बतावणी

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
18 Apr 2008 - 8:09 am

स्थळ - विष्णुलोक

नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?"
विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?"
नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!"
विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! "
नारद (चमकून) : "काय म्हणालात?"
विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी"
नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्‍या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना! चिंतेने तीन रात्री झोप नाही!"
विष्णू : "हम्म्म्म्..वाटतोय खरा चेहरा चिंताक्रांत आणि जागरणाने ओढल्यासारखा."
नारद : "तेव्हा असं ठरवतोय की यमलोकात जाऊन यमालाच भेटेन म्हणतो. तोच देऊ शकेल ना आत्म्याचे ज्ञान?"
विष्णू : "यमलोकात? ते कशाला? आणि हातात ते जाडजूड पुस्तक कोणते आहे?"
नारद : "हो अरे खरंच हे सांगायचेच विसरलो. हे कठोपनिषद, ह्यात ते नचिकेताचे आख्यान आहे ना? त्यात वाचूनच तर मला कल्पना सुचली की आपणही असेच यमाकडे जाऊन ज्ञान का मागू नये?"
विष्णू : (मोठ्याने हसतात) "हा..हा.हा.हा...."
नारद : "काय झालं? असे हसताय का? काही चुकीचे बोललो का मी?"
विष्णू: "अहो मुनिवर चुकीचे नाही तर काय? एकदम सपशेल चुकीचे आणि निरुपयोगी!"
नारद : " देवा, आपण काय बोलता आहात आपल्याला समजते आहे का? अहो हे नचिकेताचे आख्यान आहे ह्यातून गहन आत्मज्ञानाचा मार्ग किती सोपा करुन सांगितला आहे आपल्या ऋषीमुनिंनी".
विष्णू :" थूत्..तुमच्या ते..रां**नो!!"
नारद (दचकून, हातातली पडणारी वीणा सावरत) : "देवा....देवा..अहो काय हे शिव शिव शिव..काय ही शिवराळ भाषा.."
विष्णू : "माफी असावी मुनिवर पण माझ्याचाने राहवले नाही. अहो कसले बोडक्याचे आत्मज्ञान आणि कसले काय? कुणी पाहिलाय हो आत्मा? तुम्ही पाहिलाय? नाही ना? मग काय. ते आपले मुनिवर लिहीत सुटले काहीतरी आणि तुम्ही त्यांच्या बहकाव्यात आलात म्हणजे काय! अहो साधी गोष्ट आहे, एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान! बाकी दुसरं तिसरं काही नसतं! "
नारद (अचंबित होत) : "असं म्हणताय? हे तर काही मला उमगेना..सगळंच गोलगोल फिरल्यासारखं होतंय!"
विष्णू (टाळी वाजवून) : " कोण आहे रे तिकडे? अरे मुनिवरांना जरा सोमरस पाजा, आणि हो सिंगलमाल्टवालाच द्या उगीच भलतासलता नको!"
नारद : (सोमरस घेऊन तोंड पुसत) : "आहा! आत्ता कसं आल्हाददायक वाटतंय! बरं देवा मी निघतो."
विष्णू : "कुठे जायचंय"?
नारद : "आता मर्त्यलोकात एक चक्कर टाकून यावी म्हणतो."
विष्णू : " अरे वा! अहो मग चाललाच आहात तर तिथे सुध्दा आत्मज्ञान मिळेल!"
नारद : "तिथे? ते कसे बुवा?"
विष्णू : "मुनिवर आपण काळाच्या फार मागे आहात! अहो देवलोकात मिळणारे आत्मज्ञान फक्त सत्ययुगात होते. आताचे कलियुग आहे. तेव्हा सरळ ठाण्याला जा. मालवणी हॉटेलात पोहोचा. तिथे काही संतपदाला पोचलेली मंडळी सिंगलमाल्ट सोमरस घेताना दिसतील त्यांच्यासमवेत बसा, ऐसपैस गप्पा करुन समोर आलेल्या सुरमईचा यथेच्च समाचार घेत आत्मज्ञान घ्या, कसें!!"
नारद : "अरे बाप रे! माझी ऑपरेटिंग सिस्टिम एकदमच कंडम झाली म्हणायची की. इकडे विस्टा चालू आहे आणि मी आपला एम्.एस्.डॉस मधेच! अरेच्चा, आणि तो गरुड काय धरुन बसलाय ते चोचीत?"
विष्णू : "कोण तो होय? अहो मी ही परवाच भेट देऊन आलो ना ठाण्याला, तेव्हा मालवणीमधून एक अख्खी सुरमईची टोपलीच उचलून आणलीन त्याने. रोज एकेक घेऊन चघळत बसलेला असतो! आत्मज्ञानी झाल्यासारखं वाटतंय म्हणत होता!"
नारद : "छे, छे, छे. आता मला काहीच सहन होत नाहीये. जातो कसा."

चतुरंग
(डिसक्लेमर - ह्यातील घटनांशी दुसर्‍या कोणत्या लोकांत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!) ह्.घ्या.

साहित्यिकविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2008 - 8:26 am | पिवळा डांबिस

झालं? आपल्या नादाने चतुरंगही बिघडला रे, तात्या!!
आता लागली का वाट?
साक्षात श्रीविष्णुंची टायली करतो! आता कसला स्वर्ग मिळतो याला!!:))
आता बस म्हणावं नरकात आमच्याबरोबर! एकही थेंब न पिता पूर्ण शुद्धीवर राहून कोणी कसले आणि किती प्याले घेतले त्याची मोजदाद करीत!!
आम्हालाही नाहीतरी एक भरवशाचा "डेसिग्नेटेड ड्रायव्हर" हवाच होता!!!
चिअर्स!!
:)))

विजुभाऊ's picture

18 Apr 2008 - 8:40 am | विजुभाऊ

(डिसक्लेमर - ह्यातील घटनांशी दुसर्‍या कोणत्या लोकांत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!)
हे ब्येष्ट की देवा.
अहो साधी गोष्ट आहे, एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान! बाकी दुसरं तिसरं काही नसतं
विष्णुनी उमरख्याम च्या रुबाया पुराणाचे वाचन चालु केले असावे. बस्स और क्या चाहीये दिल बहेलाने के लिये.
आता जरा क्लासमधल्या नोट्स वाचुन लिहितो.
लेख तसा पसरट आहे अधुन मधुन आत्मा उपनिषद असे जड जाड शब्द वापरुन लेखाला घनता आणण्याचा प्रयत्न बरा आहे. दोस्तोवस्की आणि उसनेवस्की चे द ना शब्द रेषे ने लिहिलेले मी आणि दोस्तोवस्कींचे शौच कूप या लेखाची आठवण होते.
मुनिवरांना जरा सोमरस पाजा, आणि हो सिंगलमाल्टवालाच यालाच भारतिय आणि पाश्चात्य संस्कृतीचे फ्युजन म्हणता येइल.सध्या हे फ्याड जरा बोकाळले आहे. तरी पण या ला तो लीअरी जबरावस्की आणि सार्त्र ज्यां पोळ यांचे लिखाणचा जबरदस्त पगडा असल्याशिवाय असे लिखाण होणे आवघड आहे.
कोठे कोठे लेखाची उन्ची खालावते आणि लेखकाची जाडी रुन्दावते आहे असे भासते. पण थूत्..तुमच्या ते..रां**नो!!" या वर्णाने तानाजी मालुसर्‍याच्या भावाचे सूर्याजी चे दोर कापतानाचे उद्गार" थूत तुमच्या जिनगानीवर " यांची सरमिसळ मिपा नगरातल्या एका लेखाकाच्या बाकी उद्गारांशी केली आहे. परन्तु या मुळे लेख वास्ताविक भासतो.
धूसर वर्णानातुन पात्राना प्राचीन आर्य नावेदेउन आनार्य पणे वागायला लावणे हे त्यातल्या त्यात बरे जमले आहे.अक्षरे बरोर्बर एकामागोमाग आली आहेत हे गोष्ट स्तुत्य.
प्रस्तुत लेखकाने मिपा कट्ट्याला वरचेवर ( सोमरसामुळे विमान वर गेल्यावर नव्हे. वरचे वर म्हणजे पुन्हापुन्हा संदर्भ : अमराठींसाठीचा मराठी शब्द कोष आव्रुत्ती ३७ पान ३७५ ओळ वरुन २२ वी) (सदर ग्रन्थ विकत घेउन वाचावा.) भेट दीली तर लेखात मिपा सदस्यानी सांगितलेल्या बहूमूल्य ( जहबहरा , फुटलो , रद्दी , जिंकले हो तुम्ही जिंकले ; फहडतूस ) अशा सूचना वजा प्रतिसादानी लेखन कौशल्यात भर पडेल. अक्षर शुद्ध होईल.
सुधारणेला बर्राच वाव आहे.
.....क्लास मधे अजुनतरी येवढेच शिकवले आहे भडकमकर सरानी. ( त्यानी शुद्धलेखन शिकवताना शब्दांचे पाय मोडताना प्रत्येक तासाला तीनदा खडू मोडला)
::::भडकमकार क्लासचा एक गरीब आणि होतकरु विद्यार्थी :विजुभाऊ
आता जे काही खरे ते .... मजा आला

प्रमोद देव's picture

18 Apr 2008 - 8:40 am | प्रमोद देव

:))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

:))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे?

प्रतिसाद द्यायला योग्य प्राणवायु मिळाला नाही की काय?

मुक्तसुनीत's picture

18 Apr 2008 - 8:56 am | मुक्तसुनीत

चतुरंगवे नमो , चतुरंगवे नमो , चतुरंगवे नमः ! हाहाहा

विसोबा खेचर's picture

18 Apr 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण.

आणि हो सिंगलमाल्टवालाच द्या उगीच भलतासलता नको!"

तेव्हा सरळ ठाण्याला जा. मालवणी हॉटेलात पोहोचा. तिथे काही संतपदाला पोचलेली मंडळी सिंगलमाल्ट सोमरस घेताना दिसतील त्यांच्यासमवेत बसा, ऐसपैस गप्पा करुन समोर आलेल्या सुरमईचा यथेच्च समाचार घेत आत्मज्ञान घ्या, कसें!!"

हा हा हा! लै भारी रे रंगा... :)

आपला,
(इहलोकातच विष्णूपदाला पोहोचलेला आत्मज्ञानी!) तात्या.

--
म्हणे कठोपनिषद आणि नचिकेत! आणि त्याला म्हणे आत्मज्ञान मिळालं! ............धत् रांडिच्यांनो! ;))

छ्या! या उपनिषदातल्या नचिकेतासारख्या भुक्कड कथांपेक्षा आमच्या द मा मिरासदारांच्या 'व्यंकूची शिकवणी' सारख्या कथा कितीतरी अधिक उत्तम आणि उजव्या आहेत! त्या नचिकेताला नाही अक्कल! घरासमोर राहणार्‍या एखाद्या जीवघेण्या पोरीला पटवायचं सोडून फोकलिचा आत्मज्ञान मिळवायला निघाला आहे!!! छ्या.........! ;)

व्यंकट's picture

18 Apr 2008 - 9:11 am | व्यंकट
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2008 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान!
एकदम मस्त !!! आम्हाला प्रिय असलेला 'बतावणी' लेखन प्रकार हाताळल्याबद्दलही आपले अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

18 Apr 2008 - 9:40 am | प्राजु

चतुरंग,
एकदम दमदार. मात्र आता तुम्हांला स्वर्ग लोकांत जागा नाही :)))))) विष्णू कोपले ना..!

आवडला लेख.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

18 Apr 2008 - 10:50 am | आनंदयात्री

वाटले काय लिहिले आहे बॉ ? पण हे

नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट!

वाचल्याक्षणी रम्मी झाली, धमाल लेख ... अरे अरे .. सारी सारी .. नारद लेख ;)

मनस्वी's picture

18 Apr 2008 - 10:51 am | मनस्वी

झकास.

मदनबाण's picture

18 Apr 2008 - 11:18 am | मदनबाण

नारद : "तेव्हा असं ठरवतोय की यमलोकात जाऊन यमालाच भेटेन म्हणतो. तोच देऊ शकेल ना आत्म्याचे ज्ञान?"
यमाच काही खर दिसत नाही,,,,,त्या नचिकेता मागोमाग आता नारदमुनी सुद्दा !!!!!
(नारदमुनींना विशेष सुचना :--वेळ निश्चित करुन जा,,,,,मागल्या खेपेस नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला होता.)

(कैवल्य मुर्ति भव दु:ख हारी) असे म्हणणारा.....महादेव भक्त.....
मदनबाण

स्वाती दिनेश's picture

18 Apr 2008 - 11:34 am | स्वाती दिनेश

बतावणी फारच आवडली.
स्वाती

धमाल मुलगा's picture

18 Apr 2008 - 11:56 am | धमाल मुलगा

चतुरंगराव,
सकाळ एकदम अप्रतिम झाली. मजा आली बॉ!


विष्णू : "कोण तो होय? अहो मी ही परवाच भेट देऊन आलो ना ठाण्याला, तेव्हा मालवणीमधून एक अख्खी सुरमईची टोपलीच उचलून आणलीन त्याने.

आँ??? साक्षात भगवन् विष्णू आले होते? मला कसे नाही दिसले? कोण्त्या टेबलावर होते हो?
(भगवन् , ह.घ्या.!)

आम्हालाही नाहीतरी एक भरवशाचा "डेसिग्नेटेड ड्रायव्हर" हवाच होता!!!

खी:खी:खी: डांबिसकाकांशी आपण फुल्टू...हे आपलं....आत्मानंदाने सहमत!

विष्णुनी उमरख्याम च्या रुबाया पुराणाचे वाचन चालु केले असावे.

विजुभाऊ, चहावर माष्टरी करता करता लैच 'चहा'टाळ झालात की! त्यो बघतोय वरनं...सोडेल का आता तुम्हाला? हाय तुम्ही पण आमच्यासंग रौरवात !!!!

(इहलोकातच विष्णूपदाला पोहोचलेला आत्मज्ञानी!) तात्या.

ज ह ब ह र्‍ह्या !!!!!

वाचल्याक्षणी रम्मी झाली, धमाल लेख ... अरे अरे .. सारी सारी .. नारद लेख ;)

असं का? असं का? तू भेटच आता टोणग्या...बघतो तुझ्याकडे!!!!

(नारदमुनींना विशेष सुचना :--वेळ निश्चित करुन जा,,,,,मागल्या खेपेस नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला होता.)

मदन दा, चिंता नको! नारदमुनी मालवणी आश्रमाला भेट देऊन मगच यमाकडे जातील. तिथे आपण त्यांना स्वयंभूशेठची "३ लार्ज" ही कविता ऐकवू...

मरणाच्या दारावरही दारु आठवली
यमाला म्हटलं बसुया का
त्याचीही कळी खुलली

क्काय? पटतंय का?

- (मन आत्मरंगी रंगले...रे..चतुरंग) ध मा ल.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Apr 2008 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच....

आम्ही असे काहीसे आत्मज्ञान शिकले !

रुप पाहती लोचनी । जावे दारुच्या दुकानी ॥
ते हा विठ्ठल बरवा । ऐक बाटली मागवा ॥
बहुत सुकृतांची जोडी । धेऊ आता थोडी थोडी ॥
सर्व सुखांचे आगार । फिरु आता दारो दार ॥

(डिसक्लेमर - या डिसक्लेमरचा तसेच ह्या रचनेचा दुसर्‍या कोणत्याही रचनांशी / संत वाञमयाशी साम्य आढळल्यास तो

निव्वळ योगायोग

समजावा........)

वरदा's picture

18 Apr 2008 - 6:34 pm | वरदा

सकाळ एकदम अप्रतिम झाली. मजा आली बॉ!

हेच म्हणते