जय नांवाच्या इतिहासावर
रणांचा पण इतिहास आहे
नाना-नानी बागेमध्ये
चघळण्याचा विषय आहे
वर्तमानाच्या मोजफितीवर
इतिहासाला मापत आहेत
डोळ्यांवरती पट्टी बांधून
तराजुवर डोलत आहेत
महाकाय या बोधकथेवर
लघुमतींचे प्रवचन आहे
युगंधराच्या न्यायबुध्दीला
केविलवाणे दूषण आहे
प्रतिक्रिया
14 Nov 2010 - 12:23 pm | शिल्पा ब
हे छानंच हो !!
14 Nov 2010 - 12:25 pm | रन्गराव
करण अर्जून श्रेष्ठत्वाच्या युद्धात अजून एक निशाणेबाज! चालू दे :)