There was a pain
I inhaled it
Quietly
Like a cigarette
Left behind are a few songs
I have flickered off
Like ashes
From the cigarette.
- अमृता प्रीतम
वेदनांचा
श्वास
शांतपणे
घेतला मी,
सिगारेटचा धूर जणू.
उरली काही गाणी
झटकली मी
सिगारेट्ची
राख जणू
अत्यंत मनस्वी कवयित्री !
भाषांतर मी फार पूर्वी केलेले !
प्रतिक्रिया
24 Nov 2010 - 8:58 pm | गणेशा
छान आहे ...
जमल्यास एक वेगळा प्रयत्न मी पण करतो ....
24 Nov 2010 - 9:07 pm | जयंत कुलकर्णी
जरूर !
निश्चितच चांगला अनुवाद असेल.
24 Nov 2010 - 9:24 pm | गणेशा
प्रथमता आपले आभार ...
---
जीवंत वेदनांचे आयुष्य
श्वासा श्वासास भोगलेले
शांतपणे निर्भिडतेने सोसले
धुरापरि अस्तित्व त्यांचे
उरलेल्या क्षणसंगीताच्या
सुरविरहित पंक्ती
झिडकारल्या आसमंतात
विझलेल्या रक्तराखेसमान
- शब्दमेघ
24 Nov 2010 - 9:57 pm | जयंत कुलकर्णी
क्या बात है !
छान ! आणि जास्त भावूक !
अमृता प्रीतम फार रोखठोक आहे, या कवितेत.
पण आपल्या कविता वाचल्या आहेत इथेच. आवडतात मला.
माणसाच्या वयाबरोबर त्याचे विचार तसेच ते मांडायची पध्दतही बदलत जाते.
कदाचित ठेचा लागून ती पध्दत जास्त रोखठोक होत असावी.
:-)
24 Nov 2010 - 9:44 pm | प्राजु
सॉल्लिड!! मस्तच!
24 Nov 2010 - 10:29 pm | डावखुरा
दोन्ही अनुवाद मस्तच...
25 Nov 2010 - 11:51 am | डॉ.श्रीराम दिवटे
अनुवादातून वादात न गेलेले बरे..
25 Nov 2010 - 2:22 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद सर्वांना.
आणि श्री. दिवट्यांना वादात न गेल्याबद्दल ! वादांचा कंटाळा आलाय आता !
25 Nov 2010 - 2:34 pm | यशोधरा
आवडलं :)
25 Nov 2010 - 8:10 pm | अरुंधती
छान अनुवाद! थोडक्या शब्दांतला निखार जास्तच दाहक असतो म्हणतात.
25 Nov 2010 - 8:17 pm | मितभाषी
छान :)
5 Jul 2016 - 12:40 pm | महासंग्राम
वाह, खूब सही अनुवाद