नव स्दस्य

pramanik's picture
pramanik in जनातलं, मनातलं
23 Oct 2010 - 10:21 pm

प्रामाणीक आपटे,
राहणारा पुणे,सध्या गुजरात
संगणकतज्ञ

मी ईथला नवीन सदस्य आहे.ह्यापुर्वी इतर मराठी वेबसाईटस वर लिखाण केले आहे.मिसळपाव.कॉम हे नावच आकर्षीत करणारे आहे.पण ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही.
काही विषयांत माझे वाचन खुप आहे,त्याच्याच जोरावर ईथे लिहेन अस ठरवुन आलोय.ईथल्या सदस्यांचे वाद व विनोदच मला ईथे घेउन आले.काही विषयांत चाललेले वाद्,काही सदस्यांचे वागणे,काही शब्दांचा वापर व लिहलेल्या धाग्याव्यतीरीक्त होणारे असंबंध लिखाण हे मला नकोसे वाटणारे घटक.

मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे.आणि ईथले व ईतर कडुन काही शब्दही उसणे घेतले आहेत.

सर्व सदस्यांनी मला त्यांच्या विचारांशी हीतगुज करायची संधी द्यावी ही विनंती करुन मी ह्या धाग्याची सांगता करतो.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

23 Oct 2010 - 10:36 pm | रन्गराव

>>ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही.

कंचा फोटू व?

pramanik's picture

23 Oct 2010 - 11:05 pm | pramanik

मिसळपावम चायाचित्र

आपले या मिपा विश्वावर स्वागत आहे..
आपणाला नकोसे वाटतात त्या घटकांची तक्रार करावी (म्हणजे मग आम्हाला व्यनी येऊन जरा आळा बसल्यासारखा होईल) हि नम्र सूचना.
आपणाला आवडलेला फोटो नवनिर्माण समितीने काढून टाकल्याने त्याचे दर्शन होत नाही.
आपले ज्या विषयात खूप वाचन आहे त्या विषयावर लिहून आमचे ज्ञानसंवर्धन करावे...प्रतिसादांची चिंता करू नये.

pramanik's picture

23 Oct 2010 - 11:06 pm | pramanik

शत प्रतिशत असहमतम

असे का बरे? आपल्या स्वागताशीच आपण असहमतम आहात !!! असो, आपली इच्छा ..
बाकी फिरंगी शब्द फोटोला संस्कृतात चायाचित्र म्हणतात याची जाणिव करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

विनोदकणिका

गंभीर होउ नये.
कृपया मिसळपाव.कॉमबद्दल माहीती द्यावी.

पुनः मिलामः

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Oct 2010 - 10:46 pm | ब्रिटिश टिंग्या

ओके

आल्या आल्या तक्रारी करण्यापेक्षा काही तरी लिहा.
नाना आताच इथेच उत्तर देतो दिवाळीत मला आपटबार खुप आवडतात.

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?

पर्नल नेने मराठे's picture

24 Oct 2010 - 12:07 pm | पर्नल नेने मराठे

आगाउ दिसतोय !!!

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?
मिपावर स्वागत.
स्वतःच पाध्ये होणे हा उत्तम उपाय आहे.
ओ भौ इतक्या लवकर एकदम ही उडी मारू नका
बाकी इथे तुम्हाला इथे बरेच नवे शब्द शिकायला मिळतील.
उदा: वीकान्त , बाडीस , चेपु , तद्माताय ,

डावखुरा's picture

23 Oct 2010 - 11:01 pm | डावखुरा

pramanik यांच्याशी प्रामाणिकपणे सहंमत...
खरच छान होता तो फोटो...

तर्री's picture

23 Oct 2010 - 11:08 pm | तर्री

आपले सहर्ष स्वागत .
भर्पूर लिहिते व्हा.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Oct 2010 - 11:20 pm | अविनाशकुलकर्णी

प्रामाणीक हे नाव कि विषेशण???
नाव असेल तर अवघड आहे..

असंस्कृत अविनाश..

असंस्कृत..संस्कृत न येणारा

नाम असु शकते का?
नाम नाही ,गुण आहे.
आपल्या कविता मायबोलीवर वाचल्यात

नावातकायआहे's picture

23 Oct 2010 - 11:29 pm | नावातकायआहे

>>आपल्या कविता मायबोलीवर वाचल्यात
-१ आणि +१ ;-)

जला तुझ रंग कोणता,
कोणी तुझ्यात पडे,
बोले तो माझा,
त्या बालकांस काय म्हणावे.

आधीचा फोटो लावणार का?

सर्व सभासदांचे धन्यवाद म्हणतो मी

सुनील's picture

23 Oct 2010 - 11:31 pm | सुनील

स्वतःच्या "प्रामाणिक" ह्या नावाला जागा म्हणतो, कसे?

बाकी तुम्ही जुनेच तेव्हा सुस्वागतम म्हणण्यात अर्थ नाही, कसे?

चालू द्या...

मला नकारार्थी प्रतिसाद का मिळत आहेत?

मी ईथे नवीन आहे,ईतर वेबसाईट्स वर ह्यापुर्वी लिखाण केल्याने केवल निर्मल विरोध करत आहे.

सर्व सद्स्यांशी माफी.
कृपया संपादकांचा संपर्क करुन द्यावा.

तुमचे खरे नाव प्रविन भप्कर आहे का?

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:02 am | शिल्पा ब

नवीन येणाऱ्या सभासदाचे स्वागतसुद्धा न करता येणाऱ्या असंस्कृत व्यक्तींकडे आपण दुर्लक्ष करावे...आपण केवळ निर्मलपणे विरोध करताहात हा आपला मोठेपणाच आहे.
काय केल्याने संपादक आपल्याशी संपर्क करतात हे कालांतराने आपणास समजेलच.

पैसा's picture

23 Oct 2010 - 11:37 pm | पैसा

मिसळपाववर स्वागत. तुम्ही लिहीत रहा. लोक प्रतिसाद देत रहातील. जर काही आक्षेपार्ह असेल तर संपादक मंडळी कार्यवाही करतात.

कृपया मिसळपाव.कॉमबद्दल माहीती द्यावी.

मला वाटतं यासाठी 'वाविप्र' हा स्वतंत्र विभाग आहे. बाकी जसेजसे तुम्ही इतरांचे लेखन वाचाल तशी तुम्हाला आपोआपच जास्त माहिती होत जाईल.

वेताळ यानी म्हटल्याप्रमाणे आपल्या लेखाचे शीर्षक 'सदस्य' असे हवे होते. अचूक लेखनासाठी मदत ''येथे' या लिंकवर मिळेल. (उजव्या बाजूच्या समासात दिसते).

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?

आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला?

शिल्पा ब's picture

23 Oct 2010 - 11:54 pm | शिल्पा ब

<<<आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला?

नावाप्रमाणेच ते प्रामाणिक असल्याकारणाने मनातील शंका विचारते झाले तर आपणास इतका का संदेह व्हावा बरे?

काय काकु, पावनं वळकीचं हाय का?

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:05 am | शिल्पा ब

आम्ही स्वतःच इथे नवीन असल्याने या महोदयांना ओळखत नाही...आपणास का बरे अशी शंका यावी?

पैसा's picture

24 Oct 2010 - 12:02 am | पैसा

आपण खातं बंद करावं असं अजून वाटलेलं नाही. एकदम नव्या माणसाला अशी शंका का यावी असं वाटलं खरं. (हे मी प्रामाणिकपणे सांगते.) अर्थात हे ही शक्य आहे, की श्री. प्रामाणिक कोणतेही काम करण्यापूर्वी सगळी माहिती आधीच घेऊन ठेवत असावेत!

मितभाषी's picture

24 Oct 2010 - 12:03 pm | मितभाषी

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?

आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला?

खोडसाळ प्रतिसाद देणार्यान्चा काटा काढायचा असेल प्रामाणिक्ला. :)

पैसा's picture

24 Oct 2010 - 1:14 pm | पैसा

पावण्याच्या काठीने साप मारणे

pramanik's picture

24 Oct 2010 - 12:24 am | pramanik

मी विनायक आपटे,पुण्याचा,गुजरातचा व मुंबईचा राहणारा.

मी ह्यापुर्वी सतत वाचनाच्या माध्यमातुन मराठी साईट्सवर येत होतो.काही ठीकाणी मी सदस्यत्व घेतले,त्यामुळे ब-याच सभासदांना मी स्वभावाने ओळखतो.काही सदस्य उगाच एखाद्याला त्रास देतात ह्याचा मला काही वेळेस क्रोध येतो.त्यांना असे का करावसे वाटते ह्याचे मला ज्ञान नाही.

अशा साईट्सचा वापर योग्य त्या कारणासाठी होत नाही अस मननं करतो.

संपादकांना संपर्क करुन आपणास ईथले नियम व मर्यादा कळतील असे वाटले,म्हणुन विचारणा केली.संपादकांमुळे लेखाचा तोल राखण्यास मदत होते असे मला ज्ञान आहे.
मला ईथे कोणी ओळखत असावे अस वाटत नाही,मी ह्या नावाचा प्रयोग कधी केलेला नाही पण मला नको त्या संज्ञेने व गृहीत धरल्याप्रमाणे का संबोधले जातेय ह्याचे मला ज्ञान नाही.

मी आयुष्यात कधी कोणाचे देणे लागत नाही.

ब्रह्मिन् शंसित शुभ

काय राव नव्या नवरीगत करताय ?
जरा चार दिवस बघुन घ्या आजुबाजूला . घर बघा , माणसं बघा.
मग एकदा चहा साखरेचे , तिखटामिठाचे गव्हा -तांदळाचे डबे माहिती झाले की मग लागा की सैपाकाला.
चार जिन्नस करुन घाला , म्हण्जे मग इथले सासूसासरे , जावा-नणदा , येणारजाणारे पण लोक वळकाय लागतील.
आल्या आल्या ह्यो मोठ्ठा कंदील !
दमानं घ्या जरा.

(हुंडाबळी) अडगळ

सविता's picture

26 Oct 2010 - 1:47 pm | सविता

बाडिस

चिगो's picture

27 Oct 2010 - 12:13 am | चिगो

फुटलो... ;-)
(च्यायला ती हसुन गडाबडा लोळणारी स्मायली कशी काढतात कोण जाणे..)

या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ;)

पहिल्याच लेखात बरीच वादग्रस्त विधान फोडणीला टाकली आहेत. (बराच अभ्यास दिसतोय ) :)
(या आयडिने) पदार्पणातच(?) तुमचा जयंद्रथ ना होवो हिच शुभेच्छा !!!

वेताळ's picture

24 Oct 2010 - 10:06 am | वेताळ

मी आयुष्यात कधी कोणाचे देणे लागत नाही.


हा नक्कीच प्रामाणिक पणाच आहे ना?

कानडाऊ योगेशु's picture

24 Oct 2010 - 1:13 am | कानडाऊ योगेशु

प्रामाणिक साहेबांचे रॅगिंग चाललेले दिसते आहे. ;)
चालु द्या!

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 1:17 am | शिल्पा ब

चालु द्या काय? कोण करतयं रे रॅगिंग?

मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे.आणि ईथले व ईतर कडुन काही शब्दही उसणे घेतले आहेत

नव स्दस्य

आपण संस्कृत भाषेला दिलेल्या या देणगीमुळे मन भरून आले.

:(

ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने .......

आपल्या ज्ञानाबद्दल कोणतिही शंका नाही. काहिंनाच समजणार नाहि ना? खूप जणांना तर समजेल.

श्वः विश्रामदिन

त्वां धन्यं वदामि हि प्रतिसाद

मी विनोद करतोय अस मी वरच लिहल आहे.आज मला फावला वेळ का आहे,हे हे मी आता सांगितल की नाही?

चालु घडामोडींना लेखात प्राधान्य द्यावे असे सुचवतो,न्यायव्यवस्थेवर चर्चा करायची आहे.

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 12:06 pm | आनन्दा

दान्ड्या हरवल्यामुळे वाक्य कुठे संपले तेच कळत नाहिये :)

(बाकी आमचे संस्कृत्चे ज्ञान यथातथाच आहे! पण उसने दाखवायला काय जाते? )

कुळाचा_दीप's picture

24 Oct 2010 - 7:14 am | कुळाचा_दीप

अरे आपण खुशाल संस्कृत मधे लिहा...

मी रोज ऋग्वेद वाचतो!

श्रावण मोडक's picture

24 Oct 2010 - 12:03 pm | श्रावण मोडक

काल शनिवार होता. ;)
दोनदोन धागे, नावातल्या गफलती, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी, संस्कृत...

मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिन धागा आहे!

न चा पाय कसा मोडायचा हो?
चु. भु. दे. घे.

मी फक्त माहीती मिळवण्यासाठी धागा लिहला आहे,आपण असंबंध लिखाण करु नये.

प्रामाणिक,
मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिनचा अर्थ हा धागा चराचर व्यापुन दशान्गुळे उर्लेला आहे.

सन्स्क्रुतचा अभ्यास कमी दिसतोय तुमचा. ;)

संस्कृतात माझे ज्ञान नाही असे समजावे

मस्तिष्कसंबन्धिन् समस्या मज झाली,
जी ह्यांस मदत मागितली

भारतात कईक समस्या आहेत्,त्याबद्दल मी लिहणार.

नावातकायआहे's picture

24 Oct 2010 - 1:10 pm | नावातकायआहे

>>काल शनिवार होता.
आन आज रविवार दुपारबी हाय .... ;-)

प्रिया देशपांडे's picture

24 Oct 2010 - 3:46 pm | प्रिया देशपांडे

आपले स्वागत आहे.
इकडे मिपावरपण एक पुणेरी संस्कृत विद्वान आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका साइटीवर संस्कृतचे धडे घेतले होते. लवकरच त्यांची ओळख होईलच.चौपाटीवरही ते संस्कृत व्याकरण शिकवतात.
पुन्हा एकदा स्वागत.

विजुभाऊ's picture

24 Oct 2010 - 4:37 pm | विजुभाऊ

इथे अजून एक विद्वान होते.
त्याना शनीमंगळ्युती भोवली

सातबारा's picture

26 Oct 2010 - 6:38 am | सातबारा

आपले स्वागत !

संस्कृत लिहीण्यापूर्वी मिसळपावचे धोरण दर्शवणारे खालील वाक्य पुन्हा पहावे.

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.

(अन्यथा सद्दाम हुसैन ला पण बोलावावे लागेल, उई ! )

सविता's picture

26 Oct 2010 - 11:50 am | सविता

आपले पुर्वाश्रमी चे नाव प्रविन्भप्कर होते काय?