आले आले गणपती माझ्या घरी आले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
29 Aug 2010 - 1:53 pm

आले आले गणपती माझ्या घरी आले

आले आले गणपती माझ्या घरी आले
आगमनाने...त्यांच्या...
आगमनाने त्यांच्या हो...
घर माझे पवित्र झाले... ||धृ||

श्रावण सरता भाद्रपद महिना सुरू होता
शुक्ल चतुर्थीला गणपती बसता
आनंदाने...
आनंदाने...
मन भरून आले ||१||

मुर्ती सुंदर सुबक घरी आणली
मंदिर करूनी तिला सजवली
भक्तीभावाने...
भक्तीभावाने हो...
आरती ओवाळूनी गणेशा वंदीले ||२||

उत्सव असे हा दहा दिवसांचा
मेहनत घेवूनी आरास करण्याचा
गणेशा भजण्या...
गणेशा भजण्या हो
सारे एकच उत्साहाने न्हाले ||३||

मोदक लाडू नैव्येद्य दाखवूया
प्रसादासाठी हात पुढे करूया
वर्षाच्या सणाला...
वर्षाच्या सणाला...हो
सुटी काढून भाउबंद आले ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०८/२०१०

शांतरससंस्कृतीकविता

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

30 Aug 2010 - 3:12 am | इंटरनेटस्नेही

चांगली आहे.... सहजसोप्या भाषाशैली मुळे आकर्षक झाली आहे!

(गणेशभक्त)