बेहती हवा सा था वो...(येथे ऐका..)
३ इडियटस् चित्रपटातलं हे अप्रतिम गाणं. एका हरवलेल्या मित्राबद्दलचं हे मनोगत..
विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही. महाविद्यालयीन दिवसातली मैत्री.. सख्ख्या भावापेक्षाही अधिक जवळची..
कोण आहे हा मित्र? कोण आहे हा मनाला कायमची रुखरुख लावून गेलेला..? कोण आहे हा दोस्तीचा प्रसन्न शिडकावा करून गेलेला? कसा आहे तो? कसा होता तो?
मंद-मोकळ्या झुळुकेसारखा..वा-याची एक झुळूक. जी फक्त सुख आणि सुखच घालते आपल्या पदरात..! अगदी सहज कुठेही स्वच्छंदपणे हेलकावणा-या पतंगासारखा..! स्वत:च स्वत:ची वाट शोधणारा.. वेळप्रसंगी धडपडणारा पण सावरून पुन्हा आपल्याच मस्तीत मार्गक्रमणा करणारा..! आताचा क्षणच काय तो महत्वाचा, उद्याचं माहीत नाही असं म्हणून मस्त मजेत जगणारा..!
कहा से आया था वो?
छुके हमारे दिलको
कहा गया उसे ढुंडो..!
कुठून आला माहीत नाही... पण जीव लावून गेला.. आता शोधायला हवा त्याला..! :)
तळपत्या उन्हातल्या एखाद्या शांत सावलीसारखा होता तो.. दूरदूरपर्यंत पसरलेल्या वैराण वाळवंटात एखादं गाव लागावं त्या गावासारखा आश्वासक होता तो..
आम्ही तसे थोडेसे कुपमंडूकच.. थोडेसे घाबरलेले, थोडेसे बावरलेले.. पण तो तसा नव्हता. तो वेळप्रसंगी गोते खायचा, पण आमच्या सारखा लहानश्या बावडीत नव्हे, तर नदीच्या अथांग पात्रात.. आणि गोते खाऊनदेखील पुन्हा प्रवाहाविरुद्ध पोहणारा..!
विंदांनी 'वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे..' असं म्हटलंय.. तो अगदी तसाच होता.. आमचा होता तो.. अगदी खूप आमचा..! त्याला शोधायला हवा..!
मंडळी, खूप जीव लावणारं गाणं आहे हे.. अगदी हळवं करणारं...
आमिरखानचं, शरमन जोशीचं, मॅन्डी माधवनचं, बोमनचं... सा-यांचंच खूप खूप कौतुक करावसं वाटतं..
आणि अर्थातच.. राजू हिरानीचं..!
प्रिय राजू हिरानी,
अरे 'हृषिदा' नावाचा एक खूप मोठा माणूस होऊन गेला, तू वावरतोस त्या चित्रसृष्टीत.. !
तुझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत रे.. हृषिदांनी जसा आम्हाला निखळ आनंद दिला तसाच तू ही द्यावास इतकंच वाटतं रे..!
- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
29 Aug 2010 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही. महाविद्यालयीन दिवसातली मैत्री.. सख्ख्या भावापेक्षाही अधिक जवळची..
अगदी खरं आहे....! निरपेक्ष मैत्री आणि अशा मित्रांबरोबरचे तेच दिवस खरे जगण्याचे दिवस असतात. बाकी, बेहती हवा सा था वो....क्या कहने....!
-दिलीप बिरुटे
29 Aug 2010 - 10:39 pm | सुनील
मस्त...
29 Aug 2010 - 10:52 pm | पैसा
खूपच छान!!!!
29 Aug 2010 - 10:54 pm | आळश्यांचा राजा
क्या बात है!
29 Aug 2010 - 10:56 pm | उपेन्द्र
एका थोर सिनेमा मधल्या एका थोर गाण्याचं तेवढंच थोर विवेचन...
विसोबा .. पूर्वीच्या दूर गेलेल्या मित्रांची आठवण आणून देवून मनात खळबळ माजवलीत...
29 Aug 2010 - 10:56 pm | शुचि
>> विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही.>>
डोळ्यात फक्त पाणी यायचं बाकी राह्यलय.
>> विंदांनी 'वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे..' असं म्हटलंय.. तो अगदी तसाच होता.. आमचा होता तो.. अगदी खूप आमचा..! त्याला शोधायला हवा..! >>
सुंदर!!
तात्या फॉर्मात! मस्त तात्या मस्त. खूप आनंद दिलात या लेखानी.
29 Aug 2010 - 11:09 pm | रेवती
या सिनेमातली सगळीच गाणी चांगली आहेत. चित्रपटाची सुरुवात या गाण्यानं होते आणि शिनेमा चांगला असणार याची खात्री पटते. तात्या लेखन आवडले.
29 Aug 2010 - 11:51 pm | मी-सौरभ
>>प्रिय राजू हिरानी,
अरे 'हृषिदा' नावाचा एक खूप मोठा माणूस होऊन गेला, तू वावरतोस त्या चित्रसृष्टीत.. !
तुझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत रे.. हृषिदांनी जसा आम्हाला निखळ आनंद दिला तसाच तू ही द्यावास इतकंच वाटतं रे..!
तात्या : लई भा हा री ही...
30 Aug 2010 - 2:46 am | इंटरनेटस्नेही
मस्त!
30 Aug 2010 - 5:34 am | शुचि
योगायोग - आज टारझन चा वाढदिवस आहे आणि हा लेख मिपावर आला आहे. टारगटांची आठवण येते आहे. मिस यु टारझन!!!!!!!!
:( :( :(
30 Aug 2010 - 10:06 am | अमोल केळकर
मस्त लेखन
अमोल
30 Aug 2010 - 1:02 pm | कुक
कालच पाहिला सेट मेक्स वर छान आहे.
30 Aug 2010 - 1:08 pm | सहज
सर सह्या बदला किंवा सह्यांची रचना कृपया बदला.
दुधी गोड हलवा
अजुन एक बहुतेक गोव्याच्या ताई आहेत. काही लिहून झाल की सगळ आलबेल. पूर आला ५०० लोक गेली लगेच पुढच वाक्य सगळ काही आलबेल.
छ्या! सह्या / सह्यांची रचना बदला रे!
30 Aug 2010 - 2:25 pm | नितिन थत्ते
जुन्या सिस्टिममध्ये प्रि-डिफाइन्ड सही प्रतिसादात एम्बेड होई. आता ती अॅपेण्ड होते.
त्यामुळे सध्या जी सही आहे तीच नव्या जुन्या सर्व प्रतिसादांवर दिसते.
आज असलेली सही २००७ मधल्या प्रतिसादांवरही दिसते.
हे बदलायला हवे आहे.
समजा पुढे पाकिस्तानशी युद्ध होऊन विजय मिळाला आणि एखाद्या सदस्याने "आम्ही विजयी झालो" अशी सही बनवली तर ती सही त्याने २६/११/२००८ संबंधी 'इतके इतके मृत' वगैरे धाग्यावर २००८ मध्ये दिलेल्या प्रतिसादाखालीही दिसेल.
30 Aug 2010 - 2:02 pm | समंजस
गाणं आवडलं, सिनेमा आवडला आणि गाण्याचं, सिनेमाचं रसग्रहण सुद्धा आवडलं :)
30 Aug 2010 - 2:05 pm | चिंतामणी
हृषिदांनी जसा आम्हाला निखळ आनंद दिला तसाच तू ही द्यावास इतकंच वाटतं रे..!
एकदम सही रे.
एकदम सहमत
30 Aug 2010 - 6:36 pm | अरुंधती
चित्रपट छानच आहे....
ऋषिदांसारखे निखळ मनोरंजनाचे किंवा कलेतून सकारात्मक संदेश हसत खेळत देणारे दिग्दर्शक दुर्मिळच!
त्यांनी जसा आपल्या अनेक कलाकृतींमधून चित्ररसिकांना आनंद दिला तसाच आनंद नव्या दिग्दर्शकांनी द्यावा असं वाटतं! :-)
1 Sep 2010 - 10:54 am | विसोबा खेचर
प्रतिसाद देणा-या रसिकांचे तसेच सर्व वाचनमात्र मान्यवरांचे आभार..
तात्या.