नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

स्वानंद मारुलकर's picture
स्वानंद मारुलकर in जे न देखे रवी...
5 Sep 2010 - 2:11 pm

भाग्य दिसते जे समोरी ते मला लाभेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

नाहि दिसली ती कधी मग भेटणे अमुचे कुठे?
भाबड्या जीवास का मग आतुनी आशा फुटे?
काय पडली भूल ही माझ्या मना उमगेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

का सकाळी भास होतो पैंजणांचा अंगणी?
अन् चुलीच्या जवळ वाजे काकणांची किणकिणी
चिमूटभर त्या कुंकवाचे भाग्य मग उजळेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

मांडले शब्दात मी ह्रदयात जे हुंकारले
फक्त आशा एक की मजला दिसावी पाउले
या मनीचे हे मनोगत त्या मनी पोचेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

शृंगारसंगीतप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

5 Sep 2010 - 3:14 pm | अविनाशकुलकर्णी

बापरे ...लागेल का?...पोचेल का?...उजळेल का? किति प्रश्ण ...किति सरबत्ति

स्वानंद मारुलकर's picture

5 Sep 2010 - 10:35 pm | स्वानंद मारुलकर

उत्तर द्या :)

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 11:01 pm | शिल्पा ब

<<नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

इतके प्रश्न विचारून वैताग दिला तर नक्कीच नाही..

इंटरनेटस्नेही's picture

5 Sep 2010 - 11:48 pm | इंटरनेटस्नेही

ही ही ही. असेच म्हणतो.

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2010 - 12:08 am | राजेश घासकडवी

लिहीत राहा.

स्वानंद मारुलकर's picture

6 Sep 2010 - 7:43 pm | स्वानंद मारुलकर

सर्वांचा आभारी आहे.

>>इतके प्रश्न विचारून वैताग दिला तर नक्कीच नाही..
घ्या!! म्हणजे एवढी कविता करुन काहीच उपयोग नाही म्हणायचा.

माझी ही कविता कोणाला आवडेल का?
ही ओळ शेवटी टाकणार का?

वेताळ's picture

7 Sep 2010 - 6:47 pm | वेताळ

पण ती नक्कीच तुम्हाला सोडुन गेली असणार. भाग्यवान आहे .