(बाणा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
8 Sep 2010 - 1:31 pm

माझी आवडती कविता 'कणा' इथे वाचता येईल. कुसुमाग्रजांची माफी मागून:

"ओळखलंत का 'सर' मला", खवत आला कोणी
आयडी होता ओळखीतलाच, अशुद्ध होती वाणी

तासभर रुसला, नंतर हसला, बोलला व्यनी पाहून
कंपूबाज पाहुणे आले, गेले ऊतमात घालून

आपलीच खव असल्यागत द्व्यर्थी संवाद बरळले
संपादक स्वस्थ राहतील कसे, काही खडे वगळले

अवांतर नडले, प्रतिसाद उडले, धागे वाचनमात्र झाले
रडण्यासाठी माझ्याकडे खरड-व्यनी राहिले

डुप्लिकेट फौज घेऊन संगे, 'सर' आता लिहीतो आहे
नवीन प्रतिसाद देतो आहे, नविन रिक्रूट जमवत आहे

कात्रीकडे हात जाताच रडत रखडत हसला
"संपादन नको सर जरा कंपूबाज हटवा!"

(सर उवाच)

"मला नाही त्यांनी सोडलं, सोड तुझा बाणा
तुम्हीतरी सर्व आयडींनी मला 'आपलं म्हणा!'"

झेंडू-grudge (अर्थात 'झेंडूच्या फुलां'वरचा माझा grudge)

भयानकविडंबन

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

8 Sep 2010 - 1:42 pm | निखिल देशपांडे

अनावश्यक विडंबन

असुर's picture

8 Sep 2010 - 4:42 pm | असुर

निदेंशी बाडीस!
अतिशय अर्वाच्य (वाचनयोग्य नसलेले) आणि ही&ही विडंबन!

तरीसुद्धा रसग्रहण करायचा एक (प्रस्तुत विडंबनाप्रमाणेच) क्षीण प्रयत्न!

"ओळखलंत का 'सर' मला", खवत आला कोणी
आयडी होता ओळखीतलाच, अशुद्ध होती वाणी

काही आयडींची फार्फ्फार आठवण येऊन डॉळॅ पाणावाळॅ!

तासभर रुसला, नंतर हसला, बोलला व्यनी पाहून
कंपूबाज पाहुणे आले, गेले ऊतमात घालून

मिपावर मानापमान, रुसवीफुगवी, व्यनिमनी, कंपूझंपू, उतमात इत्यादी एकांकिका चालतात हे नवपरिणितांना समजवायचा एक प्रयत्न! यालाच तूर्तास स्तुत्य म्हणूयात!

आपलीच खव असल्यागत द्व्यर्थी संवाद बरळले
संपादक स्वस्थ राहतील कसे, काही खडे वगळले

लै पावरबाज कडवं! यावर काहीही न बोलणे शहाणपणाचे!

अवांतर नडले, प्रतिसाद उडले, धागे वाचनमात्र झाले
रडण्यासाठी माझ्याकडे खरड-व्यनी राहिले

जुने स्कोअर्स सेटल करताना येउ शकणारे प्रॉब्लेम्स आणि त्यातून होणारी प्रतिसादकर्त्याची जीवघेणी मनस्थिती यांचे एक प्रातिनिधिक वर्णन! संपूर्ण विडंबनात एकमेव वाचनयोग्य ओळ!

डुप्लिकेट फौज घेऊन संगे, 'सर' आता लिहीतो आहे
डुआयडींची किमया न्यारी, टॉप पंचविसात नेते खरी! हेच सत्य, प्रतिसाद मिथ्या!

नवीन प्रतिसाद देतो आहे, नविन रिक्रूट जमवत आहे
कंपू येती, कंपू जाती, प्रतिसादांची रेलेचेल होती
नंतर आयडी एकटा पडला, नवे रिक्रूट जमवू लागला वगैरे वगैरे!

कात्रीकडे हात जाताच रडत रखडत हसला
"संपादन नको सर जरा कंपूबाज हटवा!"

आपण सगळेच अर्जुन! कुणाला लपवणार, कुणाला फाशी देणार?

(सर उवाच)
लैच भारी!

"मला नाही त्यांनी सोडलं, सोड तुझा बाणा
तुम्हीतरी सर्व आयडींनी मला 'आपलं म्हणा!'"

हे वाक्य कुणा एका आयडीला उद्देशून आहे, त्याचे नावही इथे गुंफण्याचा प्रयत्न झालेला दिसतो आहे. त्याबद्दल अधिक न बोलणे हेच उत्तम!

झेंडू-grudge (अर्थात 'झेंडूच्या फुलां'वरचा माझा grudge)

-- (प्रतिसाद-ए-मेगाबाईट्स) असुर

मस्त कलंदर's picture

8 Sep 2010 - 1:43 pm | मस्त कलंदर

मला नाही त्यांनी सोडलं, सोड तुझा बाणा
तुम्हीतरी सर्व आयडींनी मला 'आपलं म्हणा!'"

सॉल्लीड... आवडली गं तुझी झेंडूची फुले.....

जाता जाता: आजकाल कुणीही उठतो आणि व्यनि पाठवतो नै????
(संदर्भः ज्यांच्यासाठी आहे त्यांना कळाले आहेच.. इतरांनी उगीच आपल्यावर ओढवून घेऊ नये)

सहज's picture

8 Sep 2010 - 1:48 pm | सहज

>.. इतरांनी उगीच आपल्यावर ओढवून घेऊ नये)

आपल्याला एकापेक्षा जास्त लोकांचे व्यनि येतात हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न!

बाकी निदेंशी सहमत!

मस्त कलंदर's picture

8 Sep 2010 - 3:44 pm | मस्त कलंदर

सहजकाकांना ते सोडून इतरांना व्यनि करता येतो असे वाटतच नाही वाट्टं!!!

असू दे !! व्यनि पाठवणारे बहुतेक एक षष्ठांश गोरे लोक शोधून मग व्यनि पाठवत असावेत.

स्वाती दिनेश's picture

8 Sep 2010 - 1:47 pm | स्वाती दिनेश

चिमटे झक्कास!
स्वाती

मेघवेडा's picture

8 Sep 2010 - 1:48 pm | मेघवेडा

बॉर्र्रं..

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Sep 2010 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

+ १ + डुर्र्रं..

छोटा डॉन's picture

8 Sep 2010 - 1:57 pm | छोटा डॉन

चान चान, एकदम कडक ... !!!
फु ....

अवांतर नडले, प्रतिसाद उडले, धागे वाचनमात्र झाले
रडण्यासाठी माझ्याकडे खरड-व्यनी राहिले

हे एकदम बेश्ट्य !!!

- छोटा डॉन

अवांतर : ह्या धाग्याचेही स्पॉट फिक्सिंग झाले आहे काय ?

इतकी विडंबनं करुनही अजुन तुम्ही वृत्तात मार खाता हे पाहुन खेद वाटला. असा फुल्टॉस विषय असताना अशा चुका करत जाउ नका. बाकी अपेक्षित कंपुबाजांचे अपेक्षित प्रतिसाद आले आहेत आणि येतीलच.

-अनपेक्षित कंपुबाज.

चिंतामणी's picture

9 Sep 2010 - 11:51 pm | चिंतामणी

बाकी अपेक्षित कंपुबाजांचे अपेक्षित प्रतिसाद आले आहेत आणि येतीलच.

हे बरीक लई लई खरे.

तासभर रुसला, नंतर हसला, बोलला व्यनी पाहून >>>

हा हा हा हा ...

अवातंर : बघ मी म्हणत नव्हतो, प्रतिभेला 'कच्चा माल' सापडलेच म्हणुन !!

बहुआयामी राडेबाज...आपल हे.... कंपुबाज--

पैसा's picture

8 Sep 2010 - 8:17 pm | पैसा

तासभर रुसला, नंतर हसला, बोलला व्यनी पाहून >>>

आमच्यासारख्या मिपावर काल "जन्माला आलेल्या" लिंबूटिंबूना सुद्धा कळलं बरं का !!!!
:D

प्रीत-मोहर's picture

8 Sep 2010 - 3:28 pm | प्रीत-मोहर

ही & ही

इंटरनेटस्नेही's picture

8 Sep 2010 - 3:31 pm | इंटरनेटस्नेही

लै भारी विडंबन! लेखणीत जादु आहे हो तुमच्या....

(स्वगतः मिपा वर एक कंपुंची यादी प्रसिद्ध करावी काय?)

चिंतामणी's picture

9 Sep 2010 - 11:53 pm | चिंतामणी

(स्वगतः मिपा वर एक कंपुंची यादी प्रसिद्ध करावी काय?)

मनावर ध्या आणि लौकर करा हे काम.

म्हंजी आमाला जरा मार्गदर्शन होएल त्यातुन.

जागु's picture

8 Sep 2010 - 4:39 pm | जागु

मस्त.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Sep 2010 - 5:05 pm | परिकथेतील राजकुमार

बेष्ट !
लै दिसानी पाशवी विडंबन वाचावयास मिळाले.

झ का स !

विशाल कुलकर्णी's picture

9 Sep 2010 - 5:27 pm | विशाल कुलकर्णी

सहमत !

आणखी एक कंपुबाज ;)

मितान's picture

8 Sep 2010 - 5:10 pm | मितान

:)

:)

श्रावण मोडक's picture

8 Sep 2010 - 6:11 pm | श्रावण मोडक

तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूच्या? की त्या एका संपादकासारखं डिप्लोमसी शिकू लागला आहात?
एकाच विडंबनात एकाचवेळी सगळ्यांचंच असं कौतूक करणं फक्त त्या संपादकालाच जमतं. तुम्ही पूर्वी संपादक होता त्याचा हा हँगओव्हर म्हणायचा काय?
काही प्रश्न -
१. येथे शुद्धता फाट्यावर मारली जाते हे ठाऊक असूनही अशुद्ध वाणी असे आपण का लिहिले?
२. संपादक खवही संपादित करू लागले का?
३. संपादक जे काही वगळतात त्यांना खडे हा शब्द आपण 'मोत्ये' या अर्थाने योजला आहे का?
४. अवांतर, प्रतिसाद वगैरे गेल्यानंतर खाली गाळ शिल्लक राहतो असे म्हणतात. तरीही तुमची त्याविषयी तक्रार आहे का?
५. डुप्लिकेट फौज घेऊन सर पुन्हा लिहू लागले, यातील पुन्हा या शब्दाचे प्रयोजन काय? आधी तसे नव्हते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2010 - 11:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूच्या? की त्या एका संपादकासारखं डिप्लोमसी शिकू लागला आहात?

मी निवेदिका, (निवेदिता जोशी नव्हे). बाजू घेणं हे विडंबकाचं काम नसून, सद्य परिस्थितीवर भाष्य करणं हे आहे.

१. येथे शुद्धता फाट्यावर मारली जाते हे ठाऊक असूनही अशुद्ध वाणी असे आपण का लिहिले?

टोचतं ते लिहीलं, दुसरं काय? लोकांची प्रायव्हसीही जिथे फाट्यावर मारली जाते तिथे शुद्धतेची लक्तरंच मिळणार ना!

२. संपादक खवही संपादित करू लागले का?

आता करू शकत नाहीत एवढंच सांगू शकते.

३. संपादक जे काही वगळतात त्यांना खडे हा शब्द आपण 'मोत्ये' या अर्थाने योजला आहे का?

माझ्या डोक्यात तो अर्थ नव्हता, पण रत्न आणि दगड एकाच मापाने मोजणार्‍या तुम्हां ऋषितुल्यांकडून हा वेगळाच 'पैलू' समजला.
खडे वगळले याचा अर्थ आयडी पाहून संपादन वगैरे वगैरे वगैरे! ;-)

४. अवांतर, प्रतिसाद वगैरे गेल्यानंतर खाली गाळ शिल्लक राहतो असे म्हणतात. तरीही तुमची त्याविषयी तक्रार आहे का?

छे हो, गाळ काय वाचायचा? अवांतरातच खरी गंमत नाही का?

५. डुप्लिकेट फौज घेऊन सर पुन्हा लिहू लागले, यातील पुन्हा या शब्दाचे प्रयोजन काय? आधी तसे नव्हते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

नव्हे, डुप्लिकेट फौजा घेऊन पुन्हा, नव्या जोमाने, तक्रारखोर लिहू लागले असा अर्थ लावणं अपेक्षित आहे.

बाकी आम्ही संपादक होतो ही गोष्ट खरी, पण खरं बोललेलं तेव्हा न खपल्यामुळे, किंवा महत्त्वाच्या माणसाच्या खपल्या निघाल्यामुळे आम्हीच पायउतार झालो हा इतिहासही तुम्हांस माहित असेलच! :-)

इन्द्र्राज पवार's picture

8 Sep 2010 - 6:21 pm | इन्द्र्राज पवार

"सदाश्रितपदा ! सदाशिवमनोविनोदास्पदा !
स्वदासवशमानसा ! कलिमलांतका ! कामदा !
वदान्यजनसद्गुरो ! प्रशमितामितासन्मदा !
गदारिदरनंदकांबुजधरा ! नमस्ते सदा. "

~~ मोरोपंतांची ही 'केका' रडतखडत का होईना कधीतरी समजावून घेतली होती. पण वरील 'फटका' कसला आहे, तो कुठल्या वृत्तात आहे, त्याचे गण कोण, मात्रा किती... हे दोनतीन वेळा वाचून समजते का ते पाहिले... पण ईल्ला !

पुढे कधीतरी अदितीताई यांचीच शिकवणी लावतो व विडंबन समजावून देण्याची विनंती करतो.... तोपर्यंत चालू द्या !

इन्द्रा

राजेश घासकडवी's picture

9 Sep 2010 - 12:31 pm | राजेश घासकडवी

हे कंपू कंपू खूप ऐकलंय, नक्की काय प्रकरण असतं बुवा? आणि एखाद्या संपादकालाही छळ व्हावा अशी काय बरं त्यांची शक्ती असते? छे, फार कोड्यात टाकणारी कविता. कवयित्रीने जे खुलासा म्हणून लिहिलं आहे, त्याने आणखीनच चक्रावून जायला होतं. फाटा, खडे, मोत्ये, पैलू वगैरे इतरही काही शब्द रूपकात्मक वापरलेले आहेत - ग्रेसच्या कवितांत जसं घोडा, झाड, राधा वगैरे वापरलेले दिसतात तसं - त्याचे खोलवर दडलेले अर्थ कळल्याशिवाय कविता कळतच नाही. कदाचित ती भिकार असेल किंवा कदाचित लय भारी, तेव्हा काहीच निष्कर्ष न काढणंच बरं.