शावा शावा
"हॅलो"
बोल रे जोशा
"चो, तु कभी खुशी कभी गम बघितला आहेस का रे?"
म्हटले तर हो म्हटले तर नाही
"म्हणजे"?
फॅमिली सकट गेलो होतो. एक मित्र आणि त्याची फॅमिली पण बरोबर होती. पहील्या २० मिनिटात भर एयर कंडिशन मधे आम्हा दोघांना घाम फुटला. मग गम मिटवण्यासाठी फॅमिली ला तिथेच सोडुन थिएटर जवळ असलेल्या बार मधे सिंगल माल्ट खुशी. शेवटची १५ मिनिटे बघितला.फुल्ल असल्यामुळे त्रास झाला नाही. पण त्या हॉरर ची अचानक तुच आठवण का द्यावीस बरे?
"अरे एक केस आहे. बघ तुला जमते का? माझेच नातेवाईक आहेत. उगाच सायकॉलॉजिस्ट आणि नंतर ची ट्रिटमेंट टाळता आली तर बरे"
पिक्चर बघुन डायरेक्ट सायकॉलॉजिस्ट?
"मी बापाला पाठवुन देतो, बघ का जमतेय का?"
-----------------------------------------------------------------------------------------
"मी लेले"
बोला.
"तुमच्या बद्दल जोशी साहेबांनी....."
थांबा, मी सायकिअॅट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट नाही हे तुम्हाला माहीत आहे ना?
"हो"
बोला
"जरा अवघड आहे कसे सांगायचे ते कळत नाही"
बोला, काहीही न लपवता बोला.
" मुलाबद्दल आहे. १७ वर्षाचा आहे. हे सर्व सुरु झाले शावा शावा गाण्याने"
म्हणजे?
"पिक्चर बघुन आल्यावर मुलाचे वागण्यात लक्षात येइल असा बदल झाला."
म्हणजे पिक्चर बघितला तेंव्हा साधारण वय १४. ठीक. शावा शावा चे काय?
"अहो त्या गाण्यामध्ये अर्धवट कपड्यामधे मुली नाचतात ना"
हां. अमिताभ च्या वाढदिवसाच्या निमित्ताने चा नाच. बर मग?
"अहो गुढ्ग्यावर एक फुटचे स्कर्ट घालुन वाढदिवसाला नाच"?
अहो तो इंडस्ट्रिअॅलिस्ट आहे. त्याच्या घरात कुणी किती कपडे घालावेत ह्या बद्दल आपण काय बोलणार? त्याच्याशी तुमच्या मुलाचा काय संबध?
"तसे नाही हो. त्या नंतर असलीच गाणी त्याला आवडायला लागली. गेल्या दोन वर्षात अशाच गाण्याच्या सीड्या मधे गुंतलेला असतो. एवढा हुशार मुलगा. परफॉर्मन्स अगदी खाली आलाय. रेस्,ऑल द बेस्ट, दे दना दन वगैरे पिक्चर मधे ह्या गाण्यांचा नॉन स्टॉप सप्लाय."
आणखी काही?
"म्हणजे"?
स्वावलंबन, रात्रीच्या टॉयलेट ला वाढलेल्या फेर्या?
"फेर्या वाढल्यात खर्या. पण स्वावलंबन कळले नाही".
अहो स्वतःचे कपडे स्वतः धुतो का?
"हो, तुम्हाला कसे कळले"?
स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसेस आहे ती. काहीही काळजी करायचे कारण नाही.
"तासन तास तेच कशाला"?
अनॅलिसिस.
"म्हणजे"?
आहे का नाही.
???
बॉडी सुट आहे का नाही.
"नाही कळले. जरा सविस्तर सांगा".
हे तुम्हाला चुकले नाही. कुणाला चुकले नाही. तुमचे वय काय?
५४
म्हणजे जॉनी मेरा नाम.
"काय कळले नाही."
ह्या दशकात हुस्न के लाखो रंग ने अनेकांना स्वावलंबी बनवले होते. प्रेमनाथ आणि पद्मा खन्नाच्या पोस्टरने तर खुळावले होते.नंतर त्या शिल्पाने चुराके दिल मेरा मधे असाच धुमाकुळ घातला होता. मी जास्त सिनेमा बघत नाही. पण अशी उदाहरणे नेहमीच. माझ्या माहीती प्रमाणे यमुना जळी खेळ खेळू ने सुरवात. तुमचा मुलगा जास्त सेंसिटीव दिसतोय. साधारण वर्षाभरानंतर ह्यातुन सुटका होते. तुमचा अडकलाय.
ह्या वर उपाय काय?
तुम्ही एक काम करा. मी तुम्हाला एक पत्ता देतो. स्टूडीओ मधे जा. त्याला आवडत्या गाण्याचे संपुर्ण अनॅलिसिस त्याला दाखवा.
"कळले नाही."
हे बघा. त्या वेळेस कळले नाही. पण पद्मा खन्नाने संपुर्ण बॉडी सुट घातला होता. हे नंतर कळले. तसेच ह्या सर्व एक फुटी गाण्यामधे हिरॉइन्स स्किन टाईट घालतात. केंव्हाही बघा. क्लोज अप कधीच नसतो. आभास असतो तो अर्ध नग्नत्वाचा. तुम्ही म्हणता त्या गाण्यामधे तो सर्व ठीकाणी आहे. हे त्याला स्टूडीओ मधे कळेल. नॉवेल्टी संपेल. फिक्सेशन पण जाईल. अपवाद फक्त स्विमिंग पुल आणि समुद्र किनार्यावरील सीन्स चा. पण ते फारच कमी सेकंद असतात. त्याचे हॅमरींग होत नाही.
स्टूडीयो मदत करेल?
ताशी २५०० दिले की झाले. तो शॉट क्लोज अप मधे एक्स्पांड करेल. बघा सुटतोय का प्रश्न.
जाता जाता: हे झाले तुमच्या मुलाचे? तुमची शावा शावा कोण होती?
" रेखा, परदेके पिछे"
प्रतिक्रिया
चांगले लिखाण!!!
जय स्वावलंबन
बोंबला!
खल्लास, एकदम थेट दिग्दर्शन केलेत की!
:-)
+
चक्क सगळा लेख समजला! तुम्ही
लेख आवडला. गेल्या महिन्यात
सुरेख लेख !! आणि लेख संपूर्ण
धरम
+
बुल्स आय मास्तर!!
बाबो...
आंधळेपण ?
मास्तरांचा विरोध स्वावलंबनाला नसावा
असहमत. १) १७ व्या वर्षी
जॅक
विनायक प्रभू
विरोध?
धन्य आहात मास्तर !!
मास्तरचा भाद्रपद जोरात चालु
?
:)
मास्तर आपले गांधीजी देखिल
लेख यावेळेला कमी क्रिप्टिक
ह्या सगळ्याचा इथे काय संबंध ?
अस्माकं बदरीचक्रम् युष्माकं
मला वाटलं हा लेख कामण्णा
खोदकामातील एक रत्न :)...