संतोष शिंदे ह्या कलाकराच्या हास्य सम्राट ह्या कार्यक्रमातील ह्या दोन चित्रफिती
१. पुरूषप्रधान संस्कृती - http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M
२. कोल्हापुरी भाषेची वैशिष्ट्य- http://www.youtube.com/watch?v=nPYkO4Tj9M0
संतोष शिंदे ह्या कलाकराच्या हास्य सम्राट ह्या कार्यक्रमातील ह्या दोन चित्रफिती
१. पुरूषप्रधान संस्कृती - http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M
२. कोल्हापुरी भाषेची वैशिष्ट्य- http://www.youtube.com/watch?v=nPYkO4Tj9M0
प्रतिक्रिया
9 Nov 2010 - 8:34 pm | यकु
जबरदस्त हो रंगराव.. धन्यवाद.. :)
9 Nov 2010 - 9:18 pm | विनायक पाचलग
संत्या खुप भारी करतो ..पण त्याच्यातली विविधता संपु नये हीच इच्छा !!
10 Nov 2010 - 5:23 pm | स्पंदना
विनायक आपण कोल्हापुरी. शुद ल्हि ना.
संत्या लय भारी करतय पण बघ सांगतो त्यान वैविध्य टिकिवल पायजेल.
रंगराव मी तुम्ही ही माहिती दिल्या पासुन सारखी पहाते अन मग माग येउन इथे प्रतिसाद टाकायच विसरते.
धन्स भाउ!
9 Nov 2010 - 10:46 pm | शिल्पा ब
दुसरा विडो जरा बरा आहे...पहिल्यात तो काय हातवारे करत बोलायला लागतो ..लगेच त्याच्या डोक्यात दगड घालावासा वाटतो...
10 Nov 2010 - 6:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हा प्रतिसाद मूळ क्लीप पेक्षा विनोदी आहे.
लं भारी !!! लंsssss भारी !!!!!!!!!!!! (च्यामारी, हे बोलताना मजा येते. लिहिताना येत नाही )
उच्चारासाठी खालील क्लीप पहा. ( @२:३५)
10 Nov 2010 - 10:03 pm | शिल्पा ब
मूळ प्रतिसादापेक्षा हा प्रतिसाद विनोदी आहे...
ल ssssss य भारी!!!
(च्यामारी ,आम्हाला उगाच इकडची तिकडची क्लिप द्यायची गरज नाही...लिहिताना पण तशीच मजा येते...)
10 Nov 2010 - 10:13 pm | रन्गराव
कानात हत्ती मुतला व्हता काय कीलीप बघताना? ( चिडायचा नाय, कोल्हापूरात प्रेमान असच ईचारत्यात ;))
ते 'ल' नंतर टींब नाय. 'ल य' अस असतय. त्यातल 'य' म्हणायला सूरू केला की श्वास पूर्न थांबू पत्तूर ओढायचा. प्रक्टीस करा जरा दमानं. मग बगा कशी मज्जा येत्या ते!
10 Nov 2010 - 10:46 pm | शिल्पा ब
हॅ हॅ हॅ
10 Nov 2010 - 11:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तरीच म्हटले असे का झाले. एक हत्ती दिसला होता खरा घरात मगाशी. गुपचूप कार्यभाग साधून गेला असेल तर माहित नाही. बाकी रंगराव, टिंब ल नंतर नाही, वर दिले आहे. तोच हत्ती तुमच्या डोळ्यात मुतून गेला वाटते. (मुंबईचा असलो तरी हे कोल्हापुरी स्टाईल मध्ये लिहिले आहे. चिडायचा नाय)
आणि सगळे उच्चार नाही लिहिता येत लिपीत. लय असे लिहून तो effect कसा आला असता? म्हणून तो लं लिहिला. (उच्चारी, केलं मधला लं)
10 Nov 2010 - 11:07 pm | रन्गराव
आता काय करायच गड्या? उच्चारताना माग -पूढ असतय कोल्हापूरात. मुबईत खाली वर असला तर माहीती नाय बा. आणि "हत्ती कानात मुतला" हे प्रचलित आहे. डोळ्याबद्दल पहिल्यांदा एकल. आन राग एवून काय करनार. आमिबी ईथच आन तुमीबी इथच. बाकी मज्जा चालु द्या :)
10 Nov 2010 - 9:57 pm | रन्गराव
त्यात संत्यानं कवी अशोक नायगावकराची नक्कल केलिया, ते कार्यक्रमाचे जज हायती. कुटन आलायसा? ;)
10 Nov 2010 - 10:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्या कुठून आल्या हे महत्त्वाचे नाही. त्यांच्याकडे दगड आहे आणि त्यांना तो कुणाच्यातरी डोक्यात घालायचा आहे हे महत्त्वाचे आहे.
(हलके घ्या असे म्हणालो असतो, पण शिल्पातैंच्या हातात भला मोठा दगड आहे. हलके कसे घेणार त्या?? )
10 Nov 2010 - 11:02 pm | रन्गराव
प्रगल्भ कोल्हापूरी भाषेचा पार विटाळ केलासा! अर्थाचा अनर्थ केल्यामूळे धोंडा तुमच्या डोस्क्याट पडन्याची शक्यता आहे. शिरस्त्राण घाला आता देवाचं नाव घेवून ;)
11 Nov 2010 - 9:40 am | शिल्पा ब
>-) :evil:
तोच विचार चालु ए...
11 Nov 2010 - 10:27 am | रन्गराव
बाळ नवशिखं आहे. चुका करून करून सुधारेल कधी तरी !