कुल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
7 Oct 2010 - 11:37 am

" द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्राइझ गोज टू मिस......
टाळ्यांच्या कड्कडात 'ग्रे' ने आपले बक्षिस स्विकारले.
लेट अस नॉट फर्गेट द पेरेंट्स हु मेड धिस पॉसिबल..... प्लिज पुट युअर हँड्स टूगेदर फॉर मिस्टर अँड मिसेस..........
पुन्हा टाळ्यांचा कडकडाट.
आता एक तास निवांत होता.
कंटाळवाणी भाषणे.
नंतर सांस्कृतिक कार्यक्रम.
त्याला त्या विंगेत उभे राहुन आपल्या मुलांना रेकॉर्ड डान्स्च्या पुढच्या मुव्स दाखवणार्‍या पालकांची दया यायची.
मुलांबद्दल तर अगदीच कणव.
बहुतेक जबरदस्तीने, मारुन मुटकुन मंचावर दामटवलेली.
ठरलेल्या १ ल्या नंबरसाठी फॉडर.
............................................................................................................................
गर्दीतुन वाट काढत तो शाळेच्या गच्ची कडे जाण्यास निघाला.
पाहुण्यांचे भाषण सुरु झाले होते.
मागुन आवाज आला.
" हाय स्कुब"
त्याने वळुन बघितले.
ग्रे हातात बक्षिस घेउन उभी होती.
हलो ग्रे.
"बोअर्ड"?
हो. अजुन एक तास आहे. माझ्या कार्यक्रमाला. तुझे काय. कसे काय वाटतय हॅट ट्रीक नंतर.?
"आर यू मॉकींग मी?"
नो. कॅपिटल, बोल्ड, अंडरलाइन्ड. व्हाय शुड आय?
"खर सांगु मला ह्या बेस्ट चा कंटाळा आला आहे. गळ्यातले लोढणे वाटते. शाळेत आणि घरी सुटका नाही. तुला कधी वाटले का रे बेस्ट व्हावेसे. तुझ्या आई वडिलांना?"
आई एकदा म्हणाली होती. बापु ह्या बाबतीत एकदम निर्विकार.
"म्हणजे"?
तो म्हणतो..यू डोण्ट हॅव टू बी बेस्ट. जस्ट बी युअर सेल्फ.
"सो नाइस. नाहीतर आमच्या कडे. ३६५ दिवस बेस्ट चा पाठपुरावा. माझ्या पेरेंटस नी पुढचा चार्ट च बनवला आहे."
क्काय?
"ऑनेस्ट. मी सायन्स ला कुठल्या कॉलेज मधे जाणार? नंतर गायनॅक कशी होणार. सर्जन शी लग्न करणार. ऑल द वर्क्स. डू यू थिंक दे आर स्टुपिड".
हायपर इज द राइट वर्ड.
"तुझ्या कडे काय हालहवाल"?
बघु. तुला काय हवे ते कर म्हणतात दोघेही. रिझल्ट आल्यावर ठरवेन.
सर्जन?
नो वे.
"पुढच्या वर्षी बेस्ट पेरेंट कॉन्टेस्ट असणार आहे म्हणे. तुझ्या बाबांना पार्टिसिपेट करायला सांग"
आर यू क्रेझी. माझा बाप फॉर्म भरणार?नट्स. इंटर व्ह्यु घेणार्‍याला वेडा करेल तो. ते तुझ्या पेरेंट सारख्या साठी.
" भेटायला आवडेल. कधी भेटवशील?"
बघु. चल मी खाली जातो. वॉइस ओवर ची वेळ झाली.
............................................................................................................................
उद्या सुट्टी आहे बापु.
"मग"?
'माय नेम इज नो बडी' डाउन लोड केलाय.
"काय सागतोयस"?
तुला आवडतात म्हणुनच तुझ्या साठी स्पेशल. लवकर ये.
"येतो. हाउ अबाउट हॉट बिन्स इन पॅन विथ बिग ब्राउन ब्रेड अँड रेड वाइन?
कुल.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

मितान's picture

7 Oct 2010 - 11:40 am | मितान

मस्त ! आवडले :)

सहज's picture

7 Oct 2010 - 12:15 pm | सहज

हूज यॉर डॅडी ते डॅडी कूल!! ;-)

स्पा's picture

7 Oct 2010 - 12:25 pm | स्पा

DADY COOOOL

निखिल देशपांडे's picture

7 Oct 2010 - 12:47 pm | निखिल देशपांडे

कुल...

अवलिया's picture

7 Oct 2010 - 12:50 pm | अवलिया

:)

गणेशा's picture

7 Oct 2010 - 1:11 pm | गणेशा

मस्त ...

नन्दादीप's picture

7 Oct 2010 - 1:22 pm | नन्दादीप

>>>>>इंटर व्ह्यु घेणार्‍याला वेडा करेल तो.

बाबा मुलाखतीला तयार झाले असे समजुन...

बाबांच्या मुलाखती बद्दल येउ द्या थोडे.....मजा येइल......

भाऊ पाटील's picture

7 Oct 2010 - 1:25 pm | भाऊ पाटील

मस्त. :)

निवेदिता-ताई's picture

7 Oct 2010 - 1:33 pm | निवेदिता-ताई

मस्त......

सूड's picture

7 Oct 2010 - 1:34 pm | सूड

झक्कास.

स्पंदना's picture

7 Oct 2010 - 1:53 pm | स्पंदना

कुल!

रणजित चितळे's picture

7 Oct 2010 - 1:53 pm | रणजित चितळे

हल्लीच्या रॅट रेस चे यथोचीत वर्णन आहे.

:)
जमाना बदलालाय. मुलांचे मित्र बनणे Must झाले आहे. ;)

इंटरनेटस्नेही's picture

7 Oct 2010 - 2:26 pm | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो..

(वडिलांसोबत बीअर प्राशन करणारा मुलगा) इंट्या.

फ्रॅक्चर बंड्या's picture

7 Oct 2010 - 2:31 pm | फ्रॅक्चर बंड्या

लय भारी ...

स्वैर परी's picture

7 Oct 2010 - 3:54 pm | स्वैर परी

लईईई च भारी ! प्रभू जी छा गये!

परिकथेतील राजकुमार's picture

7 Oct 2010 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

बेष्ट !

रेवती's picture

7 Oct 2010 - 7:36 pm | रेवती

ह्म्म!
मला तर कंटाळाच आलाय्......त्या 'बेस्ट' प्रकरणाचा!
त्यापेक्षा तो तुमच्या गोष्टीतला डॅडी कूल बरा!:)

स्वाती२'s picture

7 Oct 2010 - 7:39 pm | स्वाती२

छान!

"सो नाइस. नाहीतर आमच्या कडे. ३६५ दिवस बेस्ट चा पाठपुरावा. माझ्या पेरेंटस नी पुढचा चार्ट च बनवला आहे."
"ऑनेस्ट. मी सायन्स ला कुठल्या कॉलेज मधे जाणार? नंतर गायनॅक कशी होणार. सर्जन शी लग्न करणार. ऑल द वर्क्स. डू यू थिंक दे आर स्टुपिड".

आमच्या बघण्यात असे पालक कधीच कसे काय आले नाहीत याचं आश्चर्य वाटतंय ! असो..मास्तरचं लिखाण आम्ही नेहमी वाचतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2010 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्याही पहाण्यात असले र्‍याट-पेरेंट्स आले नाहीत. लेख आवडला.

माझ्याही पाहण्यात सध्या असे पालक आले नाहीत. उलट तुला नसेल जमत तर करू नकोस, तुला काय हवे ते कर असे म्हणणारेच हल्ली जास्त दिसतायेत.

चतुरंग's picture

7 Oct 2010 - 8:18 pm | चतुरंग

वॉव काय मस्त आठवण दिलीत मास्तर!
ऐका बॉनी एम डॅडी कूल! ;)

(बॉनीएमप्रेमी)बडीडॅडी

अर्धवटराव's picture

8 Oct 2010 - 1:21 am | अर्धवटराव

आयला... माझे तीर्थरूप अशेच सुपर कूल आहेत... स्वतः अमाप टेन्शन घेतील... पण माझ्या बाबतीत एकदम ठंडा !!

(पितृभक्त) अर्धवटराव

समीरसूर's picture

8 Oct 2010 - 2:08 pm | समीरसूर

छान विषय आणि नेमकेपणाने केलेली मांडणी.

बाकी बेस्ट असणं चांगलं की त्याचं दडपण न घेता मोकळेपणाने जगणं चांगलं हे काही कळत नाही.

जगण्याचे परस्परविरोधी फंडे कधी कधी गोंधळ उडवतात.

--समीर