व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस..
दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान..
भेंडी गव्वार ललिता पव्वार..
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...
हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..?
हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..?
दाद्या दाद्या खच्चून पाद्या..
एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा..
रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो.
राम मून पांडू कलर डू डाय डू..
फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड..
एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला..
मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा..
कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..?
चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा..
पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..
गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..

वाचन
53364
प्रतिक्रिया
0