इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 10:36 am

मित्रानो बाजारात रोज नवनवीन प्रॉडक्ट्स येत आहेत.
आपणही येथे काही नवी उत्पादने तयार करायची आहेत. इथे त्यांची झैरात करायची आहे.
एकच अट आहे ही प्रॉडक्ट्स इनोव्हेटिव्ह असायला हवीत.
एखादे जुनेच प्रोडक्ट नव्या प्रकारे उपयोगात येऊ शकेल , एखादे प्रोडक्ट जुन्याच प्रॉडक्ट्चे नवे व्हर्शन असेल. तर एखादे अगदीच नवे असेल.
त्या प्रॉडक्टचे फायदे इथे लिहायचे आहेत. प्रॉडक्टची झैरात करायची आहे.
उदा:
"पटापट" रीयूजेबल बबलगम.
जगात प्रथमच रीयूजेबल बबलगम
एकदाच खा महिनाभर वापरा.
याचे फायदे
महा बचत
बबल गमचा खर्च किमान तीस पटीने कमी.
दात पाडायच्या खर्चात १०० % बचत
टूथपेस्ट च्या खर्चात बचत. दात घासायची जरुरच पडणार नाही.
महिनाभर तीच बबलगम चघळल्यानन्तर तोंडाला येणार्‍या वासामुळे मित्र लांब रहातात. कटिंग चहाच्या खर्चात बचत.
महा बचत महा बचत
"पटापट" रीयूजेबल बबलगम

------------------------------------------------------------------
चेरीब्लॉसम फेस वॉश क्रीम
बहू उपयोगी क्रीम
फेस वॉश , भांडी स्वच्छ करण्यासाठी , फेस हाईड क्रीम , आय लायनर म्हणून वापरा
हे क्रीम तुम्ही बूट पॉलिश म्हणूनही वापरू शकता

तुम्हाला अशीच काही इनोव्हेटीव्ह प्रॉडक्ट या इथे सांगायची आहेत
काही क्लू देतो
चुचू मराठी टायपिंग कोर्सेस , राजे जॉगिम्ग शूज , टिंग्या बर्म्युडा प्यान्ट , डॉन कंगवा , अदिती चष्मा ,
श्रामो "मोठे व्हा" हेल्थ ड्रिंक , धम्या फटाके इत्यादी.

काय मग करताय सुरुवात.

कलासंस्कृतीविचार

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

24 Nov 2010 - 10:52 am | नगरीनिरंजन

घ्या आमचं पहिलं प्रॉडक्टः
विजुभाऊ छाप श्रीखंड मेकर
विरजलेल्या प्रतिसादांपासून चक्का झालेल्या धाग्यांपर्यंत कोणत्याही गोष्टींचे श्रीखंड करण्याचा प्रयत्न करता येईल असे उपकरण. चांगले धागे आणि प्रतिसाद या उपकरणात नासल्यास निर्माते जबाबदार नाहीत.

इंटरनेटस्नेही's picture

24 Nov 2010 - 1:32 pm | इंटरनेटस्नेही

इंटेश जाहिरात एजन्सी... जाहिरात करण्यात आमचा हात कोणीही धरु शकत नाही असे इथल्या काही माननीय सदस्यांचे म्हणणे आहे! :)

विजुभाऊ's picture

24 Nov 2010 - 2:54 pm | विजुभाऊ

हात धरून कशाची झैरात करावी लागते हो?