दगड.........
दगडांना आपणच देव बनवतो,
दगडांनी एकमेकां ची टाळकी फोडतो,
दगडांनी ठेचून कुणी बळीहि घेतो,
अन दगडाच्या देवालाच अर्पण करतो.
दगड जोडून सेतू बनतो,
दगड आकारून ताजमहाल घडतो,
दगड तोडून कुणी बावरी खणतो,
आज काश्मिरात दगड बॉम्बहि होतो,
घडवणारे,जोडणारे, अन विध्वंसक,
हात मात्र सारखेच असतात,
“ माणूस ” जातीतील,
माणसाचेच असतात.
दगडांच आपलं बरं असते
भल्याबुऱ्याची त्यांना जाण नसते
विध्वंसक हातांच डोकं मात्र
“ जाणत्या ” पुढारयांकडे गहाण असते.
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
26 Aug 2010 - 6:05 pm | स्पंदना
अतिशय चांगली कविता.
सुन्दर मांडणी, अन अगदी साध्या शब्दात माडलेले विचार.
कविता आवडली निरंजनजी.
27 Aug 2010 - 7:25 am | निरन्जन वहालेकर
धन्यवाद अपर्णाजी !
अभिप्रायासाठी आभार ! उत्साह वाढला ! ! !
29 Aug 2010 - 7:04 pm | एक अनामी
अतिशय सुंदर कविता...
आपल्याला कवितेचा आशय खूपच भावला...
सुंदर...
31 Aug 2010 - 5:17 am | अथांग
आणि विचार..
छानच !
31 Aug 2010 - 12:17 pm | निरन्जन वहालेकर
धन्यवाद ! ! !
श्री.एक अनामी व श्री.अथांग साहेब !