इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत का ?
मी जुन्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी वाचायला गेलो आणि पोपट झाला.
--------
दुपारी ते टूल बहुदा चालले नाही माझ्या browser मध्ये. आत्ता उघडले.
प्रचंड धन्यवाद. जुने अंक मला कुठेच मिळाले नव्हते.
आई ग!!!!!!!!!! पहीली कथा आज (गणपती बसल्याच्या दिवशी) वाचली ती ही गणेश पुराणातली - भाद्रपद चतुर्थीची गणपतीची. ईतकं गोड वाटलं वाचून - वर्ष =१९८२, महीना = जून
ऐंशीच्या दशकातल्या सुरुवातीचे बरेच अंक वाचले होते .. ते शोधत आहे...
आता मी भल्लूक मान्त्रिक असं एक क्यारेक्टर असलेली एक कथा शोधत आहे..
आणि एक जाहिरात असायची कोणत्यातरी बँकेची.. " मी आहे मिंटी एक खारोटी" अशी
मी शाक्तपंथीय लोक असलेली एक गोष्ट शोधणार आहे; त्यातला नायक (बहुदा अनुक्रमे १, ३, ५, ७) डोकी असलेले साप मारत मारत एकामागून एक दरवाजे पार करत जातो तिथपर्यंत वाचली होती.
रामायणही सुंदर होते.
मी मॅड झालो आहे..... आता "मिसळपाव" ला रामराम..... जितका वेळ माझा स्वतःचा म्हणून माझ्याकडे आहे तो सगळा सगळा सगळा सगळा सगळा "चांदोबा" बरोबर व्यतीत करणार !!!!!
माझ्याबरोबर मी माझ्या मामाला - (जे स्वतः आम्हाला त्यांच्या लहानपणी ते वाचत असलेल्या 'काशांचा किल्ला' बद्दल डोळे मोठे करून सांगत असत).... खुळे करणार...त्यांना प्रत्यक्ष भेटूनच हा खजिना उलगडणार कारण त्यांच्या चेहर्यावरील अविश्वसनीय भाव मला टिपायचे आहेत.
थॅन्क्स गोगोल फॉर द अप्रेसिएशन.... पण 'चांदोबा' ची नशा आता माझ्या डोक्यात इतकी भिनली आहे की, येथील (रोहटकमधील) तीन मित्रांसमवेत एका फिल्ड वर्कला जावे की न जावे या मनःस्थितीत होतो, पण आता जाण्याचे नक्की केले आहे, कारण कामानंतर तेथील एका फार्म हाऊसवर आमच्या मुक्काम असतो. वर्क शेड्युल रिपोर्टचे काम संपल्यानंतर आणि भोजनानंतर बाकीचे झोपी गेल्यावर मी 'चांदोबा' बरोबर मनसोक्त फिरणार....फिरणारच आता....एकटा ! [एरवी एफएम बँड रेडिओची साथ असायची...पण आता चक्रपाणींचा चांदोबा !
बाय द वे...तुम्हाला हा खजिना कसा काय समजला/सापडला?
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 12:31 pm | शानबा५१२
अविश्वसनिय!!
शतशा: आभार
11 Sep 2010 - 12:47 pm | Nile
धन्यवाद! लिंक आवडली, चाल्लो झाडावर लगेच*.
* का चाल्लो या प्रश्नाचे उत्तर माहित असुनही प्रश्न विचारलात तर डोक्याची शंभर शकले होउन पायाशी लोळु लागतील.
-निळ्या वेताळ.
11 Sep 2010 - 12:55 pm | मितान
लिंक आवडली. खजिनाच आहे हा !
आता चंपक ची पण असेल तर द्या.
11 Sep 2010 - 1:34 pm | आनंदयात्री
वाह !
गणेशोत्सवाची उत्तम भेट समजावे या लिंकला !!
(साईट द्रुपाल आधारितच असावी असे वाटतेय)
11 Sep 2010 - 5:56 pm | शुचि
कमाल केलीत!
हा वीकेन्ड मस्त गोष्टी वाचण्यात जाणार.
11 Sep 2010 - 6:15 pm | चिंतामणी
बालपणात नेउन सोडलेत आम्हाला.
हंममममममममममम
बरेच दिवस पुरेल हा खजीना आता.
11 Sep 2010 - 10:58 pm | मृत्युन्जय
दुव्याबद्दल धन्यवाद. दुवा मे याद रखेंगे आपको :)
12 Sep 2010 - 9:39 am | Pain
इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत का ?
मी जुन्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी वाचायला गेलो आणि पोपट झाला.
--------
दुपारी ते टूल बहुदा चालले नाही माझ्या browser मध्ये. आत्ता उघडले.
प्रचंड धन्यवाद. जुने अंक मला कुठेच मिळाले नव्हते.
12 Sep 2010 - 10:26 am | गोगोल
जवळ जवळ सगळे भाग दिसले. फक्त ८७ का ८८ साल मध्ये फक्त ५ पाचच महीने आहेत.
12 Sep 2010 - 12:58 am | सुनील
अहाहा! बालपणीच्या कित्येक आठवणी "चांदोबा"शी निगडीत आहेत!
"वाचनखूण" साठवण्याची सोय कधी उपलब्ध होणार?
12 Sep 2010 - 2:57 am | शुचि
आई ग!!!!!!!!!! पहीली कथा आज (गणपती बसल्याच्या दिवशी) वाचली ती ही गणेश पुराणातली - भाद्रपद चतुर्थीची गणपतीची. ईतकं गोड वाटलं वाचून - वर्ष =१९८२, महीना = जून
फारच मोठा खजीना सापडलाय.
12 Sep 2010 - 3:07 am | पुष्करिणी
धन्यवाद, अगदी खजिना आहे. खूप आवडली लिंक .
12 Sep 2010 - 3:37 am | भडकमकर मास्तर
गोगोल साहेब, मजा आणलीत...
ऐंशीच्या दशकातल्या सुरुवातीचे बरेच अंक वाचले होते .. ते शोधत आहे...
आता मी भल्लूक मान्त्रिक असं एक क्यारेक्टर असलेली एक कथा शोधत आहे..
आणि एक जाहिरात असायची कोणत्यातरी बँकेची.. " मी आहे मिंटी एक खारोटी" अशी
12 Sep 2010 - 4:59 am | शुचि
भाषा - मराठी
वर्ष - १९७८
महीना - डिसेंबर
भल्लूक मांत्रिकाची क्रमशः कथा आहे यात
12 Sep 2010 - 10:24 am | गोगोल
ही कथा मला देखील चाळता चाळता दीसली होती.
12 Sep 2010 - 9:18 am | चिंतामणी
ती महाबॅंकेची होती जाहीरात.
12 Sep 2010 - 9:58 am | Pain
मी शाक्तपंथीय लोक असलेली एक गोष्ट शोधणार आहे; त्यातला नायक (बहुदा अनुक्रमे १, ३, ५, ७) डोकी असलेले साप मारत मारत एकामागून एक दरवाजे पार करत जातो तिथपर्यंत वाचली होती.
रामायणही सुंदर होते.
12 Sep 2010 - 8:54 am | मदनबाण
अरे वा... झकास !!! :)
या दुव्या बद्धल तुम्हाला दुवा देतो... ;)
12 Sep 2010 - 10:15 am | चिगो
झ्याक काम... धन्यवाद.
12 Sep 2010 - 10:21 am | गोगोल
म्हणजे धूमकेतू. १९८१-८२ सुमारास प्रकशित झाली होती.
12 Sep 2010 - 10:36 am | इन्द्र्राज पवार
गोगोल गोगोल गोगोल गोगोल गोगोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल !!!!!!!!
माझ्याकडून तुम्हाला १००१ गोड गोड गोड गोड गोड मोदक !!!!!
मी मॅड झालो आहे..... आता "मिसळपाव" ला रामराम..... जितका वेळ माझा स्वतःचा म्हणून माझ्याकडे आहे तो सगळा सगळा सगळा सगळा सगळा "चांदोबा" बरोबर व्यतीत करणार !!!!!
माझ्याबरोबर मी माझ्या मामाला - (जे स्वतः आम्हाला त्यांच्या लहानपणी ते वाचत असलेल्या 'काशांचा किल्ला' बद्दल डोळे मोठे करून सांगत असत).... खुळे करणार...त्यांना प्रत्यक्ष भेटूनच हा खजिना उलगडणार कारण त्यांच्या चेहर्यावरील अविश्वसनीय भाव मला टिपायचे आहेत.
थॅन्क्सस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स !
इन्द्रा
12 Sep 2010 - 10:44 am | गोगोल
तेव्हढा "मिसळपाव" ला रामराम नका ठोकू. तुमचे प्रतिसाद फार चांगले असतात.
12 Sep 2010 - 3:04 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स गोगोल फॉर द अप्रेसिएशन.... पण 'चांदोबा' ची नशा आता माझ्या डोक्यात इतकी भिनली आहे की, येथील (रोहटकमधील) तीन मित्रांसमवेत एका फिल्ड वर्कला जावे की न जावे या मनःस्थितीत होतो, पण आता जाण्याचे नक्की केले आहे, कारण कामानंतर तेथील एका फार्म हाऊसवर आमच्या मुक्काम असतो. वर्क शेड्युल रिपोर्टचे काम संपल्यानंतर आणि भोजनानंतर बाकीचे झोपी गेल्यावर मी 'चांदोबा' बरोबर मनसोक्त फिरणार....फिरणारच आता....एकटा ! [एरवी एफएम बँड रेडिओची साथ असायची...पण आता चक्रपाणींचा चांदोबा !
बाय द वे...तुम्हाला हा खजिना कसा काय समजला/सापडला?
इन्द्रा
12 Sep 2010 - 9:51 pm | गोगोल
एका मित्रानी पाठ्वला.
13 Sep 2010 - 10:05 am | अण्णु
अत्यंत आभारी आहे :)
16 Sep 2010 - 4:18 pm | Arun Powar
गोगोल मित्रा, लिंक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद..!!
13 Nov 2016 - 7:02 pm | जयन्त बा शिम्पि
दिलेल्या लिंकवर " एरर " चा मेसेज येत आहे. कां ?
15 Nov 2016 - 12:26 pm | वैनिल
https://archive.org/details/chandamama_magazine
18 Nov 2016 - 6:25 pm | उमेश माधवराव मसलेकर
माझ्याकडे चंदामामा हे हिन्दी मासिक १९४९ ते २००६ सर्व महिन्यांचे अंक उपलब्ध आहेत RAR format मध्ये.कोणाला हवे असल्यास मी मोफत देण्यास तयार आहे.
20 Nov 2016 - 1:00 pm | सारिका होगाडे
मला मराठी चांदोबा हवे आहेत. असतील तर कृपया सांगावे. धन्यवाद.