आत्ता गणपती बद्दल लेख चाळत होते, एका अफाट बातमीने लक्ष वेधले-
खसखशीच्या दाण्यावर बोरिवली येथे राहणारे जगदीश पटवर्धन हे थ्रीडी इफेक्ट असलेले गणपती काढतात. एका हातात भिंग व दुसर्या हातात झिरो नंबरच्या सुईच्या साहय्याने ते खसखस, तीळ, तुळशीची बी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींवर श्रीगणेश साकारत आहेत. एक-दोनच नाही तर चक्क अष्टविनायकाचेही दर्शन ते इवल्याशा वस्तूंवर घडवत आहेत.
ही कला म्हणायची की जादू?
http://173.83.203.182/2010/September/07/Link/indradhanu1.htm
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 8:37 am | कौशी
वरदान ......
8 Dec 2010 - 9:52 am | वेताळ
दुसरे काय....
8 Dec 2010 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार
कोणाचे ? कलाकाराचे का शुचिमामीचे ? ;)
8 Dec 2010 - 11:08 am | टारझन
काय रे हल्ली मामी मामी करत असतोस ? पिवळी पुस्तकं वाचतोय का ? लिहा तरी एकदा पुस्तकविष्व वर मग ;)
-(मचाक याहु गृप मॉड्रेट्र) ट्राझन भावोजी
8 Dec 2010 - 2:48 pm | llपुण्याचे पेशवेll
अरे टार्या काहीबाही वाचण्यापेक्षा दिवाळी अंक वाच.
8 Dec 2010 - 2:52 pm | टारझन
आइल्ला , ही पोरगी तर फटाका आहे :) अगदी खादाडीतल्या बायांएवढी :) फक्त सोबतीला खादाडी नैय्ये :(
-(खादाडबैप्रेमी) टार्या शुमाकर
मी चु.चा.चमु चा सदस्य आहे .
8 Dec 2010 - 10:00 am | यकु
कला सुंदरच आहे.
गणपती मॅनिया
कशातही गणपती पाहातात/काढतात - पपईत गणपती, टोमॅटोत गणपती, सागरगोट्यांत गणपती, कानाखाली गणपती...
तसेच ते या खुदा वाले - यांना बोकडाच्या कपाळावर , रस्त्याच्या कडेला वाढलेल्या निवडुंगात खुदाचे नाव दिसते.
8 Dec 2010 - 10:31 am | शिल्पा ब
खुदा वाटेल तिथे दिसत असेल हो...पण असा काढता येतो का त्यांना खुदा...अन मुख्य म्हणजे धर्मांधांशी तुलनाच चुकीची आहे..
8 Dec 2010 - 10:42 am | राजेश घासकडवी
हे काम कष्टाचं आहे आणि त्यासाठी खूप मेहेनत व कौशल्य खर्ची पडलं असणार यात वादच नाही. त्याबद्दल जगदीश पटवर्धन यांना दाद दिलीच पाहिजे.
पण प्रश्न असा येतो की फोटोग्राफीच्या जमान्यात ज्याप्रमाणे हुबेहुब चित्र काढणं याला फारसं महत्त्व राहिलं नाही, तसंच या कारागिरीचं नाही का? या खसखशीच्या गणपतीसाठी जी खसखस असेल तीवर गणपती काढण्याचं तंत्रज्ञान आज सर्रास वापरात आहे. खसखस सुमारे ५०० मायक्रॉनची असेल. आजकालच्या सेमिकंडक्टर चिप्समध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाने हे चित्र ५०० नॅनोमीटरमध्ये (हजारपट लहान लांबीत, दशलक्षपट लहान आकारात) काढता येईल! दोन वर्षांनी तेच ३०० नॅनोमीटरमध्ये काढता येईल.
आपण सेलफोन, कंप्युटर सहज वापरतो. पण आत कुठेतरी अब्जावधी अतिसूक्ष्म 'गणपती' आहेत या कल्पनेने थक्क व्हायला विसरतो.
8 Dec 2010 - 11:10 am | अवलिया
सेमीकंडक्टर चीपमधे हाताने अब्जावधी सुक्ष्म गणपती काढतात? कमालच म्हणावी की !
8 Dec 2010 - 11:13 am | स्वानन्द
:)
8 Dec 2010 - 11:34 am | राजेश घासकडवी
मुद्दा कळत नसेल तर सोडून द्या ना राव! तंत्रज्ञान असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे.
तुम्ही सध्या मिपावर अवांतर, असंबद्ध लिहिण्याच्या अधिकाराविषयी झगडत असाल तर चालू द्यात.
8 Dec 2010 - 11:40 am | अवलिया
मुळ लेख हस्त कौशल्याचा असतांना तंत्रज्ञान कौतुक कशाला हा माझा प्रश्न आहे. असो. नसेल समजला तुम्हाला तर हरकत नाही. सगळ्यांनाच सगळं समजल पाहिजे असे नाही.
>>>>तुम्ही सध्या मिपावर अवांतर, असंबद्ध लिहिण्याच्या अधिकाराविषयी झगडत असाल तर चालू द्यात.
वरच्या माझ्या प्रतिसादात अवांतर, असंबंध्द असे काय आहे हे कळले नाही. पण तुम्ही एक अतिशय गंभीर आरोप माझ्यावर करत आहात हे मी संपादक मंडळाला, तसेच मालक नीलकांत यांना सुचित करु इच्छितो. सबब आपण एक तर वक्तव्य मागे घ्या किंवा २४ तासांच्या तसा योग्य पुरावा मालकांकडे सुपुर्द करा.
8 Dec 2010 - 11:54 am | राजेश घासकडवी
हस्तकौशल्याला पहिल्या ओळीतच दाद दिली आहे. प्रश्न मांडला होता तो तंत्रज्ञान हस्तकौशल्यापलिकडे गेल्यावर कला म्हणजे काय व कौशल्य म्हणजे काय असा फरक व्हायला लागतो. एकंदरीत त्या दिशेने चर्चा चालू झालेलीच आहे ते बरं वाटलं.
गंभीर आरोप वगैरे वाचून अंमळ गंमत वाटली. तुम्हीदेखील कोणी थोडंसं टोचून बोललं तर संपादक मंडळ, मालक नीलकांत वगैरेंकडे धाव घेता असं दिसतंय. असो.
जर तुम्ही असंबद्धतेच्या अधिकारासाठी लढत असाल तर वरचा प्रतिसाद हे योग्य पहिलं पाऊल आहे असं सुचवायचं होतं. (माझ्या प्रतिसादात नसलेला अर्थ काढणं वगैरे...) एवढं तुम्हाला झेपत नसेल तर मी दिलगीर आहे असं म्हणतो.
चला, निरर्थक चर्चा खूप झाली. तुमचंच खरं असं म्हणायलादेखील मी तयार आहे. चालू द्यात.
8 Dec 2010 - 12:14 pm | अवलिया
एकंदर भारतीय कला वगैरेंचा धागा आला की त्याचे महत्व काही नाही असाच काही लोकांचा दृष्टिकोन असतो.. त्यावर अधिक बोलत नाही. तुम्ही बोललात तरी फरक पडत नाही. असो.
>>>तुम्हीदेखील कोणी थोडंसं टोचून बोललं तर संपादक मंडळ, मालक नीलकांत वगैरेंकडे धाव घेता असं दिसतंय. असो.
इथे टोचुन बोलण्याचा काहीही संबंध नाही. माझे नाव घेउन अनेक जण विनोदी किंवा मला टारगेट करुन प्रतिसाद देत असतात. प्रत्येक वेळेस मी काही संपादक मंडळ किंवा नीलकांत यांचेकडे धाव घेत नाही. आपला प्रतिसाद हेतुपुरस्सर अपमानजनक होता त्यामुळे मी संपादक मंडळ आणि नीलकांत यांना सुचित केले आहे. असो.
बाकी मला काय झेपतं आणि काय झेपत नाही याची आपण अजिबात काळजी करु नये. निरर्थक चर्चेला तुम्हीच सुरवात केली होती आणि तुम्हीच थांबत आहात हा तुमचा योग्य निर्णय आहे म्हणुन तुमचे अभिणंदन करतो.
असो.
8 Dec 2010 - 12:15 pm | Nile
खसखशीच्या दाण्यावर गणपती काढणं ही भारतीय कला कशी झाली ब्वॉ?
उद्या कोणी कागदावर हागण्यार्यांवर टिका केली तर तुम्ही पुन्हा भारतीय संस्कृतीवर टिका म्हणणार का?
8 Dec 2010 - 12:16 pm | अवलिया
असो. मोठे व्हा !
8 Dec 2010 - 12:34 pm | Nile
आपला प्रतिसाद हेतुपुरस्सर अपमानजनक आहे म्हणुन संपादक मंडळाकडे जाउन रडु का?
8 Dec 2010 - 12:36 pm | अवलिया
सगळ्या गोष्टी मला विचारुनच करणार का? ऑ ! मोठे व्हा !
8 Dec 2010 - 12:37 pm | Nile
नाही, तुमचे नेहमीचे आहे म्हणुन म्हणलं अनुभवी माणसाचा सल्ला घ्यावा.
8 Dec 2010 - 12:38 pm | अवलिया
असो. आता खरेच मोठे व्हा !
8 Dec 2010 - 1:25 pm | टारझन
णाण्या, काय रे त्याला मोठे व्हा मोठे व्हा करतोय ? त्यावरुन मला तो हिन्दी-पाकी-चिनि जंगलात जातात आणि मग १ फुटाचा किस्सा होतो तो जोक आठवला.
- जोकी
अधिक माहिती साठी व्यनि करा.
8 Dec 2010 - 11:42 am | शिल्पा ब
<<<फोटोग्राफीच्या जमान्यात ज्याप्रमाणे हुबेहुब चित्र काढणं याला फारसं महत्त्व राहिलं नाही, तसंच या कारागिरीचं नाही का?
हो, पण फोटोग्राफीने कितीही सूक्ष्म आणि छान फोटो काढता आहे तरी हाताने काढलेल्या चीत्राचीच किंमत बाजारात जास्त असते...फोटोग्राफी जरी कला असली तरी ते तंत्रज्ञान आहे आणि हातानी चित्र काढणे हे कसब आहे...एका कॅनवास वर आकार, रंग इ. सगळे हाताने अन बुद्धी वापरून उतरवणे हि खूपच अवघड गोष्ट आहे...बाकी चालु द्या.
8 Dec 2010 - 11:41 am | नगरीनिरंजन
ज्याचा त्याचा छंद. मला व्यक्तिश: नव्या कल्पना लढवून सामान्य आकारात सुंदर चित्रं काढणारे, शिल्पं बनवणारे मुळीक, पटनाईक इत्यादी कलाकार आवडतात.
दाभोळकरांची गणपतीची चित्रं अतिशय सुंदर असतात.
8 Dec 2010 - 12:34 pm | मदनबाण
दाभोळकरांची गणपतीची चित्रं अतिशय सुंदर असतात.
जालावर कुठे असतील तर प्लीज मला त्याचा दुवा हवा आहे...
8 Dec 2010 - 1:24 pm | नगरीनिरंजन
इथे आहेत काही.
8 Dec 2010 - 12:03 pm | विजुभाऊ
खसखशीच्या दाण्यावर चित्र काढणे याचा उपयोग काय?
मातीच्या गणपतीला पाहून निदान काहितरी स्प्रुष्य पाहिल्याचे समाधान तरी मिळते.
खसखशीच्या दाण्यावर गणपतीचे चित्र काढले हे एक अनावश्यक कौशल्य .......
8 Dec 2010 - 12:06 pm | टारझन
दॅट मेक्स सेण्स !! :) कौशल्य तेच जे दुसर्याला समाधान देते !@!
8 Dec 2010 - 12:16 pm | छोटा डॉन
( हा प्रतिसाद विजुभाऊ आणि घासकडवी ह्या दोघांनाही आहे, तपशीलात इकडे तिकडे होऊ शकते )
>> खसखशीच्या दाण्यावर चित्र काढणे याचा उपयोग काय?
सुख, आनंद, समाधान, काहीतरी केल्याचा आणि जमल्याचा कर्तव्यपुर्तीचा आनंद.
ह्यापेक्षा वेगळे अजुन काय पाहिजे ?
बाकी आपण करत असलेल्या 'उपयोग्यशुन्य' गोष्टींची लिश्ट देऊ का ?
निदान खसखशीवर गणपती काढल्याने ४ लोक ओळखतात तरी, बाकीच्यांचे ते ही नाही त्याचे काय ?
>>मातीच्या गणपतीला पाहून निदान काहितरी स्प्रुष्य पाहिल्याचे समाधान तरी मिळते.
हे कसे काय बॉ ? आम्हाला तर खसखशीवरच काय पण सेमीकंडक्टर चीपपासुन ते डायरेक्ट पर्वतावर गणपती पाहुन तेच समाधान मिळते.
स्प्रुष्य ( बहुतेक स्पृष्य = स्पर्श करता येण्याजोगे (?) किंवा दृष्य, किंवा जे असेल ते ) म्हणजे नक्की काय ?
मी तर उलटे म्हणतो, नेहमीच्या मातीच्या मुर्ती बघण्यापेक्षा असे कौशल्य वापरुन केलेले शिल्प बघायला मला जास्त आवडेल, देव तर काय सगळीकडेच आहे, खसखसीवर असल्याने कमी होत नाही आणि पर्वतावर कोरल्याने वाढत नाही, नाही का ?
>>खसखशीच्या दाण्यावर गणपतीचे चित्र काढले हे एक अनावश्यक कौशल्य .......
'अनावश्यक' हे कोण आणि कशाच्या बेसिसवर ठरवणार ?
बाकी वर लिहले आहेच. :)
ह्यानिमित्ताने आलेली कला, कौशल्य आणि तंत्रज्ञान ह्यांच्या डावे-उजवेपणा ठरवणारी विधाने गंमतशीर वाटली.
मानवी कला आणि कौशल्य हे कुठल्याच तंत्रज्ञानापेक्षा वरचढ आणि श्रेष्ठ आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे, बाकी चालु द्यात.
- (आपल्याला कागदावरही गणपती नीट काढता येत नाही ह्याचे भान असलेला ) छोटा डॉन
8 Dec 2010 - 12:26 pm | विजुभाऊ
डान्याशी सहमत आहे
खसखशीवर गणपती काढणे काय किंवा पोतराजाने अंगावर पट्टा ओढून आवाज करणे हे करण्यात नक्की काय हाशील आहे ते कळत नाही.
तसेच "श्री राम जयराम जयजय राम " असे लिहून वह्याच्यावह्या भरवणे हे देखील एक कौशल्य ठरवावे लागेल.
अनावश्यवक किंवा आवश्यक कौशल्ये कशाला म्हणायचे हाच संभ्रम असेल तर हॉस्टेललाइफ मध्ये स्वतःचा सकाळचा कार्यक्रम दीड मिनीटात आटोपणे हे एक अत्यावश्यक कौशल्य ठरते असेच म्हणावे लागेल
तांदळावर गीत लिहिणे यात कलाकाराला त्याच्या मायक्रो रायटिंग चे स्कील दाखवायचे असते. ती एवढी बारीक अक्षरात लिहीले गीता कोण वाचत असेल असे वाटत नाही. तेथे गीता लिहीली की ते श्रेष्ठ आणि शोले पिक्चरची स्टोरी लिहीली की ते फालतू असे म्हणणारी प्रजा पाहिली आहे म्हणून हा प्रतिसाद प्रपम्च
8 Dec 2010 - 12:29 pm | छोटा डॉन
तुर्तास 'असो' एवढेच म्हणतो.
- छोटा डॉन
8 Dec 2010 - 12:42 pm | मदनबाण
तसेच "श्री राम जयराम जयजय राम " असे लिहून वह्याच्यावह्या भरवणे हे देखील एक कौशल्य ठरवावे लागेल.
इजुभाउ हे देखील सगळ्यांनाच करता येत नाही,त्यामुळे हे देखील कौशल्यच आहे बरं... ;)
9 Dec 2010 - 4:19 am | शिल्पा ब
सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत नाहीत त्यामुळे जे जे काय इतरांना शक्य नाही ते आपले कौशल्य असे मानून मी हे वाक्य संपवते.
9 Dec 2010 - 4:22 am | Nile
हो तरं, व्याकरण शुद्ध वाक्यही सगळ्यांना येतंच असं नाही.
9 Dec 2010 - 4:32 am | शिल्पा ब
नाहीतं काय!! पण तेसुद्धा एक कौशल्यच आहे..हे माझे प्रायव्हेट मत.
9 Dec 2010 - 10:33 am | टारझन
हे वाचुन मला एक चलचित्रफित निर्माण कंपणी आठवली आणि डोळे पाणावले. :)
-(प्रायव्हेट) टारझन
9 Dec 2010 - 12:12 pm | शिल्पा ब
आपले पाणावलेले डोळे याविषयी वाचुन मनाला यातना झाल्या.
8 Dec 2010 - 12:31 pm | Nile
अजुन काय काय केल्यावर ४ लोक ओळखतात सांगु का? बाकी तुमच्या राखीला किती जण ओळखतात हो?
मागे एकदा गाढवाला बघुन असेच उद्गार कुणीतरी काढले होते, कोण होता रे तो?
8 Dec 2010 - 12:33 pm | छोटा डॉन
http://www.misalpav.com/node/15748#comment-264833
- ( थोडक्यात ) छोटा डॉन
8 Dec 2010 - 12:35 pm | Nile
वयोमानपरत्वे तो मान आधी आपला आहे, तेव्हा नारळ फोडाच तुम्ही आधी.
8 Dec 2010 - 12:52 pm | राजेश घासकडवी
डानराव, माझा मुद्दा थोडा वेगळा होता. उपयुक्तता पूर्णपणे फाट्यावर मारलेलीच होती. सुंदर काहीतरी निर्माण करणं याला मी कला म्हणतो. त्यासाठी काही कौशल्यं लागतातच. खसखशीवर गणपती काढल्याने कौशल्याचं, कारागिरीचं, आश्चर्याने दडपून टाकणारं प्रदर्शन होत हे खरं. फक्त सौंदर्यवृद्धी कशी होते हे कळत नाही.
प्रश्न डावं उजवं करण्याचा नव्हताच. फोटोग्राफी आल्यावर चित्रकलेच्या अभिव्यक्तीवरच फरक पडला, रिआलिझम जाऊन इंप्रेशनिझम आला. तेच या बाबतीतही होत नाही का असं विचारण्यासाठी मी तंत्रज्ञानाचं तुलनात्मक उदाहरण दिलं.
असो. याबाबतीत तसा फारसा अभ्यास नाही, त्यामुळे चिंतातूरजंतूंसारख्या अधिकारी व्यक्तीकडून कला व कारागिरी याबाबत वाचायला आवडेल.
8 Dec 2010 - 1:00 pm | विजुभाऊ
फक्त सौंदर्यवृद्धी कशी होते हे कळत नाही.
सौंदर्य हे रीलेटीव्ह आहे. त्याची वृद्धी हे तर सब डोमेन झाले.
मिशा फेन्दारलेल्या झुरळाला नवयौवनाझुरळीण सुम्दर वाटेल आणि ते पाहून एखादी षोडषा ईईईईईईईईईई करून किम्चाळेल
8 Dec 2010 - 1:15 pm | छोटा डॉन
जाऊ द्या विजुभौ, एवढे मनावर नका घेऊ.
आपल्या कक्षेत जी सौंदर्याची व्याख्या किंवा समज असते त्यानुसार आपले मत सांगावे, इतरांच्या दृष्टीने पाहणे 'अनावश्यक' नाही काय ?
>>मिशा फेन्दारलेल्या झुरळाला नवयौवनाझुरळीण सुम्दर वाटेल आणि ते पाहून एखादी षोडषा ईईईईईईईईईई करून किम्चाळेल
+१, तेच ना.
मी वर लिहले आहेच बघा 'आपल्या कक्षेतील व्याख्या' वगैरे.
झुरळाच्या कक्षेच्या व्याख्येत नवयौवनाझुरळीण 'सुंदर' वाटेल ह्यात चुक काय, पण तेच एका तरुणीला तिच्या कक्षेत 'किळसवाणे' वाटु शकते ह्यातही चुक काय ?
आता ह्या परिस्थीतीत आपण आपल्या कक्षेनुसार 'झुरळ हाकलण्याचा बहाणा करुन तरुणीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा' अशी आमची व्याख्या आहे व त्यानुसार वर्तन हे चुक ठरणार नाही ;)
असो, विषयाला सोडुन 'अनावश्यक' वाद माझ्याकडुन बास्स्स्स्स !!!
- छोटा डॉन
8 Dec 2010 - 1:18 pm | अवलिया
आता ह्या परिस्थीतीत आपण आपल्या कक्षेनुसार 'झुरळ हाकलण्याचा बहाणा करुन तरुणीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा' अशी आमची व्याख्या आहे व त्यानुसार वर्तन हे चुक ठरणार नाही Wink
वय झाल्याने विजुभाउंना हे जमणार नाही. हल्ली ते स्वतःच्याच तोंडावरुन हात फिरवतात !
8 Dec 2010 - 1:09 pm | छोटा डॉन
सौंदर्य'वृद्धी' मानण्याचा अगर ती सिद्ध करण्याचा माझा आग्रह नाही, पण जेव्हा असलेल्या सौंदर्यावरच किंवा उपजत किंवा जोपासलेल्या कला आणि कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते तेव्हा मात्र आम्हाला वाद घालावासा वाटतो.
निदान त्यात सौंदर्य आहे हे तरी मान्य करा, मग ते वृद्धी वगैरे नंतर पाहुच की.
मला मान्य आहे 'लेअर प्लेटिंग / रॅपिड प्रोटोटायपिंग / मायक्रो कटिंग ' सारख्या अद्ययावत तंत्रज्ञाने हेच अगदी पटकन आणि कमी कष्टात करता येईल पण मी वर ते 'सुख, आनंद वगैरे' लिहले आहे ते इथे कुणाच्या हिशेबात मांडणार.
सहमती आहे, तुमचा तर्क बरोबर आहे.
फोटोग्राफीमुळे समोर दिसणारे चित्र पटकन कॅच करुन ठेवणे सहज शक्य झाले, अहो मालक पण चित्रकला समोर न दिसणारेही कागदावर उतरवते त्याचे काय ?
असो, ग्राफिक्स वगैरे टुल्स मलाही मान्य आहेत. पण आजही तैलचित्रे आणि इतर प्रकारांच्या कलाकृतींची किंमत ही फोटोपेक्षा नक्कीच जास्त आहे, फोटो कदाचित जास्त सुपेरियर क्वालिटीचे असुनसुद्धा.
सहमत :)
माझाही अजिबात अभ्यास नाही, ह्याबाबत चिंतातूरजंतू यांनी अधिक भाष्य करावे ही विनंती :)
- ( सहमत ) छोटा डॉन
8 Dec 2010 - 12:15 pm | गवि
आहे खरे भरपूर कौशल्य.
मानेचे व्यायाम करायला लागत असणार. किती अवघड आहे इतकी बारीक कलाकुसर.
फक्त फोटोंमधे डायमेन्शनचा अंदाज येण्यासाठी अशा वेळी काहीतरी दुसरा ओळखीच्या साईझचा ऑब्जेक्ट (पिन, नाणे, फार बारीक असेल तर तांदुळाचा दाणा) ठेवण्याची पद्धत पाहिली आहे. या फोटोंमधे सांगेपर्यंत तो खसखशीचा दाणा आहे की फणसाची आठळी ते कळणारच नाही.
कौतुकास्पद स्किल आहे पण हे.
उपयोग आहे की नाही अशा दृष्टीने पाहिल्यास सांगणे अवघड आहे. तसाही रोज दाढी करूनही काय उपयोग? पण मस्त मॅक ३ आणूनही करणारे खूपजण असतातच ना?
"नजाकत अली"ला थोडं तरी महत्व आहेच.
8 Dec 2010 - 12:51 pm | विजुभाऊ
तसाही रोज दाढी करूनही काय उपयोग? पण मस्त मॅक ३ आणूनही करणारे खूपजण असतातच ना?
हम्म विचार करायला उद्यूक्त करणारे वाक्य आहे.
कधीच दाढी न करताही मनमोहनसिंगाची लोकांवर छाप पडू शकते.
पण रोज घोटून दाढी करणार्या जिनांची स्तुती करुनही घोटून दाढी करणार्या अडवाणींची तेवढी छाप पडू शकत नाही.
असो.
अवांतरः एक पेग प्याल्यानन्तर गुळगुळीत दाढी केलेल्य स्वतःच्याच चेहेर्यावरून हात फिरवून बघा काय गम्मत वाटते ते. ;)
( चला पोपकॉर्न आणि झाड शोधा... )
8 Dec 2010 - 1:05 pm | गवि
तुमच्या प्रतिक्रियांचा फॅन झालो आपुन.
8 Dec 2010 - 1:11 pm | नगरीनिरंजन
खसखशीचा कीस पहिल्यांदा पाहिला आयुष्यात.
8 Dec 2010 - 1:21 pm | विजुभाऊ
खसखशीचा कीस
कीस नाय रे खीस .... खसखशीचा खीस.
खस्खशीचा कीस घेता येणार नाही. आणि ज्या गोश्टीचा किस घेता येतो त्यांचा कीस घेताना खसखस करून चालणार नाही.
8 Dec 2010 - 1:34 pm | नरेशकुमार
पन का घेउ शकत नाहि 'किस' खस्खशीचा ? बरं, किस गोश्टीका 'किस' ले सक्ते है ते पन सान्गा.
8 Dec 2010 - 1:15 pm | जागु
बापरे तो दाणा ते हातात धरुन कस करत असतील कोण जाणे ? चांगली माहीती.
8 Dec 2010 - 1:15 pm | वेताळ
आपण साला आजपासुन विजुभाऊचे फॅन झालो.
खसखशीवर गणपती कोरुन तो बघायला सगळ्याना दुर्बिण द्यायला पाहिजे.
हे निव्वळ रिकामटेकडे उद्योग आहेत.
8 Dec 2010 - 9:29 pm | ईन्टरफेल
आदी चस्मा लावयचा मग !
दुर्बीन जरा आवघडच हाय
भाऊ
8 Dec 2010 - 2:13 pm | मदनबाण
अत्यंत सय्यम आणि कुशलता लागणारे हे काम आहे...
तांदळाच्या दाण्यावर असे कोरीव काम केले जाते हे माहित होते पण खसखशीवर केले जाते हे पहिल्यांदाच कळले.
बाकी सौंदर्यवृद्धी वगरैच म्हणाल तर तो एम एफ काय काढतो ? लोक तर त्याच्या पेंटींग्ससाठी करोडो मोजतात !!! ;)
जाता जाता :--- अगं शुचे... अगदीच ४ ओळी का बरं लिहतेस ह्म्म ? याच विषयावर जरा जालावर वाचुन अजुन लेखात भर टाकली असतीस, तर वाचायला अजुन मजा आली असती...आणि माहितीत भर देखील पडली असती. असो... तू लिहीत रहा.
8 Dec 2010 - 2:35 pm | नंदन
धागा मस्तच. प्रतिक्रिया तर त्याहून मस्त. यापूर्वी राईचा पर्वत ही म्हण ऐकली होती. असो. बाकी 'खसखशीच्या दाण्यावरच्या गणपतीला स्वेटर चढवावा की नाही' असा धागा निघाला तर त्यावर किती प्रतिसाद येतील, अशी एक शंका मनात डोकावून गेली ;)
9 Dec 2010 - 12:04 am | क्रेमर
प्रतिसाद आवडला.
9 Dec 2010 - 12:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसाद आवडला. पण नंदनच्या किर्तीला जागण्यार्या दोन-चार कोट्याही आल्या असत्या तर अंमळ आणखी मजा आली असती.
9 Dec 2010 - 12:34 am | धनंजय
(मूळ धाग्याच्या उद्देशाने) सूक्ष्म कारागिरीबद्दल शिल्पकाराचे अभिनंदन! शिल्पकृतीचे चित्र बघायला आवडेल.
- - -
(अवांतर...) खसखशीमाजिं काळे-गोरे असते.
खसखस अंगची काळी असल्यास गडद-ठसठशीत रंगाचा स्वेटर शोभेल. खसखस अंगची गोरी असल्यास सौम्य रंगाचा स्वेटर निवडावा. जरीचा किंवा झिरमिळ्यांचा स्वेटर काळ्या खसखशीच्या मूर्तीला बरा.
डोंबिवलीमध्ये खरे तर कधीच स्वेटर घालायची वेळ येऊ नये. अगदी डिसेंबर-जानेवारीमध्येसुद्धा स्वेटरमुळे उकाड्याने जीव नकोसा होईल.
- - -
9 Dec 2010 - 12:38 am | नंदन
(अवांतराला उद्देशून) नो स्वेट!
9 Dec 2010 - 3:40 am | Nile
थोर भारतीय कलेला असे अविश्वासाने दिलेले आव्हान थोर भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे असे म्हणुन धनंजयांच्या प्रतिसाचा निषेध नोंदवतो.
9 Dec 2010 - 12:53 am | प्रियाली
मस्तच. ;)
9 Dec 2010 - 12:45 am | राजेश घासकडवी
त्यातला एक गणपती उजव्या सोंडेचा आहे असं आत्ताच लक्षात आलं!
9 Dec 2010 - 12:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खसखशीवरच्या ५०० मायक्रॉन डायमेंशनच्या उजव्या सोंडेंच्या गणपतीचं सोवळं कोण बनवत असणार या विचाराने मला आज रात्री बहुतेक लोकरीच्या गाठींची स्वप्न पडतील.
10 Dec 2010 - 11:45 am | स्वानन्द
ते त्या गणपतीला 'घडवणारा'च बनवून देतो.
9 Dec 2010 - 10:18 am | विजुभाऊ
"खसखशीवरच्या गणपतीचे कड्डक सोवळे " असा एक खरमरीत अग्रलेख होऊन जाउदेत अमेरीकेतून.
बाय द वे खसखस ही अफू च्या बोंडापासून तयार करतात.
अवांतर : खसखशीमाजी काळेगोरे असे काही नसते. जे असते ते गोरसरच असते.
9 Dec 2010 - 10:21 am | शिल्पा ब
<<अवांतर : खसखशीमाजी काळेगोरे असे काही नसते. जे असते ते गोरसरच असते.
आणि अंमळ अंमली असते ;)
10 Dec 2010 - 2:09 am | धनंजय
गणपतीला अंगावरच्या मळाने बनवला पार्वतीने. मग तो आधी काळाच. मग गणराज रंगी गोरा रंगला.
तसेच खसखशीचे. हे बघा अफूच्या बोंडातील खसखशीचे चित्र :



अशी गोरी खसखस पण विकतात, म्हणा :
ही दोन्ही प्रकारची एका चित्रात :
10 Dec 2010 - 4:58 am | पंगा
(... किवा पार्सिंग च्यालेंज म्हणा, हवे तर.)
या वाक्याचा अन्वयार्थ लावतालावता नाकी नऊ आले.
जगदीशपंत बोरिवलीत खसखशीच्या दाण्यावर नेमके कसे राहत असतील, ते समजले नाही. म्हणजे त्यांचा नेमका आकार केवढा आहे? (किंवा 'आज माझा कडकडीत उपास होता. आख्खा दिवस फक्त पाण्यावर राहिलो.' या वाक्यातल्याप्रमाणे, श्री. पटवर्धन केवळ खसखशीचा एक दाणा खाऊन जगतात, असे म्हणायचे आहे काय? अर्थात, तरीही कठीण आहे म्हणा!)
(अतिअवांतरः ब्रेकफास्टला खसखस घातलेला बेगल खाल्ला की एरवी कोणतेही ड्रग न घेतासुद्धा ड्रगटेस्ट फेल होण्याची शक्यता बरीच वाढते म्हणतात. खरेखोटे माहीत नाही - मुद्दाम प्रयोग करून पाहिलेला नाही. इथे तर फक्त खसखस! अर्थात, एका दाण्याने काही होऊ नये म्हणा!)
दुसरे म्हणजे, श्री. पटवर्धन हे 'थ्रीडी इफेक्ट असलेले' म्हणजे नेमके काय आहेत? म्हणजे तुम्हीआम्ही कोण- टूडी की फोरडी?
अरे हो! आपण सर्वच फोरडी, नाही का? म्हणजे आपल्याला स्थळाच्या तीन आणि काळाची एक अशा चार मिती असतात म्हणून. मग पटवर्धन थ्रीडी म्हणजे काळात एका क्षणी फ्रीझ वगैरे होऊन राहिले वगैरे आहेत का? (असतात म्हणा असेही नग - काळाबरोबर पुढे न जाणारे! युअर्स ट्रूली इन्क्लूडेड...)
की पटवर्धन हे वास्तविक टूडी आहेत, पण थ्रीडी असल्यासारखे भासतात ('इफेक्ट'!), असे काहीसे म्हणायचे आहे? (तरीही चौथे डायमेन्शन कोणत्या भावाने?)
जमल्यास खुलासा व्हावा.
10 Dec 2010 - 5:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सदर प्रतिसादवाचनाने मिपावर खसखस पिकली आहे. (तिची अफू बनवण्याचं कॉट्रॅक्ट मला मिळेल काय?)
10 Dec 2010 - 7:42 am | पंगा
धर्म ही अफूची गोळी असण्याबद्दल ऐकले होते. आपल्या धार्मिकतेला प्रणाम!
(अवांतरः खसखशीच्या दाण्यावरील गणपतीतून धर्म आणि अफूचा असाही कल्पक संगम कोणी केल्याचे पाहून गहिवरून आले. श्री. जगदीश पटवर्धनांनाही प्रणाम.)
10 Dec 2010 - 6:15 am | बेसनलाडू
याआधी कोणत्याही हॉरर चा इतका सुखद धक्का बसला नव्हता _/\_ विक्षिप्तकाकू म्हणतात तसे या हॉररने मिपावर नक्कीच खसखस पिकली असणार.
(नतमस्तक)बेसनलाडू
10 Dec 2010 - 5:37 am | निनाद मुक्काम प...
@आत्ता गणपती बद्दल लेख चाळत होते, एका अफाट बातमीने लक्ष वेधले-
मुंबईच्या गल्ली बोळ्यात असे तांदळावर व खसखस वर गणपती किंवा स्वताचे नाव लिहून त्याची कि चेन बनवून २० रुपयात मिळते .
खात्रीलायक ठिकाण हाजी आलीच दर्ग्याच्या सुरवातीला .एक पोरगा मी सतत ४ वर्ष बसलेला पहिला आहे ,(समोरील हिरा पन्ना ह्या मॉल मध्ये फुकटची थंड हवा खाणे व कॉलेज जीवनातील लेक्चर बंक करून पुढील क्रोस रॉड येथे भटकणे हा एकेकाळी आमचा आवडता उद्योग होता .)
तात्पर्य अजूनही २० ते ३० रुपयात हि कला आपल्या मालकी हक्काची होऊ शकते.
10 Dec 2010 - 10:42 am | विजुभाऊ
खसखस पिकली की आनन्दाने हासू येत असेल म्हनून बहुतेक " खसखस पिकली " हा शब्द प्रयोग आस्तित्वात आला असावा.
मराठी मुलुखात खरी खसखस पिकवणारा कोणी असेल असे वाटत नाही ( टीप : या वरून अफगाणीस्थान पूर्वी महाराष्ट्रात होता असा शोध कोणी लावु नये )
10 Dec 2010 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार
पण हा गणपती डाव्या सोंडेचा आहे का उजव्या ? आणि मुख्य म्हणजे खसखस भाजुन घेतलेली होती काय?