निशाणा..तुला दिसला ना..?

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
17 Nov 2010 - 5:47 pm

बिल्ला आणि नाग हे हिंदी सिनेमातले अवतार झाले.

जसे हिंदी पिच्चर आता सेन्सिबल निघतात, तसेच मराठी "चित्रपटांची" क्वालिटी भलतीच सुधारली आहे. क्वालिटी वॉल्स एकदम.

श्वास्..वळू..नटरंग..काय काय पाहतो आणि ऐकतो. सगळं नवलच..हाय टेक..

माझ्या कोवळ्या मनावर वाईट संस्कार होण्याच्या दिवसांत मराठी सिनेमे कसे झकास होते..

अं..अं..करणारा लक्ष्या..गावरान..

डॅम इट..करणारा महेश कोठारे..शहरी..

अशोक सराफ्..कशातही घाला त्याला व्यंजन म्हणून..अगदी कॉलेज बॉय म्हणूनही..

प्रिया अरुण गावाकडची मैना, म्हणून ती लक्ष्याची.

किशोरी शहाणे, निवेदिता वगैरे महेश कोठारेच्या..

उरेल ती अशोक सराफला..

आपल्या हिरॉईनीला बघितलं की तीन सेकंदात स्वप्न सुरु.

गाणी कध्धी कध्धी न विसरता येणारी..

"खेळ कुणाला दैवाचा कळला..तू असो..मे असो.हा असो.ही असो..कुणी असो.."

"मंगला गं मंगला..गं मंगला गं मंगला..तुझासाठी चंद्रावर मी बांधलाय बंगला.."

....

"साजणा" "दिवाणा" "ये ना" हे सर्वात पेट्ट शब्द..

रुपेरी वाळूत म्हणू नका, माडाच्या बनात म्हणू नका..

मनाच्या धुंदीत.. लहरीत ..मिठीत्..कुशीत..स्वप्नात ..मसणात..

उपरिनिर्दिष्ट सर्व स्थळी "ये ना.."

..अश्विनी ये ना..

..ये ना राणी तू ये ना..

ये ना सजणा ये ना..निशाणा तुला दिसला ना..

आणि हे सर्व कोल्हापूरच्या एखाद्या म्युनिसिपल गार्डन सदृश बागे मधे..

मागे कर्दळीची फुलं..लाल लाल..

हीरो हीरोइनचे ओठ एकामेकांजवळ आले की एकदम ही फुलं एकमेकांना चुंबतात..

घट्ट चटेरी पटेरी टी-शर्ट (जत्रा .आवाज..वगैरे दिवाळी अंकातला गुंड असला टी-शर्ट घालूनच जन्माला येतो.. !!) घातलेला अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..

असे ....म्हणजेच "नृत्ये : सुबल सरकार.."

वा..मोगेम्बो खुश हुआ..!!

मराठी सिनेमांची नावं आहाहाहा....

चल गम्मत करू..

टोपीवर टोपी..

धमाल बबल्या गणप्याची

थरथराट..

धडाकेबाज..

कमाल माझ्या बायकोची..

हळद रुसली कुंकू हसलं..

खट्याळ सासू नाठाळ सून ..

गंमत जंमत ..

दे दणादण..

हमाल दे धमाल..

....एकूण सगळी धमाल..आणि गोलमाल..!!

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

प्रमोद्_पुणे's picture

17 Nov 2010 - 5:58 pm | प्रमोद्_पुणे

छान.. वईच अजून लिवा की . अलका कुबलच्या अमूल्य योगदानाबद्दल एक शब्द सुद्धा नाही..मागे एकदा "आई मला माफ कर" नावाचा एक क्लासीक चित्रपट पाहिला होता. संधी मिळाल्यास जरूर बघा.

अलका कुबल, दीपक शिर्के, धुमाळ, विजू खोटे असे अनेक अनेक स्टेक होल्डर्स आहेत.

ते एक्स्पान्शन करण्याचं काम कॉमेंटकर्ते समर्थपणे करतीलच.

सगळं लिहिलं तर कॉमेंटणार काय?

प्रतिक्रियेबद्दल धन्स..

स्पा's picture

17 Nov 2010 - 6:01 pm | स्पा

हॅ हॅ हॅ

भन्नाट लिवलंय राव!!!!!!

अजून एक भन्नाट IDEA सांगतो......
अशी गाणी लागली कि.. "sound mute " करायचा आणि मग नुसता नाच बघायचा ,
हसून हसून नाही वाट लागली, तर नाव बदलेन..... ;)

मुलूखावेगळी's picture

21 Jul 2011 - 10:42 am | मुलूखावेगळी

अशी गाणी लागली कि.. "sound mute " करायचा आणि मग नुसता नाच बघायचा ,
हसून हसून नाही वाट लागली, तर नाव बदलेन..... Wink

नेहमीच करते ;)

भारी लिहिलेय गवि
लहानपणी ह्याच पिक्चरची उजळणी करायचो.
मंगला मंगला ग मंगला मंगला ग ........................................................

चाणक्य's picture

10 Feb 2012 - 11:47 am | चाणक्य

आजच करुन बघतो

धमाल मुलगा's picture

17 Nov 2010 - 6:18 pm | धमाल मुलगा

तिर तिर तिर तिर पळणे काय राव? :D फुटलो ना.
आणि लक्ष्याचा ड्यान्स.. दोन्ही हातात एकेक अदृष्य फुलबाजी घेऊन 'दिन दिन दिवाळी...गायीम्हशी ओवाळी' ह्यात नेहमीच्या दिवाळी स्टान्समध्ये एक सुधारणा....अशा फुलबाजा ओवाळत असताना विजारीत झुरळ शिरलं तर माणूस कसा उडी मारेल ते आठवावे. :D

बाकी, अलकाकाकू बुकल..हे आपलं कुबल..त्यांच्या सिनेमांबद्दल तर काय बोलायचं देवाऽऽ...
एरवी बाहेर जाताना टिचभर रुमाल घेऊन फिरणार्‍या बायका कुबलकाकूंच्या सिनेमाला जायचं असलं की पंचा घेऊन जायच्या म्हणे. का तर 'बरं असतं होऽ..बरंच पाणी टिपून घेता येतं..रुमाल मेला सत्रांदा पिळून काढला तरी किच्च भिजतो की मग डोळे टिपताही येत नाहीत.'

असो, ह्यावरुन आमच्याकडं इनोद करायचे की कुबलकाकूंसोबत अर्नॉल्ड शिवाजीनगरकर सिनेमात काम करायला तयार झाला तर सिनेमाचं नाव काय ठेवतील? तर म्हणे
१. थांब कमांडो कुंकू लावते.
२. माहेरचा टर्मिनेटर.

चिगो's picture

17 Nov 2010 - 8:04 pm | चिगो

आमचा एक हलकट मित्र आठवला.. ह्याला साल्याला तिची "फिगर" कुठून दिसली कुणास ठाऊक? भाडखाव म्हणे , येवढी "माल" हिरोईन मराठीवाल्यांनी रडवण्यात वाया घालवली. (ह्यानं साल्यानं जणू तिला "मल्लिका शेरावत"च बनवलं असतं ;-)) "माहेरची साडी"त अलका"तै" रडायला लागली की हा हरामखोर हसायला लागयचा आणि मग सगळ्या बायका ह्याला मनसोक्त शेलक्या शिव्या घालायच्या.. :-D

बाकी मला त्या चित्रपटातली विल्हनची नाव जबराट आवडायची.. कवट्या महाकाळ, तात्या विंचू इ.इ.
"डॅम इट"... ;-)

गविरावांचा आणखी एक षटकार... हाणा, आम्ही बसलोच आहोत आतषबाजी बघायला.

धमाल मुलगा's picture

17 Nov 2010 - 8:11 pm | धमाल मुलगा

सौंदर्य बघणार्‍याच्या नजरेत असतं म्हणतात ते हे असं. ;)

>लक्ष्याचा ड्यान्स.. दोन्ही हातात एकेक अदृष्य फुलबाजी घेऊन 'दिन दिन दिवाळी...गायीम्हशी ओवाळी' ह्यात नेहमीच्या दिवाळी स्टान्समध्ये एक सुधारणा....अशा फुलबाजा ओवाळत असताना विजारीत झुरळ शिरलं तर माणूस कसा उडी मारेल ते आठवावे.

वाचून सांडले मी खुर्चीतून........... :))))))

नेहमी लक्षा ला नाचताना बघून मला जे काय वाटायचे पण अचूक शब्द सापडत नव्हते...त्याला तुम्ही उपमा शोधून दिलीत... थेन्कू

चांगभलं's picture

17 Nov 2010 - 9:43 pm | चांगभलं

आणि लक्ष्याचा ड्यान्स.. दोन्ही हातात एकेक अदृष्य फुलबाजी घेऊन 'दिन दिन दिवाळी...गायीम्हशी ओवाळी' ह्यात नेहमीच्या दिवाळी स्टान्समध्ये एक सुधारणा....अशा फुलबाजा ओवाळत असताना विजारीत झुरळ शिरलं तर माणूस कसा उडी मारेल ते आठवावे.

हालत झालीये हसून......
धमाल मुलगा ............................ बेकार आहेस तू!!!!!!!! ;).

:bigsmile:
:bigsmile:
:bigsmile:

नगरीनिरंजन's picture

18 Nov 2010 - 6:51 am | नगरीनिरंजन

+१
असेच म्हणतो... लई बेकार आहे धमु.
>>माहेरचा टर्मिनेटर
=)) =))

आणि लक्ष्याचा ड्यान्स.. दोन्ही हातात एकेक अदृष्य फुलबाजी घेऊन 'दिन दिन दिवाळी...गायीम्हशी ओवाळी' ह्यात नेहमीच्या दिवाळी स्टान्समध्ये एक सुधारणा....अशा फुलबाजा ओवाळत असताना विजारीत झुरळ शिरलं तर माणूस कसा उडी मारेल ते आठवावे. ...........
....
Hillarious..afalatoon..h.h.pu.vaa.

धमाल कॉमेडी पिक्चर आहे. असं आम्ही सिद्ध केलं आहे.
पण त्या साठी ४-५ टवाळ मित्रांचा आडियन्स हवा. (अशीच "क्लिनचीट" आम्ही करीना-सैफ च्या कुर्बान पिक्चर लापण दिली आहे)

"बाबा, तुम्ही बाप नाही साप आहात"

"ताई, माझा दुसरा हात तुटला पण तू राखी बांधलेला हात तसाच आहे"

असे छान छान संवाद आहेत मा. सा. मधे...

-(टवाळ्)एक (आमच्या इथे कुठ्ल्याही गंभीर सिनेमाची वाट लावून मिळेल..)

ढब्बू पैसा's picture

17 Nov 2010 - 6:21 pm | ढब्बू पैसा

>>>>अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..
जबरा, परफेक्ट!! एकदम ढेरपोटया अशोक सराफ आणि रंगेबिरंगी स्कर्ट घातलेली निवेदिता असे नाचायला लागले डोळ्यापुढे.
ते अलका कुबल बद्दल पण लिहा लवकर!!

सविता's picture

17 Nov 2010 - 9:14 pm | सविता

अगदी अगदी.... १००% सहमत..........

परिकथेतील राजकुमार's picture

17 Nov 2010 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मस्त !
मिपाच्या गगनात बघावे तिकडे तुमच्याच विहार्‍या दिसत आहेत :)

इंटरनेटस्नेही's picture

22 Jul 2011 - 12:39 am | इंटरनेटस्नेही

हेच आणि असेच म्हणतो!

गणेशा's picture

17 Nov 2010 - 7:02 pm | गणेशा

एकदम मस्त लिहिले आहे ...

नगरीनिरंजन's picture

17 Nov 2010 - 7:10 pm | नगरीनिरंजन

न्हेमीपर्मानंच लै नंबरी लिवलंय भौ!
धूमधडाकातलं
"प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा
श्रीदेवी तू जयाप्रदा तू तूच माझी हेम्मा"
हे गाणं डोळ्यासमोर आलं. शिवाय मधल्या काळात लक्ष्मीकांत आणि प्रिया अरूण यांच्यावर चित्रित झालेल्या पॅरोड्यांचा सुक्काळ झाला होता..
"रो मत गंगू.." वगैरे :-)

पैसा's picture

17 Nov 2010 - 7:11 pm | पैसा

आशा काळे आणि उषा नाईक वगैरे मंडळींचे "हळदीकुंकू" समारंभ.... विसरू नका बरं का!

शुचि's picture

17 Nov 2010 - 7:44 pm | शुचि

पाटील आणि "वाईट नजर" वगैरे एक भानगड असायचीच. म्हणजे काय ते रोखठोक नाही, आधी "वाईट नजर" वगैरे प्रकरण असायचं. गावचा पाटील म्हणजे सत्तेने माजलेलाच पाहीजे. म्हणजे पाटील आडनावाच्या लोकांची किती कुचंबणा त्या दिवसात होऊन राहीली असेल ते आता माझ्या लक्षात येतं.

मृत्युन्जय's picture

17 Nov 2010 - 8:18 pm | मृत्युन्जय

अगदी अगदी. गावचा इनामदारही असाच असायचा सगळ्या चित्रपटांमध्ये. गावात एक शेतात एक या प्रकारातला. आणि येणार्‍या जाणार्‍या कुठल्याही तरण्याताठ्या (?????) पोरींकडे, विशेषतः रंजना, आशा काळे, पद्मा चव्हाण (तरण्याताठ्या शब्दापुढचे ४-५ प्रश्नचिन्हं याचसाठी होते) आदींकडे बघुन,"पाखरु लै तय्यारीचं आहे बबन्या" असे आपल्या शेजारच्या चमच्याकडे बघुन चित्रपटात एकदातरी म्हणायचा. आणि चेहेर्‍यावर मग कमालीचे लोचट किंवा बावळट भाव आणुन तो चमचा म्हणायचा "मंग टाकायचा का आज रातच्याला डाव. शेवंतीचा बाप पण आज शहरात गेला हाय बियाणं आणायला. एकटीच असंल घरी. बिनबोभाट उरकुन टाकुयात सगळं. कसं?" या रात्रीची अखेर बर्‍याच वेळा डाव हुकल्यामुळे शेवंतीच्या शेतातली उभी पिकं जाळण्यात व्हायचा.

योगी९००'s picture

17 Nov 2010 - 8:35 pm | योगी९००

मस्त धागा..

तसा लक्षा चांगला होता पण आपल्या दिग्दर्शकांनी त्याला वाया घालवला. त्याला नाचताना बघणे म्हणजे एक शिक्षाच होती. उ.दा. हमाल दे धमाल मधले "मनमोहना तू राजा स्वप्नातला" यात तर त्याने मधे मधे कथ्थक केला आहे. तो पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. मला तर लक्षाची कीव वाटायची. अशोक सराफ पण तिच गत होती . कदाचित इतर रोल (व्हिलन, चरित्र नायक वगैरे) करत असल्याने तो जरा वाचला.

(आता ३००/ट्रॉय वगैरे चित्रपट पाहिल्यामुळेच की काय) आपले पुर्वीचे मराठी युद्धपट म्हणजे सुर्यकांत वगैरे यांचे चित्रपट जरा हास्यास्पद वाटायचे. त्यामध्ये काही मावळे वि. काही दाढीधारी सैनिक तलवारी घेऊन नाचत आहेत असे वाटायचे.

मला आवडायचे ते आपले निळूभाऊ.. "पण बाई मी काय म्हणतो" वगैरे डॉयलाग मनात फार बसले आहेत.
(तसेच दादा कोंडकेही जबरा आवडायचे . आमच्या शाळेत यामुळेच एकदा एकाने शिवरांयाचे गुरू कोण? याचे उत्तर दादो़जी कोंडदेव ऐवजी दादोजी कोंडके असे सांगितले होते.)

पण काही म्हणा जरी तमाशापट,रडवे, अतिकौटूंबिक असे असले तरी त्या त्या काळानुसार हे चित्रपट बरे वाटायचे (मधला लक्षा/अशोकचा काळ सोडून). आता दबंग सारखा अतिटुकार चित्रपट डोक्यावर घेतला जातो..तर हे का नाहीत?

बरोबर आहे .. त्या काळानुसार ते चित्रपट खुप छान होते ..

आत्ताच सकाळ मध्ये ' सांगते ऐका चे मेकींग वाचले ' खरेच खुप जबरदस्त प्रवास वर्णन केलेला आहे .. नक्की वाचावा असा ..

लिंक : http://72.78.249.107/esakal/20101117/4625380670850015419.htm

मेघवेडा's picture

17 Nov 2010 - 9:21 pm | मेघवेडा

>> त्या काळानुसार ते चित्रपट खुप छान होते ..

'ऑब्सोलीटली' करेक्ट!*

*संदर्भः मुसु (२०१०), शाहीद - एक करूण कहाणी, प्रतिसाद क्र. २५९५९२.

प्रीत-मोहर's picture

17 Nov 2010 - 10:12 pm | प्रीत-मोहर

ऐस्याच बोल्ती मै

शुचि's picture

18 Nov 2010 - 3:03 am | शुचि

>> (तसेच दादा कोंडकेही जबरा आवडायचे . आमच्या शाळेत यामुळेच एकदा एकाने शिवरांयाचे गुरू कोण? याचे उत्तर दादो़जी कोंडदेव ऐवजी दादोजी कोंडके असे सांगितले होते.)>>

इथे हसून मरायची वेळ आलीये.

(आता ३००/ट्रॉय वगैरे चित्रपट पाहिल्यामुळेच की काय) आपले पुर्वीचे मराठी युद्धपट म्हणजे सुर्यकांत वगैरे यांचे चित्रपट जरा हास्यास्पद वाटायचे

सुर्यकांत,चंद्रकांत यांच्या इतक्या मर्दानी भूमिकांना मराठीत नक्कीच तोड नाही,त्याहून त्यांच्या शिवरायांच्या भूमिकेला तर नाहीच नाही.
चेहऱ्यावरचे हावभाव आणि भरलेला सातारी आवाज यावरच ते चित्रपट तोलायचे.

- अकिलीस

अर्धवटराव's picture

17 Nov 2010 - 10:19 pm | अर्धवटराव

पहिले पोटभर हसुन घेतो !!!

सगळ्यात हाईट म्हणजे.. लक्ष्याचे टीशर्ट्स. लूझर टाईपचे ढगळ, चमकणारे आणि त्यावर लाल/गुलाबी रंगाचं बदाम चित्र.. आणि त्यात "LOVE" लिहिलेलं. त्यात लक्ष्याचं गाणं "L O V E लव्ह म्हणजे प्रेम" आणि त्याचा तो ब्रेक डान्स.. आहाहाहा.. अत्युच्च्य दर्जाची करमणुक.

(लक्ष्या फॅन) अर्धवटराव

एक महत्वाचं राहिलं. लोलकातून सात सात वर्षा उसगावकर. हेही ठीक पण जोडीला सात सात महेश कोठारे किंवा सात सात अशोक सराफ्.. अईग्ग

पंगा's picture

21 Jul 2011 - 12:15 pm | पंगा

कठीण आहे.

माजगावकर's picture

18 Nov 2010 - 12:54 am | माजगावकर

अगदी अगदी. गावचा इनामदारही असाच असायचा सगळ्या चित्रपटांमध्ये. गावात एक शेतात एक या प्रकारातला. आणि येणार्‍या जाणार्‍या कुठल्याही तरण्याताठ्या (?????) पोरींकडे, विशेषतः रंजना, आशा काळे, पद्मा चव्हाण (तरण्याताठ्या शब्दापुढचे ४-५ प्रश्नचिन्हं याचसाठी होते) आदींकडे बघुन,"पाखरु लै तय्यारीचं आहे बबन्या" असे आपल्या शेजारच्या चमच्याकडे बघुन चित्रपटात एकदातरी म्हणायचा. आणि चेहेर्‍यावर मग कमालीचे लोचट किंवा बावळट भाव आणुन तो चमचा म्हणायचा "मंग टाकायचा का आज रातच्याला डाव. शेवंतीचा बाप पण आज शहरात गेला हाय बियाणं आणायला. एकटीच असंल घरी. बिनबोभाट उरकुन टाकुयात सगळं. कसं?" या रात्रीची अखेर बर्‍याच वेळा डाव हुकल्यामुळे शेवंतीच्या शेतातली उभी पिकं जाळण्यात व्हायचा.

राजशेखर.. पांढरी फरची टोपी.. एक डोळा बारीक करुन, "पाखरु नवीन दिसतंया गावात.. रातच्याला येऊ दया वाडयौव..

वाचून फारच मजा आली.
(वाचक)बेसनलाडू

फारएन्ड's picture

18 Nov 2010 - 2:12 am | फारएन्ड

एकदम अचूक निरीक्षणे :lol:

तो अशोक आणि निवेदिता च्या डान्स चा ग्राफ आवडला :)

जोडीला सात सात महेश कोठारे किंवा सात सात अशोक सराफ्>>>
दोन्ही हातात एकेक अदृष्य फुलबाजी घेऊन >>> हे ही जबरी!

बाकी निळू फुलेंचे अनेक रोल्स, दादा कोंडक्यांचे सुरूवातीचे चित्रपट, राजा परांजप्यांचे चित्रपट अजूनही छान वाटतात.

जयंत कुलकर्णी's picture

18 Nov 2010 - 7:13 am | जयंत कुलकर्णी

थोडे अवांतर :
आणि त्याच्याही पूर्वीच्या मराठी चित्रपटात स्वतःचे कॉरपोरेट जग शिलाइ मशीन चालवून सावरणारी कर्ती स्त्री... तिला विसरून कसे चालेल ? ;-) आणि हे करताना आलेले अंधत्व....
तोच तोच सीन बघून तमाम मराठीजनांना जगात शिलाई मशीन चालवता आले की कुठल्याही अडचणींचा सामना करता येतो असे वाटायला लागले होते तर हाच एकमेव उद्योग आहे असे समजून बहुदा एक पिढी खपली असावी.

दारिद्र्याचे उदात्तिकरण करता करता आम्ही दरिद्रीच राहिलो.

असाही प्रवाद त्या काळी होता की त्या काळात शिलाई मशीन्चा सर्वात जास्त खप महाराष्ट्रात होता.

हलके घ्या हो............मराठी जन हो..

नंदन's picture

18 Nov 2010 - 7:13 am | नंदन

भन्नाट लिहिलंय, वाचून मजा आली. महेश कोठारेच्या चित्रपटांचा अजून एक अविभाज्य (!) भाग म्हणजे हिंदी गाण्यांच्या चालीवरचं मराठी कडबोळं. पहिल्या दोन-तीन खेपांपुरती त्याची गंमत होती, पण नंतर बोअर व्हायला लागलं. महमूद-ओमप्रकाशच्या हॉरर पिक्चरच्या सीनवर बेतलेला लक्ष्या-शरद तळवलकरांचा सीन मात्र अधिक आवडला होता.

समीरसूर's picture

18 Nov 2010 - 10:33 am | समीरसूर

नाचाविषयीचे वर्णन अगदी परफेक्ट!! :-)

लहानपणी कुठलेही सिनेमे आवडायचे; अगदी चंगू मंगू, गो. धमाल नाम्याची असल्या विचित्र नावांचे चित्रपट देखील आवडायचे... नंतर लक्षात यायला लागले की मराठी चित्रपट किती भिकार असायचे त्या काळात...

अत्यंत फालतू कथा, अत्यंत ढिसाळ दिग्दर्शन (बहुधा पीतांबर काळे वगैरे मंडळींचे), सुबलदांचे भिकार नृत्यदिग्दर्शन असा पांचट मसाला असायचा. सुबलदांना बहुधा १-२ स्टेप्सच यायच्या. वर नमूद केल्याप्रमाणे तीर तीर धावण्याच्या, हाताचे पंजे कमरेखाली आणून पुढच्या बाजूला हलवण्याच्या, आणि दोन हात समोर ठेवत मागे पळत जाऊन एकदम वर-खाली-मागे-पुढे असे हात ठेवून छान गिरकी घेऊन तिथल्या तिथे कंबर हलवण्याच्या...बस्स या पुढे त्यांची मजल कधी गेलीच नाही आणि विशेष म्हणजे त्यांना भरपूर काम देखील मिळायचे.

मराठी चित्रपट म्हणजे तो विनोदीच असला पाहिजे असा जणू विडाच त्याकाळी सगळ्यांनी उचलला होता. पटकथा इतकी बेंगरूळ आणि सपाट की हसावे की रडावे कळत नसे. काल-परवा पल्लवी सुभाषचा एक चित्रपट अगदी थोडा वेळ पाहिला. त्यात पल्लवीची आई विधवा असते आणि सरकारने अध्यादेश काढल्याप्रमाणे पांढरे कपाळ, पांढरे केस, पांढरी साडी असं सगळं पांढरं-पांढरं घेऊन एका शिलाई मशिनवर काहीतरी शिवत असते. तेवढ्यात फटफटीवर एक अभिनयाचा प्रयत्न करणारा इसम येतो. आता तो फटफटीवर आलाय, पूर्वी सायकलवर आणि फार पूर्वी बैलगाडीत आणि फारफार पूर्वी पायी येत असे. पुढे तो मर्सिडीझमध्ये जरी आला तरी चित्रपटाला काहीच फरक पडणार नाही. मग आई अगदी मान उंचावून बाहेर बघते आणि तिच्या चेहर्‍यावर भक्कन हसू पसरतं.

"अरे दादा...तू अचानक?" (दादा सगळे ३२ दात दाखवतोय)

आई पुन्हा टाचा उंचावून, हरणासारखी मान उंच करत, फिरवत, शोधक नजरेने विचारते, "आणि हे काय? वहिनी कुठे आहे?" (तो फटफटीवर एकटाच आलाय हे आईने पाहिलयं पण न जाणो येतांना दादाने वहिनीला विहीरीत वगैरे ढकलले असेल तर बरंच आहे म्हणून खातरजमा करून घेण्यासाठी टाकलेला हा भाबडा प्रश्न)

दादा शक्य तितका अभिनयाचा प्रयत्न करत हसू, चेहर्‍यावरचा साधेपणा, दातांची चमक इत्यादी सांभाळत म्हणतो, "नाही मी एकटाच आलोय, तिला काम होतं घरी" (तिला आणलं तर आणखी जास्त प्रसंग लिहा, संवाद लिहा, एक नटी आणून उभी करा, तिच्यातली आणि दादामधली केमिस्ट्री दाखवा, माफक खट्याळ प्रणय दाखवा...कुणी सांगितले नसते धंदे, त्यापेक्षा तिला घरीच कामात गुंतवलेले बरे असा क्रियेटीव्ह विचार निर्मात्याने केला असावा. शेवटी त्याला पिक्चर रीलीज होऊन अनुदान मिळाल्याशी मतलब आणि असलाच तर काळा पैसा पांढरा दाखवण्याशी मतलब; पिक्चर गेलं तेल लावत...)

मग दादा बाहेरून हिरवी भाजी डोकावणारी एक पिशवी आईकडे (म्हणजे त्याच्या ताईकडे) देतो.

"हे काय आता? काय आहे यात?" (हिरवी भाजी डोकावतेय ते बहुधा आईला दिसत नसावं. गरीब खेडूत आई असल्याने मोतीबिंदू झाला असावा; किंवा भाजीखाली एक-दोन ब्लॅक लेबल, रॉयल स्टॅग, किंगफिशर स्ट्राँग असतील अशी आशा असेल म्हणून मुद्दाम हा प्रश्न तिने विचारला असावा. )

"ते मला माहित नाही, ते तुझ्या वहिनीलाच माहिती! तिने दिलं आणि मी आणलं" (दादा आल्यापासून हसतोच आहे. दिग्दर्शकाची हुशारी बघा आणि वाखाणा, काय वहिनीचं वन्संवर प्रेम आहे, वा वा! दादाला या जगावेगळ्या मायेची जाणीव आहे हे दाखवण्यासाठी हा १० किलो साखरेत घोळलेला संवाद. अगदी वंन्समोअर म्हणायला लावणारा संवाद!)

"मी तर तुला कित्येकदा म्हटलं; चंपकराव (किंवा कुठलातरी राव) गेल्यापासून आमच्यासोबत येऊन रहा. पण तू ऐकलं नाहीस. तुझा स्वाभिमानी स्वभाव माहित नाही होय मला?" (मग म्हटलच कशाला? दात दिसतातच आहेत.)

"अरे या घरात आठवणी आहेत त्यांच्या आणि त्यांना आवडलं असतं का मी असं हे घर सोडून गेलेलं" (युक्तीवाद)

"तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकेल होय? शिकली असतीस तर मोठ्ठी वकील झाली असतीस. चंपी (किंवा ढंपी, कमळी) दिसत नाही कुठं ती?" (हसत दादा म्हणतोय. एका वाक्यात हा बहीणीला वकील बनवायला चाललाय.)

"तिची बुद्धीबळाची स्पर्धा आहे ना कॉलेजात...येईलच आता" (एक बदल म्हणून बुद्धीबळ. आधी शेतात, रानात, फुगडी खेळायला, भोंडला खेळायला, कुणा मैत्रीणीच्या साखरपुड्याला/लग्नाला/डोहाळजेवणाला/मुलाच्या बारश्याला/वाढदिवसाला असे ऑप्शन्स असायचे. बदल हवाच ना!)

तेवढ्यात एका दोन हजार लोकवस्तीतल्या खेड्यात आयोजित केलेल्या बुद्धीबळाच्या स्पर्धेत जिंकलेला फुटबॉल विश्वचषकापेक्षाही दीडपट मोठा चषक घेऊन चंपी हुंदडत शेतातून वाट तुडवत घरी येते. तिच्या चेहर्‍यावर ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्याच्या किंवा लास वेगसमध्ये हृतिक रोशनसोबत ३ नाईटस आणि ४ डेज राहिल्याच्या आनंदाइतका आनंद उतू जातोय. ओवरअ‍ॅक्टींगचा खापरपणजोबा काय असतो हे चंपीच्या चेहर्‍यावरून कळतं.)

"अरे मामा.." (बस्स, यापुढे संवादच दिले नाहीत तिला. भूत बघितल्यासारखा हा संवाद चंपी म्हणते.)

मामा आणि आई चंपीचं माफक कौतुक करतात आणि चंपी लगेच माळरानावर जाऊन "मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे, कुठूनसे येती, मन..." छाप आनंदाचे गाणे माफक मादक हालचालींसकट पेश करते. 'माफक मादक' म्हणजे केस चेहर्‍यावर आणणे, हाताची बोटे एका रांगेत धरून कपाळावरून हनुवटीपर्यंत आणणे, एक हात केसात फिरवून मान वर करून चक्कर आल्यासारखा चेहरा करणे, मग किंचित खाली बसून दुपट्टा नसलेला ड्रेस दाखवणे, त्या प्रकारात गळ्याच्या खाली जेमतेम पाव इंच त्वचा दाखवणे (हमखास भ्रमनिरास, संदर्भासाठी पहा http://www.misalpav.com/node/15479), मग पुन्हा उठून थोडा मादकपणा....आणि नेमक्या याच वेळी आमच्या इथे वीज गेली....सगळ्या स्वप्नांचा, आशा-आकाक्षांचा चुराडा झाला, राडा झाला...डॅम इट!

--समीर

गवि's picture

18 Nov 2010 - 11:08 am | गवि

काय मस्त लिहिले आहेत..

छोटासा अत्यंत वाचनीय लेखच झालाय.

धमाल आली. भर हपीसात तोंड दाब दाबून हसतोय..

रेवती's picture

28 Nov 2010 - 8:55 pm | रेवती

पांढरी साडी असं सगळं पांढरं-पांढरं घेऊन एका शिलाई मशिनवर
हे सगळं इतकं पांढरं कसं काय बुवा राहतं?
दिवसभरात स्वयंपाकाची फोडणी उडणे, शिलाईकामाचे धागे दोरे चिकटणे किमानपक्षी धूळ लागणे अश्याने आपल्याकडे पांढरा कपडा थोडेच दिवस पांढरा राहतो. बरं हे सगळं खेडेगावात असेल तर हार्ड वॉटरने कपड्यांची वाट लागते. शहरात चाळीत असतील तर कमी पाण्यात कसे एवढे छान कपडे धुवून निघतात?

फारएन्ड's picture

22 Jul 2011 - 8:24 am | फारएन्ड

हा प्रतिसादही भन्नाट!

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2010 - 12:31 pm | स्वाती दिनेश

लैच उच्च धागा आणि उच्च उच्च प्रतिसाद, मजा आली वाचताना, ते सगळे शिनूमे आलेच डोळ्यासमोर..
स्वाती

आठवणार्‍या काही व्हिलन स्टाईल्सः

य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य् (विकट हास्य टाईप) कवट्या महांकाळ बहुधा. (चू भू दे.घे)

ओम भगभुगे भग्नी भागोदरी भग्मासे..ओम फट स्वाहा....तात्या विंचू, नीड्लेस् टू से.

मला राजा व्हायचंय्. हो मलाच व्हायचंय राजा.. राहुल सोलापूरकर..असाच कुठलातरी सिनेमा.

नावातकायआहे's picture

22 Nov 2010 - 10:56 pm | नावातकायआहे

लेख आणि प्रतिक्रिया....

__/\__

>>"हे काय आता? काय आहे यात?" (हिरवी भाजी डोकावतेय ते बहुधा आईला दिसत नसावं. गरीब खेडूत आई असल्याने मोतीबिंदू झाला असावा; किंवा भाजीखाली एक-दोन ब्लॅक लेबल, रॉयल स्टॅग, किंगफिशर स्ट्राँग असतील अशी आशा असेल म्हणून मुद्दाम हा प्रश्न तिने विचारला असावा. )

आयशप्पत खपलो......

जबरा धागा आहे.

गगनविहारी, हसून हसून पडलो.
diagram काढायची idea लै भारी !!
तुम्हाला सष्टांग नमस्कार _/\_.

सही रे सई's picture

20 Jul 2011 - 10:06 pm | सही रे सई

एक नंबर... हसून हसून लोट्पोट झाले.
(ते जमिनीवर गडाबडा लोळणारं स्माईली कसं टाकतात बरं?)

किसन शिंदे's picture

21 Jul 2011 - 12:09 pm | किसन शिंदे

:D :D :D :D :D :D :D
मराठी चित्रपटांच झक्कास समीक्षण केलयं तुम्ही..

बराच जुना धागा कोणीसा उत्खनन करुन काढलेला दिसतो..

प्रियाली's picture

20 Jul 2011 - 11:41 pm | प्रियाली

एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..

खि:खि:खि:खि:!

मस्त पण थोडा अपुरा वाटला आणखी लिहिता आले असते.

आत्मशून्य's picture

21 Jul 2011 - 10:50 am | आत्मशून्य

"साजणा" "दिवाणा" "ये ना" हे सर्वात पेट्ट शब्द..

=)=)=)=)=)=)

घट्ट चटेरी पटेरी टी-शर्ट (जत्रा .आवाज..वगैरे दिवाळी अंकातला गुंड असला टी-शर्ट घालूनच जन्माला येतो.. !!) घातलेला अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..

=)=)=)=)=)=)=)

- मोगँम्बो जिव्हारी

पाषाणभेद's picture

21 Jul 2011 - 10:54 am | पाषाणभेद

लेख वाचनात आला नव्हता पण आता उशीराही वाचून फार मनोरंजन झाले.

मराठी_माणूस's picture

21 Jul 2011 - 12:30 pm | मराठी_माणूस

आणि हे सर्व कोल्हापूरच्या एखाद्या म्युनिसिपल गार्डन सदृश बागे मधे..

कोल्हापुर द्वेष डोकावतोय :)

शिक्षण झाले सारे शिवाजी युनिव्हर्सिटीत..

द्वेष कशाला असेल? उलट शाहुपुरी,राजारामपुरी, सह्याद्री अन गोकुळ हॉटेल, भवानी मंडप, वांगी बोळ ,चोरगे मिसळ, पापाची तिकटी, रंकाळ्यातलं केंदाळ आणि असल्याच सगळ्या गोष्टीत जीव अडकलाय..

मराठी_माणूस's picture

21 Jul 2011 - 3:47 pm | मराठी_माणूस

शिक्षण झाले सारे शिवाजी युनिव्हर्सिटीत..
द्वेष कशाला असेल? उलट शाहुपुरी,राजारामपुरी, सह्याद्री अन गोकुळ हॉटेल, भवानी मंडप, वांगी बोळ ,चोरगे मिसळ, पापाची तिकटी, रंकाळ्यातलं केंदाळ आणि असल्याच सगळ्या गोष्टीत जीव अडकलाय..

हे मलाही लागु

मनराव's picture

21 Jul 2011 - 2:33 pm | मनराव

मस्त........!!!

स्मिता.'s picture

21 Jul 2011 - 6:57 pm | स्मिता.

इतका जबरी मनोरंजक लेख कसा काय नजरेतून सुटला होता?? लेख तर भारी आहेच प्रतिक्रिया त्याहून तडका!!

अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..
हे वाचून वेड्यासारखी हसले. :D
ते हसणं कमी होत नाही तोवर लक्ष्याच्या डान्सवरची धम्याची प्रतिक्रिया वाचली अन् कोसळलेच! कसं काय इतक्या समर्पक उपमा सुचतात राव?

सहज's picture

21 Jul 2011 - 7:23 pm | सहज

मस्त धागा व समीरसूर यांचा प्रतिसाद

इरसाल's picture

21 Jul 2011 - 8:39 pm | इरसाल

हृदयी वसंत फुलताना ...................बनवा बनवी...

ह्या मध्ये असणाऱ्या चार जोड्या म्हणजे अक्षरश जोड्या वाटतात. चौथी जोडी कोण यावर कोणी प्रकाश टाकेल काय ? अशोक सराफचा भाऊ.....

प्रचेतस's picture

21 Jul 2011 - 9:17 pm | प्रचेतस

तो सुशांत रे नावाचा एक मठ्ठ कलाकार ज्याने नंतर वंश आणि अजून कुठल्यातरी हिंदी चित्रपटात काम केले सिद्धार्थ हे नाव घेउन.
त्याच्याबरोबर चक्क निवेदिता जोशी होती.

मस्त कलंदर's picture

21 Jul 2011 - 11:13 pm | मस्त कलंदर

त्याचा दुसरा सिनेमा बाजीगर होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2011 - 12:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शांताराम बापूंचा नातू ना हा? कॅन्सरने गेला असंही कानावर होतं.

असो. धागा आणि समीरसूर यांचा प्रतिसाद वाचून लोटपोट. बरं झालं कोणी ते उत्खनन केलं ते!

मस्त कलंदर's picture

22 Jul 2011 - 6:21 pm | मस्त कलंदर

तोच तो. दोन-चार वर्षं होऊन गेली असतील त्याला जाऊन.

इंटरनेटस्नेही's picture

22 Jul 2011 - 12:47 am | इंटरनेटस्नेही

जबरा धागा आहे.
धागा आणि समीरसूर यांचा प्रतिसाद वाचून लोटपोट.

गगनविहारी, हसून हसून पडलो.
diagram काढायची idea लै भारी !!
तुम्हाला सष्टांग नमस्कार _/\_.

अर्धवट's picture

22 Jul 2011 - 2:04 pm | अर्धवट

झकास

सोत्रि's picture

24 Jul 2011 - 9:19 pm | सोत्रि

गवि आणि सर्व प्रतिसाद देणारे,

धमाल आली. अजूनही मोठयाने आणि पोट धरून हसतो आहे.

अलका कुबल.... ह्म्म, अनुल्लेखाने मारतो आहे ;)

- (मराठी चित्रपटप्रेमी) सोकाजी

जबरी म्हणुन.......बहुसन्ख्यान्नी पाहीला नसेल.

शाम भागवत's picture

28 Jun 2019 - 11:19 pm | शाम भागवत

मजा आली.

विजुभाऊ's picture

29 Jun 2019 - 11:20 pm | विजुभाऊ

बरेच दिवसानी पुन्हा हसलो.
मस्त लिहीला होतात लेख गवी.
त्यावेळी लक्ष्या अशोक यांच्याशिवाय एक केंकरे नामक इसम हीरॉ म्हणून कधीकधी वावरायचा. कधी कधी विजय कदम ही असायचा.
कुलदीप पवार व्हीलन आणि हीरो असे आलटून पालटून करायचा.
कोणताही सिनेमा अर्धा हुकला तरी फारसा फरक नाही
सुबल सरकार या माणसाला डान्स डायरेक्टर कोणी बनवला कोण जाणे. त्याने मायकेलजॅक्सनला ही लक्ष्या प्रमाणे नाचायला लावले असते.
जितेंद्रच्या आउट्डेटेड मास पीटी कम कवायती स्टेप्स मधून हा कधी बाहेर च आला नाही

कॉमी's picture

10 Feb 2024 - 8:04 pm | कॉमी

ऐसी अक्षरेवर लिंक सापडली. हसून हसून पुरेवाट झाली.

Bhakti's picture

11 Feb 2024 - 8:00 am | Bhakti

खो खो ;);)
खरंच धमाल असायची सगळी...
चिकी चिकी बूबूम बूम....हं...हं..मर्कट उड्या ....हायला म्हणजे खरंच असं आयकोनिक गाणं मराठीने पहिल्यांदा बनवलं असेल ;)