..मी गरुडभरारी घेता...
..मी गरुडभरारी घेता...
मी गरूडभरारी घेता..
तु हो आकाश निळे..
मी सुर्य कदाचित होता..
तु हो किरण कोवळे..
मी खट्याळा वारा होता..
तु हो सुगंध धुंद करणारा..
मी भरलेले नभ मग होता..
तु हो पाऊस कोसळणारा..
मी मिटली पापणी होता..
तु हो सुंदर स्वप्ने सारी..
मी प्रवास सुंदर मोठा
तु हो वाट गुणगुणणारी..
मी कधी कंटाळवाणा होता..
तु हो आठवण हुरहुरणारी..
मी कोरा कागद उलगडलेला..
तु होऊनि ये कविता स्फुरणारी..
मी राकट मनगट होता..
तु हो मूठ ताकदवानी..
मी उचकी शेवटची होता..
तु हो पवित्र गंगेचे पाणी..
-------योगेश.
छान, आवडली कविता.
आवडली कविता..
मस्त!!
मस्त
क्या बात है
योग्या मस्तच ... लिहित रहा रे
मी मिटली पापणी होता.. तु हो
मी कोरा कागद उलगडलेला.. तु
मी कधी कंटाळवाणा होता.. तु हो