स्मृतिभ्रंश!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
25 Sep 2010 - 1:25 pm

बातमी खूप वाईट आहे.
गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे.
माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे!
काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता. मला वाटलं, झाला असेल "स्विच ऑफ'! पण मोबाईल नव्हे, त्यातलं "सॉफ्टवेअर' स्विच ऑफ झालंय, याची मज पामरास काय कल्पना?
सकाळी सगळे प्रयोग करून पाहिले. बायकोच्या मोबाईलमधलं सिमकार्ड काढून इकडे घाल, इकडची बॅटरी तिकडे लाव, मेमरी कार्ड तपासून बघ...सगळे निष्फळ होते. मोबाईल जो रुसून बसला, तो उजेडात यायला काही तयार नव्हता.
""सगळे नंबर सेव्ह करून ठेवायला काय होतं तुला? फोन मेमरी कशाला वापरतेस? सिम मेमरी वापरत जा ना! एवढंही कळत नाही का...'' वगैरे वगैरे स्तुतिसुमनं मी हर्षदावर वारंवार उधळली होती. त्यामुळं माझ्याकडील सर्व नंबर सिमकार्डमध्ये सेव्ह असणार, याची खात्रीच होती. माझं सिमकार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं, तेव्हा त्यात ढिम्म एकसुद्धा नंबर दिसत नव्हता.
माझा पोपट झाला होता. मोबाईल बंद पडला होताच, वर सिम कार्ड कोरं होतं. सकाळी सगळा जामानिमा घेऊन मोबाईलच्या दुकानात जाणं नशीबी आलं.
"साहेब, काही होणार नाही. सॉफ्टवेअर बदलायला लागेल. मेमरी लॉस होईल...' तिथल्या कर्मचाऱ्यानं निष्ठूरपणे सांगून टाकलं.
""अरे लेका, आमची मेमरी लॉस झालेय म्हणून या मोबाईलच्या मेमरीवर अवलंबून राहतो ना! आता तीही लॉस झाली, तर "गझनी' होईल की नाही आमचा?'' असं म्हणायचं अगदी तोंडावर आलं होतं. पण मी ते माझ्या "मेमरी'तच ठेवलं. "डिस्प्ले' होऊ दिलं नाही.
मग खात्री करण्यासाठी आणखी दोन-चार दुकानं पालथी घातली. काहीही फायदा होणार नव्हता, हे लक्षात आलं होतं, तरी वेडी आशा काही सुटत नव्हती. "सध्याच्या स्थितीत फोन नंबर्स तरी सेव्ह होणार नाहीत का,' अशी अजीजी मी प्रत्येक ठिकाणी करत होतो आणि मी जणू काही त्यांची इस्टेट लिहून मागत असल्यासारखी प्रतिक्रिया ते देत होते.
शेवटी मनावर दगड ठेवून "सॉफ्टवेअर' बदलून घ्यायचं ठरवलं. दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून आधीच्या सॉफ्टवेअरला श्रद्धांजली वाहिली. काहीही झालं तरी त्यानं मला दोन वर्षं साथ दिली होती! संध्याकाळी मोबाईल कोरा होऊन माझ्या हातात आला, तेव्हा माझं मन मात्र आता सगळे नंबर पुन्हा जमविण्याच्या कल्पनेनंच भरून आलं होतं!
...
ता. क. : "तुमचा मोबाईल नंबर पाठवा,' असा एसएमएस माझ्या सर्व परिचितांना पाठवण्याचा विचार आहे. कशी वाटते कल्पना?

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

हा हा. आमचा परममित्र संगणक परवा असाच कोरा खरंतर(मॅट्रीक्स पाहिला असेल तर) गर्भावस्थेतच गेला म्हणा ना. आम्हीही अगदी.. असो.

(स्मार्ट फोन घ्या हो, फोनचा पुर्ण बॅकअप संगणकावर, त्या संगणकाचा पुर्ण बॅकअप दुसर्‍या संगणकावर ... असे घेउन ठेवले की कटकट नाही, कसें? ;-) )

प्रीत-मोहर's picture

25 Sep 2010 - 1:39 pm | प्रीत-मोहर

हॅहॅहॅ

मस्त कलंदर's picture

25 Sep 2010 - 1:44 pm | मस्त कलंदर

स्मार्ट फोन घ्या हो, फोनचा पुर्ण बॅकअप संगणकावर, त्या संगणकाचा पुर्ण बॅकअप दुसर्‍या संगणकावर ... असे घेउन ठेवले की कटकट नाही, कसें?

हेच म्हणणार होते. गेल्य तीन मोबाईल्समध्ये मी स्वतःहून आधीचे नंबर्स सेव्ह केले नाहीत. किंवा फोन मेमरी टू सिम मेमरी आणि सिम मेमरी टू फोन मेमरी असा द्रविडीप्राणायामही केला नाही. बॅक-अप आणि रिस्टोर.. शिंपल!!!!

शुचि's picture

25 Sep 2010 - 5:52 pm | शुचि

छान फुलवलाय प्रसंग

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2010 - 5:58 pm | कानडाऊ योगेशु

ता. क. : "तुमचा मोबाईल नंबर पाठवा,' असा एसएमएस माझ्या सर्व परिचितांना पाठवण्याचा विचार आहे. कशी वाटते कल्पना?

अहो पण त्यासाठी त्यान्चे नम्बर तरी तुमच्याकडे हवेत ना?

चिरोटा's picture

25 Sep 2010 - 8:12 pm | चिरोटा

कल्पना आहे ती.
मस्त रंगवली आहे कथा.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Sep 2010 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

काय हे ? बॅक अप घेउन ठेवला न्हवता ?

मुख्य म्हणजे तुमच्याकडे स्टेपनी नाही ?????

पैसा's picture

25 Sep 2010 - 8:22 pm | पैसा

आपल्या दु:खात सहभागी आहे.

बाकी एसेमेस पाठवायची कल्पना वाचून "तेरा नाम क्या है बसंती?" ची आठवण आली आणि डोळे पाणावले!

तुमच्या सेवादात्याकडे जाऊन नेटवर्कवरुन अ‍ॅड्रेसबुक डाऊनलोड करुन घेता येते का ते पहा. तुमच्या जुन्या फोनला ती सुविधा मात्र हवी त्याला 'नेटवर्क सिंक्रोनायझेशन' म्हणतात. ती असल्यास तुमचे नंबर्स नेटवर्कला असतात.
आणि नव्या फोनला सुद्धा सुविधा हवी तरच तुमचे नंबर्स तुम्हाला मिळतील.
परवाच मी माझा मोबाईल बदलून नवा घेतला त्यावर ही सुविधा नसल्याने मला नंबर्स मिळेनात मग पुन्हा तो परत करुन दुसरा घेतला आणि झटक्यात अ‍ॅड्रेसबुक लोड झाले! ;)

(सिंक्रोनाईज्ड्)चतुरंग

शिल्पा ब's picture

25 Sep 2010 - 11:21 pm | शिल्पा ब

म्हणजे आपली सगळी माहीती नेटवर्क कडे? प्रायव्हसीचं काय?

चतुरंग's picture

25 Sep 2010 - 11:41 pm | चतुरंग

एन्क्रिप्टेड असते. तुमच्याखेरीज इतरांना बघता येत नाही.

(कोडेड्)चतुरंग

Pain's picture

25 Sep 2010 - 11:45 pm | Pain

प्रायव्हसी? हे तर काहीच नाही. गूगलच्या क्लाउड काँप्युटींगबद्दल माहिती वाचले आहे का ?

आपला अभिजित's picture

26 Sep 2010 - 12:48 am | आपला अभिजित

माझ्या काळजात पडलेल्या खड्ड्याची आपण योग्य दखल घेऊन त्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल धन्यवाद. झाले गेले नंबर गंगेला मिळाले, असे आता मी मानू लागलो आहे. तरी पण चतुरंगाने सुचवलेला उपाय पडताळून पाहायला हरकत नाही. बाकी संगणकावर बॅक-अप वगैरे परिभाषा ऐकून मला गहिवरून आले आहे! याच काय, पुढच्या जन्मातही मी एवढ्या तांत्रिक बाबीत लक्ष घालून वेळ देण्याची शक्‍यता मला अतिशय धूसर वाटते आहे!
असो.
बाकी, "सगळ्यांना एसएमएस करून त्यांचे नंबर मागविण्याबाबत मी केलेल्या विनोदाच्या प्रयत्नाला मिळालेली दाद पाहून मला भडभडून आले आहे!!

श्रावण मोडक's picture

26 Sep 2010 - 10:22 am | श्रावण मोडक

बाकी, "सगळ्यांना एसएमएस करून त्यांचे नंबर मागविण्याबाबत मी केलेल्या विनोदाच्या प्रयत्नाला मिळालेली दाद पाहून मला भडभडून आले आहे!!

हाहाहाहा... मलाही तसंच झालं होतं.

मस्त कलंदर's picture

26 Sep 2010 - 12:29 pm | मस्त कलंदर

ढच्या जन्मातही मी एवढ्या तांत्रिक बाबीत लक्ष घालून वेळ देण्याची शक्‍यता मला अतिशय धूसर वाटते आहे!

यात अवघड काहीच नाही. तुमच्या फोनसोबत येणारे सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल करा. अथवा नेटवरून डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. फोनसोबत कनेक्टर्स येतात. फोन काँप्युटरला जोडा. सॉफ्टवेअर मघला बॅकअप अँड रिस्टोर ऑप्शन निवडा. तुम्हाला कशाचा नक्की बॅकअप घ्यायचाय उदा. नंबर्स, फोटो, कॅलेंडर, व्हिडिओ, गाणी ते सिलेक्ट हे तो तुम्हाला विचारेल. हवे ते पर्याय निवडा. बॅकअप कुठे साठवायचा ते संगणकाला सांगा.. पुढच्या वेळेस हीच प्रोसीजर फक्त बॅकअप कुठे साठवलाय ते सांगायचे. शिंपल!!!!

डावखुरा's picture

26 Sep 2010 - 3:11 am | डावखुरा

अहो मेमरी लोस झाली ना मग एसेमेस कोणत्या क्रमांकावर पाठवणारे...
:p

>>>>>"तुमचा मोबाईल नंबर पाठवा,' असा एसएमएस माझ्या सर्व परिचितांना पाठवण्याचा विचार आहे. कशी वाटते कल्पना?

गांधीवादी's picture

26 Sep 2010 - 7:03 am | गांधीवादी

आं, मे कहा हुं ?
मै कोन हुं ?
ये आजु बाजु क्या हो रहा है ?
ये सब लोग कोन है ?
मै यहा किसलिये आया हुं ?
(तमाम हिंदी पिक्चर वाल्यांची याददाश्त गेली, तरी त्यांचे भाषा ज्ञान काय जात नाही. )

लेख आवडला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2010 - 1:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे...! मीही फोनला फॉर्मेट मारले आणि सर्व फोन क्रमांक घालवून बसलो.
सीम मधील शिल्लक असलेल्या क्रमांकानी दु:ख हलके केले तेवढेच.

अवांतरः सीमकार्ड मधे अधिक क्रमांक साठवता येतील अशी काही सुविधा आहे काय ?

-दिलीप बिरुटे