(सुरेश भटांच्या प्रतिभेला सलाम करून. मूळ कविता खाली दिली आहे)
सोसुनी सोसास या आक्रोश माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात नाही श्वास माझा मोकळा
कोण जाणे कोठुनी हे पाहुणे आले इथे
मी असा की लागतो ह्या पाहुण्यांनाही लळा
राहतो माझ्या घरी हा सासरा खाष्टापरी
बायको का ही अपूरी कापण्या माझा गळा?
कोणत्या काळी कळेना मी जुवाला जुंपलो
अन् कुठे पत्नी पळाली ती भगीनी मंडळा
वाटुनी आश्चर्य माझे सांगते साऱ्या जना
"काय सांगू मठ्ठ आणी मूलखाचा वेंधळा"
पाहुण्यांच्या मध्यभागी कोंडलेला बैल मी
माझियासाठी न माझा नांगराचा सोहळा
मूळ कविता
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
प्रतिक्रिया
4 Oct 2010 - 11:07 am | श्रावण मोडक
हं!
4 Oct 2010 - 2:28 pm | नितिन थत्ते
Thou too, Ghaskadvi !!!!!
विडंबनात नेहमीचा "बायको आणि तिचे नातेवाईक" हा विषय आणल्याने मजा नाही आली.