एलओएलझेड!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 6:08 pm

मला पहिल्यांदा कळायचंच नाही. "एलओएल' आणि "एलओएलझेड' म्हणजे काय ते! मला वाटायचं, सॉफिस्टिकेटेड भाषेत शिवी देण्यासाठी "वायझेड' म्हणतात, तशीच काहितरी शिवी असावी. पण फेकबुकाच्या वाऱ्या वाढल्यानंतर हे काहितरी वेगळं प्रकरण आहे, हे लक्षात यायला लागलं.
कुणीतरी समुद्रावर कुठेतरी उंडारतानाचा फोटो टाकते.
त्यावर डझनभर प्रतिक्रिया येतात.
"काय घरदार सोडलंय वाटत...एलओएलझेड!'
....
कुणीतरी हापिसातल्या कर्मचाऱ्यांच्या पार्टीतला कुणाच्या तरी गळ्यात पडलेला असतानाचा फोटो टाकते.
त्यावरही "हं...पार्टी-शार्टी...मजाय!' असली काहितरी भंपक कॉमेंट.
- पुढे - एलओएलझेड!
....
जत्रेतली शिंगं डोक्‍यावर लावलेला फोटो काढतं, वर फेसबुकात टाकतं.
त्यावरही डझनभर एलओएलझेड!
...
तरी फारच साधीसुधी, सोज्वळ, प्रातिनिधिक उदाहरणं घेतली.
या वरच्या प्रसंगांत "लाफिंग आऊट लाऊड' अर्थात तोंड फाटेस्तोवर हसण्यासारखं काय आहे?
ओळख, सुसंवाद, मैत्री, उत्तम मैत्री, एकमेकांच्या भावना न सांगता ओळखण्याएवढ्या पातळीवर गेलेली ही माणसं. निदान, तसा दावा करणारी. मग एखाद्याच्या फोटोवर हलकाफुलका विनोद करणारी, त्याचा पाय खेचणारी, त्याची कुरापत काढणारी कॉमेंट टाकली, तर "एलओएलझेड' कशाला म्हणावं लागतं? आपण त्याची चेष्टा करतोय, गंमत करतोय, हे पटवून देण्यासाठी? की त्याबद्दल आगाऊ माफी मागण्यासाठी?
विनोद आपल्या आयुष्यातून एवढा हद्दपार झालाय? आपण ज्याला "मैत्री' म्हणतो, ती एवढी पोकळ, बाळबोध, बालिश, बाष्कळ आहे? दुसऱ्यानं केलेली चेष्टा, गंमत, टर खुल्या मनानं, तेवढ्याच जिंदादिलीनं न स्वीकारण्याएवढी?
की "एलओएलझेड' म्हणण्याचा पण एक ट्रेंड आहे? सगळे म्हणतात, म्हणून आपणही म्हणूया! की स्वतःच्याच विनोदशैलीच्या क्षमतेबद्दल असलेली ही शंका आहे?
काय नक्की आहे काय?
...
ही झाली एक तऱ्हा.
दुसरी तऱ्हा म्हणजे फेसबुकावर काहितरी आचरट, अर्धवट, अपूर्ण आणि तथाकथितरीत्या उत्कंठा चाळवणारा स्क्रॅप टाकण्याची.
उदाहरणार्थ - "फीलिंग लाइक वीपिंग...'
"अलोन टुडे...'
"व्हाय धिस हॅपन्स टू मी ऑल द टाइम...'
"समथिंग इंटरेस्टिंग इन माय लाइफ...'
किंवा तत्सम काहितरी.
म्हणजे सरळसोट "आज 18 वेळा बादली धरून बसावं लागलं,', "अमक्‍या ढमक्‍याशी लग्न ठरलंय,' "तमक्‍यानं आज मला जाम पिडलं. जोड्यानं मारावासा वाटतोय साल्याला', असं म्हणायचं नाही. गोल - गोल फिरत बसायचं.
मग कुणीतरी विचारणार - "काय झालं गं?'
अशा दीडेक डझन कॉमेंट आल्यावर मग ही - "काही नाही गं...सहजच. गंमत करत होते,' असं काहितरी उत्तर देऊन वेळ मारून नेणार.
काय साधतं यानं?
लोकांचा वेळ फुकट घालवल्याचं समाधान? की लोकांना निष्कारण त्रास देण्याचा विघ्नसंतोषीपणा?
तुम्ही म्हणाल - "ज्याला वाचायचंय त्यानं वाचावं. इतरांनी सोडून द्यावं.'

मग प्रश्‍नच मिटला!
असो.
एलओएलझेड!

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वतन्त्र's picture

22 Nov 2010 - 6:26 pm | स्वतन्त्र

असाच "लाईक" बद्दल देखील आहे.
बळच "लाईक".प्रतिक्रिया देता नाही आली कि आपलं "लाईक" आहेच !

स्वैर परी's picture

22 Nov 2010 - 6:35 pm | स्वैर परी

आजकाल लोकांना नाद लागला आहे फेसबुक चा! लाईक, स्टेटस, कोमेंट आणि विशेषतः लॉल्झ्झ्झ्झ लिहिण्यची. थोडे दिवस चालेल, आणि याचाही कंटाळा आला कि तोपर्यन्त काहितरी नवीन आलेले असेलच!

चिगो's picture

22 Nov 2010 - 6:55 pm | चिगो

नवीन काहीतरी फॅड्स निघत असतात.. कित्येकदा अशा ठिकाणी खर्‍या, उत्स्फुर्त प्रतिसादाऐवजी काहितरी ओढुन-ताणुन लिहीलेले असते. One aims at impressing others rather than expressing him/herself at these sites.. जाऊ द्या..

बाकी निरीक्षण आवडले, आणि मननही...

अगदी अगदी!
कितीतरीवेळा बरं वाटतं कि मी फेसबुक, ऑर्कुटवर नाहिये.
गबोलायलाही अगदी दोन तीन जण तीही अठवडा १० दिवसात एकदा पाचेक मिनिटं!
आपला जालसंपर्क भयंकर आहे हे अभिमानानं सांगतात लोक!
वेळ कसा मिळतो तेच समजत नाही.
इकडे माझी फोडणी जळकट झालेली असताना लोकांच्या गळ्यात गळे घातलेल्या फोटूंचं कौतुक आणि हास्यकल्लोळ कसा जमणार?;)

मिसळपाव's picture

22 Nov 2010 - 11:46 pm | मिसळपाव

...मला वाटायला लागलं होतं की facebook मधे आकंठ बुडालेल्या मंडळीत मीच एक 'कोरडा पाषाण' आहे म्हणून! आणि twitter म्हणजे निव्वळ 'अतिसार' !!

थोडे दिवस फेस्बूक वर होते, ऑर्कुट्वर होते पण जे आतून बोलायचं होतं ते सर्वांसमोर बोलणं खूप कठीण जात होतं. प्रायव्हसी अशी काही नाहीच आहे. सगळं सगळ्यांना दिसतं. :( मग दिला नाद सोडून. शिवाय मला जास्त मित्रमैत्रिणीही नाहीत जे आहेत ते घट्ट आहेत. मग फक्त दाखविण्यासाठी म्हणून "सुपरफिशिअल" मैत्र गोळा करत बसले होते . त्याचाही मग उबग आला. शेवटी कलटी दिली. आता माझे निवडक मित्र-मैत्रिणी आणि मी आणि इमेल मस्त रसायन आहे.

नाहि हो शुचिताई , फेसबुकावर सगळं सगळ्यांना नाही दिसत. तुम्ही तुमची पोस्ट कोणाला दिसायला हवीये ते निवडू शकता. तुंम्ही जेव्हा एखादी गोष्ट शेयर करता तेव्हा everybody , friends of friends , friends वगैरे पर्याय दिसतात. त्यातून तुम्ही friends निवडले की फक्त तुमच्या लिस्ट मधील मित्रांनाच तुमची पोस्ट दिसेल. शिवाय त्यातही तुम्हाला फिल्टर लावता येतो. म्हणजे friends list मधील काही ठराविक मित्रांना च ही पोस्ट दिसायला हवी असेल तर customise हा एक पर्याय पण आहे. आणि जे सर्वांना दिसायला नकोच आहे ते कशाला टाकायचं फेबु वर. जे सर्वांना कळायला हवय अशाच गोष्टी जनरली लोक टाकतात.

हे माहीत नव्हतं. धन्यवाद सांगीतल्याबद्दल.

योगी९००'s picture

22 Nov 2010 - 8:51 pm | योगी९००

दुसरी तऱ्हा म्हणजे फेसबुकावर काहितरी आचरट, अर्धवट, अपूर्ण आणि तथाकथितरीत्या उत्कंठा चाळवणारा स्क्रॅप टाकण्याची.
एकदम बरोबर..काही वेळेला लोकांचे updates वाचून डोकं उठतं..उगाच "आज मी कमी जेवले", "आज मला ऑफीसहून येण्यास खुप उशिर झाला" असले काही लिहीलेले वाचले की त्या मित्र/मैत्रीणींना Delete करावेसे वाटते. च्यायला आम्हाला काय करायचे की तुम्ही काय जेवला आणि तुमच्या घरात/ऑफिसमध्ये तुम्ही काय दिवे लावले ते..

अश्या लोकांना micro blogging म्हणजे काय ते सांगणे आवश्यक आहे..

गवि's picture

23 Nov 2010 - 2:11 pm | गवि

"आज मी कमी जेवले"

हे आपल्यातुपल्याला नाही पण कोणालातरी समजणं अत्यावश्यक असू शकतं.

पण सरळ सांगता येत नाही..पर्सनल ई-मेल पाठवून सांगण्यात तो अर्थ उरत नाही..

:-)

निव्वळ वैधानिक तात्विक शक्यता..

वादाचा उद्देश सुतराम नाही.

राजेश घासकडवी's picture

22 Nov 2010 - 10:28 pm | राजेश घासकडवी

मी हा शब्दप्रयोग कधी फारसा वापरलेला नाही. पण वापरणाऱ्यांचा अर्थ बहुतेक वेळा समजू शकतो.

या वरच्या प्रसंगांत "लाफिंग आऊट लाऊड' अर्थात तोंड फाटेस्तोवर हसण्यासारखं काय आहे?

जालावरच्या प्रतिक्रिया या लेखी असतात, शब्दांना भावना सहज देता येत नाहीत. आपण गप्पा मारताना कितीतरी फुटकळ विनोदांवर हसतो. कधी कधी ते खदखदा हसणं असतं, कधी नुसतं स्माईल असतं. ते हसणं लेखनात कसं प्रतीत करायचं? म्हणून एलोएल. त्याचा मूळ 'लाफिंग आउट लाउड' शी फारसा संबंध उरलेला नाही.

नवीन माध्यमात भाषेची जडणघडण होताना आपल्याला प्रत्यक्ष दिसते आहे. त्या प्रक्रियेत शब्दांचे अर्थ सगळे मिळून ठरवतात. हे ठरताना ते असे भोंगळपणे वापरलेले दिसणारच. त्याचा त्रागा करून घेण्याऐवजी गंमत म्हणून बघा.

विनोद आपल्या आयुष्यातून एवढा हद्दपार झालाय? आपण ज्याला "मैत्री' म्हणतो, ती एवढी पोकळ, बाळबोध, बालिश, बाष्कळ आहे?

मैत्रीचं स्वरूप बदललेलं नाही. तोंडओळख करून घेण्याच्या नवीन सोयी उपलब्ध झाल्या आहेत इतकंच असावं. जालावर जे गमतीने आठवड्यात पाच मिनिटं तुमच्याशी संवाद साधतात त्यांच्याकडे मित्र नव्हे, संभाव्य मित्र म्हणून पहा. खऱ्या मैत्रीचे निकष शेवटी तेच आहेत - एकमेकांविषयी आत्मीयता, एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा, आणि धृढ झालेलं नातं. ते असलं की मग शब्द कसे वापरले आहेत हा मुद्दा क्षुल्लक होतो.

गवि's picture

23 Nov 2010 - 9:00 am | गवि

+१

गवि's picture

23 Nov 2010 - 2:18 pm | गवि

प्रत्यक्ष भेटता येत नाही, व्हर्चुअली तर येतंय्..काय वाईट आहे. न च भेटण्यापेक्षा बेटर इव्हिल..!!

नवीन भाषा डेव्हलप होतेय, काय वाईट आहे.न च बोलण्यापेक्षा बेटर इव्हिल..!!

इमर्जन्सीसाठी मोर्स कोड डेव्हलप झाला. नंतर खूप वर्षं शॉर्टकट मेसेज कोड नंबर आणि कड कट्ट करून "शादी मुबारक", "दिवाली की शुभ कामनाएं" च्या तारा पण केल्याच ना सर्वांनी?

प्रत्यक्ष मिठी मारुन, हात मिळवून तासभर शुभेच्छा द्यायच्या सोडून मेसेज नं. १५, किंवा "कड कट्ट कड कट्ट डिट डा डिट्. ही कसली भाषा बॉ शुभेच्छा देण्याची..शॉर्टकट.." असं म्हटलं का?

आता फेसबूक आहे..उद्या आणि काही..

आपण तेच आहोत ना?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Nov 2010 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे. शिवाय मिपा दोन दिवस बंद होतं तेव्हा फेसबुकानेच तर टवाळी जगवून ठेवली ना! विचारा आमच्या पर्‍याला फेसबुक कसं चालवायचं ते!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Nov 2010 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार

साला फेसबुकाची १२.५०% TRP आपल्यामुळे आहे.

शेवटी फेसबुक हे साधन आहे. ते कसे वापरायचे आणि काय साध्य करायचे ते प्रत्येकानी ठरवायचे :)

ह्यासाठी सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे पांडुरंग तावरे ह्यांचे फेसबुक खाते. त्या खात्यातुन तो माणुस कसा त्याच्या खात्याचा कारभार चालतो ते एकदा अनुभवाच. अ‍ॅग्री टुरीझमला तर त्यांनी फेसबुकवर एक वेगळाच आयाम देवुन ठेवला आहे. त्यांच्या बरोबरीनेच शिवसेनेच्या मेघा गावडे ह्या सुद्धा फेसबुकचा सुंदर वापर करुन घेतात.

अनेक दिग्दर्शक, संगितकार ह्यांनी फेसबुकच्या सह्हायाने किती वेगवेगळ्या कल्पना समोर आणल्या आहेत ते बघितले की थक्क व्हायला होते. अनेक दिग्दर्शक आज आपल्या चित्रपटांच्या प्रोमोसाठी फेसबुक / ट्विटरचा आधार घेत आहेत.

ट्विटरचे जाता जाता उदाहरण देतो. ट्विटरवर सकाळी सकाळी दलाई लामा, नारेंद्र मोदी अथवा आनंद महेंद्रु ह्यांचे ट्विट खरच अगदी वाचणेबल सदरात मोडणारे. आजतर चक्क चक्क बर्‍याच दिवसांनी ललित मोदी साहेब ट्विटरवर येउन आपण एक मुलाखत दिल्याचे सांगुन गेले आहेत ;)

घासकडवी, गवि, आदितीतै, परा यांच्याशी सहमत.

सुनील's picture

22 Nov 2010 - 10:46 pm | सुनील

मग एखाद्याच्या फोटोवर हलकाफुलका विनोद करणारी, त्याचा पाय खेचणारी, त्याची कुरापत काढणारी कॉमेंट टाकली, तर "एलओएलझेड' कशाला म्हणावं लागतं? आपण त्याची चेष्टा करतोय, गंमत करतोय, हे पटवून देण्यासाठी? की त्याबद्दल आगाऊ माफी मागण्यासाठी?

मागे एका मसंवर "ह घ्या" असे लिहिण्याची फ्याशन होती, हे आठवले!

बाकी सगळ्यांचे आहेत तर आपलाही अकाउन्ट असावा म्हणून ऑर्कुट आणि फेसबूकवर खाते उघडले होते. आता तिथे क्वचितच चक्कर टाकतो!

>> विनोद आपल्या आयुष्यातून एवढा हद्दपार झालाय? आपण ज्याला "मैत्री' म्हणतो, ती एवढी पोकळ, बाळबोध, बालिश, बाष्कळ आहे? >>
जरी घासकडवी यांनी वेगळा परस्पेक्टीव्ह सांगायचा प्रयत्न केला असला तरी मला अभीजीत यांचे म्हणणे जास्त पटते. ही फेसबूकवरची मैत्री मला "होलसम" अशी नाही वाटत. मला आवडलेली कविता, अध्यात्मिक वाक्य, एखादा अर्थगर्भीत सुंदर विचार मी रोज माझ्या मित्रमैत्रिणींना इमेलमधून लिहीते आणि ते त्यांना कीती आवडले याची आतुरतेने वाट पहाते. तेच जर मी वॉलवर लिहीलं तर या पोरकट , अनावश्यक भाऊगर्दीत ते हरवून जाते. परत थिल्लर लोकांना सर्वांना ते दिसते .... म्हणजे प्रायव्हसी गेली?
पोकळ , बाळबोध आणि बालीश स्वरूप आलं आहे हे मला पटतं. प्रौढ , प्रगल्भ व्यक्तींना एकमेकांना देता येणारी आश्वासक ऊब, मैत्री, प्रेम, आत्मीयता हे फेसबुक, ऑर्कुटवर मला तरी सापडले नाही.
"हार्ट - टू- हार्ट" संवाद हा वॉलवरून होणं शक्यच नाही. मग नक्की वॉलवर काय लिहायचं उरलं तर थिल्लर गोष्टी. प्लीज काऊंट मी आऊट.

वरील विषयाला काय लिहावे हेच कळत नव्हते म्हणुन रिप्लाय लिहिला नव्हता .
परंतु निगेटीव्ह आलेल्या रिप्लायवरुन काही लिहावेसे वाटले ..

फेसबुक वर अजुन नहिये मी, माझ्या नावाचे अकाँट माझ्या फ्रेंड ने त्याच्या गेम्स पाईंट साठी काढले आहे.. काही माहीती नाही मला त्याचे ..

-------
परंतु .. ऑर्कुट ने मला खुप मोठे नविन जग दिले .. खुप छान मित्र दिले .. येव्हडेच काय माझी पहिली कविता ही मी ऑर्कुट वरच लिहिली ... मला झालेले काही फायदे येथे देतो .. नक्कीच माझ्या सारखे फायदे झाले असतील कोणालाही .

१. मी पहिली तोडकी मोडकी कविता ऑर्कुट वर लिहिली .. काही प्रतिसाद आले .. मग माझे हळु हळु सुरु झाले .. कधीच कसले जास्त लिखान न करणारा मी बरेच विषयावर माझे लेखन सुरु झाले.
आनि ऑर्कुट फ्रेंड मुळेच माझे मी त्यांच्याबरोबर केलेले ७ स्टेज प्रोग्रॅम मस्त झाले.

२. माझ्या २ जॉब ला मला ऑर्कुट फ्रेंडचा रेफरंस मिळाला आणि मी सीलेक्ट झालो त्या कंपणीत नाहीतर अजुन वेळ लागला असता.

३. माझे घर घेताना, माझा बेस्ट फ्रेंड झालेला (ऑर्कुट फ्रेंड) त्याने ३ लाख रुपये कॅश दिले आणि माझे स्वप्न पुर्ण झाले ...

४. माझे पहिले गाणे सिडी मध्ये प्रकाशित झाले ते ही ऑर्कुट फ्रेंडसच्या सहकार्याने .. त्याला सत्यजीत केळकर आणि स्वप्नजा लेले यांचे संगीत अआणि आवाज मिळाला.

५ माझे पहिले छोटेशे शुटींग "वळु"च्या कॅमेरामन कडुन झाले , ते ही ऑर्कुट फ्रेंड मुळेच.

६. १०० हुन अधीक ऑर्कुट फ्रेंड आहेत मला.. अआणि आम्ही भेटतो ही.. खुप मजा पिकनीक आणि बरेच काही.
काही जणे अजुनही घरी येतात .. आई शी छान मैत्री झाली आहे ..

असेच बरेच काही आहे .. अगदी "आपला अभिजीत " असे ऑर्कुट प्रोफाईल नेम असणारा अभिजीत गलगलीकर पण एकदा भेटला होता कल्यान ला " ऑड वाटेच्या" पुस्तकाच्या वेळेस.. पुणे ते कल्याण प्रवास एकाच गाडितुन केला होता.

त्यामुळे दाखवण्यासाठी नाही पण स्वताचय लाईफ मध्ये खुप खुप महत्वाचे मित्र मिळाले.. शिवाय माझे पर्स्नल जवळजवळ २०-३० फ्रेंड ही तितकेच जवळ आहेत माझ्या अआणि त्यातील काही जण माझ्या ऑर्कुट फ्रेंड्स चे पण मित्र झालेत ..

असो थांबतो .. स्वपुरान खुप झाले .. परंतु खरेच सोशल नेटवर्कींग ला एक वेगळी कडा पण असते ... हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता.

छोटा डॉन's picture

23 Nov 2010 - 2:23 pm | छोटा डॉन

मस्त प्रतिसाद :)
सोधल नेटवर्किंगची वेगळी बाजु उत्तमपणे मांडल्याबद्दल आभार :)

- छोटा डॉन

इंटरनेटस्नेही's picture

22 Nov 2010 - 11:24 pm | इंटरनेटस्नेही

फचेबूक वर स्ततुस उप्दते करय्ल लै मअ येते.

(विघ्नसन्तोशि) इन्तेश.

आपला अभिजित's picture

24 Nov 2010 - 3:41 pm | आपला अभिजित

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मला पण फेसबुकात डोकावायला फारसा वेळ नसतो, पण जेव्हा डोकावतो, तेव्हा जे जाणवते, त्यावर टिप्पणी करतो. मागे एकदा `लाइक धिस' बद्दलही लिहिले होते.

असो.

अनोळखी लोकांशी उत्तम मैत्री होउ शकते याचे अनेक अनुभव आहेत पण फेसबुकवर स्टेटस मेसेजसंबंधी जे लिहिले आहे ते अगदी खरे आहे. तिडीक जाते. खरोखर काहीतरी चांगले करून प्रसिद्धी न मिळवता आल्याने पण त्यासाठी हपापलेले तुच्छ लोक हे धंदे करतात.

हाउ आय मेट योउर मदर मधल्या वू गर्ल्स किंवा मिपावर लेखक/ कवी म्हणून प्रसिद्धी मिळावी यासाठी सुमार पण नियमात बसणार्‍या घाउक लेखनाचा रतीब घालणारे हे यांचेच भाईबंद. अशा लोकांची संख्या भरपूर म्हणून फेसबुक एकदम लोकप्रिय!