हिंदूर

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जे न देखे रवी...
26 Sep 2010 - 6:07 pm

मिलिंद फणसेंची अप्रतिम सिंदूर आणि आसपासच्या समाजात साचत चाललेली समृद्ध अडगळ यांची मनात गल्लत झाल्याने उमटलेले हे काही वेडेवाकुडे

नि:शब्द होत गेलो, मजबूर होत गेलो
हिंदू वाचुवाचूनी हिंदूर होत गेलो

ठिणग्या विझून गेल्या, पिकल्या जरी मिशाही
हसले पुन्हा नेमाडे मी धूर होत गेलो

धारा न अमृताच्या पानेच ही सहाशे
डोळ्यात नीज येता मगरुर होत गेलो

ही कोसलाबिढारे वाचून पाठ होती
'हिंदू' जुन्या बाजारी - मी शूर होत गेलो

स्मरणातुनी पुसेना पुसता कथा 'खंड्या'ची
काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो

हास्यगझलविडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

26 Sep 2010 - 6:26 pm | श्रावण मोडक

मी दूर होत गेलो... वा. भावना व्यक्त!

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2010 - 7:34 pm | बिपिन कार्यकर्ते

क्या बात है, रावसाहेब! पाच कडव्यात एकदम मस्त मांडलं आहेत.

नगरीनिरंजन's picture

26 Sep 2010 - 8:09 pm | नगरीनिरंजन

समर्पक! :-)

हम्म. ठीक आहे.
या उपर काहीच म्हणावेसे वाटत नाही.
दूर शूर धूर मगरूर या शब्दांचा अर्थ माहीत आहे. हिंदूर म्हणजे काय?
की तुम्हाला त्या तिथे विधूर हा शब्द वापरायचा होता
असो.
बाकी एखादी लेखणी थकली की फक्त
काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो

हेच म्हणावेसे वाटते.
...................( रावसाहेंबांच्या उत्तम लेखनाचा एक चाहता)

जबरी!!
मानसिक अवस्थेचं समर्पक वर्णन!!
५ ही कडवी कडवट सुंदर.

चतुरंग's picture

26 Sep 2010 - 11:36 pm | चतुरंग

अस्वस्थ भावना चांगल्याप्रकारे व्यक्त झाल्या आहेत!

रंगा

अथांग's picture

27 Sep 2010 - 1:48 am | अथांग

तुमचे - वेडेवाकुडे !

सूड's picture

27 Sep 2010 - 6:54 pm | सूड

छान !!

विसोबा खेचर's picture

27 Sep 2010 - 9:09 pm | विसोबा खेचर

वा वा!