आयटम साँग: तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Sep 2010 - 4:50 pm

आयटम साँग: तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना

हं..अं..अं..अं..अं..अं..अं..
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना
माझ्याबरोबर तुम्ही गाणं म्हणा
कंबर हलवूनी एकसाथ गाणं गाना
गाण्याच्या नशेमध्ये सारे चिंग व्हाना
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||धृ||

मासोळी ज्वानी माझी चमचम करी
पाण्यात पडले पोहते तेजधारेतूनी
राणी मी तुमची तुम्ही माझे राणा
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||१||

मी राणी हुकूमाची तुम्ही सारे गुलाम
एक मारी ठुमका करी दुनीया सलाम
पत्ते हाती धरता आता उतारी सोडाना
तुन तुन तुन तुन तुन ताना ना..ना..ना...ना..ना ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०९/२०१०

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

सुनील's picture

12 Sep 2010 - 12:52 am | सुनील

पाभे, असेच दगड फोडीत रहा!

"चाल"वाले काका कुठे गेले?

अविनाशकुलकर्णी's picture

12 Sep 2010 - 8:31 am | अविनाशकुलकर्णी

मस्त

(कृपया हलके घ्या.)
पाषाणभेद साहेब हे गाणे विकता का भारता सरकारला ? ५/१० कोटी रुपये नक्कीच मिळून जातील. एकजात सगळे bolywood वाले पण नक्कीच थिरका लाऊ शकतील ह्या गाण्यावर. तो रेहेमान सध्या त्याच्या कामात व्यस्त असल्याने त्याला आपल्या "ओ यारो, ये इंडिया बुला लिया" गाण्यावर चाल बदलण्यासाठी वेळच नाही. तुम्ही प्रयत्न करा.
'राष्ट्रकुल' गीत बदलण्यास रेहमानचा नकार