Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 22:21
प्रामाणीक आपटे, राहणारा पुणे,सध्या गुजरात संगणकतज्ञ मी ईथला नवीन सदस्य आहे.ह्यापुर्वी इतर मराठी वेबसाईटस वर लिखाण केले आहे.मिसळपाव.कॉम हे नावच आकर्षीत करणारे आहे.पण ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही. काही विषयांत माझे वाचन खुप आहे,त्याच्याच जोरावर ईथे लिहेन अस ठरवुन आलोय.ईथल्या सदस्यांचे वाद व विनोदच मला ईथे घेउन आले.काही विषयांत चाललेले वाद्,काही सदस्यांचे वागणे,काही शब्दांचा वापर व लिहलेल्या धाग्याव्यतीरीक्त होणारे असंबंध लिखाण हे मला नकोसे वाटणारे घटक. मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे.आणि ईथले व ईतर कडुन काही शब्दही उसणे घेतले आहेत. सर्व सदस्यांनी मला त्यांच्या विचारांशी हीतगुज करायची संधी द्यावी ही विनंती करुन मी ह्या धाग्याची सांगता करतो.
  • Log in or register to post comments
  • 6482 views

प्रतिक्रिया

Submitted by रन्गराव on Sat, 10/23/2010 - 22:36

Permalink

स्वागत

>>ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही. कंचा फोटू व?
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:05

In reply to स्वागत by रन्गराव

Permalink

मिसळपावम चायाचित्र

मिसळपावम चायाचित्र
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 10/23/2010 - 22:42

Permalink

आपले या मिपा विश्वावर स्वागत

आपले या मिपा विश्वावर स्वागत आहे.. आपणाला नकोसे वाटतात त्या घटकांची तक्रार करावी (म्हणजे मग आम्हाला व्यनी येऊन जरा आळा बसल्यासारखा होईल) हि नम्र सूचना. आपणाला आवडलेला फोटो नवनिर्माण समितीने काढून टाकल्याने त्याचे दर्शन होत नाही. आपले ज्या विषयात खूप वाचन आहे त्या विषयावर लिहून आमचे ज्ञानसंवर्धन करावे...प्रतिसादांची चिंता करू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:06

In reply to आपले या मिपा विश्वावर स्वागत by शिल्पा ब

Permalink

शत प्रतिशत असहमतम

शत प्रतिशत असहमतम
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 10/23/2010 - 23:12

In reply to शत प्रतिशत असहमतम by pramanik

Permalink

असे का बरे? आपल्या स्वागताशीच

असे का बरे? आपल्या स्वागताशीच आपण असहमतम आहात !!! असो, आपली इच्छा .. बाकी फिरंगी शब्द फोटोला संस्कृतात चायाचित्र म्हणतात याची जाणिव करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:15

In reply to असे का बरे? आपल्या स्वागताशीच by शिल्पा ब

Permalink

विनोदकणिका गंभीर होउ

विनोदकणिका गंभीर होउ नये. कृपया मिसळपाव.कॉमबद्दल माहीती द्यावी. पुनः मिलामः
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Sat, 10/23/2010 - 22:46

Permalink

ओके

ओके
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 10/23/2010 - 23:00

Permalink

धाग्याचे नाव संस्कृतमध्ये बरोबर लिहले आहे ना?

आल्या आल्या तक्रारी करण्यापेक्षा काही तरी लिहा. नाना आताच इथेच उत्तर देतो दिवाळीत मला आपटबार खुप आवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:08

In reply to धाग्याचे नाव संस्कृतमध्ये बरोबर लिहले आहे ना? by वेताळ

Permalink

एखाद्या सदस्याचे खाते काढुन

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 10/24/2010 - 12:07

In reply to एखाद्या सदस्याचे खाते काढुन by pramanik

Permalink

आगाउ दिसतोय !!!

आगाउ दिसतोय !!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 10/24/2010 - 16:28

In reply to एखाद्या सदस्याचे खाते काढुन by pramanik

Permalink

एखाद्या सदस्याचे खाते काढुन

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा? मिपावर स्वागत. स्वतःच पाध्ये होणे हा उत्तम उपाय आहे. ओ भौ इतक्या लवकर एकदम ही उडी मारू नका बाकी इथे तुम्हाला इथे बरेच नवे शब्द शिकायला मिळतील. उदा: वीकान्त , बाडीस , चेपु , तद्माताय ,
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Sat, 10/23/2010 - 23:01

Permalink

pramanik यांच्याशी

pramanik यांच्याशी प्रामाणिकपणे सहंमत... खरच छान होता तो फोटो...
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Sat, 10/23/2010 - 23:08

Permalink

सुस्वागतम.

आपले सहर्ष स्वागत . भर्पूर लिहिते व्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 10/23/2010 - 23:20

Permalink

प्रामाणीक हे नाव कि

प्रामाणीक हे नाव कि विषेशण??? नाव असेल तर अवघड आहे.. असंस्कृत अविनाश.. असंस्कृत..संस्कृत न येणारा
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:24

In reply to प्रामाणीक हे नाव कि by अविनाशकुलकर्णी

Permalink

नाम असु शकते का? नाम नाही

नाम असु शकते का? नाम नाही ,गुण आहे. आपल्या कविता मायबोलीवर वाचल्यात
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sat, 10/23/2010 - 23:29

In reply to नाम असु शकते का? नाम नाही by pramanik

Permalink

-१ आणि +१

>>आपल्या कविता मायबोलीवर वाचल्यात -१ आणि +१ ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:31

In reply to -१ आणि +१ by नावातकायआहे

Permalink

जला तुझ रंग कोणता, कोणी

जला तुझ रंग कोणता, कोणी तुझ्यात पडे, बोले तो माझा, त्या बालकांस काय म्हणावे.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:27

Permalink

नाम असु शकते का? नाम नाही

आधीचा फोटो लावणार का? सर्व सभासदांचे धन्यवाद म्हणतो मी
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 10/23/2010 - 23:31

Permalink

हॅ हॅ हॅ

स्वतःच्या "प्रामाणिक" ह्या नावाला जागा म्हणतो, कसे? बाकी तुम्ही जुनेच तेव्हा सुस्वागतम म्हणण्यात अर्थ नाही, कसे? चालू द्या...
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sat, 10/23/2010 - 23:36

In reply to हॅ हॅ हॅ by सुनील

Permalink

मला नकारार्थी प्रतिसाद का

मला नकारार्थी प्रतिसाद का मिळत आहेत? मी ईथे नवीन आहे,ईतर वेबसाईट्स वर ह्यापुर्वी लिखाण केल्याने केवल निर्मल विरोध करत आहे. सर्व सद्स्यांशी माफी. कृपया संपादकांचा संपर्क करुन द्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 10/23/2010 - 23:47

In reply to मला नकारार्थी प्रतिसाद का by pramanik

Permalink

तुमचे खरे नाव प्रविन भप्कर

तुमचे खरे नाव प्रविन भप्कर आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 10/24/2010 - 00:02

In reply to मला नकारार्थी प्रतिसाद का by pramanik

Permalink

नवीन येणाऱ्या सभासदाचे

नवीन येणाऱ्या सभासदाचे स्वागतसुद्धा न करता येणाऱ्या असंस्कृत व्यक्तींकडे आपण दुर्लक्ष करावे...आपण केवळ निर्मलपणे विरोध करताहात हा आपला मोठेपणाच आहे. काय केल्याने संपादक आपल्याशी संपर्क करतात हे कालांतराने आपणास समजेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 10/23/2010 - 23:37

Permalink

प्रामाणिक

मिसळपाववर स्वागत. तुम्ही लिहीत रहा. लोक प्रतिसाद देत रहातील. जर काही आक्षेपार्ह असेल तर संपादक मंडळी कार्यवाही करतात.
कृपया मिसळपाव.कॉमबद्दल माहीती द्यावी.
मला वाटतं यासाठी 'वाविप्र' हा स्वतंत्र विभाग आहे. बाकी जसेजसे तुम्ही इतरांचे लेखन वाचाल तशी तुम्हाला आपोआपच जास्त माहिती होत जाईल. वेताळ यानी म्हटल्याप्रमाणे आपल्या लेखाचे शीर्षक 'सदस्य' असे हवे होते. अचूक लेखनासाठी मदत ''येथे' या लिंकवर मिळेल. (उजव्या बाजूच्या समासात दिसते).
एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा?
आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 10/23/2010 - 23:54

In reply to प्रामाणिक by पैसा

Permalink

<<<आल्या आल्याच हा प्रश्न का

<<<आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला? नावाप्रमाणेच ते प्रामाणिक असल्याकारणाने मनातील शंका विचारते झाले तर आपणास इतका का संदेह व्हावा बरे?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 10/23/2010 - 23:59

In reply to <<<आल्या आल्याच हा प्रश्न का by शिल्पा ब

Permalink

काय काकु, पावनं वळकीचं हाय

काय काकु, पावनं वळकीचं हाय का?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 10/24/2010 - 00:05

In reply to काय काकु, पावनं वळकीचं हाय by Nile

Permalink

आम्ही स्वतःच इथे नवीन

आम्ही स्वतःच इथे नवीन असल्याने या महोदयांना ओळखत नाही...आपणास का बरे अशी शंका यावी?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 10/24/2010 - 00:02

In reply to <<<आल्या आल्याच हा प्रश्न का by शिल्पा ब

Permalink

मला तरी

आपण खातं बंद करावं असं अजून वाटलेलं नाही. एकदम नव्या माणसाला अशी शंका का यावी असं वाटलं खरं. (हे मी प्रामाणिकपणे सांगते.) अर्थात हे ही शक्य आहे, की श्री. प्रामाणिक कोणतेही काम करण्यापूर्वी सगळी माहिती आधीच घेऊन ठेवत असावेत!
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sun, 10/24/2010 - 12:03

In reply to प्रामाणिक by पैसा

Permalink

@ पैसातै,

एखाद्या सदस्याचे खाते काढुन टाकायचे असल्यास कोणाला संपर्क करावा? आल्या आल्याच हा प्रश्न का विचारावासा वाटला बॉ तुम्हाला? खोडसाळ प्रतिसाद देणार्यान्चा काटा काढायचा असेल प्रामाणिक्ला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 10/24/2010 - 13:14

In reply to @ पैसातै, by मितभाषी

Permalink

यालाच म्हणतात

पावण्याच्या काठीने साप मारणे
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sun, 10/24/2010 - 00:24

Permalink

परीचय

मी विनायक आपटे,पुण्याचा,गुजरातचा व मुंबईचा राहणारा. मी ह्यापुर्वी सतत वाचनाच्या माध्यमातुन मराठी साईट्सवर येत होतो.काही ठीकाणी मी सदस्यत्व घेतले,त्यामुळे ब-याच सभासदांना मी स्वभावाने ओळखतो.काही सदस्य उगाच एखाद्याला त्रास देतात ह्याचा मला काही वेळेस क्रोध येतो.त्यांना असे का करावसे वाटते ह्याचे मला ज्ञान नाही. अशा साईट्सचा वापर योग्य त्या कारणासाठी होत नाही अस मननं करतो. संपादकांना संपर्क करुन आपणास ईथले नियम व मर्यादा कळतील असे वाटले,म्हणुन विचारणा केली.संपादकांमुळे लेखाचा तोल राखण्यास मदत होते असे मला ज्ञान आहे. मला ईथे कोणी ओळखत असावे अस वाटत नाही,मी ह्या नावाचा प्रयोग कधी केलेला नाही पण मला नको त्या संज्ञेने व गृहीत धरल्याप्रमाणे का संबोधले जातेय ह्याचे मला ज्ञान नाही. मी आयुष्यात कधी कोणाचे देणे लागत नाही. ब्रह्मिन् शंसित शुभ
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on Sun, 10/24/2010 - 01:02

In reply to परीचय by pramanik

Permalink

नववधू प्रिया मी बावरते ....

काय राव नव्या नवरीगत करताय ? जरा चार दिवस बघुन घ्या आजुबाजूला . घर बघा , माणसं बघा. मग एकदा चहा साखरेचे , तिखटामिठाचे गव्हा -तांदळाचे डबे माहिती झाले की मग लागा की सैपाकाला. चार जिन्नस करुन घाला , म्हण्जे मग इथले सासूसासरे , जावा-नणदा , येणारजाणारे पण लोक वळकाय लागतील. आल्या आल्या ह्यो मोठ्ठा कंदील ! दमानं घ्या जरा. (हुंडाबळी) अडगळ
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Tue, 10/26/2010 - 13:47

In reply to नववधू प्रिया मी बावरते .... by अडगळ

Permalink

+१

बाडिस
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 10/27/2010 - 00:13

In reply to नववधू प्रिया मी बावरते .... by अडगळ

Permalink

ठॉ ठ्ठॉ ठ्ठ्ठॉ...

फुटलो... ;-) (च्यायला ती हसुन गडाबडा लोळणारी स्मायली कशी काढतात कोण जाणे..)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sun, 10/24/2010 - 01:06

In reply to परीचय by pramanik

Permalink

या प्रतिसादासाठी एकदा जोरदार

या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ;) पहिल्याच लेखात बरीच वादग्रस्त विधान फोडणीला टाकली आहेत. (बराच अभ्यास दिसतोय ) :) (या आयडिने) पदार्पणातच(?) तुमचा जयंद्रथ ना होवो हिच शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 10/24/2010 - 10:06

In reply to परीचय by pramanik

Permalink

निदान नावाला तरी जागा.

मी आयुष्यात कधी कोणाचे देणे लागत नाही. हा नक्कीच प्रामाणिक पणाच आहे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 10/24/2010 - 01:13

Permalink

प्रामाणिक साहेबांचे रॅगिंग

प्रामाणिक साहेबांचे रॅगिंग चाललेले दिसते आहे. ;) चालु द्या!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 10/24/2010 - 01:17

In reply to प्रामाणिक साहेबांचे रॅगिंग by कानडाऊ योगेशु

Permalink

चालु द्या काय? कोण करतयं रे

चालु द्या काय? कोण करतयं रे रॅगिंग?
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 10/24/2010 - 01:48

Permalink

धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे???????????

मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे.आणि ईथले व ईतर कडुन काही शब्दही उसणे घेतले आहेत नव स्दस्य आपण संस्कृत भाषेला दिलेल्या या देणगीमुळे मन भरून आले. :( ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने ....... आपल्या ज्ञानाबद्दल कोणतिही शंका नाही. काहिंनाच समजणार नाहि ना? खूप जणांना तर समजेल.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sun, 10/24/2010 - 01:59

In reply to धाग्याचे नाव संस्कृतमधे लिहले आहे??????????? by चिंतामणी

Permalink

श्वः विश्रामदिन त्वां धन्यं

श्वः विश्रामदिन त्वां धन्यं वदामि हि प्रतिसाद मी विनोद करतोय अस मी वरच लिहल आहे.आज मला फावला वेळ का आहे,हे हे मी आता सांगितल की नाही? चालु घडामोडींना लेखात प्राधान्य द्यावे असे सुचवतो,न्यायव्यवस्थेवर चर्चा करायची आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 10/24/2010 - 12:06

In reply to श्वः विश्रामदिन त्वां धन्यं by pramanik

Permalink

दान्ड्या हरवल्यामुळे

दान्ड्या हरवल्यामुळे वाक्य कुठे संपले तेच कळत नाहिये :) (बाकी आमचे संस्कृत्चे ज्ञान यथातथाच आहे! पण उसने दाखवायला काय जाते? )
  • Log in or register to post comments

Submitted by कुळाचा_दीप on Sun, 10/24/2010 - 07:14

Permalink

प्रणाम मोहोदय

अरे आपण खुशाल संस्कृत मधे लिहा... मी रोज ऋग्वेद वाचतो!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 10/24/2010 - 12:03

Permalink

काल

काल शनिवार होता. ;) दोनदोन धागे, नावातल्या गफलती, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी, संस्कृत...
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 10/24/2010 - 12:11

In reply to काल by श्रावण मोडक

Permalink

मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिन

मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिन धागा आहे! न चा पाय कसा मोडायचा हो? चु. भु. दे. घे.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sun, 10/24/2010 - 12:17

In reply to मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिन by आनन्दा

Permalink

मी फक्त माहीती मिळवण्यासाठी

मी फक्त माहीती मिळवण्यासाठी धागा लिहला आहे,आपण असंबंध लिखाण करु नये.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sun, 10/24/2010 - 12:24

In reply to मी फक्त माहीती मिळवण्यासाठी by pramanik

Permalink

प्रामाणिक, मष्तिक्वोर्ध्वदशान

प्रामाणिक, मष्तिक्वोर्ध्वदशान्गुल्गामिनचा अर्थ हा धागा चराचर व्यापुन दशान्गुळे उर्लेला आहे. सन्स्क्रुतचा अभ्यास कमी दिसतोय तुमचा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Sun, 10/24/2010 - 12:42

In reply to प्रामाणिक, मष्तिक्वोर्ध्वदशान by मितभाषी

Permalink

संस्कृतात माझे ज्ञान नाही असे

संस्कृतात माझे ज्ञान नाही असे समजावे मस्तिष्कसंबन्धिन् समस्या मज झाली, जी ह्यांस मदत मागितली भारतात कईक समस्या आहेत्,त्याबद्दल मी लिहणार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sun, 10/24/2010 - 13:10

In reply to काल by श्रावण मोडक

Permalink

+१

>>काल शनिवार होता. आन आज रविवार दुपारबी हाय .... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रिया देशपांडे on Sun, 10/24/2010 - 15:46

Permalink

प्रामाणिक

आपले स्वागत आहे. इकडे मिपावरपण एक पुणेरी संस्कृत विद्वान आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका साइटीवर संस्कृतचे धडे घेतले होते. लवकरच त्यांची ओळख होईलच.चौपाटीवरही ते संस्कृत व्याकरण शिकवतात. पुन्हा एकदा स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 10/24/2010 - 16:37

Permalink

इथे अजून एक विद्वान

इथे अजून एक विद्वान होते. त्याना शनीमंगळ्युती भोवली
  • Log in or register to post comments

Submitted by सातबारा on Tue, 10/26/2010 - 06:38

Permalink

आपले स्वागत !

आपले स्वागत ! संस्कृत लिहीण्यापूर्वी मिसळपावचे धोरण दर्शवणारे खालील वाक्य पुन्हा पहावे. अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. (अन्यथा सद्दाम हुसैन ला पण बोलावावे लागेल, उई ! )
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com