(पुन्हा टवाळी)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
4 Nov 2010 - 3:53 am

प्रेरणा - प्राजु यांची शुभेच्छापर कविता 'पुन्हा दिवाळी'.

वळवळती त्या जिभा, गुलाबी कट्ट्यावरती संध्याकाळी
चुगल्या, लफडी, गॉसिपमधुनी मुक्त चालु दे पुन्हा टवाळी

कुणी कुणाच्या खोलीमधुनी.. ओल्या नवथर सोनसकाळी
सलज्ज लपुनी आले निघुनी, विचारते बघ पुन्हा टवाळी

सजून जाती तरुणी काही, रंग रंगुनी कॉस्मेटिक्सनी
शिट्या मारुनी, गाणी म्हणुनी, हसत चालु दे पुन्हा टवाळी

मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी
आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी

हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा! भर माझी झोळी
चिकट गोड भावुकता जावो, मस्त चालु दे पुन्हा टवाळी!

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

>> चिकट गोड भावुकता जावो, मस्त चालु दे पुन्हा टवाळी!
हा हा मस्त!!! दिवाळीची रंगत आणलीत.

बेसनलाडू's picture

4 Nov 2010 - 4:58 am | बेसनलाडू

टवाळी फारच मस्त!
(टवाळखोर)बेसनलाडू

अनामिक's picture

4 Nov 2010 - 5:28 am | अनामिक

शब्दबद्ध केल्याबद्दल धन्यवाद. मिपावरील सर्वांनाच ही टवाळी आवडो.

टवाळीला शिघ्रपणे प्रसवायच्या प्रयत्न असूनही विडंबण परिपक्व झाले आहे असं वाटलं. कुठेही शब्दांची खेचाखेच झालेली नाही. या प्रकारच्या विडंबणात भावनेपेक्षा शब्द महत्त्वाचे, ते पोचले.

मूकवाचक's picture

4 Nov 2010 - 4:15 pm | मूकवाचक

+१

अडगळ's picture

4 Nov 2010 - 5:34 am | अडगळ

आवडले .अतिशय.

आमचं हे पावशेर बी गोड मानून घ्या.

टवाळदेशी टवाळ वसती , घुमो टवाळी तिन्ही त्रिकाळी,
दंतमौक्तिके काळी पिवळी , तयास लाभो नवी झळाळी,
ठसके लागो ,पोट दुखू दे , जबडे हाडे सुखद खळाळी,
सट्वाईने हास्य कोरले , जन्मापूर्वी इथे , कपाळी .

सट्वाईने हास्य कोरले , जन्मापूर्वी इथे , कपाळी .
मस्त !

राजेश घासकडवी's picture

6 Nov 2010 - 10:51 am | राजेश घासकडवी

जबडे हाडे सुखद खळाळी,
सारख्या ओळींतून, ळकाराच्या खळखळीतून नादमाधुर्य छान साधलं आहे. शेवटच्या ओळीच्या रचनेतून मर्ढेकरांच्या
'या कढईच्या कुट्ट कपाळी
ठोकुन पक्के, काळे बळकट'
या ओळींची काहीशी आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2010 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी
आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी

हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा! भर माझी झोळी
चिकट गोड भावुकता जावो, मस्त चालु दे पुन्हा टवाळी!

मस्त.......!

-दिलीप बिरुटे

शुचि's picture

4 Nov 2010 - 9:25 am | शुचि

गुड!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2010 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जी बॅक इन फॉर्म! मस्त आहे विडंबन!!

पिवळा डांबिस's picture

4 Nov 2010 - 10:34 am | पिवळा डांबिस

सजून जाती तरुणी काही, रंग रंगुनी कॉस्मेटिक्सनी
शिट्या मारुनी, गाणी म्हणुनी, हसत चालु दे पुन्हा टवाळी

वा, वा, सुंदर!
इथे तुम्हीही अगदी मूळबरहुकूम गल्ली चुकलां आहांत!
बेष्ट!!!!!
:)

यशोधरा's picture

4 Nov 2010 - 11:29 am | यशोधरा

मस्त आहे विडंबन!
>>हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा! भर माझी झोळी >> परमेश, म्हंजे देवबाप्पा का? आकाशातला? बरं बरं! :)

मेघवेडा's picture

4 Nov 2010 - 3:51 pm | मेघवेडा

हा हा हा! मस्त!

धमाल मुलगा's picture

4 Nov 2010 - 3:57 pm | धमाल मुलगा

नुसतंच विडंबन..
टवाळक्या करायला तर कधी येत नाहीत..आणि नुसतं विडंबन टाकतात. काय उपेग गुर्जी? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2010 - 4:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय धमालराव, तुम्हाला पथ्य माहित नाहीत काय?

धमाल मुलगा's picture

4 Nov 2010 - 4:16 pm | धमाल मुलगा

ती असतात आजारपणासाठी.
आणि टवाळीला खव-व्यनि आहेतच ना?

सहज's picture

4 Nov 2010 - 4:17 pm | सहज

बरेच दिवसात स्वयंपाक केला नाही सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न!

धमाल मुलगा's picture

4 Nov 2010 - 4:21 pm | धमाल मुलगा

आत्ता अंमळ ट्युब पेटली. (काय करणार, सरकारी ट्युबलाईट है.)
अहो, पण पथ्य केव्हाच उलटली की. आता काय? आणि पथ्यं पाळताना पथ्यही पाळावं लागेल ना?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2010 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पथ्य उलटली ... छ्या, अगदीच ब्वॉ तुम्ही हे!!

चिंतामणी's picture

5 Nov 2010 - 7:30 pm | चिंतामणी

काय उपेग गुर्जी?

उपेग म्हणणे स्मॉल की पतीयाळा?????

परिकथेतील राजकुमार's picture

4 Nov 2010 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार

घासुगुर्जी हे पुणेद्वेष्टे असले तरी आमचे आप्तस्वकीय असल्याने हा धागा उघडला.

छान केले आहे विडंबन. पण एका सदस्याने संपादकाच्या कवितेचे असे विडंबन करणे योग्य आहे का असा प्रश्न पडला.

परालिया चाचा

सहज's picture

4 Nov 2010 - 4:14 pm | सहज

हेच म्हणतो.

>पण एका सदस्याने संपादकाच्या कवितेचे असे विडंबन

अहो पुदुकाका* बहुतेक 'हिरवे' ह्या कॉमन फॅक्टर मुळे तसे चालून जात असावे. ;-)

* पुदु - पुण्याचे दुकानदारकाका

राजेश घासकडवी's picture

6 Nov 2010 - 11:28 am | राजेश घासकडवी

आप्तस्वकीय शब्द काळजाला भिडला.

पण एका सदस्याने संपादकाच्या कवितेचे असे विडंबन करणे योग्य आहे का असा प्रश्न पडला.

विडंबन लिहून झाल्यानंतर, एक सामान्य सदस्य म्हणून ते वाचल्यानंतर तोच प्रश्न आम्हासही पडला आहे. कोणास उत्तर सापडल्यास कळवावे.

प्रभो's picture

4 Nov 2010 - 6:43 pm | प्रभो

भारी हो गुर्जी....

पिंगू's picture

4 Nov 2010 - 10:38 pm | पिंगू

मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी
आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी

गुर्जींच विडंबन मला मिसळपाव खायला घेउन गेलं...

अविनाशकुलकर्णी's picture

5 Nov 2010 - 1:22 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त

मवाळासही जहाल बनवी , अशी जमू दे नित्य टवाळी
कडेकपारी मावळप्रांती , इथे तिथे ही रोज नवाळी

:)