समस्यापुर्ती (३)
मंद सुगंधी रात करीतसे घात
कवींसाठी नियम-
- वरील ओळ मिळून चार ओळींच्या कवितेने समस्येचे समाधान करायचे.
- प्रत्येक ओळीत १३ अक्षरे
- यमक हवेच. प्रत्येक ओळीत यमक, किंवा पहिल्या तीन ओळीत यमक, किंवा (पहिली-तिसरीत) आणि (दुसरी-चौथीत) यमक किंवा (पहिली-दुसरीत) आणि (तिसरी-चौथीत) यमक.
वाचकांसाठी नियम-
- कविता वाचल्यावर प्रोत्साहनासाठी निदान काहीतरी लिहा. शब्द म्हणजे हिरे-मोती नव्हेत की देण्यात कंजुषी करावी!
! मालकांनी पैशे खर्चून फुकटात प्रतिसाद देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्याचा फायदा घ्यावा !
चला तर.
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 9:14 am | प्रभो
पंगतीला खास होता मसालेभात
पहिल्या रातीला आला गडी रंगात
मंद सुगंधी रात करीतसे घात
वर्षातच बाळकृष्ण नांदे घरात
23 Nov 2010 - 9:25 am | प्राजु
हात मेल्या! अखंड लग्नाचीच स्वप्नं बघ तू! ;) दुसरं काही म्हणून सुचत नाही तुला.. :)
23 Nov 2010 - 9:29 am | प्रभो
ही माझी नाही तर माझ्या काही मित्रांची परिस्थिती लिहिली आहे.. ;)
23 Nov 2010 - 9:08 pm | संदीप चित्रे
एका वर्षातच बाळकृष्ण आणायचा इरादा पक्का दिसतोय !
23 Nov 2010 - 10:25 am | अरुण मनोहर
रात्री उपवास करणे हे प्रकृती स्वास्थ्यासाठी केव्हाही चांगलेच!
बाकी कविता छानच!
23 Nov 2010 - 10:30 am | मिसळभोक्ता
रात्री उपवास केल्यास भूक लागते, आणि त्याचा परिणाम फारसा चांगला नाही, (आदरणीय) अरुणजी !
23 Nov 2010 - 1:26 pm | गणेशा
आवडले
23 Nov 2010 - 9:35 am | प्राजु
हळूच तिमिरात धरूनीया हात
सांग मज बात, तुझिया गं मनात
ऋतू बहरात, तुझिया अंतरात
मंद सुगंधी रात करीतसे घात...
23 Nov 2010 - 10:27 am | अरुण मनोहर
प्राजुचे होम ग्राउंड! (काव्या विषयी बोलतो आहे.) छानच आहे. पण हा नेहमीचाच कोन झाला नाही का?
एखाद्या हटके कोनातून येऊ द्यात ना!
23 Nov 2010 - 10:29 am | मिसळभोक्ता
प्राजूने जरा तंत्रज्ञानाविषयी लिहावे...
23 Nov 2010 - 9:41 am | मिसळभोक्ता
जरी मिळाला खमंग मसालेभात
तरी त्यावरी नसे कांद्याची पात
मग बघू सिनेमा जाऊबाई जोरात
मंद सुगंधी रात करीतसे घात
(सूज्ञ वाचकांना हा सुगंध कसला हे कळले असेलच.)
23 Nov 2010 - 10:30 am | अरुण मनोहर
हसता हसता नाक दाबल्यामुळे आणखी काही लिहित नाही!
23 Nov 2010 - 10:32 am | मिसळभोक्ता
म्हणजे, दाबलेले नाक सोडा, म्हणतो मी !
उगाच "होते मनोहर तरी" असे कुणाला लिहावे लागू नये, म्हणून...
23 Nov 2010 - 1:34 pm | अरुण मनोहर
चंट बाला ओढली मंद प्रकाशात
चंद चुम्माचाटी साठी बाहुपाशात
मंद सुगंधी रात करितसे घात
खुंट रुते लागता गालाला हात
23 Nov 2010 - 2:27 pm | गणेशा
छान आहे ..
अवांतर :
फक्त पहिला नियम "चार ओळींच्या कवितेने समस्येचे समाधान करायचे."
यात कसल्या समस्येचे हे कळले नाही. . म्हणुन लिहिताना दिशा कळत नाहिये ..
जरा सांगावे
23 Nov 2010 - 2:40 pm | अरुण मनोहर
समस्यापुर्ती मधे जी ओळ दिली असते, ती एखादे कोडे असते. किंवा एखादी परिस्थिती, जी कशी आली असेल हेच एक कोडे होऊ शकते.
ह्या समस्येत, सुगंधी रात्रीत घात कसा काय झाला ते उत्तर अपेक्षीत आहे.
तुम्ही खाली दिलेले कडवे कविता म्हणून बरे आहे. पण घात झाला हे काही दिसत नाही.
23 Nov 2010 - 2:42 pm | गणेशा
धन्यवाद .. मला हेच माहित नव्हते ..
बदलतो खालील कडवे ... धन्यवाद
23 Nov 2010 - 2:49 pm | गणेशा
धुंद तुझीया कवेत श्वास श्वासात
धरलेला तुझा मी मखमली हात
मंद सुगंधी रात करीतसे घात
झोपेतुन उठता पेकाटात लाथ
23 Nov 2010 - 2:54 pm | अरुण मनोहर
स्वप्नात मखमली
सत्यात दुखभरी!
23 Nov 2010 - 2:49 pm | गवि
निरोपवेळी निघता सोडुनि हात
भारनियमनी विझे दिव्याची वात
त्वये म्हणावे येना परतुनि आत
मंद सुगंधी रात करीतसे घात
..............
मुळात "करीतसे" मधला री ह्रस्व असावा अशी आमची इच्छा आहे..(काव्यात हं..)
23 Nov 2010 - 2:50 pm | गणेशा
अप्रतिम
23 Nov 2010 - 2:55 pm | राजेश घासकडवी
तीन ओळी द्या तेरा अक्षर भरुनि
अरुणाची ये एक समस्या अजुनि
ओळ शेवटी, बसवुनी यमकात
"मंद सुगंधी रात करीतसे घात"
आम्हाला 'क्ष' वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून दाखवा असा प्रश्न आला की आम्ही बिनधास्त
'आज आम्हाला मास्तरांनी 'क्ष' चा वाक्यात उपयोग करून दाखवायला सांगितला'
असं वाक्य लिहीत असू :)
23 Nov 2010 - 3:02 pm | अरुण मनोहर
हा: हा: हा: हीच ट्रीक शाळेत मी देखील वापरली होती. मास्तर म्हणाले होते, "प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले!"
तसेच गुर्जी, समस्येचे समाधान नाही झाले अजून!
23 Nov 2010 - 3:25 pm | राजेश घासकडवी
प्रणयाच्या गणिताचे उल्टे उत्तर
मदीर गोडी चाखत दोघे सत्वर
मंद सुगंधी रात करीतसे, घात
दुसरा आठचा पाच मिळ्वुनी त्यात
(एक स्वल्पविराम त्या ओळीत घालण्याचं धार्ष्ट्य केलेलं आहे. घाईघाईत लिहिल्याने थोडी मात्रांची ओढाताण झालेली आहे.)
23 Nov 2010 - 3:33 pm | मेघवेडा
आयायाय गं!
__/\__
कालिदासासही लाज वाटावी अशी समस्यापूर्ती! जॉबर्याच!
'दुसरा आठचा' ऐवजी 'चाराचा तिसरा'' असे वापरल्यास मात्रांची होणारी ओढाताण टाळता येईल गुर्जी!
23 Nov 2010 - 3:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जी, तुम्हाला गुर्जी बनवून एक उत्तम काम केलेलं आहे!! तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार.
हा धागा उसवायला लावणार्या मेव्याचे स्पेशल आभार.
24 Nov 2010 - 8:04 am | नरेशकुमार
काव्यात अश्लिल सुद्धा खपवितात आनि इथ्ल्याच आया बहिनि आभार मान्तात.
6900 वेला निशेध. अस्ल्या कवितेचा.
23 Nov 2010 - 3:56 pm | अरुण मनोहर
ट्यूब पेटली!
अच्र्त!
23 Nov 2010 - 3:40 pm | अविनाशकुलकर्णी
हडळींचा नाच. खविसांची साथ
कवट्यांचा डोगर.हाडांची रास
मुंज्याची मुंज.मुडद्यांची वरात
मंद सुगंधी रात करीतसे घात
23 Nov 2010 - 3:42 pm | अरुण मनोहर
बापरे! अमावस्येला वाचून पहायला हवी!
23 Nov 2010 - 5:12 pm | स्पा
फट्टे.......................
झकास एकदम
23 Nov 2010 - 3:45 pm | अविनाशकुलकर्णी
प.रा ची पार्टी..बाटल्यांची रास
चिंतामणी भरवतात त्याला घास.
व्हिस्की.मंचुरियन ..जमली बात
मंद सुगंधी रात करीतसे घात
23 Nov 2010 - 3:52 pm | अरुण मनोहर
तुम्हाला पार्टीला बोलावले नव्हते हाच घात असावा बहुदा!
23 Nov 2010 - 4:12 pm | गणेशा
आवडले
23 Nov 2010 - 5:07 pm | विनायक प्रभू
चांदीचे ताट
सोन्याचा पाट
वालाची उसळ
मसाल्याचा भात
मंद सुगंधी रात
करीतसे घात
सर्व बेताची लागली वाट
23 Nov 2010 - 5:10 pm | गवि
वालाची उसळ..!!
नक्की "सुगंध"च ना? आणि "मंद"च ना?
23 Nov 2010 - 5:50 pm | मेघवेडा
शांतपणे घेई, मला ही घरात, नशीब माझे फळफळले आज!
काय बदल झाला, तुझ्या गं स्वरात, कुठून आला गंधर्व गळ्यात?
प्रेमभरे गेलो मुका घेण्यास, वाजला कानाखाली हात...
मंद सुगंधी रात करितसे घात, चुकून गेलो दुसर्याच घरात :O
23 Nov 2010 - 9:18 pm | पैसा
मेव्या, मस्त कविता! शराबी पिक्चर मधला अमिताभ आठवला, " भूले से ये मैं किसके घर आ गया यार!" त्या गाण्याची उलटी सिच्युएशन.
26 Nov 2010 - 11:06 am | kamalakant samant
जरी मी कुठे दूरवरी स्थीत
सा॑गावे कसे आठवणी दाटतात
पारीजात जरी तो नित्य सुग॑धीत
म॑द सुग॑धी रात करीतसे घात !!
26 Nov 2010 - 6:28 pm | सूड
मधुकर गुंजारवे रमे पद्मात
ना भान राहिले आला चांद नभात।
मिटले दळ एकेक बंदी हा आत
मंद सुगंधी रात करीतसे घात॥
26 Nov 2010 - 7:20 pm | मेघवेडा
सही रे सुध्या. मस्त कल्पना आहे. फक्त ते मीटराचं बघ. आणि तो 'चांद' खड्यासारखा लागतोय. चंद्रसुद्धा चालेल की! :)