विमुक्त-२

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 9:56 pm

http://www.misalpav.com/node/14757-विमुक्त-१

विमुक्त -२

फेसबुकातले फोटो आणि त्या दिवशीची घटना मोठ्या ड्रमच्या आवाजासारखी पुन्हा पुन्हा विशालच्या मन:पटलावर आदळत होती . पुढचे सात आठ दिवस तो अस्वस्थ होता. निहार आणि मिनाक्षीला तो भेटायला गेला नाही, त्यांचे कॉल्सही त्याने घेतले नाहीत आणि सॉरीच्या एस एम एसचे उत्तरही दिले नाही.
एक दोन दिवसातच त्याला जाणवले की निहार आणि मिनाक्षीचे कॉल बंद झाले आहेत. इतर मित्रांकडून त्यांची खबरबात कळत होती. आपण विशालला दुखावले आहे हे त्यांच्या गावीही नव्हते. त्या घटनेचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला नव्हता. दे वेअर हॅविंग फन. त्यांच्या पार्ट्य़ा सुरूच होत्या.

रोहनचा कॉल होता. ’डोक दुखतय का, नाइस ले , गॉ टू ’ऎटीट्यू", हा वही पार्लर. जरा मस्त मसाज करून घे. बरा होशील’ रोहनच्या बोलण्याने विशालचे डोके आणखीच सटकले. त्याला वाटले हा रोहन नाही निहारच बोलतो आहे. त्याच्याभोवती वावरणारा प्रत्येकजण इतकी वर्षे त्याला कोणत्या ना कोणत्या वस्तू बद्दल काहीतरी सुचवत होता. आजवर त्याला त्यात काही वावगे वाटले नव्हते. तो सुद्धा कधी तरी म्हणायचाच की या हॉटेलात बटरचिकन काय क्लास असते, या डिझायनरचे कपडे क्लासिक असतात. पण ते मनापासून असे. बाकी सर्वांचे बोलणे मनापासून होते की वरवरचे? तो पार्ट्य़ांचे फोटो पाहत होता तसे फक्त निहारच नाही अनेक जण असे त्याच्याभोवती होते जे आपापला ब्रेंड पुढ करत होते असे त्याला जाणवले. कधी आडून, कधी आग्रहाने तर कधी थेट . एक दोघांनी सरळ सांगितले होते की विशालने त्या दुकानात शॉपिंग केले तर त्यांना त्याचे कमिशन मिळेल. शर्ट, परफ्यूम, जीन्स, शूज, व्हिस्की, बिअर , नेकलेसेस, घड्याळ जे काही असेल विशालचे काही मित्रमैत्रिणी इतर लोकांच्या गळी उतरवत होते. कुणी एखाद्या क्लबची जाहिरात करत होते, कुणी हॉटेलाची तर कुणी एजंसीची.

कसा मार्ग काढायचा यातून? जेवढा विशाल या सर्वांपासून दूर जायला पाहात होता तेवढे सगळे पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होते. विशालने इंटरनेटवर सर्च केला तर आणखी काही फोटो मिळाले. ते सर्व निहार, मिनाक्षी, विशाल आणि त्यांच्या पार्ट्यांचे होते. फेसबुकाशिवाय ही दुसरी साईट तर कर्मशियल साईट होती, जाहिरातीकरता असलेली. त्याने भराभरा इतर मित्रांना कॉल केले.

"रोहन, अनिता तुम्हे यह सब अनएथिकल नही लगता? त्याने आपला वापर केला आहे."
"मी कसली सेक्सी दिसते आहे त्या ड्रेस मधे "
"एनफ, मी काय म्हणतोय नि तू काय चाललय तुझ्या डॉक्यात अनिता"
विशालला संताप आला होता.

"पैसा तर मागितला नाही ना. "
"अनिता , तुम्हे पता था क्या? विश्वासघात केला त्याने अस नाही वाटत?"
"विशाल, साल्या, पार्टीत आपण फुकट दारू प्यायलो, जेवलो, वी हॅड फन , ये सब तुम्हे चलता है. किसेने फोर्स नही किया था, अपना चॉइस था "
"हे सर्व जर निहारने फुकट दिल आणि लावले आपले फोटो त्याच्या साईटवर तर एवढ काय झाल?"
"तुझा इगो हर्ट झाला का? तुला न विचारता केल म्हणून? तुझ्या फेसबुकात पण आमचे फोटो आहेतच ना?"
विशालला काय बोलाव ते कळेना. तो चिडला होता. विचार नुसतेच भिरभिरत होते.
"सोच मत जादा, इस गेम मे मज़ा है, कम ऒन , हॅव फन , बी अ स्पोर्ट" अनिताने तर सरळच सांगितले होते.
विशालला हे सर्व आठवून गरगरायला लागले .
तत्त्व सोपे होते, जाहिरात करा, फुकट द्या आणि लोक एकदा का त्याच्यावाचून राहू शकणार नाहीत असे दिसले की विकत घ्यायला लागतील . प्रत्येकाला काम केल्याबद्दल कमिशन मिळणार होते. काही मित्र , निहार , त्याचे वागणे सगळे एकमेकांशी एका धाग्याने गुंफलेले होते. मिनाक्षीने सुचवलेल्या मैत्रिणीसुद्धा त्याचाच एक भाग होत्या. त्या पार्टीत विशालशी सलगी करणारा तो माणूस एका कंपनीचे मार्केटींग बघायचा. निहार त्या माणसासाठी सध्या काम करतो, त्याच्या एका मित्राने सांगितले तेव्हा विशालचा चेहरा पडला.
विशाल विचार करत होता..’आपल्याला सगळ दिसत होत पण कळत नव्हत?की कळूनही आपला असा वापर होणार नाही हे वाटत होत आपल्याला? की मान्य केल होत आपणसुद्धा कमिशन न घेता या साखळीचा भाग असण?मग आता एवढा त्रास का होतो ?’

विशालला आता ही माणसे काय़, माणसेच नकोशी वाटत होती. पण जीवनशैली? पार्ट्यांशिवाय असे वेगळे, एकटे त्याला किती दिवस राहता येणार होते? खूप खूप एकटे वाटत होते त्याला. त्याला सारिकाची आठवण झाली. तिचे शब्द आठवले. तिला माहिती असावे कदाचित हे सर्व. तिला हे सर्व नको होते म्हणून ती मलाही सोडून गेली. कुठे असेल सारिका?
विशालने तिला कॉल केला तर तो नंबर वापरात नसल्याचे रेकॉर्डिंग आले. तो तिच्या फ्लॅटवर गेला. तिथे तिने तो फ्लॅट सोडल्याचेही कळले. नवा पत्ता त्याला माहिती नव्हता. त्याला आठवले की तो तिच्याबरोबर राहायचा तेव्हा एक दोनदा सारिकाबरोबर तिच्या ग्रूपच्या प्रार्थनेला गेला होता. तिथे ती नक्की भेटेल. मग कशाचाही विचार न करता विशालने बाईक काढली आणि तो सुसाट प्रार्थनाहॉलकडे निघाला.

रस्त्यालगतची झाडे, मधले सिग्नल्स, रस्ता क्रॉस करणारी माणसे, रस्त्यावरची गर्दी सगळे त्याच्या लेखी अस्तित्त्वात नव्हते. तो हॉलवर पोहोचला तेव्हा तिथे कोणीच नव्हते. शेजारीपाजारी आणि पानवाल्याकडे चौकशी केली तर कळले की प्रार्थना काल संध्याकाळीच झाली . आता तीन दिवसानंतर माणसे पुन्हा प्राथेनेकरता येतील. तरी विशाल थांबला. उष्ट खरकट काहीतरी मिळेल या आशेने तिथे शेजारच्या उकिरड्यावर काही कुत्री, बकऱ्या आणि एखादी गाय रेंगाळत होती. विशाल रणरणत्या उन्हात सिगरेट पीत, घामेजला चेहरा घेऊन तिथे सलग तीन दिवस आला. ताटकळला. निराश होऊन परत गेला . अंगाभोवती येणाऱ्या माश्या, डास एका हाताने उडवत होता, भुंकणाऱ्या कुत्र्याकडे, शेपटीने फटकारणाऱ्या गाईकडे त्याने मख्खपणे पाहिले . विशालला कोल्ड ड्रिंक , सिगरेटची पाकीट विकून पानवाल्याने आपली खुशाल शीळ घातली होती. एकदाचा तो दिवस आला. प्रार्थनाहॉलमधे गर्दी झाली होती. येणाऱ्या लोकांत त्याला सारिका दिसली नव्हती. विशालने तिला ओळखले नाही असे होणे शक्यच नव्हते. तेवढ्यात सारिका दिसली. आज उशीर झाला असे म्हणत ती दारातून आत शिरली आणि झरझर पुढे येऊन बसली सुद्धा. प्रार्थना सुरु होती, उदबत्तीचा सुगंध पसरला .विशालच मन मात्र सारिकाच्या सहवासाठी उत्सुक होत. प्रार्थना संपली, शंका विचारून, प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली माणसे माना डोलावून, आनंदून निघून गेली. सारिका इथेच थांबेल हा विशालचा अंदाज खरा निघाला. तिच्या समोर जाऊन विशाल उभा राहिला, तिच्या नजरेला नजर भिडवीत.
"बिलकूल अकेला हू, आय नीड यू" त्याने हे वाक्य म्हटले आणि मनावरचा सगळा ताण दूर झाला असे त्याला वाटले.
पण सारिका सहजासहजी तयार होणार नव्हती. विशालने हट्ट सोडला नाही. तो सतत तिला भेटत होता. मनधरणी करत होता. पंधरा दिवसानंतर सारिकाच्या सर्व अटी मान्य करून तो तिच्याबरोबर राहू लागला. त्याच्या मनाप्रमाणे वागायला फक्त रविवारी मुभा होती. एरवी पार्ट्या बंद, जुने मित्र , दारू सगळे काही बंद. जुने काही तसेही त्याला नकोच होते. एकटेपणा नको होता फक्त. त्याला खात्री होती की पुढच्या सहा महिन्यात तशाही सर्व अटी नाहिश्या होतील. रविवार त्याचा होता, रविवारी सारिका त्याची होती. बास्स सध्या एवढे पुरेसे होते.
तो प्रार्थनेला जात होता, ग्रूपला लागेल ती मदत करत होता. सारिकाच्या ग्रूपमधे विशाल रूळू लागला होता. आपल्या कामाच्या ठिकाणी त्याने या ग्रूपची एकदोनदा तोंड भरून स्तुतीही केली. त्याचे काही सहकारी प्रार्थनेला आले सुद्धा. असेच एकदा प्रार्थनेकरता लोक जमले होते. विशाल गप्पांमध्ये सहभागी झाला होता. पण तिथे राहण, त्यांच्यातला होण काही इतक सोप नव्हत याची जाणिव विशालला पुन्हा एकदा झाली.
"विशाल, तुझ्या सांगण्यावरून दोन महिन्यात फक्त पाच जणांनी आपला ग्रूप जॉइन केला. ऐसा स्लो कैसे चलेगा? "
"म्हणजे?ज्यांना आवडेल ते येतील, पिपल शूड अग्री. फोर्स करनेसे कुछ नही मिलेगा"
"हा, तुम्हे भी कुछ नही मिलेगा ये समझ लो"
" मुझे क्या चाहिए, मै नही होना चाहता कोई बडा आदमी, जैसा हू वैसा ठीक हू"
खर तर वाद आणखी वाढला असता पण प्रार्थनेची वेळ झाली होती त्यामुळे सुदैवाने तो विषय तिथेच थांबवावा लागला. विषय तिथे थांबला खरा पण विशालच्या मनातून गेला नव्हता.

"सारिका, तुला आधीही मी सांगितल होत आय़ डोंट बिलिव्ह इन ऒल धिस, कुणाची चिंता अशी दूर करता येते का? आयुष्य कस जगायच ते शिकवता येत नाही."
"न शिकवता यायला काय झाल आहे? सर्वांना नाही जगता येत मनासारख आयुष्य. तुला तरी आल का? आयुष्य कस जगायच , कस चांगल करायच ते समजत आणि शिकवताही येत ते फक्त काहींनाच"
"मग फुकट करा ना सर्व, लेट युवर जॉब आणि युवर पॅशन बी सेपरेट, परोपकाराचा आव आणून तुम्ही त्यातून पैसा करता आहात. हे सर्व म्हणजे एक बिझनेस म्हणून बघता तुम्ही!
"कोणतीही सामाजिक संघटना असेल तर पैसा लागतो. तो कुठून आणायचा? सेवा करायची त्याचा मोबदला हवाच. लोक तसेही तयार असतात मदत करायला. "

"तुलाही माहिती आहे मी कशाविषयी, कोणाविषयी बोलतो आहे. मी चार माणस आणली, ती सुद्धा पैसा देणारी की मी महान होतो तुमच्या ग्रूपमधे. एका बकऱ्याने खाटिकाकडे आणखी चार मेंढर ओढून आणायची , आपला बळी जाऊ नये म्हणून! "
"यू आर अनबिलिव्हेबल! डोक फिरलय तुझ निहारमुळे. नको तिथे नको ते लॉजिक लावतो आहेस. टेक अ ब्रेक. मी तुला कधी म्हटले की तुला असेच वागावे लागेल. नको या गोष्टी तर नकोत. यू स्टिल कॅन बी अ पार्ट ऒफ अवर ग्रूप. रहा ना ग्रूपमधे. पण म्हणून अशी तुझी चुकीची मत मुद्दाम चारचौघात का मांडतोस? इतरांच्या मनात तू शंका आणि संशय कशाला निर्माण करतोस? ते मात्र चालणार नाही. मला आवडणारही नाही."

त्या रात्री विशालला सारिकाला जवळ घ्यावस वाटल नाही. विशाल जागा होता आणि सारिका मात्र गाढ झोपली होती. एकेक तास उलटत होता. स्क्रीनप्ले सुरु असावा तसे विशालच्या समोरून एकेक आठवण, एक एक व्यक्ती आपोआप बाजूला होत होती. सारिकाची आठवण आली तशी सगळ चित्रच थांबल्यासारख झाल. त्याला पहिल्यांदा सारिका वेगळी वाटली होती.
आपल्याला अस काही जे वाटत ते फक्त तेवढ्यापुरतच वेगळ ठरत का? कालांतराने खर त्यात काही वेगळ उरत नाही. की काही निराळ नसतच मुळी?. दोष आपलाच . आपल्या नेहमी चुकाच होतात . सारिकाला आणि निहारला लाइफ कस जगायच ते कळल आहे. दोघांनाही माझी पर्वा नाही. मिनाक्षी नेहमी एका अंतरावरच होती, दूर...
एक वेळ निहारच जाऊ दे पण सारिकाच्या लेखी मी कुणीच नाही का?
पहाटेचे पाच वाजायला आले होते. त्याने सारिकाला हलवून उठवले.

" मला वाटायच की मी फार व्यवहारी आहे. भावनाबिवना गुंडाळून जगू शकतो पण तुझ तस नाही. खर सांगू, हे तुझ तस नसण, एवढ इमोशनल असण, पझेसिव्ह असण वरवर आवडत नाही अस म्हणायचो मी . तरी मला ते हव हवस वाटत होत."
त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता.
" पण तुझ तस असण तरी खर होत का सारिका? की सगळी गुंतवणूक, सगळ्य़ा भावना हे फक्त एक नाटक होत? फक्त गरजेपुरतच होत? हो , गरज प्रत्येकाची होती. मीही अपवाद नव्हतो. पण हे अस जगण कुठवर जगायच? प्रेत्यक ठिकाणी एक कल्ट आहे. एक डाव आहे लोकांना गुंतवण्याचा आणि मोहाच जाळ घट्ट विणून लोकांचा जीव घेण्याचा. आत शिरायचा मार्ग आहे पण बाहेर पडता येणार नाही, पडलात तर शिक्षा होईल असा ’वन वे’ आहे." तो उसासला.
सारिका उठून उभी राहिली होती.
"ह्याच सत्यापासून मी पळत होतो, ते माझा पाठलाग करतच आहे. नेहमीचच. पण मी आता पळणार नाही त्याला स्वीकारणार आहे. दु:ख ह्याच वाटत की ही रात्र एकवेळ संपेल पण भूतकाळ काही सोडून देता येत नाही. कुठलीच गोष्ट फ्री नसते म्हणतेस ना खर आहे. सगळ काही तुमच्या समोर येत पण आपापल्या अटींसह. तसाच वर्तमानही एकटा नसतो. वर्तमानात जगतांना भूतकाळातून उडत आलेला एक एक टवका जखम ठसठसत ठेवतो. हे आयुष्य आहे."
सारिकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. आता आणखी काय काय सांगणार आहे हा?

" परवा निहारने फोन केला होता, येतोस का पार्टीला म्हणून? निहार, ज्याला मी ग्रेट समजायचो ,तो ही आपल्यासारखाच आहे सामान्य. काही कामाने मी एक पत्ता शोधत होतो. एका जुन्या इमारतीत रंग जुनाट, कसलेतरी कागदाचे गठ्ठे समोर ठेऊन मान एक जण बसला होता. दुसरा कुणी नाही निहार होता. त्याने मला पाहिले नाही. तो कामात मग्न होता. कशाचे पॉश ऒफिस, कुठली गाडी, कुठले घर? सगळे जेव्हा दिवस बरे असतील तेव्हाचा तात्पुरता झगमगाट. सत्य हेच आहे की निहारही कधीतरी खूप एकटा असतो. त्यालाही नकार देतात लोक. सगळे असेच सामान्य, स्पर्धा करत, तडजोड करत जगणारे. मिनाक्षी सुद्धा तशीच. तू काही वेगळी नाहीस. इथे प्रत्येकजण एक झाड शोधतो आहे. एक आपल्यापेक्षा मोठ आणि एक आपल्यापेक्षा कमी उंचीचे. एक आपला मोठेपणा सिद्ध करता येइल असे आणि वेळ आलीच तर आपल्याला सावरू शकणारे असे एक. प्रत्येकाच्या झाडाच पॅकेज फक्त वेगळे. माझ पॅकेज मी ठरवणार. माझा निर्णय झाला आहे. कस जगायच ते समजलय म्हण. "

निहारला असा सामान्य दर्जा दिल्यानंतर विशालला कुठतरी आत खूप हलक वाटल. दिवसाला सामोर जाण्याचा हुरूप आला. दिवस उजाडला.
विशाल ऒफिसमधे शिरला तेव्हा वातावरणात एक निरूत्साह होता, एक उदासी होती. ७०% लोकांना पुढील महिनाअखेर काढून टाकणार होते. विशाल टिकून राहण्याची शक्यता तशीही कमीच होती. त्याला या सर्वाची सवय झाली होती.
त्या दिवशीनंतर विशाल रोज दुपारीच ऒफिसातून बाहेर पडत होता नव्या जॉबच्या इंटरव्ह्यू करता. .............
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"नवा जॉब, नवी माणसे, नवे मित्र, एका तांड्याबरोबर व्यापाराला निघायचे , गावोगावी व्यापार करायचा, गाव बदलायचा, तांडा बद्लायचा, व्यापाराची पद्धत तीच, काय बदलत ? काहीच नाही. माणसे तशीच असतात , त्यांच्या भुकाही त्याच असतात. "
विशाल हातातल्या फोनशी खेळत होता आणि त्याच्या मनात विचार तरंगत होतेच. आपल्याला फोन बदलायला हवा . हा कुठल्याही क्षणी दगा देईल ."

विशालला आज जरा शांतपणा मिळाला होता. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. वेटरने ओर्डर केलेले ड्रिंक आणून ठेवले. तेवढ्यात त्याच्या पाठीवर थाप पडली. विशालने वळून बघितले. निहारला तिथे पाहून त्याला काहीच वाटले नव्हते. आश्चर्य तर मुळीच नाही. निहार येऊन त्याच्या शेजारी बसला. निहारचा चेहरा विशालला अतिशय करूण भासला. अनेक युक्त्या लढवूनही कधी सरशी होत नाही हे लक्षात आलेल्या उदास खेळाडू सारखा. आधार देणार झाड सुटल्यासारखा. निहारच्या वागण्यातला उत्साह, त्याची बढाई, सगळे हरवले , खंतावले होते. निहारच्या हातातले सॉफ्ट ड्रिंक काय तेवढे फेसाळत होते.
"या सॉफ्ट ड्रिंकचा खास तुझा असा ब्रॅंड असेल ना " विशालने हासत निहारला विचारले.
"अरे छोड भी, कैसा है तू?मिनाक्षी स्टेज विथ हर बॉस दिज डेज, वही उसका सिनिअर. " एका दमात निहारने ग्लास संपवला होता.
पुढे काही सेकंद भयाण शांततेत गेले. काही घडलेच नाही अशा थाटात मग निहारने बोलायला सुरुवात केली. थोड्यावेळात आजूबाजूचे काही त्यांच्यात सामील झाले.
" तबियत ठीक है, बोअर हो गया हू, नविन जॉब ऒफर येईलच. निहार, पार्टीचे माझ्याकडे लागले! माझ सगळ प्लॅनिंग झाल आहे"
" डिटेल्स देता हू "असे म्हणत विशालने काय काय ठरवले आहे ते निहारला सांगायला सुरुवात केली.
" और मेरी गेस्ट लिस्ट? किती लोक आलेली चालतील तुला?" आवाजातला आनंद निहारला लपवता आला नाही.
आपल्याशी भांडून गेलेला विशाल, आपल वागण पटले नाही म्हणणारा विशाल , नेहमी आपल्या पंखाखाली राह्णारा विशाल .. आणि आजचा विशाल? नक्की कोण आहे हा? हाच विशाल आता पार्टीकरता पुढाकार घेतो आहे याचे कारण त्याला कळले नव्हते. निहारचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक अविश्वासही होता.
"तेरी लिस्ट एसएम एस कर दे. " आपले बील भरून विशाल उठला. बाहेर पडला.
सभोवताली अंधार वाढला होता. विशालची नजर आकाशातल्या एका तेजस्वी ताऱ्याकडे होती.

-०-
~सोनाली जोशी

कथाविचार

प्रतिक्रिया

चांगली कथा व वेगळा विषय.
अनेक वाक्ये आवडली पण कथेचा वेग चांगला असल्याने वाचनात गुंतायला झाले.:)
तरी जास्त आवडलेलं
वर्तमानात जगतांना भूतकाळातून उडत आलेला एक एक टवका जखम ठसठसत ठेवतो.
आणखी एक,
प्रत्येकाच्या झाडाच पॅकेज फक्त वेगळे.

दोन्ही भाग वाचले आहेत हे लिहायचे राहिले होते.:)

अर्धवटराव's picture

5 Oct 2010 - 11:09 pm | अर्धवटराव

दोन्ही भाग सलग वाचले. कथेचं टायटल सर्वात भारी. अगदी चपखल. विमुक्ततेचे सगळे पैलू एकामागुन एक प्रकट झालेत. आणि शेवट देखील विमुक्तच... कुठल्याही निर्णायक अवस्थेपासुन विमुक्त.

(बद्ध) अर्धवटराव

स्वाती२'s picture

6 Oct 2010 - 12:12 am | स्वाती२

कथा आवडली.

स्वप्निल..'s picture

6 Oct 2010 - 12:21 am | स्वप्निल..

दोन्ही भाग चांगले आहेत .. पुढचा कधी? :)

प्राजु's picture

6 Oct 2010 - 12:51 am | प्राजु

चांगली आहे कथा..
आवडली.

अनामिक's picture

6 Oct 2010 - 2:15 am | अनामिक

छान आहे कथा... एका दमात दोन्ही भाग वाचून काढले. ओघवती असल्याने लांब असूनही कुठेही कंटाळवाणी होत नाही. अजून अश्याच कथा येऊ द्या!

कुसुमिता१२३'s picture

6 Oct 2010 - 10:01 am | कुसुमिता१२३

सुरेख कथा! दोन्ही भाग आवडले..
इथे प्रत्येकजण एक झाड शोधतो आहे. एक आपल्यापेक्षा मोठ आणि एक आपल्यापेक्षा कमी उंचीचे. एक आपला मोठेपणा सिद्ध करता येइल असे आणि वेळ आलीच तर आपल्याला सावरू शकणारे असे एक.
हे विशेष भिडलं मनाला..खरच अगदी असच असतं!

रणजित चितळे's picture

6 Oct 2010 - 11:19 am | रणजित चितळे

तुम्हाला धन्यवाद ब-याच दिवसांनी एक चांगली कथा वाचायला दिल्या बद्दल.

विसुनाना's picture

6 Oct 2010 - 11:57 am | विसुनाना

कथा आवडली. बहुपेडी कथानक आहे.
पेंटिंगसदृश वर्णन करायचे तर जोरकस आणि विविध रंगांचे स्ट्रोक्स वापरून गहिर्‍या काळपट पार्श्वभूमीवर एखादा आत्ममग्न चेहरा दृगोचर व्हावा असे वाटले.
लेखिकेने एक वरची पातळी गाठली आहे हे स्पष्ट होते. अभिनंदन!

नगरीनिरंजन's picture

6 Oct 2010 - 12:30 pm | नगरीनिरंजन

सुंदर कथा. सुंदर विचार!
>>प्रेत्यक ठिकाणी एक कल्ट आहे. एक डाव आहे लोकांना गुंतवण्याचा आणि मोहाच जाळ घट्ट विणून लोकांचा जीव घेण्याचा. आत शिरायचा मार्ग आहे पण बाहेर पडता येणार नाही, पडलात तर शिक्षा होईल असा ’वन वे’ आहे.
ही वाक्यं मनाला भिडली. खरोखर विमुक्त, स्वतंत्र जीवन आपण कधी जगू शकतो का?
समाजमान्य चाकोरीत स्वत:ला फिट बसवून जगणारे तथाकथित प्रतिष्ठित कुटुंबवत्सल पांढरपेशे असो की दाढ्या वाढवून क्लिष्ट भाषा बोलणारे गबाळे कलंदर कलाकार असो, सगळीकडे नुसता कल्ट आणि त्याचं मार्केटिंग. जो अनुयायी असेल त्याचा उदोउदो, बंडखोरांच्या वाटेला अवहेलना.
अनवट अशा विषयावर सुंदर भाष्य करणारी कथा आवडली.