व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस..
दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान..
भेंडी गव्वार ललिता पव्वार..
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...
हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..?
हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..?
दाद्या दाद्या खच्चून पाद्या..
एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा..
रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो.
राम मून पांडू कलर डू डाय डू..
फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड..
एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला..
मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा..
कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..?
चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा..
पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..
गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..
प्रतिक्रिया
26 Jun 2015 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा
असच एक आठवतय... मूळ गाणं 'तुम से मिलकर ना जाने क्यूं?' चं केलेलं ! ;)
26 Jun 2015 - 2:21 pm | kalash
26 Jun 2015 - 2:27 pm | सूड
'ड' येत नाही? नक्की?
26 Jun 2015 - 3:38 pm | वेल्लाभट
जास्तीची मेजॉ.......र्टी
कमीची मेजॉ...........र्टी
मामाचं पत्र हरवलं.....
ते मला सापडलं.......
हेच वेगळ्या टोन मधे
मामाचं पत्र 'हरवलं' टोन लिहिणं कठीण
ते; मला 'सापडलं' !
.
.
.
.
.
.
26 Jun 2015 - 4:01 pm | मालविका
माझीही थोडी भर
भट्ट जेवूनी तत्त फुगले
घरी जाऊनि स्वस्थ झोपले
बायकोने विचारले का हो झोपले?
अगो xxचे पोट फुगले.
तू तू तू तू तारा
डबा बाटली भंगरावला
तू तू तू तारा
तूने मेरा पाकीट मारा
आणि एक
अकरा म्हण अकरा
भाजून खा बकरा
27 Jun 2015 - 4:23 pm | पगला गजोधर
नऊ म्हण नऊ....
27 Jun 2015 - 4:30 pm | यसवायजी
सोळा- रॉकेलचा बोळा.
सतरा- गंजलेला पत्रा.
-
या वस्तू कुठे घालायच्या याच्या जागा ठरलेल्याच. ;)
27 Jun 2015 - 9:06 pm | निनाद मुक्काम प...
गाण्याच्या एका ओळीचे पुढे अनेक विडंबन करण्याचा प्रधात
ओये ओये ने केला होता
ओये ओये
कांदा पोहे
बच्चा रोये
मम्मी सोये
अजून एक गाण्याचे विडंबन आमच्या शालेय जीवनात
करायचो
जुली जुली
जुलीचा बाप आप माझ्या घरी
त्याला मी खायला दिली पाणी पुरी त्याने मला
दिली काना खाली खाली
मस्त चाली मध्ये गाता यायचे
वरच्या एका प्रतिसादात सोने तुला सोन्याची माळ घे हे गाणे वाचले त्याची थोडी सुधारीत आवृत्ती
सोनू तुला सोन्याची माळ घे
सोन्यापरी लेडीस घड्याळ घे , घड्याळ घे
मोनिका ची साडी घे तू गोल गोल
आता तरी माझ्या संगे गोड बोल
सायो नारा सायो नारा चे विडंबन
सायन आया सायन आया
दादर माटुंगा सायन आया
26 Jun 2015 - 4:07 pm | भिंगरी
नूरी नूरी
भाजी पूरी
शेव पूरी
26 Jun 2015 - 4:14 pm | बॅटमॅन
म्हण गुढीपाडवा...नीट बोल गाढवा.
26 Jun 2015 - 4:17 pm | बॅटमॅन
मारिन मारिन, चपलेनं मारिन, सोडणार नाहि तुला....(माये नि माये च्या चालीवर)
27 Jun 2015 - 8:17 pm | टवाळ कार्टा
=))
26 Jun 2015 - 4:34 pm | उगा काहितरीच
देखा है पहिली बार ... टकलेपे खिले दो बाल
टाक्क तोडून टाक्क तोडून
.
.
देखा है पहली बार...म्हातारा हा*ला हिरवागार
टाक्क *** टाक्क ***
.
26 Jun 2015 - 4:37 pm | गवि
पुंडलिकान् मारली इटकर..
.ती लागली तुकारामाला..
....पुंडलिकवरदे हरी इट्टलच्या चालीवर..हे एक विसरलं वाटतं.
..बाकी त्याज्य ते योग्यमार्गे त्यागावे याविषयी बालपणी प्रचंड ओढ असल्याचे अनेक काव्यांत दिसत आहे. ;)
27 Jun 2015 - 12:24 am | ऋतुराज चित्रे
आम्ही असे म्हणायचो
पुंडलिकान् मारली इटकर..
मेला ढेकून..
त्याला खाल्ला तुक्यानं
27 Jun 2015 - 12:51 pm | भिंगरी
.
पुंडलिक वरदे
हाणली विटकर
मेला ढेकूण
29 Jun 2015 - 10:34 am | नाखु
असा आहे
पुंडलीकानी वरती हाणली विट्कर
अरे जावूदेव आता तु खा मार
खिरित नान्द्येव बुडाला
पार्वती पळाली धरधर महादेव.
26 Jun 2015 - 4:59 pm | बाळ सप्रे
होळी रे होळी
पुरणाची पोळी
सायबाच्या ...त बंदुकीची गोळी
26 Jun 2015 - 5:17 pm | बाळ सप्रे
दिड दमडिचं तेल आणलं
मामाजींची शेंडि झाली
भावोजींची दाढी झाली
सासुबाईंची न्हाणी झली
उरलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला
26 Jun 2015 - 5:30 pm | इरसाल
धिशीज १००थ प्रतिसाद्वा !
26 Jun 2015 - 5:37 pm | बॅटमॅन
चूक. १००वा माझा होता, संस्कृतिरक्षकांनी उडवला. :(
26 Jun 2015 - 5:48 pm | इरसाल
माझा १००वा झाला म्हणुन आनंद व्यक्त करु की तुझा उडवला म्हणुन निषेध.
तुम अपना समस्या काँस्टंट रखोरे बाबा- बाबुसाल ;)
26 Jun 2015 - 5:31 pm | मिरची
अय्या गडे...इश्या गडे
आम्ही गेलो मामाकडे
मामाने केले दहीवडे
दह्यात पडली लाकडे
मामाला झाली माकडे (मामेभावंडांना चिडवण्याचे खास गाणे)
26 Jun 2015 - 5:44 pm | यसवायजी
टर्रदिशी टर्रदिशी
प्यान्ट फाटली कशी?
(ऑन डी चाल ऑफ़ पर्रदेशी पर्रदेशी जाणा नहीं)
--
एक बेड़की को देखा तोह ऐसा लगा... (पुढे काहीही रटाळ)
--
26 Jun 2015 - 6:01 pm | कहर
आरं आरं पांड्या
कारे धोंड्या
तुझी म्हस कोणची ?
काळी
दुध किती देते ?
शेरभर
तू किती पितो ?
पावशेर
.
.
.
.,
एवढेच आठवतंय … पुढचे कोणाला माहित आहे का ?
26 Jun 2015 - 6:55 pm | यसवायजी
हायला हे अडम तडम कसं विसरलं होतं-
हा घोडा कुणाचा? - राजाचा
इथं कशाला आलाय? - चरायला.
चारा किती खातो? - गाडीभर
पाणी किती पितो? - तळंभर
तळ्यात काय? - हंडा
हंड्यात काय? - चंबू
चंबूत काय? - लिंबू
लिंबूत काय? - मिठाचा खडा
उच्चल तुझ्या राजाचा घोडा.
26 Jun 2015 - 6:39 pm | मोहनराव
पुढून सपाट
मागुन सपाट
दिसतंय कसं
गोदरेजचं कपाट!!
26 Jun 2015 - 6:57 pm | यसवायजी
सोनम कपूर?
26 Jun 2015 - 7:02 pm | सूड
__/\__
26 Jun 2015 - 8:42 pm | असंका
लहानपणचं वाटत नाही.....
26 Jun 2015 - 7:05 pm | शब्दबम्बाळ
शाळेमध्ये असताना सर्व शिक्षा अभियानचे खूप छान गाणे लागायचे. मूळ गाणे हिंदी असले तरी मराठीत भाषांतर उत्तम जमले होते.
'सकाळी सकाळी मित्रांच्या भेटीला तयार होऊन निघालो आम्ही'
यात आम्ही काही बदल करून म्हणायचो,
"सकाळी सकाळी मित्रांच्या भेटीला ओढ्यावर चाललो आम्ही,
थांबवले तरी ना थांबतो आम्ही प्रेशरनी चाललो आम्ही
मेघांसारखे गरजू आम्ही पावसासारखे बरसू आम्ही
सूर्यासारखे तळपू आम्ही, ओढ्यावर चाललो आम्ही!!" ( बाकीची मुलं: ओ हो हो हो ) :D
मूळ गाण्याचा दुवा: School chale hum!
26 Jun 2015 - 8:29 pm | असंका
कुणी सातारचं असेल इथे तर कृपया ते "अगडबंब बगडबंब बोले म्यांव म्यांव" पूर्ण सांगू शकतील का?
26 Jun 2015 - 8:38 pm | असंका
मी जानेवारी कुड खातो!
मी फेब्रुवारी कुड खातो!
कळलं?
आता पुढचं तू पूर्ण कर-
मी मार्च? कुड खातो
मी एप्रिल? कुड खातो
बरोबर! पुढे?
आणि हे एक-
दे गुलाम चारा कडू
26 Jun 2015 - 10:47 pm | पगला गजोधर
मछली जलकी राणी है
जीवन उसका पाणी है
हाथ लागो तो डर जायेगी
बाहर निकालो तो मर जायेगी
पुढे काही 12 वर्षांनी कॉलेजात गेल्यावार
ऐका सुबक ठेंगण्या बॉन्गकन्येच्या डोळ्याच्या पिटपीटीकडे पाहून बालपणातील हि कविता मोठ्याने म्हणून, तारस्वरात 5 वी ओळ सुद्धा जोडायाचो .....
मछली जलकी राणी है जीवन उसका पाणी है हाथ लागो तो डर जायेगी बाहर निकालो तो मर जायेगी
ओर बंगालनको दो तो खा जायेगी.....
27 Jun 2015 - 12:38 am | ऋतुराज चित्रे
विडंबन
घालीन लोटांगन
वरती ढुंगन
डोळ्याने पाहिन ** तुझे.
एखाद्याच्या नावापुढे दादा लावून
***दादा ***दादा पेटी वाजव
दोन पैसे देतो माझा बोचा खाजव
असे चिडवायचो.
28 Jun 2015 - 1:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
बोचा म्हणजे काय रे भाउ?
(निरागस)पैजारबुवा,
30 Jun 2015 - 12:14 pm | टवाळ कार्टा
म्हणजे "बो"चा पंख खाजव
संदर्भासाठी आंजावरून साभार
28 Jun 2015 - 4:01 pm | मार्मिक गोडसे
डोकं खाजवल्याने विस्मृतीत गेलेल्या आठवणी जाग्या होतात. बोचा खाजवल्याने नक्की काय होते ?
27 Jun 2015 - 11:17 am | पगला गजोधर
ऐक हात उलटा, दुसरा हात सुलटा, स्टाइलने
आणि सामोरासमोर च्या ऐवजी वरखाली झिम्मा सारखा ऐक प्रकार बहिणीला तिच्या मैत्रिणी बरोबर खेळताना आठवतंय.
त्या असा काहीतरी म्हणायच्या
आयी बिना ( 3 वेळा टाळया)
सुपरसीना
डिंग डॉंग
लेझी गर्ल ....
आयी बिना सुपरसीना डिंग डॉंग लेझी गर्ल स्त्याच्यु गो ......
27 Jun 2015 - 12:54 pm | भिंगरी
जीभ बोटाच्या पकडीत धरून बोलायला सांगायचे,
'मी वाण्याच्या पोत्यातला गुळ खाल्ला.'
27 Jun 2015 - 1:51 pm | बॅटमॅन
मेरे देश की धरती छपरावरती उंदीर कुरकुरती
माझी झोप मोडती...
29 Jun 2015 - 7:07 pm | नाव आडनाव
माझा एक मित्र म्हणायचा -
मेरे देश कि धरती हात पाय वरती
पटा पटा माणसं मरती...
27 Jun 2015 - 4:09 pm | पगला गजोधर
इत्ता इत्ता पानी ...गोल गोल रानी .....
29 Jun 2015 - 1:06 am | पियुशा
मी पण मी पण " अच्छा कपड़ा सिया तूने मेरे नाप का, नाप था मेरा सिया मेरे बाप का =)) और एक गंगू बाई पाण्याला जाती.... जाऊं दया चने फूटा ने खाती खाऊन दया =)) अजुन एक एह तेरे करम कभी चाकू कभी गन =) चन्द्रकान्ता च फेमस टाइटल सांग च पण इडम्बन बनवाल होत सिनिअर्सेनि आता आठवेना क्रुरसिंग यक्क् "म्हणयचो ते आठवताय
29 Jun 2015 - 7:21 am | अत्रुप्त आत्मा
@ अच्छा कपड़ा सिया तूने मेरे नाप का, नाप था मेरा सिया मेरे बाप का>> ह्ही ह्ही ह्हा! :-D
जिल्बुषा हे पांडुनि ठेवलेलं नाव सार्थ आहे! :-D
29 Jun 2015 - 3:55 pm | सदस्यनाम
गप्पे पिवशे. ते ओरिजिनल गाने आहे. चाल मात्र ढापल्ली आहे.
क्या रे टेलर बोर्ड लगाया टिपटॉप का.
नाप मेरा लिया शर्ट सिया बापका.
दख्खनी हिंदी भाषेतली ती क्यासेट आहे.
29 Jun 2015 - 9:30 pm | पियुशा
बर्रररर सदस्य भाऊ जौंदे और एक " जान
ने जिगर जानेमन तेरा वजन २०० टन गर जो तू मुज़पे गिरी मर जाऊंगा में सनम
29 Jun 2015 - 9:34 pm | यसवायजी
रूप तेरा मस्ताना, बेंच मोडला बस्ताना.
29 Jun 2015 - 9:44 pm | पियुशा
हां हां हां __^__ और एक तुम तो ठैरे परदेसी साथ क्या निभाओगे अंडे मिले तुमको पेपेर्मे अब डंडे खाके जाओगे ओ। ओ। ओ। मरतेय मई आज हसून हसून ~~~~
4 Jul 2015 - 12:56 am | भिंगरी
रुप तुला नस्ताना
बकरीचा डोळा अस्ताना...
29 Jun 2015 - 10:24 am | पगला गजोधर
अबो ढबोरे ... ढबोरे...
माझी म्हैस तुझी म्हैस आली का ?...... आली ...
दुध किती देती ? .......आद्शेर पावशेर .....
चारा किती खाती ? ........घम्मा घम्मा .....
तिचं नाव, तिचं नाव सांगू का ? .......सांग सांग ...
तिचं नाव, तिचं नाव "कलावती" (ज्यांच्या घराच्या बाल्कनीत क्रिकेटचा ब्वोल गेला कि त्या जप्त करणाऱ्या खडूस बाई )
29 Jun 2015 - 11:32 am | भटक्या योगी
वाहः ! एकदम शाळेत नेऊन बसवलत मागच्या बेंचवर :)
मस्त !
29 Jun 2015 - 12:56 pm | तुडतुडी
अंबाबाई चीम्बाबाई नमस्कार , खालून दिसतोय चमत्कार
आणि short form मध्ये खूप शिव्या द्यायच्या असतील तर
यमुनाबाईचा गडू , यमुनाबाई आगाशे
29 Jun 2015 - 3:17 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
यमुनाबाई आगाशे म्हणजे एकदमच अस्सल आणि अतिप्राचीन स्मृती बघा....लैच हळवं केलंत =)) _/\_
29 Jun 2015 - 3:27 pm | गवि
अगदी अगदी..
यडपट, मूर्ख, नालायक, बावळट, इडियट आचरट, गाढव, शेळपट
हे यमुनाबाई आगाशे पक्के तोंडपाठ आहे. पण गडू कसला ? पब्लिकली सांगण्यासारखे नसावे?
29 Jun 2015 - 4:00 pm | बॅटमॅन
आमच्या व्हर्जनमध्ये इ = इरसाल आणि शे = शेंबडा असे होते.
बाकी गडू कधी ऐकला नाञ. आमचे एक मित्रवर्य हामुपा असे एक कष्टममेड शेपूट तिथे जोडीत. तीन मूळ क्रियांचा शॉर्टफॉर्म, दुसरे काही नाही.
तदुपरि- यमुनाबाई आगाशे हा दक्षिण महाराष्ट्रीय प्रकार असावा काय?
दक्षिण महाराष्ट्रावरून आठवलं, घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होता. =))
29 Jun 2015 - 4:46 pm | यसवायजी
घसरगुंडी हाही तितकाच फेमस प्रकार होता
होता? अजुन आहे. राहील. :ड
29 Jun 2015 - 4:53 pm | बॅटमॅन
हा हा हा, इंडीड ;) तेच रे. बाकी या विषयावर कही रोचक लेखन आलेले आहे.
29 Jun 2015 - 6:36 pm | यसवायजी
रोचक लेखन व्यनीत्नं धाडा.
29 Jun 2015 - 6:44 pm | बॅटमॅन
व्यनि पहा.
29 Jun 2015 - 7:10 pm | नाव आडनाव
मलापण पाठवा.
30 Jun 2015 - 12:18 pm | टवाळ कार्टा
मलापण पाठवावे ही विणंती ;)
29 Jun 2015 - 2:16 pm | पगला गजोधर
अच्चीवर गच्ची ....
गच्चीवर ( होता / सापडला / ठेवला )... ( तुटका पत्रा, लोचा, गोळा, सुचेल ते यमक ...)
ज्यांनी कोणी ....केलं / केलं-नाही .....त्याच्या ऐका जवळच्या नातेवाईकाला उद्देशून ...
वरच्या शब्दांना जुळणारे यमक वस्तू / प्राणी
उदा कुत्रा / *चा / चोळा या संधार्भातील
गधेगाळीय वाक्यरचना.
29 Jun 2015 - 4:03 pm | बॅटमॅन
आओ बच्चों तुम्हें दिखाये झांकी हिंदुस्थान की...
या गाण्याचे शुद्ध मांसाहारी विडंबन लै फेमस होते. लय हसलो होतो राव ते ऐकून. एकदोघांनाच यायचे ते एवढे सगळे पाठ.
29 Jun 2015 - 5:18 pm | सौंदाळा
झीनत अमान, देवानंद, प्राण असलेले विडंबन का?
29 Jun 2015 - 6:47 pm | बॅटमॅन
हा हा हा, नेमके =)) =)) =))
बादवे त्यात दारसिंगही होता असे स्मरते =))
30 Jun 2015 - 6:14 pm | सौंदाळा
मग पानपट्टीचे पण माहितेय का?
पानपट्टी पानपट्टी गेली पान आणायला..
कसले पान xxxxxxxx लागली की बोंबलायला
30 Jun 2015 - 6:22 pm | बॅटमॅन
तीन कडवी आहेत त्यात. धर्मेंद्र, रेखा आणि पान, चुना व सुपारीचे उल्लेख आहेत, बरोबर?
30 Jun 2015 - 6:41 pm | सौंदाळा
करेक्ट
दहावीत असताना एक वर्गमित्र अगदी हावभाव करुन बेंबीच्या देठापासुन कोकलायचा पानपट्टी पानपट्टी
30 Jun 2015 - 7:27 pm | बॅटमॅन
शिवाय ते
नदीकिनार्याच्या काठी...
...............
ग्यानबा तुकाराम
हेही प्रसिद्ध होते. 'शाळा' कादंबरीत याची सोवळी व्हर्जन दिलेली आहे.
30 Jun 2015 - 7:34 pm | टवाळ कार्टा
हाहा...हे म्हैत आहे ;)
30 Jun 2015 - 12:18 pm | टवाळ कार्टा
मला व्यनीतून पाठवावे ही विणंती ;)
30 Jun 2015 - 12:44 pm | नाखु
इडंबन ठाव हाये.
30 Jun 2015 - 7:34 pm | टवाळ कार्टा
पनं मला न्हाय ठावं ना
29 Jun 2015 - 4:13 pm | kalash
(चाल-पंझी बनू उडती फिरू मस्त गगन मी)
गच्ची वरून खिडकी तुझी मस्त दिसते /
आज मला तुला पाहावेसे वाटते //
तुझ्या खिडकीला लाल लाल काचा /
लाल काचाना हिरवे हिरवे पडदे /
पडद्या मधून तुही किती मस्त दिसते//
तुझ्या खिडकीवर ठेवल्या आहेत कुंड्या /
वरच्या मजल्यावर उभा आहे बंड्या/
त्याची नजर तुझ्या वर सारखी असते//
तुझ्या बापाचा माझ्यावर आहे डोळा/
ओरडून सगळ्यांना करतोय तो गोळा/
त्याला सांग तुझे माझे प्रेम असते //
29 Jun 2015 - 4:53 pm | पगला गजोधर
आमच्याकडे
ह. भ. प. चा लोन्ग्फोर्म हळूच भगिनींकडे पाहणारा
किंवा
हळूच भजी पळवणारा
असा व्हायचा
30 Jun 2015 - 8:16 am | पगला गजोधर
सहीमे दही ,
सुभाष घई ,
बाकी कुछ नही.
30 Jun 2015 - 5:34 pm | तुडतुडी
गडू म्हंजे गधडा डुक्कर . गडू म्हंजी ते पाण्याचं छोटं भांडं असतंय
3 Jul 2015 - 9:43 pm | नन्दु मुळे
पादानाम फुसकुली मध्ये टाराटूरी च मध्यमा
उत्तमे ढमढमे पादे ठूसकुली अती विरळा
अंतु म्हणे चिंतु ला हागतांना नको कुंथु
चिंतु म्हणे अंतुला कुंथल्या विना न पडे जंतु
4 Jul 2015 - 1:17 am | ऋतुराज चित्रे
रघु रघु राना
पाची बोटे ताना
रघु राना रुसला
भिंतीवर जावून बसला
4 Jul 2015 - 8:57 am | यसवायजी
सडा शिंपला
शंख फुंकला
दशरथ राजा
घसरत आला
6 Jul 2015 - 2:15 pm | बॅटमॅन
या श्लोकाचा हा पाठभेद प्रथमच ऐकतोय. आम्ही ऐकलेली व्हर्जनः
उत्तमे ढमढमे पादे मध्यमे टुरटुराटुरी
पादानां फुस्कुली राणी तस्य घाणी न जायते ||
बाकी ३ इडियट्स मधली व्हर्जनः
उत्तमं धद्धधात् पादं मध्यं पादं थुचुक् थुचुक् |
कनिष्ठं थुडथुडी पादं सुरसुरी प्राणघातकम् (चतुरच्या अॅक्सेंटमध्ये "प्राण-घटकम्") ||
बाकी दोन व्हर्जन अर्धवट आठवताहेत.
डर्रबुर्रं महाघोरं टिस्सपिस्सश्च मध्यमम् | (व्हर्जन १.)
ढर्रं बुर्रं भयं नास्ति कैयं कुय्यं मध्यमं अस्ति
ठुस्साकारं प्राणसंकटम् || (व्हर्जन २.)
दोन्ही व्हर्जन दक्षिण भारतीय आहेत. ३ इडियट्स मधील व्हर्जन बहुधा नॉर्थ इंड्यन असावी.
5 Jul 2015 - 10:16 am | ऋतुराज चित्रे
बाई.. बाई.. बाई.. वैतागले मी ह्या केसांना
अगं मग बायरचं बेगॉन का घेत नाही
त्याने केस गळायचे तर थांबतातच
अन झोपही कायमची लागते.
'प्रकाश माका' तेलाच्या जाहिरातीचे तेव्हाचे विडंबन आठवले.
6 Jul 2015 - 2:01 pm | भिंगरी
काय झालं?
बाळ रडत होतं
दोन धपाटे दे त्याला.
ग्राइप वॉटर्सच्या जाहीरातीचे विडंबन.
6 Jul 2015 - 2:11 pm | बॅटमॅन
"तू लहान असताना मीही तुला हेच देत होते" हे मेन वाक्य वगळल्याबद्दल खच्चून, कचकून, इ. णिषेढ.
6 Jul 2015 - 2:14 pm | भिंगरी
खच्चून,कचकून माफी.
17 Mar 2016 - 9:11 pm | गामा पैलवान
एबी सीडी ईयेफ जी
त्यातून निघाले गांधीजी
गांधीजींनी खाल्ला पेरू
त्यातून निघाले नेहरू
नेहरूंनी खाल्ली काकडी
त्यातून निघाला पतोडी
पतोडीने मारली सिक्सर
त्यातून निघाला गावस्कर
गावस्करने मारली फोर
त्यातून निघाले चोर
चोरांनी पकडला क्याच
संपली आमची म्याच
बघा, केव्हढे बाळबोध होतो कोणे एके काळी आम्ही.
-गा.पै.
18 Mar 2016 - 12:13 pm | दुर्गविहारी
कविवर्य रामदासजी आठ्वले यान्च्या समग्र कवितान्चा सन्ग्रह निघावा अशी या निमीत्ताने मागणी.
कविवर्य रामदासजी आठ्वले फॅन क्लब
18 Mar 2016 - 12:23 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
कचरे के डिब्बे में
तुझको बिठाकर
ऊपर से प्लास्टिक का
ढक्कन लगाकर
रखूँगा गटर के पास
मत हो मेरी जान उदास
19 Mar 2016 - 10:43 pm | भिंगरी
शाळेत असताना एखादीने म्हटले
'अय्या'
की आम्ही म्हणायचो
तुझा नवरा भय्या
भय्याच्या हातात काठी
तुझा नवरा घाटी.