कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्री. पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मिपा'करांना सुचवू इच्छितो..
[मूळ लेख http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse-... या दुव्यावर वाचता येईल. तसेच तिथे ’ला प्रेस’च्या वाचकांचे प्रतिसादही वाचता येतील]
या उपहासपूर्ण शैलीत लिहिलेल्या लेखातून पाकिस्तानबद्दलची आम पाश्चात्य जनतेची सहानुभूती काशी कमी-कमी होत चालली आहे हे दिसून येते.
पाकिस्तानला जो नुकताच प्रलयंकारी महापुराचा तडाखा बसला त्यामुळे त्या देशातील दोन कोटी पूरग्रस्त जनता बेघर होऊन रस्त्यावर आली. त्यांच्या पुनर्वसनासाठी ४६ कोटी डॉलर्स लागतील असे संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर करून सार्या जगाला मदत करण्याची हांक घातली होती. पण केवळ १८.५ कोटीचीच मदत ही संघटना जमा करू शकली. एका मानवतावादी परोपकारी संघटनेने पकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी फक्त दोन लाख डॉलर्सचीच मदत जमा केली पण त्याच काळात तिने हेतीसारख्या (Haiti) छोट्या देशातील भूकंपग्रस्त लोकांसाठी याच संघटनेने ३६ लाख डॉलर्सची मदत जमा केली होती. यामुळे पाकिस्तानच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आणि त्याने या पाश्चात्य देशांवर खूप आग पाखडली.
त्या आधीच पाकिस्तानने दर F-16 या लढाऊ विमानासाठी प्रत्येक नगामागे ४ कोटी डॉलर्स मोजून २० अशी विमाने खरेदी केली होती असे सांगून लेखिका विचारते कीं या विमानांसाठी पाकिस्तानने २०x४=८० कोटी डॉलर्स उडवले (म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने मागितलेल्या ४६ कोटी डोलर्सपेक्षा जास्त रक्कम मोजली होती. हे पैसे कुठून आले?) पण पूरग्रस्तांसाठी मात्र पाकिस्तान हातात कटोरी घेऊन उभा!
लेखिका पुढे म्हणते कीं ज्या देशाकडे लष्करी सामुग्री विकत घेण्यासाठी पैसे आहेत किंवा असा पैसा जे राष्ट्र उभा करू शकते अशा राष्ट्रांना पूरग्रस्तांसाठी कां नाहीं स्वतःचा निधी कसा काय उभा करता येत? लेखिका पुढे म्हणते कीं अशा पाकिस्तानला एक दमडीसुद्धा मदत द्यावीशी त्यांना वाटत नाहीं.
याहूनही चीड आणणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानी राजकीय व औद्योगिक क्षेत्रातील बडे-बडे नेते स्वतःचा आयकर व इतर कर देत नाहींत. १९ जुलै रोजी न्यूयॉर्क टाइम्सने एक पाकिस्तानला अवमानित करणार्या लेखात पाकिस्तानच्या करवसूली करण्याच्या पद्धतीवर खणखणीत टीका केली आहे. त्यानुसार पाकिस्तानातले श्रीमंत लोक कर देतच नाहींत असा गौप्यस्फोट केला. तोही हा थोडाथोडका कर बुडवण्याचा प्रकार नसून अजीबात कर न देण्याचा प्रकार आहे. जिथे १ कोटी पाकिस्तान्यांनी कर भरला पाहिजे तिथे त्याच्या २५ टक्के लोकच कर भरतात. पाकिस्तानी खासदारांची सरासरी माया (Net worth) नऊ लाख डॉलर्स आहे. भूतपूर्व पंतप्रधान व आताचे विरोधी पक्षनेते नवाज शरीफ हे करोडपती आहेत पण त्यांनी २००५ ते २००७च्या दरम्यान अजीबात आयकर भरलेला नाहीं. थोडक्यात करवसूलीची पद्धती श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी केलेली पद्धती आहे.
याच विषयावर 'गॉन' या आघाडीच्या पाकिस्तानी वृत्तपत्रात इस्लामाबादच्या मेहनाज सिद्दीकी या पाकिस्तानी नागरिकाचे 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'तले हे पत्र फारच उद्बोधक आहे. (http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp...) या पत्रलेखकानुसार पाकिस्तानी लोकसभेला दिलेल्या अहवालानुसार करबुडवे लोक १० अब्ज पाकिस्तानी रुपयांचा (१२५ कोटी डॉलर्सचा) कर बुडवत आहेत तर वसूल न केलेला कर याच्या पाचपट आहे. या अपमानास्पद परिस्थितीत (सध्या तरी) लोकशाहीचा मार्ग अनुसरणार्या पाकिस्तानच्या सरकारचे मित्रसुद्धा यापुढे पाकिस्तानला मदत करायला कांकू करू लागले आहेत असे पत्रलेखक म्हणतो.
मूळ इंग्रजीत लिहिलेला पॅट्रिस लागासे यांचा लेख आणि गॉनमधील वाचकाचे पत्र जरूर वाचण्याची मी सर्व मिपाकरांना शिफारीस करतो.
(अर्थात् भारतीय नेते आणि भारतीय श्रीमंतही यात कांहीं कमी नाहींत, पण आपला देश कटोरी घेऊन हिंडत नाहीं हाच फरक!)
PAKISTAN By Patrice Lagacé - La Presse - Montréal
http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse-...
प्रतिक्रिया
27 Oct 2010 - 10:09 pm | रन्गराव
चांगला लेख! पण एक गोष्ट मात्र आहे, इतका कर्जबाजारी आणि भिकारी देश असून सगळ्या जगास वेठीस धरल आहे. अगदी अमेरीकेला सुद्धा माफी मागायला भाग पाडलं त्यांनी. आणि आपण एक महाशक्ती होन्याच्या मार्गावर असूनही २६/११ साठी जबाबदार लोकांच्या केसालाही हात लावू शकलो नाही! :(
28 Oct 2010 - 8:04 am | गांधीवादी
भारतात पुन्हा हल्ला झाल्यास युद्ध भडकेल
'नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने बराच संयम बाळगला. यापुढे असा हल्ला झाला, तर राजकीय दबावामुळे भारत सरकारला "काहीतरी' कारवाई करावी लागेल.' असे अमेरिका सांगते आहे.
काळजी करू नका, हजारो मारले गेले कि काहीतरी कारवाई (राजकीय दबावामुळे) नक्कीच होईल आणि ती होण्यासाठी पुढच्या हल्ल्याची वाट बघण्यापलीकडे एक सामान्य माणूस काही करू शकत नाही. so wait and watch.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4820713.cms
हल्ल््यात जे मारले गेले, त्यांचे कुटुंबीय दु:खाचे कढत उसासे अनुभवत असताना, दुसऱ्या बाजूला त्याच नराधमाच्या रक्षणासाठी इंडो-तिबेट तुकडीचे शूर शिपाई नेमण्यात आले आहेत. आर्थर रोड जेलला सैनिकी छावणीचे रुप आले आहे. कसाबच्या रक्षणासाठी दररोज दहा ते पंधरा लाख रुपये खर्च होतात, अशा बातम्या आहेत. हे सारे कशासाठी? कराडो भारतीयांनी ज्याला टीव्हीवर 'रंगे हाथ' पकडले व नंतर ज्याने स्वत:च गुन्हा मान्य करुन फाशीचीच मागणी केली. त्याच्यावरच दयेचा वर्षाव कशासाठी? ज्याने केवळ कायदाच नव्हे, तर मानवता पायदळी तुडवली व भारतीय लोकशाहीचा व संस्कृतीचाच अपमान केला, त्यालाच 'कायद्याचा न्याय' मिळावा, म्हणून काही मंडळींचा जीव इतका धायकुतीला का येतो?
यालाच कायद्याचे राज्य म्हणतात का? तसे असेल, तर हा कायदा कोणासाठी? निरपराध मारल्या गेल्या जनतेसाठी की, त्यांच्या मारेकऱ्यांसाठी? महत्त्वाचा कोण? शांतताप्रिय नि:शस्त्र ससे की, त्याला मारणारा सशस्त्र क्रूर व कपटी पारधी?
28 Oct 2010 - 10:47 am | रन्गराव
>>ती होण्यासाठी पुढच्या हल्ल्याची वाट बघण्यापलीकडे एक सामान्य माणूस काही करू शकत नाही. so wait and watch.
वाचून खूप त्रास झाला. पण सत्य नाकारता येत नाही हे ही तितकच खरं आहे! आपण लिहिलेलं भितीदायक असल तरी सत्य आहे :(.
27 Oct 2010 - 10:21 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. मी तर पाकीस्तानातल्या पूराने खूषच झालो. :)
-(पाताळयंत्रम मधला हिहाहा करून हसणारा राक्षस) पेशवे.
28 Oct 2010 - 12:42 am | मी-सौरभ
ऑडीओ मधे 'पाताळ विजयम' ऐकलय असं वाटतय??
- (पाजी)
27 Oct 2010 - 10:37 pm | वेताळ
अहो मग मानवतादी ,परोपकारी लोकांनी तुम्हाला खुप छळले असेल नाही?
मला देखिल पाकिस्तानात पुर आल्यावर खुप आनंद झाला होता.
27 Oct 2010 - 10:39 pm | वेताळ
अहो ज्या वयात पुराणे पोथ्या वाचायच्या असतात त्या काळात असले टुकार लेखन कसे काय वाचत असता बॉ?
27 Oct 2010 - 11:20 pm | चिंतामणी
पाकीस्तानचे पुरते वस्त्रहरण केले आहे.
पण एक गोष्ट सत्य आहे.
नंगेसे....................................
सुधीर काळे यांचे आभार.
27 Oct 2010 - 11:10 pm | तर्री
लेख , मूळ "कॅनेडियन " महिलेचा लेख व पा़किस्ताना मधिल प्रतिक्रिया "जगाला "विचार करयला भाग पाडतिल अशाच आहेत.
पाकिस्ताने भारत द्वेश सोडून स्वःतच्या ऊत्कर्षाचा विचार केला , तर ऊपखंडात शांतता / समॄध्दी प्रसथापित होईल असे जसवंत सिंगांच्या एक विधान आहे.
अजुन असे "भरपूर" वैचारिक लेखन वाचायला मिळावे ही इच्छा.
28 Oct 2010 - 8:16 am | सहज
लेख वाचूनही त्रासच आहे. पुरग्रस्त लोकांचे योग्य पुनर्वसन झाले नाही तर असे किती अजमल कसाब उर्फ आयते मनुष्यबळ उपलब्ध होणार???
28 Oct 2010 - 8:45 am | पिवळा डांबिस
पाकिस्तान सरकारचे आणि तिथल्या धनवंत लोकांचे धोरण भारतविरोधी आहे हे पूर्णपणे मान्य.....
आय एस आय तिथल्या लष्करे तायबा इत्यादि संघटनांना प्रोत्साहन देते हेही पूर्णपणे मान्य.....
पण म्हणून नैसर्गिक पूरामुळे तिथल्या सामान्य गरीब जनतेवर आलेल्या संकटाला पुरेसा जागतिक प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यात आनंद मानणे हे मनाच्या क्षुद्रतेचे लक्षण आहे...
इथल्या काही यशस्वी ह्युमॅनिटी हेटर्सचं काही वाटलं नाही पण काळेकाका यू टू? :(
अवर कल्चर हॅज टॉट अस मच बेटर दॅन दॅट!!!
पाकिस्तानातल्या काही संस्था भारतात आतंकवाद माजवण्याचा प्रयत्र्न करतात हे सत्य आहे....
पण त्याचा बदला म्हणुन पाकिस्तानातल्या (किंवा अन्य कुठल्याही शत्रूदेशातल्या!!!) सामान्य जनतेचे सर्वस्व गमावण्यात आनंद मानणे हे विकृतीचे लक्षण आहे...
मला शरम वाटते.....
कारण जर मला यांत आनंद वाटला तर मी ही त्या भारतद्वेषी पाक्यांच्याच रांगेत येऊन बसतो...
आणि मला ते कदापिही मान्य नाही.....
भारतात आतंकवादी येतात ना?
मग हाणा ना त्यांना!! सुपरपॉवर आहोत ना आपण?
मग कसाबला आणि अफजल गुरूला पकडा आणि हाणा...
त्यांच्या घरादाराला आणि फारतर कुत्र्यालाही हाणा...
जरूर पडेल तर एन्काऊंटर झालं असं दाखवा....
आय डोन्ट हॅव प्रॉब्लेम विथ दॅट....
पण जेंव्हा आम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या निरपराध आणि अबला जनतेला त्यांच्या परराष्ट्रिय धोरणात काहिही मत नाहिये....
तेंव्हा तिच्या हालांत आनंद मानणं हे पुरुषत्वाचं लक्षण निश्चित नाही.....
मे द अल्मायटी ब्लेस यू!!!
आमेन!!!!
28 Oct 2010 - 9:28 am | स्पा
शब्द शब्दाशी सहमत..............
28 Oct 2010 - 9:36 am | वेताळ
तरी वाटतच होत मानवतावादी अजुन कसे आले नाहीत.....बाकी भरल्या पोटी व कडक सुरक्षेच्या किल्ल्यात राहणार्याला वि़कृत भारतियांची किव येणारच म्हणा.
कसाबचा बाप खुप श्रीमंत होता. कसाब एशाआरामाची जिंदगी सोडुन फक्त इस्लामखातर भारतावर हल्ला करायला तयार झाला हे आजच कळाले.
28 Oct 2010 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>तरी वाटतच होत मानवतावादी अजुन कसे आले नाहीत..
खी खी खी
पाकड्यांकडे [आदराने लिहितोय. नाहीतर म्हणाल किती हा द्वेष] पाहण्याची दृष्टी त्यांच्या वृत्तीमुळे जगभर बदलत चालली आहे. [विदा नाही. संदर्भ नाही] त्यामुळे मदतीचा ओघ कमी होतोय त्याची काही स्पेशल कारणे असतील असे वाटत नाही.
अवांतर : काळे साहेब, काश्मीरबाबत घटनेत दुरुस्ती आणि त्यांच्या स्वांतत्र्याच्या विचाराचा आदर केला पाहिजे. असे मत काश्मीरच्या अभ्यासगटाने व्यक्त केले आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे.
-दिलीप बिरुटे
28 Oct 2010 - 12:12 pm | llपुण्याचे पेशवेll
अवांतर : काळे साहेब, काश्मीरबाबत घटनेत दुरुस्ती आणि त्यांच्या स्वांतत्र्याच्या विचाराचा आदर केला पाहिजे. असे मत काश्मीरच्या अभ्यासगटाने व्यक्त केले आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे.
+१ सहमत आहे. पुढे जाऊन कोणत्याही पक्षाने कधी वेगळ्या महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण स्वायत्ततेची मागणी केली तर या अभ्यास गटाच्या सदस्यांचा पत्ता नोट करून ठेवला पाहीजे. समर्थनार्थ लगेच बोलावता येईल. :) उगाच कोणी देशद्रोही वगैरे म्हणायला नको. :)
28 Oct 2010 - 12:31 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
महाराष्ट्रात मराठीच हवी अशी साधीच मागणी केली तरी सुद्धा हेच विचारवंत कुत्र्यासारखे भुंकत येतात. :)
28 Oct 2010 - 1:00 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
28 Oct 2010 - 1:31 pm | सुधीर काळे
काश्मीरबाबतच्या या "अभ्यासगटा"ची स्वामिनिष्ठा वाखाणण्यासारखी आहे. या आधीच पाडगावकरांनी "पाकिस्तानलाही या संवादात सामील करून घेतले पाहिजे" असे सांगून 'सूतोवाच' केले होतेच. जे असे बोलतील अशांचीच या गटावर नेमणूक झाली असावी काय? ताईसाहेबांनी आपल्या पंतप्रधानांना या गटाने "काय बोलले पाहिजे" हे सांगितले असेलच व "जो हुकम" करीत तसा निरोप त्यांना पोचलाही असेल.
आता तर "इंचा-इंचाने"च्या जागी "यार्डायार्डाने" हा शब्दप्रयोग करावा लागणार असे दिसते.
गिलानीसारखा देशद्रोही खुद्द दिल्लीत येऊन भारतापासून अलग होण्याची गर्जना करून गेला. हेच कुणा दुसर्या नेत्याने केले असते तर त्याला तिथल्यातिथे पकडले असते. पण गिलानी वेगळे! ते श्रीनगरला परत गेले व पत्रकारांनी छेडले असता "माझ्याविरुद्ध ९० गुन्हे दाखल आहेत, त्यात हा ९१वा!" असे अपमानास्पद उद्गारही काढायला त्यांनी कमी केले नाहीं.
सध्या बिहारच्या निवडणुका चालू आहेत व राहुल'बाबा' RSS आणि SIMI कसे एकासारखे एक आहेत हे पटवून देत आहेत. मग "आहिस्ता कदम"चाच सल्ला सार्या सरकारला दिला गेला असणार!
घटनादुरुस्तीबाबत खालील दुव्यांचा अभ्यास सुरू आहे आणि तो झाला कीं लिहीन!
http://greaterkashmir.com/news/2010/Oct/21/op-ed.asp
http://www.greaterkashmir.com/news/2008/Dec/5/sheikh-abdullah-the-archit...
http://www.indocommunity.us/Kashmir_Task_Force_files/news54.pdf
http://www.kashmir-information.com/crescent/chapter2.html
29 Oct 2010 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काश्मीरमधील फुटीरवादी संघटना हुरियत कॉन्फरन्सच्या सय्यद अली शाह गिलानी याने अभ्यास गटावर सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. सदरील शिफारसी पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटला असेल.
>>>घटनादुरुस्तीबाबत खालील दुव्यांचा अभ्यास सुरू आहे आणि तो झाला कीं लिहीन!
नक्की लिहा. वाट पाहतोय. दुव्याबद्दल धन्यु.
-दिलीप बिरुटे
30 Oct 2010 - 10:56 am | सुधीर काळे
खरे तर या गिलानींच्याविरुद्ध आणि अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला का भरत नाहींत हेच समजत नाहीं.
28 Oct 2010 - 10:06 am | पिवळा डांबिस
कसाबचा बाप खुप श्रीमंत होता. कसाब एशाआरामाची जिंदगी सोडुन फक्त इस्लामखातर भारतावर हल्ला करायला तयार झाला हे आजच कळाले.
रियली? कसाब अन्नाला मोताद झालेला भाडोत्री आहे!!!!
कसाब आणि अफजल गुरूला पकडा आणि हाणा!!!
यांतलं काय तुम्हाला कळलं नाही?
:)
28 Oct 2010 - 10:14 am | वेताळ
मग भारतियांच्या बरोबर इतर देशातील लोकाची पाकिस्तान विषयी इतकी टोकाची भुमिका व्हायची गरजच काय होती?
हेच हरामी भिकारी पाकिस्तानी अमेरिका व इतर देशातील लोकानी पाठवलेल्या रोट्या खावुन काम न करता मदरश्यात जातात व बंदुका हातात घेवुन आपल्यावर रोखतात.ते पुरात जर मरत असतील तर आम्हाला आनंद होणे साहजिकच आहे.पाव्हण्याच्या काठीने जर साप मरत असेल तर त्यात वावगे काय?त्यात कसली विकृती आहे हे जरा मला समजावता काय?कसाब किंवा इतर अतिरेकी हे गरीब व भिकार कुटुंबातुनच आले होते.जर कीडच मुळातुन मरत असेल तर त्याचा आनंदच आहे.
28 Oct 2010 - 10:28 am | पिवळा डांबिस
अरे, पाकिस्तानातील रुलिंग क्लास ही तालिबान पाठीराखी भूमिका घेत आहे म्हणुन इतर देशातील लोकांचे मत त्यांच्याविरुद्ध होत चालले आहे. आणि त्याबद्दल मलाही आनंद वाटतोच! आपण जे इतकी वर्षे उर्वरित जगाला घसा फोडून सांगतो आहोत ते आत्ता त्यांना पटायला लागलंय! देरसे आये दुरुस्त आये!!!
पण पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनानी जेंव्हा एखाद्या भूभागातली जनता हालअपेष्टा सोसत असते तेंव्हा तिला मदत करायची नसेल तर जाऊ द्या पण तिच्या हालांमध्ये आनंद मानण्यात माणुसकी आहे काय? त्या कनेडियन लेखात तर तोच सूर आहे!! तूच विचार कर आणि सांग ना मला!!!
उलट त्या सामान्य जनतेबद्दल सहानुभूती दाखवली तर कदाचित (आणि पुन्हा सांगतो कदाचित!!) कसाबसारखे भूखमंगे दहशतवादाच्या वाटेला जाणार नाहीत कदाचित!!!!
आमेन!!
एखाद्या समस्येबद्दल तिथल्या गरीब आणि भिकार जनतेचा नायनाट करणं हा उपाय होऊ शकतो का?
मुंबईकर,
पिडां
28 Oct 2010 - 4:51 pm | पंख
>> पण पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनानी जेंव्हा एखाद्या भूभागातली जनता हालअपेष्टा सोसत असते तेंव्हा तिला मदत करायची नसेल तर जाऊ द्या पण तिच्या हालांमध्ये आनंद मानण्यात माणुसकी आहे काय?
जनता ? कुठली जनता.. पाकिस्तानात पुर आल्याचा मलाही फार आनंद झाला व त्यात काही लाख पाकडे मेले याचा तर फारच आनंद होतोय.. कारण ते जे काही लाख होते त्यात ९० % दहशतवादी किंवा दहशतवादास पाठींबा देणारेच असणार यात मला काहीच शंका नाही.. मुंबई हल्ल्यानंतर हे काही लाख लोक खरेतर भारत सरकारनेच ठेचायला हवे होते, पण काय करणार राज्यकर्त्यांना पारंपारीक 'षंढपणा' नडला.. पण आता निसर्गच त्यांच्यावर सूड ऊगवतोय तर होऊन जाऊअ दे ना.. ईथे तरी मानवतावादी मंडळींनी आड येऊ नये.. कारण जे मेलेत ते मानव नाहीतच.... ऊलट भारताने एक नद्याजोड प्रकल्प लवकरात पुर्ण करून सगळ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानात सोडावे.. ऊरला सुरला पाकिस्तानही अरबी समुद्रात बुडवावा... तिथलं एकही बेणं शहाणं नाही..
28 Oct 2010 - 9:37 am | विकास
पण त्याचा बदला म्हणुन पाकिस्तानातल्या (किंवा अन्य कुठल्याही शत्रूदेशातल्या!!!) सामान्य जनतेचे सर्वस्व गमावण्यात आनंद मानणे हे विकृतीचे लक्षण आहे...
असे चर्चेत काळेसाहेबांनी म्हणलेले दिसले नाही. त्यांचा मुद्दा त्यांनी ठळक अक्षरात लिहीलेला आहे: या उपहासपूर्ण शैलीत लिहिलेल्या लेखातून पाकिस्तानबद्दलची आम पाश्चात्य जनतेची सहानुभूती काशी कमी-कमी होत चालली आहे हे दिसून येते.
कदाचीत त्यांच्या इतर लेखनविषयांचा आणि राजकीय मतांवरून असे गॄहीत धरले गेले आहे की त्यांना आनंदच झाला आहे वगैरे. अर्थात त्यांना झाला का नाही याची मला कल्पना नाही. ;) पण जे काही लिहीले आहे त्यातून असे वाटले नाही.
28 Oct 2010 - 9:59 am | पिवळा डांबिस
आम्ही आम्हाला काय वाटलं ते सांगितलं...
काळेकाकांबद्दल काय अपेक्षा आहे ते ही सांगितलं...
काळेकाकांना तसा आनंद झाला आहे की नाही याची माहिती नाही...
पण त्यांच्या अभ्यासूव्रूत्तीविषयी आदर असल्याने त्यांना जर आनंद झाला तर त्याचं मनस्वी दु:ख्ख वाटेल!
:(
इतरांविषयी तसं वाटेल असं म्हणता येणार नाही....
28 Oct 2010 - 10:21 am | अपूर्व कात्रे
every Pakistani is either terrorist or potential terrorist असे मी कुठेतरी वाचले होते. ते फारच बरोबर आहे. त्यामुळे त्या पुरामध्ये असेच काही अतिरेकी आणि भावी अतिरेकीही मारले गेले असतील. भारतासाठी चांगलेच आहे. भारताने दिलेली मदत स्वीकारताना पाकिस्तानने जो मानभावीपणा केला तो बघून फारच राग आला. म्हणजे भीक तर हवी आहे पण तुमच्याकडून direct नको असेच म्हणण्यासारखे आहे. सुंभ जळला तरी पीळ काही गेला नाही. भारत आणि इस्रायेलच्या मानवतावादी कार्यकर्त्यांना पाकिस्तानात मदतकार्य करण्यासाठी येण्याची बंदी घातली होती.
28 Oct 2010 - 12:16 pm | मृत्युन्जय
त्यांच्या घरादाराला आणि फारतर कुत्र्यालाही हाणा...
पिडा काका मग तर तुम्ही त्याच्या घरादाराला हाणण्याला पण विरोध केला पाहिजे. त्यांची काय चुक? ते तर गरीब बिचारे लोक आहेत. सर्वस्व (पक्षी: पोटचा गोळा) गमावण्याच्या मार्गावर आहेत. अश्या लोकांना का हाणायचं? फक्त त्यांच्या पोटी असा पुत्र निपजला म्हणुन. त्यांच्या पोटी कसाब किंवा अफजल निपजला यात त्यांची काय चुक? आणि बिचार्या मुक्या कुत्र्याची काय चुक? (तोही माणूसच आहे ना शेवटी?)
28 Oct 2010 - 1:01 pm | सुधीर काळे
प्रिय पिवळा डांबिस,
मी नेहमीच म्हणत आलो आहे कीं कुठल्याही देशाचे सरकार आणि जनता यात गल्लत करू नये आणि मी करत नाहीं. मला पाकिस्तानी जनतेचे टीव्हीवर पाहिलेले हाल, तेही रमजान महिन्याच्या उपासाच्या महिन्यात, पाहवले नाहींत. पण गिलानींना आणि जरदारींना याची पर्वाच नव्हती. दोघेही आपापली खासगी कामें करून मग मदतकार्याला लागले. जरदारी तर युरोप-इंग्लंडमध्ये आपल्या मुलाच्या 'प्रोमो'त गुंतले होते! हे नक्कीच संतापजनक होते.
पण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची पापें त्यांना भोगायला न लागता त्यांच्या जनतेला भोगावी लागली याचे वाईट वाटते.
पाकिस्तानी सरकार पैसेखाऊ आहे, तिथले नेतृत्व स्वार्थी आहे, लष्कर बदमाष आहे व ISIबद्दल तर लिहायलाच नको पण यांची पापे जनतेने कां धुवावीत? (आपलेही सरकार पैसेखाऊ आहे, पण आपले नेतृत्व तसे नक्कीच बरे आहे, आपले लष्कर तूलनेने खूपच चांगले आहे व रॉबद्दल मला फारशी माहिती नाहीं! पण अशा खात्यांबद्दल फारशी माहिती नसणे हेही त्यांच्या यशाचे एक चिन्हच आहे.)
हा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद!
(अवांतर आणि गमतीने: पिवळा डांबिस या नावामागे प्रिय लावताना जरा विचार करावा लागला हे मात्र खरे!)
28 Oct 2010 - 7:47 pm | बिपिन कार्यकर्ते
पिडां, अगदी सहमत आहे तुमच्याशी. दोन तीन शब्द सोडल्यास.
28 Oct 2010 - 9:18 am | गोगोल
http://news.yahoo.com/s/afp/20101022/pl_afp/uspakistanmilitarydiplomacy_...
28 Oct 2010 - 11:57 am | चेतन शिवणकर
पाकिस्तानच्या आईची --------
28 Oct 2010 - 11:57 am | चेतन शिवणकर
पाकिस्तानच्या आईची --------
28 Oct 2010 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणजे भारताच्या... :) भारताच्या पोटातुनच बाहेर पडलाय ना पाकिस्तान.
28 Oct 2010 - 12:01 pm | स्पा
चेतन फुल पेटलाय.........:)
28 Oct 2010 - 1:18 pm | गांधीवादी
इसवी सन २०२५
नुकत्याच हाती आलेल्या बातमीतून हे पुन्हा सिद्ध झालेले आहे कि, काल पुणे येथे झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग आहे. त्याचा भयंकर अतितीव्र कडक भाषेत निषेध माननीय पंतप्रधान यांनी पुन्हा केला. इथून पुढे असा हल्ला खपवून घेण्यात येणार नाही अशी ताकीद पुन्हा देण्यात आली. असे हल्ले होऊ नये म्हणून पुन्हा 'भारत बचाव' समिती स्थापन करण्यात आली.
प्रसंगी पुण्यातील मेट्रो रुळावरून पुन्हा घसरल्याने जवानांना यायला उशीर झाला त्यामुळे जवानांना एक हेलीकॉप्टर देण्याचे आश्वासन पुन्हा देण्यात आले. तसेच काही वीर बुलेट प्रुफ जॅकेट नसल्याने पुन्हा दगावले, म्हणून त्यांना उच्च दर्जाचे जॅकेट देण्याचे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कबूल केले. आणि अश्या लहान सहान गोष्टी होतंच असतात, त्या मनावर घेऊ नका. असे बोलून जनतेचे पुन्हा सांत्वन केले.
५०० मृत झालेल्याच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख, जखमींना २५ लाख देण्यात येतील असे पुन्हा जाहीर करण्यात आले. मृतांना उद्या पुन्हा श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, तरी कृपया पुन्हा उद्या सर्वांनी हातात पेटलेल्या मेणबत्त्या घेऊन शनिवारवाडा येथे हजर रहाणे.
भारताने युद्ध करून आशियातील शांती पुन्हा भंग करू नये, यासाठी अमेरिकेतून पुन्हा दबाव टाकण्यात आला.
28 Oct 2010 - 2:27 pm | Dhananjay Borgaonkar
पुन्हा अवांतर
28 Oct 2010 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार
त्यांच्या बाबतीत खरे तर पुन्हा पुन्हा असा वाक्यप्रयोग हवा.
28 Oct 2010 - 2:48 pm | निखिल देशपांडे
मुळ लेखक श्रीमती नसुन श्री असावा असे वाटते.
संदर्भासाठी हा दुवा पहाता येईल. या संदर्भात जाणकारांनी प्रकाश टाकावा.
28 Oct 2010 - 3:44 pm | सुधीर काळे
देशपांडेसाहेब,
जरा चेक करून सांगतो. पॅट्रिस हे पॅट्रीशियाचे संक्षिप्तीकरण असेल असे वाटून मी त्या लेखकाचे नाव श्रीमती केले. नक्की कळल्यावर दुरुस्त करतो.
काळे
29 Oct 2010 - 8:03 am | सुधीर काळे
देशपांडेसाहेब,
मी माझ्या टोरांटोनजीक रहाणार्या मावसबहिणीला "Patrice" बद्दल कालच विचारले. तिने तिच्या माँट्रियलमध्ये रहाणार्या मैत्रिणीला विचारून मला लिहिले आहे कीं Patrice हा पुरूषच आहे!
मी आता विकास-जींना विनंती करतो कीं त्यांनी ही दुरुस्ती करून लेख सुधारावा!
29 Oct 2010 - 8:07 am | विकास
मी आता विकास-जींना विनंती करतो कीं त्यांनी ही दुरुस्ती करून लेख सुधारावा!
करतो. मात्र for the record: विकास आणि जीना यांचा काही संबंध नाही. ;)
29 Oct 2010 - 12:38 pm | सुधीर काळे
"मात्र for the record: विकास आणि जीना यांचा काही संबंध नाही." हाहाहा!
दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद.
28 Oct 2010 - 7:43 pm | मदनबाण
अमेरिका जोपर्यंत पाकड्यांना फंडींग करत राहील तोपर्यंत पाकड्यांना काहीच फरक पडणार नाही, आणि पडलाच तर पाकडे चीन कडुन भीक मागतील.
पाकडे भिकेला लागले तरी हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करण्यास थांबणार नाहीत...
सध्या दुसर्या कारगिलची वाट पाहत आहे...
28 Oct 2010 - 11:03 pm | पैसा
एक गोष्ट आठवली.
एक अमेरिकन भिकारी आणि एक पाकिस्तानी भिकारी एका पार्कात नेहमी भेटत असत. अमेरिकन भिकार्याला फार पैसे मिळत नसत, तर पाकिस्तानी भिकारी भरपूर कमवत असे.
एकदा अमेरिकन भिकारी पाक भिकार्याला म्हणाला, "गड्या, मी हातात बोर्ड घेऊन बसतो, मी उपाशी आहे, मला थोडे पैसे द्या, तर कोणी पैसे देत नाहीत. तुला एवढे पैसे कसे मिळतात?"
पाक भिकारी म्हणतो, "हॅ हॅ हॅ, मी पण बोर्ड घेऊन बसतो, त्यावर एवढंच लिहितो, की मी पाकिस्तानी आहे आणि मला पाकिस्तानात कायमचं परत जायचं आहे. पण १० डॉलर्स कमी पडतायत! येणारा जाणारा प्रत्येकजण १० डॉलर्सची नोट माझ्या पुढे टाकतो!"
तात्पर्य........(वेगळे सांगायला नकोच!)
29 Oct 2010 - 7:32 pm | अपूर्व कात्रे
१) प्र. तुमच्याकडे एका बंदुकीत दोन गोळ्या असतील आणि तुमच्यासमोर जर सद्दाम हुसेन, ओसामा लादेन आणि पाकिस्तानी माणूस असे तिघे जण असतील तर तुम्ही कोणाकोणाला गोळ्या घालाल?
उ. दोन्ही गोळ्या पाकिस्तानी माणसाच्या डोक्यात घालेन.
२) एकदा ओबामा आणि मनमोहन सिंग बार मध्ये बसलेले असतात. तेवढ्यात एकजण त्यांना येऊन विचारतो की तुमची चर्चा कशावर सुरु आहे? मनमोहन सिंग म्हणतात आम्ही आत्ताच ठरवले आहे की उद्या पाकिस्तानवर एक nuclear bomb टाकून सर्वच्या सर्व पाकिस्तानी माणसे आणि एक mechanic मारून टाकायचा. तो माणूस त्यांना विचारतो : "mechanic ला कशासाठी मारताय?" मनमोहन सिंग ओबामांकडे वळून म्हणतात: "बघा.. मी म्हणालो नव्हतो पाकिस्तानी माणसाची काळजी कोणालाच नाही म्हणून..."
28 Oct 2010 - 11:08 pm | वाटाड्या...
कश्यावरुन अमेरिकेतील हे जे राज्यकर्ते आहेत, जे पाकिस्तानींना मदत करत आहेत, तेच त्यातील हिस्सा खात नसतील? म्हणजे पाकिस्तानात पैसा पोहोचवायचाच पण तिथुनच परस्पर आपल्या स्वीस खात्यात वळवायचा..असं कशावरुन होत नसेल. सध्याच आलेल्या ह्या रिपोर्टवरुन तर ते किती झाला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात सामान्य माणसाला ह्याची प्रत्यक्ष झळ पोहोचत नाही अमेरिकेत.
बाकी "पाकडे भिकेला लागले तरी हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करण्यास थांबणार नाहीत..." १००% सहमत आहे.
"सध्या दुसर्या कारगिलची वाट पाहत आहे..." ..बापरे, म्हणजे आपली काही लोकं आता दुसर्या शवपेट्यांच्या काळाबाजाराची स्वप्ने बघत असतील...
पिडांकाकांशी अंशतः सहमत..सामान्य पाक जनता जीला फक्त स्वतःच्या विवंचनेत रस आहे आणि पाकिस्तानी सरकार भारताविरुद्ध काय काय करतं ह्यात काहीही स्वारस्य नाही अश्या पण पुरात सापडलेल्या लोकांशी नैतीक पाठींबा द्यायला काय हरकत आहे?
काळेकाका, बाकी उपहासात्मक लेख छान...शेवटी एक दिवस ह्या गोर्या आणि बर्यापैकी मुर्ख राज्यकर्त्यांना थोडी अक्कल येवो नी त्यांनी ऊठ सुठ त्यांना पैसे नी काय काय देणं बंद करो. कारण आज हे दहशतवाद निर्मुलनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असतीलही पण उद्या ह्यांच्याच उरावर ते बसतील तेव्हा कुठला पैसा नी काय ह्यांना वाचवायला येणार आहे?
-वाटाड्या...
29 Oct 2010 - 8:13 am | विकास
मला या संदर्भात कायम एक विनोद आठवतो:
एक शेजारी आपल्या बाजूच्या शेजार्याचा कायम द्वेष करत असतो. त्याच कधी भले होऊ नये असेच त्याला वाटत असते. एकदा त्याला अचानक देव प्रसन्न होतो आणि म्हणतो की काय हवे ते माग... फक्त एकच अट आहे: तुला जे देईन त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्याला देईन. ह्याला प्रश्न पडतो. थोडा विचार करून देवाला म्हणतो, "मला एका डोळ्याने आंधळा कर." ;)
30 Oct 2010 - 1:29 pm | इन्द्र्राज पवार
"....पाकडे भिकेला लागले तरी हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाया करण्यास थांबणार नाहीत......"
श्री.मदनबाण यांचे वरील वाक्य वरवर कितीही भडक वाटले तरी ते सातत्याने सत्यरूपातच राहिल यात (अगदी अहिंसेचे पोवाडे गाणार्यालादेखील) शंका असणार नाही. कारण मुळात पाकिस्तानचा जन्मच भारतद्वेषातून म्हणा वा भारतभीतीपोटी झाला असे म्हणा, झाला असल्याचे इतिहास सांगतोच. "मरेपर्यंत भारताला शत्रूच मानू.." अशीच शिकवण त्यांचा धर्म देतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती तेथील राज्यकर्त्यांनी अगदी १४ ऑगस्ट १९४७ पासून जनतेला दिली आहे. नैसर्गिक आपत्तीत जातो तो मानवी जीव, धर्म नव्हे, हे कितीही त्रिकालाबाधित सत्य असले तरी हैतीला मदत जाण्यास अडथळा येत नाही, पण पाकिस्तानकडे ती वळत नाही, याला तिथे पैदा होणारे व होत राहणारे विषवल्लीचे बीजच कारणीभूत आहे. मग जर असे असेल तर तेथील सरकारने 'पूरग्रस्तांसाठी आम्हाला मदत केली नाही...' असे वृथा गळे काढण्यात तरी काय अर्थ?
श्री.सुधीर काळे यानी दिलेली करबुडव्यांची उदाहरणे खूपच बोलकी आहेत. स्वतःचा पैसा स्वीस बँकांतून दाबून ठेवायचा आणि गोरगरीब जनतेला, पूरग्रस्तांना जग मदत करील या भ्रमात राहायचे, अशीच जर इस्लामची शिकवण असेल तर झाले मग कल्याण त्या पूरात भरडून गेलेल्या जनतेचे.
तेथील पूरग्रस्तांसाठी भारतातील सो-कॉल्ड 'मानवतावादी' संघटनांनीदेखील आपल्याला फार पाझर फुटला आहे हे दाखविण्याची अजिबात गरज नाही. दिली मदत तर घेतीलच, ढेकर देतील आणि उद्या परत भारताच्या नावाने शंख करायला रिकामे.
पॅट्रिस लागासे यांचा लेख सडेतोड आणि सत्यपरिस्थिती सांगणाराच आहे.
इन्द्रा
30 Oct 2010 - 2:09 pm | समंजस
पाकिस्तानच्या जनतेने स्वतः काही केलं तरंच त्यांचं भलं होउ शकतं अन्यथा नाही. पाकिस्तानी जनतेने दुसर्यांवर अवलंबून राहू नये.
जगातील कोणत्याही देशाला पाकिस्तान बद्दल प्रेम नाही किंवा आदर नाही.
पाकिस्तानच्या जन्मापासून ते आतापर्यंत इतर देशांनी जसे की ईंग्लड, अमेरीका, चीन, आखाती देश, ईतर पाश्चात्य देश यांनी मदत केली आहे ती फक्त त्यांच्या स्वतःच्या फायद्या करीता. यातील प्रत्येक देशांनी पाकिस्तानला वापरलंय ते आपापल्या देशाला जागतिक राजकारणात, तेल व्यवहारातील राजकारणात एक उपयोगी प्यादा म्हणून, पाकिस्तानचा विकास व्हावा तेथील जनतेचा विकास व्हावा म्हणून नाही.
तिथल्या सत्ताधार्यांनी फक्त आपापला वैयक्तीक फायदाच बघितला आहे. देशाचा किंवा जनतेचा नाही.
आज जेव्हा आतंकवाद जवळपास सगळ्याच खंडात आणि उप खंडात पसरला आहे आणि पाकिस्तान हे आतंकवाद्यांचं राहण्याचं, प्रशिक्षण घेण्याचं, आतंकवादी पुरवण्याचं, कारस्थानं रचण्याच केंद्रस्थान झालं आहे त्या मुळे जगात, पाकिस्तानला मदत करणारं कोणीही राहीलेलं नाही. जगाच्या दृष्टीने पाकिस्तान हा एक विषाणूंनी ग्रासलेला, सडलेला असा एक रोगी आहे. हा रोगी संपला काय आणि जगला काय काही फरक पडत नाही.
पाकिस्तानच्या जनतेने हे सत्य लवकरात लवकर समजून घेउन, योग्य सरकार आणलं आणि त्यावर नियंत्रण ठेवलं तरच त्यांच भलं होईल अन्यथा.........
30 Oct 2010 - 2:45 pm | मृत्युन्जय
सगळे मान्य समंजस. पण तसे भारताबद्दल तरी कुठे इतर कुठल्या देशाला प्रेम आहे?
30 Oct 2010 - 3:59 pm | सुधीर काळे
माझ्या मते भारताबद्दल एक तर्हेचा (grudging कां होईना, पण) आदर नक्कीच आहे. कांहीं वर्षांपूर्वी मला जपानी कंपन्यांच्या कांहीं उच्चपदस्थ अधिकार्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली असताना "मी भारतीय आहे" असे सांगितल्यावर त्यांच्या चेहेर्यावर सौहार्द्राचे भाव उमटत व "आम्हाला कुठल्याही गोष्टीची आयात न करणार्या भारताबद्दल आदर आहे" असे ते आवर्जून सांगत. ही अर्थात खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
पुढे १९८४ साली इंडोनेशियात आल्यावर जिकडे बघावे तिकडे फक्त जपानी गाड्या व इतर जपानी माल दिसू लागल्यावर मला त्यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ कळला.
भारताबद्दल grudge असण्याचे कारण असूया असावी. लोकशाही राबवत असूनही आपली आर्थिक प्रगती नेत्रदीपक आहे. त्यात आपण कुणाच्याही ताटाखालचे मांजर होण्यास नेहमीच नकार दिला आहे. त्यामुळेही कांहीं राष्ट्रे आपल्याशी दुरावा धरतात. शिवाय पहावे त्या देशात भारतीय इंजीनियर्स, डॉक्टर्स व इतर व्यवसायातील लोक नेहमीच पुढे असतात व पहिल्या १०त त्यांची गणना होते! अमेरिकेत शालेय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यातही चांगल्या grades मिळविणारी मुलेही ७० टक्के आशियाई व ३०-४० टक्के भारतीयच असतात.
'डब्या' बुश (४३) नेहमी अमेरिकन मुलांना बजावायचे कीं गणीताचा अभ्यास पक्का करा नाहीं तर एकादा भारतीय तुमची नोकरी घेऊन जाईल! ओबामाही तेच सांगतात. आपल्या शिक्षणाच्या उच्च प्रतीचा सर्वांनीच धसका घेतला आहे!
भारताबद्दल कांहींशी नावड असली तरी आदर नक्कीच भरपूर आहे.
इथे इंडोनेशियातही तीच परिस्थिती आहे. आम्ही इथे सन्मानाने रहात आहोत व आम्हाला आदरपूर्वक वागणूक मिळते. आज इंडोनेशियातील बहुसंख्य पोलाद कारखाने चालविण्याची जबाबदारी भारतीयच उचलत आहेत.
फक्त मध्यपूर्वेत (जिथे बहुसंख्य भारतीय मजूर म्हणून गेले आहेत) जरा परिस्थिती वेगळी आहे.
आपल्या लोकांच्या बुद्धिमत्तेमुळे, कामसूपणामुळे व त्यापायी मिळालेल्या व्यावसायिक व आर्थिक यशामुळे श्रीलंका, मलेशियासारख्या देशात थोडफार मत्सर मात्र आहेच.
तेंव्हा कुणीही कमीपणा वाटून घेऊ नये!
30 Oct 2010 - 5:04 pm | समंजस
भारताबद्दल सुद्धा इतर देशांना प्रेम नाही. सहमत.
कोणत्याही देशाला पाकिस्तान बद्दल प्रेम नाही किंवा आदर नाही हे वाक्य लिहीण्याचा उद्देश होता तो, पाकिस्तानाला पुरा सारख्या नैसर्गिक आपत्तीबद्दल मदत हैती या देशा पेक्षा कमी मिळाली त्याला अनुसरून होता. इतर देश हैतीला मुक्तहस्ताने मदत करतात परंतू पाकिस्तानला नाही या वरून इतर देशांची पाकिस्तान बद्दल असणारी समजूत/वागणूक किंवा उदासीनता दिसून येतेय. संभावीत कारण वरील प्रतिसादात दिलं आहेच.
भारता बद्दल इतर देशांना जरी प्रेम नसलं तरी वरील प्रकारची उदासीनता सुद्धा दिसून येत नाही.
30 Oct 2010 - 7:01 pm | इन्द्र्राज पवार
"....भारता बद्दल इतर देशांना जरी प्रेम नसलं तरी वरील प्रकारची उदासीनता सुद्धा दिसून येत नाही...."
~ इथे थोडा गोंधळ होतोय असे मला वाटते. द्वेष, प्रेम आणि उदासीनता या संज्ञा आपण "भारत" आणि त्यायोगे "भारतीय" याना एकत्रीतरित्या लावू पाहात असलो तर परिस्थिती काहीशी वेगळी आहे, जी श्री.सुधीर काळे यांच्या जपान+इंडोनेशीया अनुभव बोलातून प्रतीत होते.
माझा स्वतःचा काही कारणानिमित्य अमेरिकन्स आणि युरोप (केवळ इंग्लंडच नव्हे तर स्वीडन, नॉर्वे, जर्मनी आणि हॉलंड) येथील Educationally Elite Faculties समवेत खूप पत्रव्यवहार होत असतो. हे लोक त्या त्या देशात त्यांच्या क्षेत्रात नावाजलेले आहेत, आणि त्यांच्या पत्रातून ज्यावेळी Indian Brain Power बद्दल जे काही वाचायला मिळते त्यावेळी माझे मन आनंदाने फुलून येते. खुद्द इंग्लंडमधील एक जोडपे आपल्या मुलीला Political Sciences या विषयासाठी दिल्लीच्या जेएनयूमध्ये दाखल करण्याची गोष्ट माझ्यासमोर छेडते त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते की, ब्रिटीश लोकही आता भारताला कोणत्या नजरेने पाहात आहेत. लंडनस्थीत लक्ष्मी मित्तलच्या उद्योगसमूह कार्यालयात ज्यावेळी ब्रिटीश तरुण-तरुणी अर्जाची भेंडोळी घेऊन तिष्ठ्त उभे राहतात त्याचवेळी समजून चुकते की, २१ शतकात कशा प्रकारचे राज्य करण्याची संधी भारतीयांपुढे आहे.
~ हे झाले भारतीयांबद्दल.....तसे पाकिस्तानी नागरिकाबद्दल मत होणे, सद्यस्थितीत, कदापिही शक्य नाही. निव्वळ अमेरिकाच नव्हे तर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आणि पर्यायाने पाकिस्तानी नागरिक म्हणजे आतंकवाद्यांचे बगलबच्चे हीच ढोबळ व्याख्या झाली आहे. पॅट्रीकच्या लेखातील अनेक कारणापैकी ही मानसिकतादेखील एक आहेच.
"भारत" अॅज अ कंट्री...म्हणून दुमत असू शकते...त्याला कारण म्हणजे सदैव बदलत राहणारी सरकारी धोरणे, महागाई, बेफाट होत चाललेले शहरीकरण, चढत्या भाजणीचा भ्रष्टाचार, सरकारी दप्तरदिरंगाई, नोकरशाहीची अरेरावी, पर्यावरणाचा र्हास, जातपात, उच्चनीच, पोलिटिकल अनरेस्ट, लोकसंख्येला आळा घालण्यात येणारे अपयश....आदीमुळे कदाचित भारताबद्दल जसे आणि जितके प्रेम असायला पाहिजे तितके परदेशात नसेल....पण 'भारतीयां'बद्दल तसे वातावरण अजिबात नाही, हे मी स्वानुभवाने सांगतो.
.... आणि नेमका हाच फरक एक भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक यांच्यात आहे.
इन्द्रा
30 Oct 2010 - 8:10 pm | प्रदीप
आरारारारारा....... अजूनही वेळ गेलेली नाही त्या मुलीला तथाकथित डाव्या विचारसरणीच्या पाकातून बुडवून काढण्याची. जमले तर वाचवा तिला इंद्राकाका ह्या अरिष्टातून!!
मित्तल समूहाचे यश आनंददायक व अभिमानास्पद आहे खरे, पण नेमक्या ह्याच तर्हेच्या हाईपपासून आपण दूर राहिले पाहिजे. मित्तल एक यशस्वी समूह आहे, त्यांच्याकडे नोकरीसाठी जागा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काही उमेदवार रांगेत उभे आहेत. तसेच ते इतरही कार्यालयांसमोद जाऊन उभे राहत असतील. ह्यात इतके हाईप करण्याची गरज काय आहे?
31 Oct 2010 - 9:01 am | सुधीर काळे
विषयांतर होतेय्, पण हा एकच मुद्दा मांडतो.
मित्तलसाहेबांच्या सुराबायातील पोलाद कंपनीत मी सहा वर्षें काम केले आहे व त्या सहा वर्षात त्यांचे पाय मला बर्यापैकी "पाळण्या"त दिसले होते व त्यांचे हे उत्तुंग यश पाहून मला मुळीच आश्चर्य वाटले नाहीं. ते या यशाला पूर्णपणे लायक आहेत.
ते अतीशय धूर्त व भावनेच्या आहारी न जाणारे उद्योगपती आहेत. त्यामुळे ते कुठल्याही "हाईप"च्या आहारी जाणार नाहींत याची मला खात्री आहे.
माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या कंपन्यांत त्यांच्या मुलाखेरीज एकही नातेवाईक नोकरीला नाहीं. सौ. उषा मित्तल सुराबायाला बारीक-सारीक जबाबदार्या घेत असत, पण फारशा गुंतलेल्या नसत.
खरे तर श्री लक्ष्मी निवास मित्तल (L N Mittal) हे त्यावेळी 'निवासबाबू' होते, अद्याप 'लक्ष्मी' झालेले नव्हते!
31 Oct 2010 - 9:10 am | सुधीर काळे
निव्वळ अमेरिकाच नव्हे तर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आणि पर्यायाने पाकिस्तानी नागरिक म्हणजे आतंकवाद्यांचे बगलबच्चे हीच ढोबळ व्याख्या झाली आहे.
इंद्रजीत-जी, तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्या मुद्द्याच्या समर्थनार्थ (जरी थोडेसे भरकटलेले असले तरी) 'डॉन'मधील हे पत्र वाचण्यासारखे आहे! आता पाकिस्तानीच या दहशतवादाला विटले आहेत व परदेशातील त्यांच्या प्रतिमेबद्दल काळजीत आहेत हे उघड आहे.
http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp...
31 Oct 2010 - 9:27 am | गांधीवादी
दिवाळी आणखीनच गोड. अभिनंदन.
31 Oct 2010 - 9:52 am | मदनबाण
पाकड्यांची सध्याची परिस्थीती बघता...आपल्या टाळक्याला त्रास होण्याची शक्यताच जास्त आहे.
कारण ज्या वेळी आपण पहिल्यांदा अणुस्फोट केले त्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांनी "आम्ही गवत खाऊन राहू, पण अणुबॉम्ब मिळवू," असे म्हटले होते.
आजच्या घडीला पाकिस्तानजवळ ७०-९० तर भारताजवळ ६०-८० अणू बॉम्ब असल्याचा अंदाज आहे...
चीनी मंत्र्यांनी आम्हाला ५० किलो संपन्न युरेनियम दिले असे खान यांनी त्यांच्या हस्त लिखितात म्हंटले आहे.
दिवसेन दिवस पाकडे अणू बॉम्बची संख्या वाढवण्यात गुंतले आहेत...
आता माकडाच्या हातात कोलीत लागले तर काय होईल? आपल्याला सर्वात मोठा धोका चीन कडुन जरी असला तरी सुद्धा पाकिस्तानी तालिबानी लढवय्यांचा वापर करुन आपल्या विरुद्ध अणवस्त्रांचा वापर करु शकतील ही शक्यता दिवसेन दिवस वाढत चालली आहे.
पाकिस्तानात जितकी अस्थिरता वाढेल तितकी ती आपल्या देशासाठी काळजीची गोष्ट ठरणार आहे हे नक्की... :(
अवांतर :---- हा लेख वाचण्यासारखा आहे. :)
http://amitjoshitrekker.blogspot.com/2010/02/blog-post_26.html
31 Oct 2010 - 10:15 am | सुधीर काळे
मदनबाण-जी,
अगदी माझ्या मनातलं बोललात!
मी मागे म्हटलं होतं कीं भारताचा उपयोग Target practice अशा स्वरूपात करून शेवटी हल्ले होतील पाश्चात्य राष्ट्रांवर व अमेरिकेवर. "आमच्या हातात अण्वस्त्रें आली तर आम्ही ती अमेरिकेवर डागू" असे विधान अल कायदाचे (त्यावेळचे पण आता मरहूम) नं. ३ नेते मुस्ताफा अबुल-याझीद केलेच होते. (http://www.misalpav.com/node/8315)
पाकिस्तानच्या शस्त्रागारातील अण्वस्त्रें जेंव्हां अल कायदाच्या अतिरेक्यांच्या हाती पडतील त्यावेळी काय होईल?
याबाबत 'न्यूक्लियर डिसेप्शन'च्या १९व्या प्रकरणातील शेवटचा भाग वाचनीय आहे त्यात 'अल-कायदा'च्या २०२० पर्यंतच्या महत्वाकांक्षी योजनेची (Vision) सर्व धर्माच्या लोकांना काळजीत टाकणारी माहिती आहे. (त्या 'महत्वाकांक्षी योजने'त भारताचा मात्र उल्लेख नाहींय्, पण 'अल कायदा'च्या रडारवर जरी भारत नसला तरी पाकिस्तानच्या रडारवर असणारच!)
31 Oct 2010 - 10:54 am | इन्द्र्राज पवार
"....आरारारारारा....... अजूनही वेळ गेलेली नाही त्या मुलीला तथाकथित डाव्या विचारसरणीच्या पाकातून बुडवून काढण्याची. ...."
~~ श्री.प्रदीप यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि संतुलित विचाराच्या सदस्याने "...आरारारारारा..." सारखी ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा मारणार्यासम पातळी या विषयासंदर्भात गाठावी याचा मनस्वी खेद होत आहे.
कसल्या डाव्या विचारसरणीची तुम्ही कथा सांगत आहात, हे मला कळेल का? जे.एन.यू. दिल्लीत मी दोन वर्षे काढलेली आहेत, तिथल्या विविध चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे, संसद सदस्य तिथे वारंवार भेटत असतात, त्यांच्यासमोर अनेक प्रकारे, (स्वतंत्र, गटाने) संवाद साधले आहे. मला तर ते स्थळ लोकशाहीच्या वाढीचे एक निकोप केन्द्र वाटले आहे....नव्हे आहेच. आता डावे, उजवे, कुंपणावरचे, लिप्त, अलिप्त शिक्षणाच्या कुठल्या क्षेत्रात नाहीत? २५ ते ३० राष्ट्रातील युवकयुवती तिथे येत असतात, साहजिकच ते आपल्यासमवेत आपल्या देशाची संस्कृती, विचार, मतप्रणाली तिथे आणणारच ना? निर्भेळ मनाने त्यांचे विचार समजून घेणे, आपल्याकडीच विचारांची, प्रणालीची त्यांच्या समवेत देवाणघेवाण करणे.....यात वावगे काय आहे, प्रदीप जी? बरे, चला वादाकरीता मानून चालू की, आहे तिथे तुम्ही म्हणता ती तथाकथित डाव्या विचारसरणी.... पण त्यामुळे देशाची कोणत्या हिताला बाधा पोहोचते, हे तुम्ही सांगाल? कोणत्या प्रकारचा पाक तुम्हाला तिथे आढळला हे तरी मला समजू द्या.
बर्मिंगहॅमच्या त्या जोडप्याने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तिथे प्रवेश घेण्याचे जे नक्की केले आहे, ते काय तिथल्या वातावरणाचा अभ्यास केल्याशिवाय? एक इन्द्रराज पवार नावाची व्यक्ती भारतातून त्यांना जेएनयूबद्दल सांगते म्हणून थोडेच ते तसा निर्णय घेतील काय?
तिच गोष्ट लक्ष्मी मित्तल यांची ~~
का करू नये भारतीयांनी त्यांच्या कर्तृत्व हाईपची गोष्ट? ब्रिटिश युवावर्ग इंग्लंडमध्ये अन्यत्र अर्ज करीत असणारच...पण एका भारतीयाच्या हाताखाली काम करण्यास ते उत्सुक आहे, यात आपल्या देशाचे चित्र चांगले रंगविले जाईल का विरोधाचे? श्री.सुधीर काळे यांनी दिलेले त्यांचे स्वत:चे उदाहरण मित्तल यशगाथाच सांगते ना? आज IBM, Intel, Microsoft येथील भारतीयांची टक्केवारी खुद्द अमेरिकेला चिंतेची बाब वाटत आहे, ही बाब हाईप करण्यासारखी नाही?
मला वाईट वाटते ते अशासाठी की सर्वार्थाने सीनिअर असलेल्या एका सदस्याला हे सांगावे लागत आहे.
असो.
इन्द्रा
31 Oct 2010 - 3:16 pm | प्रदीप
जे. एन, यु. च्या संदर्भात तुमचे मन दुखावले गेले असल्यास मी तुमची सपशेल माफी मागतो. पण दोन गोष्टी नमूद जरूर करू इच्छितो. पहिली, मी पडलो तद्दन शहरी माणूस. त्यामुळे 'ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा' कशा शब्दात मारतात ह्याविषयी मी संपूर्ण अनभिज्ञ आहे. तरीही 'आरारारारा...' ह्यात 'ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा मारणार्यासम पातळी' (पक्षी: काही हीन, हिणकस वगैरे) आहे, हे मी मानत नाही. दुसरी, 'जे. एन. यु. त [मला आक्षेपार्ह अॅक्टिव्हीटीज चालतात] त्यामुळे "देशाची कोणत्या हिताला बाधा पोहोचते" असे मी काहीच म्हटलेले नाही.
का करू नये भारतीयांनी त्यांच्या कर्तृत्व हाईपची गोष्ट? ब्रिटिश युवावर्ग इंग्लंडमध्ये अन्यत्र अर्ज करीत असणारच...पण एका भारतीयाच्या हाताखाली काम करण्यास ते उत्सुक आहे, यात आपल्या देशाचे चित्र चांगले रंगविले जाईल का विरोधाचे?
मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे अनेक भारतीय व्यक्ति, कंपन्या, संस्था तसेच काँग्लोमेरेट्स आदरणीय आहेत, त्यांविषयी प्रत्येक भारतीयाने जरूर अभिमान बाळगावा. पण अभिमान असणे एक गोष्ट आहे आणी 'इंग्लिश लोक त्यांच्या कंपन्यांसमोर नोकरीसाठी अर्जाची भेंडोळी घेऊन उभे आहेत' असे म्हणत त्यात काही विशेष आहे असे ध्वनित करणे ही सर्वस्वी दुसरी-- ही दुसरी गोष्ट माझ्य्या तरी लेखी हाईप ह्या सदरात मोडते. इंग्लंडमधे कार्यरत असलेल्या आर्सेलोर मित्तल ह्या कंपनीत तेथील स्थानिक लोक काम करू इच्छितात, ह्यात गर्व बाळगण्यासारखे नक्की काय आहे?
माझा स्वतःचा काही कारणानिमित्य अमेरिकन्स आणि युरोप (केवळ इंग्लंडच नव्हे तर स्वीडन, नॉर्वे, जर्मनी आणि हॉलंड) येथील Educationally Elite Faculties समवेत खूप पत्रव्यवहार होत असतो. हे लोक त्या त्या देशात त्यांच्या क्षेत्रात नावाजलेले आहेत, आणि त्यांच्या पत्रातून ज्यावेळी Indian Brain Power बद्दल जे काही वाचायला मिळते त्यावेळी माझे मन आनंदाने फुलून येते.
तुमचे मन आनंदाने फुलून येते त्यामुळे ते तूर्तास तरी तसेच राहू दे. तेव्हा हा विषयी मी इथे थांबवतो. ह्या विषयातील माझी निरीक्षणे तुमच्यापेक्षा थोडी वेगळी आहेत इतकेच इथे नमूद करतो.
1 Nov 2010 - 10:46 am | इन्द्र्राज पवार
माफीचा मुद्दा चुकूनही मनात आणू नका प्रदीप जी. तुमच्यासारख्या वरिष्ठाने तसे म्हटल्याने मी आत्ता नक्कीच खजील झालो आहे कारण माझी तितपत बिलकुल पात्रता नाही....असो.
"...तरीही 'आरारारारा...' ह्यात 'ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा मारणार्यासम पातळी' (पक्षी: काही हीन, हिणकस वगैरे) आहे, हे मी मानत नाही...."
इथे शहरी, निमशहरी, ग्रामीण हे मुद्दे गैरलागू आहेत. कारण शब्दाच्या योजनातून जो ध्वनी प्रतीत होतो त्याला अमुक एका प्रादेशिकततेचा वा मातीचा गंध असतो असे नसून त्याचे प्रयोजन कोणत्या संदर्भात केले गेले आहे ते पाहणे भाषाविज्ञान शिकविते. "आरारारारा...." हे एक्स्प्रेशन जरी हीन, हिणकस दर्शवित नसले तरी ते 'हेटाळणी' युक्त नक्कीच आहे....(आणि तोच भाव जेएनयू संदर्भात तुमच्या त्या वाक्यात उमटला आहे असे मी मानतो....)
....यावर आता वाद नको....तुमची तिथल्या वातावरणासंबंधी जी मते असतील तीचे मी खंडन करणार नाही, कारण घटनेने तुम्हाला मतप्रदर्शनाचा हक्क बहाल केलेलाच आहे.... पण तशी ती इतरांचीही असावीत किंवा तशी ती बनावीत असे कुणी म्हणू नये इतकेच.....कारण जिथे शिकलो त्या जागेविषयी मी हळवा असणे साहजिकच आहे.
२. तुमचे मन आनंदाने फुलून येते त्यामुळे ते तूर्तास तरी तसेच राहू दे. तेव्हा हा विषयी मी इथे थांबवतो.
Indian Brain Power बाबत मी जे लिहिले त्याबद्दल तुमच्या वरील वाक्याला हलकी का होईना एक अपमानाची किनार आहेच....पण ती मनावर घेत नाही.....आणि सबब विषयही वाढवित नाही.
इन्द्रा
31 Oct 2010 - 1:19 pm | सुधीर काळे
मूळ धागा "पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?" हा आहे इकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो!
खरे तर निवासबाबूंच्यावर एक वेगळा लेखच लिहिला पाहिजे!
5 Nov 2010 - 4:55 pm | सुधीर काळे
एक नवी मनोरंजक माहिती http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/6870853.cms या दुव्यावर वाचा!