ज्यांनी हे आधी वाचलंय त्यांना आधीच सॉरी..!!
.............
"साहेब कुठली ओतू?"
पटवर्धनच्या मोठ्ठ्या आवाजाने सगळ्या सोनेरी चंदेरी बाटल्या किणकिण हलल्या..
Royal Challenge नाव छान वाटतं..पण त्याला आर सी म्हणायचं..
..
..
"नको हो आज पटवर्धन..मी काय पट्टीचा नव्हे हो..कशाला .. असू दे.. मी पेप्सी घेतो.."
"बसा हो.. घ्या..ए एक आर सी इकडे आणून ठेव रे.."
..
..
चला..पटवर्धन म्हणतोय एव्हढा मनापासून तर बसूया आज..
..
..
"पण स्मॉल बनवा हो.. मला ड्राइव्ह करायचंय.."
ग्लास भरला.. म्हणजे भरूनच आला.. आता त्यात किती ड्रिंक आणि किती सोडा कसं कळणार..??
घोट कडवट लागत होता..घसा आणि पोट गार गार जळालं.. पुढचा पेप्सी मधे घालूनच घ्यावा..
..
"अजून एक ओततोय बरं का साहेब.."
"आता बास् पटवर्धन..!!"
सालं आज काही खरं नाही.. हा आज ऐकत नाही.. एव्हढा एक गटागट पिऊन बास करायचं..
गटक गटक गटक..
"ए जगन्या..साहेबांचा ग्लास संपला की रिपीट करत जा.. विचारायचं नाही.."
अत्यंत खालच्या आवाजात पटवर्धन वेटरला बोलला..
मला काही ते नीट ऐकू आलं नाही.. जाउदे च्या मारी.. त्याची पार्टी आहे.. चालायचंच..
जगन्या.. म्हणजे जगन असणार.. अजूनही इतकी Old fashioned नावं ठेवतात? लहान दिसतो तसा..बालमजूर वाटतोय.. जाऊ दे..पोटाला तर मिळतंय ना त्याच्या..
तिसरा की दुसरा ग्लास आहे हा..? ग्लास म्हणायचं की पेग.. पेग बरं वाटतं.. देशी थोडीच आहे ही..
आता हा पटवर्धन "मराठी विरुद्ध अमराठी", किंवा एकदम "महाभारतातली द्रौपदी" असला काहीतरी विषय काढणार..
बरं असतं ड्रिंक्स सोबत..दोन तीन झाली की मग कुठलाही विषय मस्तच..
मस्तच.. मस्तच..मस्तच..
हे सालं कुठलं मधलंच गाणं लावलंय ?? ना धड दु:खी ना धड आनंदी..
एक तर गझल लावा किंवा मस्त Uptown Girl लावा.. इथे प्यायला बसलोय.. केस कापायला नव्हे..
हा चौथा की तिसरा ग्लास .. साला जगन सगळेच लार्ज भरत चाललाय वाटतं..
तो तरी काय करणार बिचारा.. पटवर्धनने ऑर्डर दिलीय ना..जाऊ दे भेंडी..
नुसते दाणे..?? चिजलींग तरी ठेवायची..
हाश्श्श....
"साहेब हळू सावकाश...!!" पटवर्धनचा आवाज कानात गूं करून घुसला..
अरे तिच्या मारी.. मी ग्लास जर्रा जोरात खाली ठेवला म्हणून लग्गेच..
"I am perfectly Ok पटवर्धन!!.. एक सुरमई फ्राय सांगा लवकर"..
सुरमई.. सुरमई..
सुरमई शाम इस तरह आये..
भूक लागलीय तिच्या आयला...
सहावा की पाचवा ? की साडेचारावा ??
ग्लास आत्ता तर संपवला होता.. आपोआपच भरतोय.. नीट लक्ष ठेवलं पाहिजे..
लोक तरी किती आलेत पार्टीला..फ़ुकटचे खायला लगेच येतात लतकोडगे..
खाबू साले..खाबू खाबू खाबू ...
आत्ता चार पावलं फिरून आलं पाहिजे.. तरच मज्जा..
समोर जोश्या बसलाय.. त्याचा शर्ट वर गेलाय.. बाजरीच्या कणकेसारखं त्याचं पोट दिसतंय.. तरंगत जाऊन मस्त कणीक तिंबून काढावी का ??
का का का..
का का का..
कू कू कू..
अरे यार.. आपल्याच हाताच्या तळव्याकडे बघायला किती मजा येतेय.. वेडावाकडा हलतोय हात.. द्यावी का कोणाला ठेवून राप्पकन.. ?? धम्माल येईल.. लोक म्हणतील साहेबाला चढली.. त्याने तमाशा केला..
पण मला अजिबात चढत नाही हे त्यांना कोण पटवणार.. ??
शांत बसणं सेफ.. उगीच गैरसमज नको कोणाचा..
गैरसमज.. गैरसमज..बम बम..
आठवा ग्लास ?? काहीतरीच.. आपली एव्हढी कपॅसिटी नाहीच आहे..पाचवाच असेल फारतर..
पटवर्धन घेईल काळजी..
ही चायनीज चिंकी कधी आली.. चिकणी बनलीय एकदम..बेब..
हिचं सालं नावच विसरलो..
चिंकी.. चिंकी.. चिकणी.. चिकणी..
चिकन दिसतंय मख्खनवालं.. बुफे टेबलवर..
चिकन जाईल का आपल्याला आता.... पण पोट स्टफ झालंय..
अरे इतके ग्लास लिक्विड.. ****.. पोटाची काशी केलीत..
...
च्यायला.. आले आधार देऊन उठवायला वगैरे.. ज़रा दोन चार पेग घेतले की यांना वाटतं की टल्ली झाला..
मी काय त्यातला दिसतो काय..
मला उठवायला पटवर्धन कशाला.. चिंकीला तरी पाठवायचंत..
मी शांत आहे.. एकदम मस्त शांत..
किंचितही मरगळ नाही..एकदम फ्रेश..
मी उठून ड्राइव्ह करत मसणातही जाऊ शकतो..
मरगळ मरगळ..बरगळ बरगळ..
मळमळ मळमळ ..
काहीतरी यमक जुळतंय ..
मी उठून लिफ्ट पर्यंत सरळ चालत आलो तरी कुणाला पत्ताच नाही..
मस्त उत्तम भिकार फकीरचंद मूड..
जाळून टाकूया का मस्तपैकी जग..की मस्त नाच करुया.. इपडी पोडे पोडे पोडे पोडे..
टॉयलेट कुठे आहे इथे भेंडी..!! जागेवर टॉयलेट ठेवत नाहीत.. कुत्रे साले..
...
मागे पटवर्धन अत्यंत हलक्या आवाजात कोणालातरी सांगतोय..
"साहेबांचं हे मस्त आहे.. कितीही प्यायले तरी एकदम सोबर माणूस..!!"
प्रतिक्रिया
10 Nov 2010 - 10:16 am | स्वानन्द
लय भारी.... यावरून मागे ढकल्पत्रातून आलेला एक असंच विनोदी कथन आठवतंय.
म्हणजे सुरुवातीला तो आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचं वर्णन करतोय. जसं...भिंतीवर शिवाजी महाराजांचा फोटो आहे, बायको स्वयंपाक करत आहे,.... आणि मग हळूहळू जसजशी चढायला लागते... कुत्र्याचा पाय मांजराला... अणि मांजराचा कुत्र्याला!
10 Nov 2010 - 12:43 pm | चिगो
मस्तच गगनविहारी... तशीही एकदा चढली की सगळेच "गगन-विहारी" होतात !! ;-)
कृ. ह. घ्या.
छानच !! बाकी स्वानन्द म्हणताहेत ती "तळीरामची कविता"पण जबरा आहे..
10 Nov 2010 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही घ्या ती 'रिस्की' कविता:
http://www.misalpav.com/node/536
10 Nov 2010 - 4:19 pm | स्वानन्द
बर्रोब्बर.. हीच ती कविता.
धन्यवाद!
बाकी एका गोष्टीचं वाईट वाटलं... ही कविता ढकलपत्रांतून फिरते आहे...पण त्या लेखक / कवी चं नाव काही त्याबरोबर फिरत नाही. :(
10 Nov 2010 - 5:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> ही कविता ढकलपत्रांतून फिरते आहे...पण त्या लेखक / कवी चं नाव काही त्याबरोबर फिरत नाही. <<
या लेखक/कवीचं नाव ढकलपत्रांबरोबर आलं असतं तर आनंद झाला असता.
10 Nov 2010 - 8:15 pm | पैसा
इथे आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=41788110
ही श्री. वि रा भाटकर यांची १९६१ ची कविता आहे. अपूर्व आणि दीपावली मधे प्रसिद्ध झालेली आहे. भाटकरांबद्दल काही माहिती मिळते का याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण आणखी काहीच सापडत नाही.
11 Nov 2010 - 3:17 am | सुप्परमॅन
हीच कविता आठवली.
7 Dec 2010 - 9:24 am | डावखुरा
मस्त साला नै नै म्हणता म्हण्ता फुल्ल चढ्ला की अगदी लेखासारखाच..
पुन्हा एक जबरा लिखाण गगनविहारी साहेब...
7 Dec 2010 - 9:49 am | गवि
धन्यवाद..
हिक्....!!! :)
10 Nov 2010 - 1:28 pm | आळश्यांचा राजा
लेख आणि कविता भन्नाट! (आम्ही नशेत बरळलेल्या फिलॉसॉफ्या आठवल्या!)
10 Nov 2010 - 3:17 pm | धमाल मुलगा
दुसर्या दिवशी आठवतं? :D
बाकी पटवर्धन, साहेबांना असं टाईट्ट्ट करुन सोडणं बरं नाही हां...
10 Nov 2010 - 5:12 pm | आळश्यांचा राजा
व्यवस्थित आठवतं! दुसर्या दिवशी आठवणार आहे हे पण नशा होत असताना समजतं!
7 Dec 2010 - 10:15 am | टारझन
ह्याला म्हणतात पिणे. नाही तर काही लोकं अशी पितात की त्यांचं त्यांना भान नसतं आपण काय बोलतोय काय करतोय कसं वागतोय ( किंवा कुठे लोळतोय ) आणि उलट्या करणारांची किळस करावी तेवढी थोडी :)
गगनविरही , शैली आवाल्डी बरका आपल्याला :)
- कोळश्यांचा राजा
7 Dec 2010 - 10:28 am | गवि
:) :)
पण बाहेर कायबी दाखवलं नाही तरी आत तेच असतं हां ... उगीच खोटे का बोला ?
धन्यवाद टारझन..
13 Jun 2016 - 4:16 pm | पुंबा
हेहेहे.. हो.. आपण काही पण बोलतोय, लोक दुसर्या दिवशी आठ्वण काढून हसणार आहेत हे कळत असतं तेव्हा..
10 Nov 2010 - 1:29 pm | मराठमोळा
चांगला झालाय लेख, आवडला. :)
10 Nov 2010 - 3:51 pm | यकु
:bigsmile:
.
.
.
.
.:beer:
10 Nov 2010 - 4:26 pm | नगरीनिरंजन
इह्हीहॅ..:-)
10 Nov 2010 - 5:31 pm | स्पंदना
चांगला चढलाय लेख !
10 Nov 2010 - 7:00 pm | प्रियाली
लेखाचं शीर्षक गगनविहारी असेच ठेवले असते तरी चालले असते. ;)
बाकी लेख मस्तच.
11 Nov 2010 - 12:19 am | माजगावकर
मस्तच लेख.... टांगा पलटी, घोडे फरार...
11 Nov 2010 - 2:51 am | मराठे
मस्त.
ह्यावरून एक प्रसंग आठवला. मी व माझा कलिग सचिन एका बारमधे गेलो होतो. माझा बारमधे जाण्याचा पहिलाच प्रसंग होता.पण तो पट्टीचा पिणारा होता... म्हणजे असं मला त्यानेच सांगितलं होतं.
तर.. एक दोन पेग गेल्यानंतर...
सचिनः (तिथल्या (काळ्या) वेटरकडे बघत जोर जोरात) "कालिया कालिया कालिया"
(जसा तो वेटर आमच्या दिशेने येउ लागला त्याबरोबर)
सचिनः (प्लेटमधल्या शेंगदाण्याकडे बघून हळू आवाजात) "खालिया खालिया मैने खालिया"
7 Dec 2010 - 7:45 am | निनाद मुक्काम प...
लेख मस्तच झालाय
कॉकटेल बार टेंडर म्हणून करीयरची सुरवात केली दहा वर्षापूर्वी मुंबापुरीतील एका पंचतारांकित हॉटेलातून
अनेक उच्चभ्रू पान ३ वरील ख्यातनाम नाव काही पेल्यात गगनी विहार करायचे .आमची करमणूक व चक्षु मोदन ह्या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी हि मंडळी फार शर्थीने प्रयत्न करायची .
त्यांच्याशी संवाद साधने म्हणजे भेजा फ्राय सारखी निर्भेळ करमणूक असायची .ह्या लेखामुळे वो बिते दिन याद आ गये .
7 Dec 2010 - 9:51 am | गवि
वा..
"बार टेंडरच्या नजरेतून मदिरासाधक" असा एक वेगळा दुर्मिळ अँगल दाखवलात.
क्या बात..
7 Dec 2010 - 8:30 am | मदनबाण
छान लेख... ;)
7 Dec 2010 - 10:00 am | अन्जन
मला ढकलपत्रांचा रेफ्रन्स हवा आहे. कोण सान्गेल काययययय?
7 Dec 2010 - 10:10 am | शिल्पा ब
मस्त लेख..आवडेश.
7 Dec 2010 - 12:53 pm | इंटरनेटस्नेही
मस्त लेख.. आवडला.
स्वगत: रॉयल चॅलेंज फार कडवट लागते बुवा.. आपला चॉईस.. ब्लेन्डर्स प्राईड / सिगनेचर / रॉयल स्टॅग !
7 Dec 2010 - 1:58 pm | छोटा डॉन
>>जाळून टाकूया का मस्तपैकी जग..की मस्त नाच करुया.. इपडी पोडे पोडे पोडे पोडे..
>>टॉयलेट कुठे आहे इथे भेंडी..!! जागेवर टॉयलेट ठेवत नाहीत.. कुत्रे साले..
=)) =)) =)) =))
एकदम कडक साहेब, अगदी अस्स्सल. ;)
- छोटा डॉन
8 Dec 2010 - 12:38 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
7 Dec 2010 - 2:11 pm | गवि
लिफ्टलाच टॉयलेट समजण्याविषयी कोणाला समजलेलं दिसत नाय ते बरंय..
7 Dec 2010 - 2:21 pm | छोटा डॉन
>>लिफ्टलाच टॉयलेट समजण्याविषयी कोणाला समजलेलं दिसत नाय ते बरंय..
हा हा हा, तेच म्हणतो ना मी. ;)
कायपण म्हणा हां, अशावेळी सगळं जर जागच्या जागी ( तेच ते टॉयलेट वगैरे ) नसेल तर एकदम मुर्तीमंत सटकते हां.
अगदी सात्विक संतापाचा कडेलोट का काय असते तसेच होते बघा. ;)
- छोटा डॉन
7 Dec 2010 - 2:31 pm | गवि
बी.पी.ओ. नामक कथेत बिचार्या कथानायकाला अशा अवस्थेत शेतातील घरात चाललेल्या पार्टीत शेतघराच्या मागे दूर असलेले मूत्रगृह शोधत भेलकांडत जावे लागते आणि तिथे बसलेला एक सांड कुत्रा त्याच्यावर एकदाच भफ्फ करतो तेव्हा सर्व निसर्गाचा फोर्स परतवून त्याला तिथून काढता पाय घ्यावा लागतो.
बिचारा.. आता त्याची तशी अवस्था केल्याबद्दल वाईट वाटतंय.. ;)
4 Apr 2012 - 2:17 pm | मन१
जाम आवडलं
14 Jun 2016 - 8:26 am | नाईकांचा बहिर्जी
अरारारा लैच खास जमलेले आहेत हे पेगायण!!
14 Jun 2016 - 9:02 am | साहेब..
मस्त आहे.