बनवा झटपट कविता (समस्यापुर्ती)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
18 Nov 2010 - 8:39 am

संस्कृत काव्यात समस्यापुर्ती हा एक खुप लोकप्रिय काव्यप्रकार होता.

मिपावर देखील सुरू करून पाहुया.

समस्यापुर्तीसाठी एक ओळ दिल्या जाते. त्या ओळीत मांडलेल्या प्रश्नाचे, किंवा परिस्थितीचे समाधान करणार् या तीन ओळी तुम्ही रचायच्या आहे. दिलेली ओळ कुठल्याही क्रमांकात बसवून चार ओळीत समस्यापुर्ती करायची आहे.

कुठलेच उत्तर बरोबर वा चुक असणार नाही. त्यामुळे स्पर्धा अशी नाही. पण एकच परिस्थिती कशी विविध प्रकारांनी हाताळल्या जाऊ शकते ह्याची मनोरंजक उदाहारणे नक्की समोर येतील (अशी आशा करुया).

चला तर सुरवातीसाठि ओळ देत आहे.

चंद्र अवचित ग्रासला

कविता

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

18 Nov 2010 - 10:58 am | रणजित चितळे

चंद्र अवचित ग्रासला
पंधरा दिसांचा फासला
जेव्हा अरुण दिसला
पुनवेला पुन्हा हसला

अरुण मनोहर's picture

18 Nov 2010 - 11:26 am | अरुण मनोहर

वाहवा क्या बात है!
(स्वगत- आपण पुर्वेला नाही, द्क्षीण्-पूर्वेला असल्यामुळे हे दिसले नसावे!)

नगरीनिरंजन's picture

18 Nov 2010 - 11:01 am | नगरीनिरंजन

गवाक्षातुनि डोकावता ती चंद्रमुखी
भर माध्यान्ही मुखचंद्र मला दिसला
नजरभेटता दाटला तो लज्जामेघ
पदर होऊनि चंद्र अवचित ग्रासला

अरुण मनोहर's picture

18 Nov 2010 - 11:27 am | अरुण मनोहर

लज्जा मेघ! मस्त कल्पना!

लंबोदर ठेचकाळता,
चंद्र गाली हासला
शापदग्ध झाला परंतु
चंद्र अवचित ग्रासला|

अरुण मनोहर's picture

21 Nov 2010 - 4:38 pm | अरुण मनोहर

छानच.
तिसरी ओळ-
शापग्रस्त झाला, आणि
अशी हवी होती का?

शुचि's picture

21 Nov 2010 - 7:03 pm | शुचि

लंबोदर ठेचकाळता,
चंद्र गाली हासला
शापग्रस्त झाला अन
चंद्र अवचित ग्रासला|