..मी गरुडभरारी घेता...
मी गरूडभरारी घेता..
तु हो आकाश निळे..
मी सुर्य कदाचित होता..
तु हो किरण कोवळे..
मी खट्याळा वारा होता..
तु हो सुगंध धुंद करणारा..
मी भरलेले नभ मग होता..
तु हो पाऊस कोसळणारा..
मी मिटली पापणी होता..
तु हो सुंदर स्वप्ने सारी..
मी प्रवास सुंदर मोठा
तु हो वाट गुणगुणणारी..
मी कधी कंटाळवाणा होता..
तु हो आठवण हुरहुरणारी..
मी कोरा कागद उलगडलेला..
तु होऊनि ये कविता स्फुरणारी..
मी राकट मनगट होता..
तु हो मूठ ताकदवानी..
मी उचकी शेवटची होता..
तु हो पवित्र गंगेचे पाणी..
-------योगेश.
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 12:42 am | पक्या
छान, आवडली कविता.
13 Nov 2010 - 3:16 am | प्राजु
आवडली कविता..
13 Nov 2010 - 3:52 am | बेसनलाडू
कविता आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
शेवटची 'उचकी' नसते, 'आचका' असतो. 'उचकी'ला गंगेचे पाणी कशाला? नळाचे चालते ;) (ह. घ्या.)
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू
13 Nov 2010 - 11:57 am | sneharani
छान कविता!
13 Nov 2010 - 4:02 pm | रन्गराव
जवाब नही योगेश साहेब!
16 Nov 2010 - 2:00 pm | गणेशा
योग्या मस्तच ...
लिहित रहा रे ..कुठे गायब असतोस तु काय माहित
17 Nov 2010 - 8:26 pm | सुहास..
मी मिटली पापणी होता..
तु हो सुंदर स्वप्ने सारी..
मी प्रवास सुंदर मोठा
तु हो वाट गुणगुणणारी.. >>>>
आवडेश !!
17 Nov 2010 - 8:52 pm | मनीषा
मी कोरा कागद उलगडलेला..
तु होऊनि ये कविता स्फुरणारी.
छान आहे कविता .
18 Nov 2010 - 8:28 am | यशोधरा
सुरेख.