शावा शावा

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
4 Oct 2010 - 1:15 pm

"हॅलो"
बोल रे जोशा
"चो, तु कभी खुशी कभी गम बघितला आहेस का रे?"
म्हटले तर हो म्हटले तर नाही
"म्हणजे"?
फॅमिली सकट गेलो होतो. एक मित्र आणि त्याची फॅमिली पण बरोबर होती. पहील्या २० मिनिटात भर एयर कंडिशन मधे आम्हा दोघांना घाम फुटला. मग गम मिटवण्यासाठी फॅमिली ला तिथेच सोडुन थिएटर जवळ असलेल्या बार मधे सिंगल माल्ट खुशी. शेवटची १५ मिनिटे बघितला.फुल्ल असल्यामुळे त्रास झाला नाही. पण त्या हॉरर ची अचानक तुच आठवण का द्यावीस बरे?
"अरे एक केस आहे. बघ तुला जमते का? माझेच नातेवाईक आहेत. उगाच सायकॉलॉजिस्ट आणि नंतर ची ट्रिटमेंट टाळता आली तर बरे"
पिक्चर बघुन डायरेक्ट सायकॉलॉजिस्ट?
"मी बापाला पाठवुन देतो, बघ का जमतेय का?"
-----------------------------------------------------------------------------------------
"मी लेले"
बोला.
"तुमच्या बद्दल जोशी साहेबांनी....."
थांबा, मी सायकिअ‍ॅट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट नाही हे तुम्हाला माहीत आहे ना?
"हो"
बोला
"जरा अवघड आहे कसे सांगायचे ते कळत नाही"
बोला, काहीही न लपवता बोला.
" मुलाबद्दल आहे. १७ वर्षाचा आहे. हे सर्व सुरु झाले शावा शावा गाण्याने"
म्हणजे?
"पिक्चर बघुन आल्यावर मुलाचे वागण्यात लक्षात येइल असा बदल झाला."
म्हणजे पिक्चर बघितला तेंव्हा साधारण वय १४. ठीक. शावा शावा चे काय?
"अहो त्या गाण्यामध्ये अर्धवट कपड्यामधे मुली नाचतात ना"
हां. अमिताभ च्या वाढदिवसाच्या निमित्ताने चा नाच. बर मग?
"अहो गुढ्ग्यावर एक फुटचे स्कर्ट घालुन वाढदिवसाला नाच"?
अहो तो इंडस्ट्रिअ‍ॅलिस्ट आहे. त्याच्या घरात कुणी किती कपडे घालावेत ह्या बद्दल आपण काय बोलणार? त्याच्याशी तुमच्या मुलाचा काय संबध?
"तसे नाही हो. त्या नंतर असलीच गाणी त्याला आवडायला लागली. गेल्या दोन वर्षात अशाच गाण्याच्या सीड्या मधे गुंतलेला असतो. एवढा हुशार मुलगा. परफॉर्मन्स अगदी खाली आलाय. रेस्,ऑल द बेस्ट, दे दना दन वगैरे पिक्चर मधे ह्या गाण्यांचा नॉन स्टॉप सप्लाय."
आणखी काही?
"म्हणजे"?
स्वावलंबन, रात्रीच्या टॉयलेट ला वाढलेल्या फेर्‍या?
"फेर्‍या वाढल्यात खर्‍या. पण स्वावलंबन कळले नाही".
अहो स्वतःचे कपडे स्वतः धुतो का?
"हो, तुम्हाला कसे कळले"?
स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसेस आहे ती. काहीही काळजी करायचे कारण नाही.
"तासन तास तेच कशाला"?
अनॅलिसिस.
"म्हणजे"?
आहे का नाही.
???
बॉडी सुट आहे का नाही.
"नाही कळले. जरा सविस्तर सांगा".
हे तुम्हाला चुकले नाही. कुणाला चुकले नाही. तुमचे वय काय?
५४
म्हणजे जॉनी मेरा नाम.
"काय कळले नाही."
ह्या दशकात हुस्न के लाखो रंग ने अनेकांना स्वावलंबी बनवले होते. प्रेमनाथ आणि पद्मा खन्नाच्या पोस्टरने तर खुळावले होते.नंतर त्या शिल्पाने चुराके दिल मेरा मधे असाच धुमाकुळ घातला होता. मी जास्त सिनेमा बघत नाही. पण अशी उदाहरणे नेहमीच. माझ्या माहीती प्रमाणे यमुना जळी खेळ खेळू ने सुरवात. तुमचा मुलगा जास्त सेंसिटीव दिसतोय. साधारण वर्षाभरानंतर ह्यातुन सुटका होते. तुमचा अडकलाय.
ह्या वर उपाय काय?
तुम्ही एक काम करा. मी तुम्हाला एक पत्ता देतो. स्टूडीओ मधे जा. त्याला आवडत्या गाण्याचे संपुर्ण अनॅलिसिस त्याला दाखवा.
"कळले नाही."
हे बघा. त्या वेळेस कळले नाही. पण पद्मा खन्नाने संपुर्ण बॉडी सुट घातला होता. हे नंतर कळले. तसेच ह्या सर्व एक फुटी गाण्यामधे हिरॉइन्स स्किन टाईट घालतात. केंव्हाही बघा. क्लोज अप कधीच नसतो. आभास असतो तो अर्ध नग्नत्वाचा. तुम्ही म्हणता त्या गाण्यामधे तो सर्व ठीकाणी आहे. हे त्याला स्टूडीओ मधे कळेल. नॉवेल्टी संपेल. फिक्सेशन पण जाईल. अपवाद फक्त स्विमिंग पुल आणि समुद्र किनार्‍यावरील सीन्स चा. पण ते फारच कमी सेकंद असतात. त्याचे हॅमरींग होत नाही.
स्टूडीयो मदत करेल?
ताशी २५०० दिले की झाले. तो शॉट क्लोज अप मधे एक्स्पांड करेल. बघा सुटतोय का प्रश्न.
जाता जाता: हे झाले तुमच्या मुलाचे? तुमची शावा शावा कोण होती?
" रेखा, परदेके पिछे"

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

4 Oct 2010 - 2:05 pm | स्वैर परी

चांगले लिखाण!!!

नावातकायआहे's picture

4 Oct 2010 - 2:10 pm | नावातकायआहे

>>"म्हणजे"?
स्वावलंबन,

जय स्वावलंबन... ब्रम्हचारी पिच्चर्ची आठवण झाली... ;-)
:d
:d
:d
:d

खुद खूशी....

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 3:51 pm | धमाल मुलगा

हल्ली परिस्थिती इतकी अवघड झालीये?
आमच्या काळी नव्हते हों असें! ;)

-(बाटगा पुणेकर) ध.

मास्तर, हल्लीच्या मुलांना मिळालेल्या एकूणच एक्पोझरमुळे परिस्थिती बिकट होत गेलेली दिसते.
मनातल्या खळबळणार्‍या भावनांना वाट करुन द्यायला संधी मिळत नाही हे अवघड आहे.
वडिलांनी मुलांचे मित्र आणि आईने मुलींची मैत्रीण होणे गरजेचे आहे!
(खुद के साथ बातां : रंगा, घोडा मैदान फार दूर नाही, तुझा लेले होऊ देऊ नकोस म्हणजे झाले! :( )

(चिरंजिवांचा बडी)रंगाडॅड

प्रियाली's picture

4 Oct 2010 - 5:17 pm | प्रियाली

लेख संपूर्ण समजला. :) चांगला किस्सा.

शावा शावा हिंदी झालं हो म्हणून स्किन टाईट सूट्स वगैरे. पण इंग्रजी चित्रपटांचं काय? हल्ली पीजी-१३ चित्रपटांमधली नग्नता वाढत चालली आहे असा अनुभव आहे. पीजी-१३ नंतर पीजी-१६ किंवा पीजी-१५ अशी एक पातळी ठेवावी असे वाटते. अर्थातच, त्याने फारसा फरक पडेल का ते मात्र माहित नाही. ;)

नितिन थत्ते's picture

4 Oct 2010 - 5:53 pm | नितिन थत्ते

>>लेख संपूर्ण समजला. चांगला किस्सा

असेच म्हनतो.

>> शावा शावा हिंदी झालं हो म्हणून स्किन टाईट सूट्स वगैरे. पण इंग्रजी चित्रपटांचं काय?

कोणत्याही जमान्यात इंग्रजी चित्रपट तेव्हाच्या हिंदी चित्रपटांच्या पुढेच असतात.

असो. पद्मा खन्ना नंतर एकदम शिल्पाशेट्टीवर उडी मारल्याबद्दल (पक्षी= आमच्या लक्ष्मी, झीनत अमान, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि इतर असंख्य यांना विसरल्याबद्दल) मास्तरांचा णिशेढ.

चक्क सगळा लेख समजला!;)
तुम्ही त्या वडिलांना चांगला उपाय सुचवलात, सर!
आमच्यासाठीही दिल्ली दूर नाही!
सध्या मुलींबद्दल अतोनात चीड आहे.....थोड्याच दिवसात हे चित्र बदलणार याची कल्पना आहे.;)
माझ्यामैत्रिणीचा १३ वर्षाचा मुलगा स्विमिंगला गेला असताना तिथे त्याच्या वर्गमैत्रिणीला पोहण्याच्या (अंगभर ;) ) कपड्यात पाहिले आणि वैतागला. सगळ्या मुलींशी बोलणे सध्या बंद केले आहे इतका राग आला आहे त्याला!
त्याच्या आईनेही कोणते कपडे घालावेत हे आजकाल तोच ठरवतोय. आईवडील फारच समजुतदार असल्याने प्रकरण चांगलं निभतय. :)

स्वाती२'s picture

4 Oct 2010 - 6:31 pm | स्वाती२

लेख आवडला.
गेल्या महिन्यात लेकाच्या खोलीत स्पोर्ट इलस्ट्रेटेडची स्विम सुट एडिशन मिळाली. हे कधी आलं? म्हणून विचारलं तर लेकाच उत्तर. -'आता त्यातले फोटो बघून सेल्युलाईट सेल्युलाईट करुन रडत बसू नकोस. त्या सगळ्यांना एअरब्रश करतात. they are not real!'

सुरेख लेख !! आणि लेख संपूर्ण समजला.

विनायक प्रभू's picture

4 Oct 2010 - 6:52 pm | विनायक प्रभू

धरमवीर मधील धर्मेंद्र च्यागुढग्यावर एक फुट ड्रेसवर पोट्ट्या खल्लास होत असत.

नितिन थत्ते's picture

4 Oct 2010 - 8:11 pm | नितिन थत्ते

बिन्गो.

चतुरंग's picture

4 Oct 2010 - 9:27 pm | चतुरंग

(कुत्तेकमीनेफ्यान)चतुरंगपाजी*
*(हा पाजी पंजाबी आहे मराठी नाही! ;) )

वाटाड्या...'s picture

4 Oct 2010 - 11:23 pm | वाटाड्या...

विप्र मास्तर...

नेहेमीप्रमाणेच डो़क्याला शॉट्ट..रंगाशेठ म्हणतो त्याप्रमाणे..."वडिलांनी मुलांचे मित्र आणि आईने मुलींची मैत्रीण होणे गरजेचे आहे!"....लाखमोलाची बात ..

राहुन राहुन एक प्रश्ण जरुर पडलाय? आपण कसे कधी मोठे झालो हे कळ्ळ्ही नाही. त्या दिवसांमधे (असं काही तरी म्हणतात...म्हणजे नक्की काय? ते माहीत नाही) आपल्याला हे असले काहीच प्रश्न कधीच कसे पडले नाही? मास्तर आहे का काही उत्तर?

- (रंगाश्टाईल) (मरतयं आता..) कोरडा वाटी

मिसळभोक्ता's picture

5 Oct 2010 - 3:09 am | मिसळभोक्ता

पण मला एक कळले नाही मास्तर, स्वावलंबनाला विरोध का ?

त्याने आंधळेपण येते वगैरे चुकीचे समज आहेत, हे तुम्ही लेल्यांना समजवायला हवे होते.

स्वावलंबनाकडून नैसर्गिकरीत्या परस्परावलंबनाकडे कसे जाता येईल ह्याकडे त्या मुलाचे लक्ष वेधले जाणे जरुरीचे असावे असे वाटते, अन्यथा बोळा निघणार कसा? ;)

रंगा

असहमत.

१) १७ व्या वर्षी परस्परावलंबन ? लग्न होईपर्यंत थांबायला नको ? किमान पालकांनी तरी याचा आग्रह धरावा. धोके समजावून सांगावेत. त्यापलीकडे मुला-मुलींनी काही केलेच तर त्यांची जबाबदारी.

२) मुलांचे (मुलींबद्दल माहित नाही) या वयात (किंवा कधीही) परस्परावलंबनाकडे लक्ष वेधण्याची गरज नाही. त्याचेच वेध असतात (उलट तिथून ल़क्ष डायव्हर्ट करावे लागते). लग्न होईपर्यंत ते नैतिकदृष्ट्या अयोग्य (किंवा काहींना खरोखर अशक्य) म्हणून तर दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न दिसतो.

विनायक प्रभू's picture

5 Oct 2010 - 9:45 am | विनायक प्रभू

@ पेन
जगात असा कुठलाही फोर्स नाही जो जॅक ला जिल बरोबर पाणी भरण्यापासुन थांबवु शकतो.
नैतिक, अनैतिक -विसरा.
मला मुलगी असती तर ....
You can have your fun.. just be careful.
मुलाला सांगुन ठेवले आहे. क्राउन सांभाळ रे बाबा.
आणि जिल टंबलाणार नाही ह्याची काळजी घे.

Pain's picture

5 Oct 2010 - 10:26 am | Pain

असहमत.
तसे काही आहेत: उदा. - स्वत:चे/ पालकांचे नियंत्रण

सध्याच्या जगात नैतिक/अनैतिकतेचे काहीच सोयरसुतक नाही हे खरे आहे पण निदान आपल्या आयुष्यात/ घरात त्याची कदर करायला, किमान तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे ? आधीच हार मानून कशी चालेल ?

विनायक प्रभू's picture

5 Oct 2010 - 9:28 am | विनायक प्रभू

@ मिभो
आणखी एक किस्सा.
११ वी चा एक वर्ग.
ओरियेंटेशन च दिवस.
"मुलांनो शक्यतो स्वावलंबी बना. अगदीच सहन झाले नाही तरच परस्परावलंबी व्हा. पण काळजी घेतल्याशिवाय नाही. भुकंपग्रस्त किंवा वादळग्रस्त झाला तर 'रेड्क्रॉस सोसायटी कडे जाउ नका'. त्या पेक्षा स्वावलंबन केंव्हाही चांगले. आणि स्वावलंबनाने जर आंधळेपण येते असे तुम्हाला सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेउ नका. तसे असते तर युरोपात सायकल करता वेगळे रस्ते असतात तसे भारत सरकार ला आंधळ्यांकरता खास वेगळे रस्ते बांधावे लागले असते."

सूड's picture

5 Oct 2010 - 3:37 pm | सूड

धन्य आहात मास्तर !!

मास्तरचा भाद्रपद जोरात चालु आहे.

अनिल २७'s picture

5 Oct 2010 - 10:36 am | अनिल २७

?

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2010 - 11:39 am | ब्रिटिश टिंग्या

>>हे ही दिवस जातील

म्हणुनच दिवस न जाण्यासाठी हा लेख परत एकदा वाचा! :)

स्वावलंबनाचा आग्रह धरत.स्वावलंबनाचे तोटे खुप कमी आहेत पण फायदे खुप ज्यादा आहेत.

लेख यावेळेला कमी क्रिप्टिक असल्यामुळे कळाला

सुमार दर्जाचे कौल काढुन आपले सुमार विचार अभिजात कसे हे दाखवायच्या दुसर्‍या संस्थळावरिल केविलवाण्या कौलापेक्षा हा लेख निश्चितच चांगला आहे.

चेतन

अवांतरः " गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी संकेतस्थळांचे स्वरुप झपाट्याने 'गृहशोभिका' प्रकारचे होत आहे. एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते. " असे म्हणणारे सुडो-विचारवंत पाहिले की कीव येते.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Oct 2010 - 4:31 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या सगळ्याचा इथे काय संबंध ?

अस्माकं बदरीचक्रम्‌ युष्माकं बदरीतरु : |
बादरायणसंबधात्‌ यूयं यूयं वयम्‌ वयम् ||

मला वाटलं हा लेख कामण्णा महाडिकांचा असावा
नसेल तर प्रतिसाद उडवण्यास हरकत नाही

चेतन

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2016 - 4:55 pm | टवाळ कार्टा

खोदकामातील एक रत्न :)....अप्रतीम आहे