माहिती.

शैलेन्द्र गुरुवार, 12/09/2010 - 13:57
"आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, तेंव्हा मी तुला प्रत्येक वळणावरच्या स्वप्नांचा इतिहास ऐकवीन." सुंदर, चित्रदर्शी

धमाल मुलगा गुरुवार, 12/09/2010 - 18:17
एकदम कविता वगैरे? आणि तीही एकदम अशी झकास? उदाहरणार्थ वगैरे म्हणायचं झालं तर थोरच आहेस. :)

In reply to by धमाल मुलगा

स्पंदना गुरुवार, 12/09/2010 - 18:44
अय्यो धमु! मी मुळची कवितेतलीच आहे. ललीत एका गुरु महाराजांनी डोक खाउन लिहायला लावल्यान सुरु केल. आणी हो थोरच म्हणायच आहेना? ते 'कोसला' मधल? की 'थेर'?