मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुल

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
" द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्राइझ गोज टू मिस...... टाळ्यांच्या कड्कडात 'ग्रे' ने आपले बक्षिस स्विकारले. लेट अस नॉट फर्गेट द पेरेंट्स हु मेड धिस पॉसिबल..... प्लिज पुट युअर हँड्स टूगेदर फॉर मिस्टर अँड मिसेस.......... पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. आता एक तास निवांत होता. कंटाळवाणी भाषणे. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम. त्याला त्या विंगेत उभे राहुन आपल्या मुलांना रेकॉर्ड डान्स्च्या पुढच्या मुव्स दाखवणार्‍या पालकांची दया यायची. मुलांबद्दल तर अगदीच कणव. बहुतेक जबरदस्तीने, मारुन मुटकुन मंचावर दामटवलेली. ठरलेल्या १ ल्या नंबरसाठी फॉडर. ............................................................................................................................ गर्दीतुन वाट काढत तो शाळेच्या गच्ची कडे जाण्यास निघाला. पाहुण्यांचे भाषण सुरु झाले होते. मागुन आवाज आला. " हाय स्कुब" त्याने वळुन बघितले. ग्रे हातात बक्षिस घेउन उभी होती. हलो ग्रे. "बोअर्ड"? हो. अजुन एक तास आहे. माझ्या कार्यक्रमाला. तुझे काय. कसे काय वाटतय हॅट ट्रीक नंतर.? "आर यू मॉकींग मी?" नो. कॅपिटल, बोल्ड, अंडरलाइन्ड. व्हाय शुड आय? "खर सांगु मला ह्या बेस्ट चा कंटाळा आला आहे. गळ्यातले लोढणे वाटते. शाळेत आणि घरी सुटका नाही. तुला कधी वाटले का रे बेस्ट व्हावेसे. तुझ्या आई वडिलांना?" आई एकदा म्हणाली होती. बापु ह्या बाबतीत एकदम निर्विकार. "म्हणजे"? तो म्हणतो..यू डोण्ट हॅव टू बी बेस्ट. जस्ट बी युअर सेल्फ. "सो नाइस. नाहीतर आमच्या कडे. ३६५ दिवस बेस्ट चा पाठपुरावा. माझ्या पेरेंटस नी पुढचा चार्ट च बनवला आहे." क्काय? "ऑनेस्ट. मी सायन्स ला कुठल्या कॉलेज मधे जाणार? नंतर गायनॅक कशी होणार. सर्जन शी लग्न करणार. ऑल द वर्क्स. डू यू थिंक दे आर स्टुपिड". हायपर इज द राइट वर्ड. "तुझ्या कडे काय हालहवाल"? बघु. तुला काय हवे ते कर म्हणतात दोघेही. रिझल्ट आल्यावर ठरवेन. सर्जन? नो वे. "पुढच्या वर्षी बेस्ट पेरेंट कॉन्टेस्ट असणार आहे म्हणे. तुझ्या बाबांना पार्टिसिपेट करायला सांग" आर यू क्रेझी. माझा बाप फॉर्म भरणार?नट्स. इंटर व्ह्यु घेणार्‍याला वेडा करेल तो. ते तुझ्या पेरेंट सारख्या साठी. " भेटायला आवडेल. कधी भेटवशील?" बघु. चल मी खाली जातो. वॉइस ओवर ची वेळ झाली. ............................................................................................................................ उद्या सुट्टी आहे बापु. "मग"? 'माय नेम इज नो बडी' डाउन लोड केलाय. "काय सागतोयस"? तुला आवडतात म्हणुनच तुझ्या साठी स्पेशल. लवकर ये. "येतो. हाउ अबाउट हॉट बिन्स इन पॅन विथ बिग ब्राउन ब्रेड अँड रेड वाइन? कुल.

वाचन 4426 प्रतिक्रिया 0