अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या
अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या
आडकल घास, थोडं पानी प्या, तुमी धिरानं घ्या ||धृ||
पुरणावरनाचं जेवन केलं निगूतीनं
तिखट सार केला मसाला वाटून
आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१||
कुरडई पापड कढईत तळले
वाटीमधी गुळवणी ताक दिले
हातामधी घेवून सारं तुम्ही कुस्करा ||२||
घाई नका करू जेवतांना
घास चावून घ्या खातांना
आरामात करा सारं, मग मसाला पान खा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०१०
प्रतिक्रिया
25 Sep 2010 - 3:47 pm | गांधीवादी
>>आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१||
एवढ्या लाडिक पणे आग्रह ऐकल्यावर कोण नाय म्हणणारे ? कारभारी चापून चापून हाणल्याशिवाय काय उठणार नाय.
25 Sep 2010 - 4:38 pm | मितभाषी
कारभारी चापून चापून हाणल्याशिवाय काय उठणार नाय. =)) =)) =)) =))
@गांधीवादी,
अरे पार वघळ येइपेर्यंत होनार मंग
26 Sep 2010 - 5:41 am | गांधीवादी
चाव्ट. आमी नायी ज्जा.