केसुंनी त्यांचे विडंबन टाकताच आमच्याच्याने राहवलेच नाही! त्यांचे (वाटले बरे किती) आणि चित्तची मूळ गजल दोन्हीही आमचे प्रेरणास्थान.
(गजलेत अत्यंत योग्य दुरुस्त्या सुचविल्याबद्दल केसुंचे आभार. संपादित आवृत्ती.)
भेटती अजून गरगरीत भोवरे किती!
सोबतीस आणतात श्वान चावरे किती!
मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो
त्या तशा तनूतही मेद आत रे किती?
प्रश्न हा विचारतात 'ढीग' ते 'ढिगास'ही-
पुढचेच 'मॅक' ते असे दूर रे किती?
बारक्या जनास ही बघून हासती जरा
आलिशान चारचाकि चेपली बरे किती?
ज्या क्षणास तो विशाल देह तिथुनि चालला
जाणवे कसा उपास? पोकळी बरे किती?
"तूच सांग आजकाल चालतोस तू कसा?"
होत धरणिकंप अन् मोडती घरे किती!
ब्रेड दावितात 'ते' तुझ्यासमोर कोरडा
तुला फिकीर बर्गरात असे चीझ रे किती?
चालता असेच ते अजून चार दीसही
घडायचे तयां अजून उपासही खरे किती?
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या?
शोधशील तू तरी धुळीत अन्न रे किती?
चतुरंग
प्रतिक्रिया
21 Apr 2008 - 7:43 am | विसोबा खेचर
मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो
त्या तशा तनूवरी आत मेद तो किती?
मस्त! :)
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या?
शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती?
क्या बात है, ह्या ओळी भिडल्या!
तात्या.
21 Apr 2008 - 10:33 am | धमाल मुलगा
:-)
अरे काय चाललंय काय हल्ली?
चतुरंगकाका आमच्या केसुशेठला एकदम खत्तरनाक स्पर्धात्मक वातावरणात आणून टाकतात, एकदम फर्मास बतावणी काय लिहितात....मज्जाच मज्जा....तिकडं डांबिसकाका एकदम वैचारिक, संवेदनशील, भावनाप्रधान (आणि) प्रवासवर्णनं लिहायला लागले आहेत...
मीपण कविता करु का? :-)))))))))))))
हा हा हा !!!
आणि
शेवट तर एकदम अप्रतिम.
-(अचंबीत) ध मा ल.
21 Apr 2008 - 11:38 am | मदनबाण
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या?
शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती?
मस्तच राव.....
(चित्तची मूळ गजल सुद्धा सुंदर आहे हे सांगणे न लागे.)
( चतुरंगी विडंबनाचा चाह्ता )
मदनबाण
21 Apr 2008 - 9:12 pm | वरदा
भेटती अजून गरगरीत भोवरे किती!
सोबतीस आणतात श्वान चावरे किती!
ही हि ही....अगदी खरय...